आपली पृथ्वी
.
पुनम न टाकलेल्या चित्रावरुन एकदम लक्षात आल कि मला पण बरेच दिवसापासुन उर्विका ने (वय वर्षे साडे पाच) काढलेल चित्र इथ टाकायचय.(Thanks पुनम )
सध्या तिला शाळेत रिसायकलिंग ,आपल्या पृथ्वीचे कस संरक्षण कराव इत्यादी शिकवत आहेत.
तिला एखादी गोष्ट आवडली तर ती बरेच दिवस ते विसरत नाही आणि तासनतास त्यावर बोलत असते.
आमच्या भागात आम्ही बरच रिसायकलिंग already करतोच. (त्या साठी वेगवेगळे ट्रॅश कॅन पुरवलेले आहेत.)पण घरातही माझ्या पाणी वापरण्यावर तिच नेहमी लक्ष असत.
Dishes करताना नळ चालु ठेवला तर २/३ मिनिटाच लेक्चर हमखास ऐकाव लागत.
ती दिवसभर चित्र काढत असते. म्हणजे अगदी टिव्ही बघताना सुद्धा. पण अलिकडे पेपर च्या दोन्ही साईड्स वापरण इत्यादी चालु आहे.
तिच्या या उपक्रमात सामिल व्हाव म्हणून मी तिला किचन मध्ये "पेपर टॉवेल्स किंवा पेपर नॅपकिन्स" वापरण बंद करेन अस सांगितल.
संपुर्ण पणे पेपर टॉवेल्स बंद करण मला तरी खुप कठीण वाटल. बघु. आता दोन महिने झाले अजुन तरी संकल्प चालु राह्यलाय.
हे चित्र Earth Day साठी काढलेल नव्हत. मागच्या महिन्यात काढल असाव. कारण मला ते तिच्या कप्प्यात तेव्हा सापडलय. आमच्या घरी पाहुणे म्हणुन रहायला येणार असाल तर कमीतकमी एकदा तरी तिच लेक्चर ऐकण्याची तयारी ठेवुन या.
मस्त काढलंय चित्र. त्या खालचा
मस्त काढलंय चित्र. त्या खालचा तिने इंग्लिशमधून लिहिलेला मजकूरही गोड एकदम. काय एकेक विचार चालू असतात नाही पोरांच्या डोक्यात.
तुझी प्रस्तावना वाचून उर्विकाबद्दल अभिमान दाटून आला अगदी
किती छान आहे चित्रं. इतक्या
किती छान आहे चित्रं. इतक्या लहान वयात किती समज आहे उर्विकाला.
खुप गोड.
मस्त चित्रं काढलयं . मजकुर तर
मस्त चित्रं काढलयं . मजकुर तर सहीच आहे. आजकालच्या एवढ्या लहान मुलांमध्येपण किती समज आहे .
उर्विकाचं खुप खुप कौतुक !!!
मस्तच. एक से बढकर एक कलाकार
मस्तच. एक से बढकर एक कलाकार मुलं आहेत माबोकरांची
कसलं गोड आहे उर्विकाचं चित्र!
कसलं गोड आहे उर्विकाचं चित्र! मजकूर तर एकदम ढिश्क्यांव!!!
उर्विका मस्तच गं. छानच काढलय
उर्विका मस्तच गं. छानच काढलय चित्र, आणि या वयात ती 'go green' बद्दल जागरुक आहे ही खूप चांगली गोष्ट आहे.
चांगलंय चित्र
चांगलंय चित्र सीमा.
लेक्चरच्या बाबतीत मोदक. आमच्याकडेही मधून मधून असा ताप येतो नी लेक्चरबाजी ऐकावी लागते. फक्त रोज स्वतःच जे महास्नान चालतं त्यात ते तत्वज्ञान वाहून जातं.
मस्त काढलय
मस्त काढलय
छान आहे चित्र.. डिझाईन वगैरे
छान आहे चित्र.. डिझाईन वगैरे एकदम मस्त काढलंय
भारी आहे रच्याकः - एकंदर
भारी आहे
रच्याकः - एकंदर नवी पोरं आइबापाला लय ऐकवतात असं दिसतंय...
छानच. केवढा विचार करते ग
छानच. केवढा विचार करते ग ह्या वयात.
मस्त! खूप छान विचार. संकल्प
मस्त! खूप छान विचार. संकल्प विनाघोर तडीस जाऊ दे.
सायो
मस्त!!! काय समज आहे या वयात
मस्त!!!
काय समज आहे या वयात ग्रेट.
छान काढलयं चित्र. आणि
छान काढलयं चित्र. आणि एव्हढ्याश्या वयातले विचार पण किती छान.
तुझ्या संकल्पासाठी शुभेच्छा!
उर्विकाचे चित्र अगदी कल्पक
उर्विकाचे चित्र अगदी कल्पक आणि सुंदर आहे! तुमच्या संकल्पाला शुभेच्छा!!
खूपच छान चित्र आणि
खूपच छान चित्र आणि विचार...कौतुक वाटलं. माझ्या मुलीलाही दाखवलं.
वॉव. सीमा. कसलं सुपरमस्त
वॉव. सीमा. कसलं सुपरमस्त चित्र आणि विचार आहेत गं. उर्विकाचे कौतुक वाटले अगदी.
विषयाला धरुन आहे म्हणुन
अतुल कुलकर्णी ( नट) यांची मुलाखत नवर्याने कुठेतरी पाहिली/ऐकली. ते एक/दोन वीजेची उपकरणे सोडुन स्वतःच्या मुंबईतल्या घरात कुठलेही विजेचे उपकरण वापरत नाहीत म्हणे. आणि त्यांनी एक जागा विकत घेऊन त्यावर जंगल करतायेत म्हणे. चु.भु.द्या.घ्या.