'खूब लडी मर्दानी'च्या निमित्ताने..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

खूब लडी मर्दानी.. मर्दानी?
हो, स्त्री असूनही स्त्रीत्वाच्या मर्यादा सांभाळून आपल्या हक्कासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी लढणारी मर्दानी!
एका स्त्रीला काय हवं? सहा महिने तरी कुटुंबाला पुरेल एवढे अन्न आणि सहा महिने तरी धकवता येइल एवढे सरपण..
मनुला-मणिकर्णिकेला कधी वाटलं असेल का, तिचा असा एक comfort zone असावा? राजबिंडा पती-संसार-मुलं..बस्स्-हेच जीवन असावं? ती स्त्रीच होती, तिच्याही मनाशी ह्या भावना असतीलच. पण, या जगात-'किसीको मुक्कमिल जहाँ नही मिलता'..
तिलाही काही मिळालं, काही गमवावं लागलं. पती गेला, मुलगा गेला, राज्यही गेलं. पण hats off तिच्या खडतर परिस्थितीवर मात करणार्‍या लढाऊ वृत्तीवर! विशेष करून तिच्या वयाला न शोभणार्‍या तिच्या असामान्य बुद्धीवर! बुद्धीच कशाला? तिचं असं जे जे काही होतं ते खूपच सुंदर होतं. ती एक रुपवती, गुणवती स्त्री होती. त्या रुपातही पराक्रमाचं तेज होतं.
तो काळ असो, किंवा आजचा, तिच्याशी कुणाही स्त्रीची तुलना होऊ शकत नाही. लहानपणापासूनच स्वत:च्या आयुष्याला हवे तसे वळण लावत, पुढे जाणार्‍या कणखरपणाला काय म्हणावे? चुल-बोळकी-बाहुल्या खेळण्याच्या वयात तलवार पेलणार्‍या हातांना काय म्हणावे?
आधी तिनं दत्तक पुत्राला आपला वारस ठरवावा म्हणून ब्रिटीशांना खलिता धाडला. तो हक्क नाकारला गेला आणि झाशीच्या राणीने आपल्या साथीदारांबरोबर बंड पुकारले-By hook or crook, मेरी झाँसी नही दूंगी!-काय आत्मविश्वास, केवढा दुर्दम्य आशावाद?
तिने ते बंड पुकारले नसते; strategy ठरवली नसती; ती ठिणगी तेव्हा पडली नसती, ब्रिटिशांनी राणीचा दत्तक पुत्र अधिकृत वारस ठरवला असता तर-
-तर अजूनही आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असण्याची शक्यता नाकारता येत्ये का?
ती स्वतः तळपणारी तलवार होती, असामान्य स्त्री होती.

आणि आपण? किती खुजे? आजुबाजुच्या प्रत्येक व्यक्तीला for granted घेऊनही अजूनही किती परावलंबी? आपण एक तर past मध्ये जगतो-म्हणजे तेव्हा असं केलं असतं तर तसं झालं असतं-माझ्या वडिलांनी Degree करायची परवानगी दिली नाही, नाहीतर मीही शिकले असते type. किंवा दिवास्वप्न बघतो-पुढे असं होइल, तसं करेन वगैरे. पण वर्तमानाला धरून हवा तसा shape देण्याचा प्रयत्न केलाय का? can you take risk?
राणी जेव्हा लढाईच्या मैदानात उतरली तेव्हा तिने risk चा विचार केला नसेल का? केला असेलच. तसा विचार करूनही, केवळ तिशीत असलेल्या कोवळ्या पोरीने ब्रिटीशांना धोबीपछाड करून सोडावे. आणि आपण एक साधा निर्णय घ्यायला कारणं का शोधावीत?
जागे व्हायला हवयं ना? हे 'जागेपण' स्वतःपुरते मर्यादीत नकोय. स्त्रीच किंवा पुरुषचं अश्या मर्यादाही नको. झाशीची राणी-एक सळसळणारं व्यक्तिमत्व होतं. त्या ठिणग्या आपल्यात, आपल्या मुलाबाळात - सर्वात असावे अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?
मी हिंदु, तू ख्रिश्चन, किंवा मी मराठी, तू तमिळ अश्या बिनबुडाच्या घोषणा देत, असलेल्या कचर्‍यात अजून थोडी भर घालत 'घाण' करत बसण्यात काय अर्थ आहे?
कुणाकडेही बोट दाखवतांना बाकीची बोटं आपल्याकडं निर्देश करतात, हे विसरून कसं चालेल?
जागे होऊ या आणि आपल्या उज्ज्वल भविष्याला आणि happenning वर्तमानकाळाला सामोरे जाऊ या!

मला तसं या निमित्ताने बरंच काही लिहिता आलं, त्यासाठी शैलजा(आणि तिने वेळोवेळी दिलेले reminders :P) आणि नानबा यांचा लेख हे निमित्त झालेत. दोघांचेही धन्यवाद.

याशिवाय 'खूब लडी मर्दानी' ही कविता माझ्या रंगीबिरंगी पानावर टाकल्याबरोबर, मराठी website वर हिंदी लिहीलेच कसे-अश्या अर्थाचा- अगदी धावतपळत येऊन प्रतिसाद देणार्‍यांनादेखील मनापासून धन्यवाद! Proud

एक सुचना: ह्या लेखातले विचार माझे आहेत. तुमच्यापर्यंत जर ह्या भावना पोचल्या तर आनंद आहे, नाहीतर फार मनावर घेऊ नका Happy

विषय: 
प्रकार: 

सुरेख ! मस्त लिहिलयसं चिन्नु ,
झाशीची राणी , अहिल्यादेवी , सावित्रीबाई खरोखरच किती कठीण परिस्थितीत त्यांनी आणि त्यांच्यासारख्या अनेक स्त्रियांनी लढा दिला . या सगळ्यांना मानाचा मुजरा .

सुर्यकिरण, शैलजा, छायाताई, श्री, शुभं, भाऊ भावना पोहोचल्या हे पाहून आनंद वाटला.
शुभं, चित्रात नक्की झाशीचीच राणी आहे का? मी राणीचा असा फोटो/चित्र कधीच पाहीला नाही. सतत घोड्यावर बसून, तलवार हातात घेतलेली निग्रही चेहर्‍याचंच चित्र पाह्यलयं.

मस्त लिहिलस. कविता वाचून आणखीनच रक्त सळसळलं.
शाळेत होती कविता. फारच मस्त वाटलं पुन्हा वाचून.
एक सांगू का? तू लिहिलस "केवळ तिशीत असलेल्या कोवळ्या पोरीने ब्रिटीशांना धोबीपछाड करून सोडावे...".
पण कवितेत राणीचं वय "तेईस" (२३) असं आहे.
तर ते "विशीत" असायला हवं का?

आणि आपण? किती खुजे? आजुबाजुच्या प्रत्येक व्यक्तीला for granted घेऊनही अजूनही किती परावलंबी? आपण एक तर past मध्ये जगतो-म्हणजे तेव्हा असं केलं असतं तर तसं झालं असतं-माझ्या वडिलांनी Degree करायची परवानगी दिली नाही, नाहीतर मीही शिकले असते type. किंवा दिवास्वप्न बघतो-पुढे असं होइल, तसं करेन वगैरे. पण वर्तमानाला धरून हवा तसा shape देण्याचा प्रयत्न केलाय का? can you take risk?>>हे खूप आवडला .. उगाच काही तरी गोंजारत बसायचा स्वभाव कधी तरी राग येतो ..आणि रिस्क घेणा स्वभावात का बसत नाही ह्याचा खूप विचार .. विचार विचार .. Sad

एक सांगू का? तू लिहिलस "केवळ तिशीत असलेल्या कोवळ्या पोरीने ब्रिटीशांना धोबीपछाड करून सोडावे...".
पण कवितेत राणीचं वय "तेईस" (२३) असं आहे.
=================================
जाणकार लोक राणीचा जन्म १८२८ सालात झाला असे म्हणतात.
१८५७ साली तिचे वय तीस बरोबर आहे

अथक, नमुसी, प्रित, नलु, सुनिधी, सर्वांना धन्यवाद.
शुभं, दुर्मिळ छायाचित्र पोस्टल्याबद्दल धन्यवाद.
पण ती तशीच आवडते-चेहर्‍यावर तेजःपुंज भाव ल्यालेली आणि हातात ढाल, तलवार असणारी अशी.

१८५७ ची लढाईत फक्त राणीचाच सहभाग होता असे नाही. It was team effort. इथे राणीचा उल्लेख मी त्या लढाईची प्रतिनिधी या स्वरूपात करू इच्छीते. लढाईच्या वेळेस जात-पात-धर्म भेदभाव करत बसायला कुणाकडे वेळ होता? सर्वच स्वातंत्र्याच्या वेडाने भारले गेले होते. असं वादळ पुन्हा यायला हवंय.

नमुसी, इथे पहा. तसेच मी एक ब्रिटीश अधिकार्‍याचं पत्रंही वाचलं होतं, ज्यात त्याने राणीची छबीचे वर्णन दिलं होतं, जे त्याला पडद्याआडून फक्त काही क्षण न्याहाळायला मिळालं होतं. त्यातही Timeline दिली होती. मला link मिळाल्यास डकवते.
तिशीत असो का विशीत पण राणीने केलेल्या साहसापुढे तर आपण सदैव नतमस्तक होणार.

Back to top