प्रेमाच्या व्याख्या आत्तापर्यंत खूप खूप केल्या गेल्या असतील.जर एखाद्या शिघ्र कवीला विचारल तर तो तितक्याच शिघ्रपणे उत्तर देइल, ' प्रेमभंग म्हणजेच प्रेम'.जर कोणा विज्ञान शिक्षकाला विचारल तर तो प्रेमाचे गूणधर्म, रचना, उप-युक्तता यावर तासाची बेल वाजेपर्यंत व्याख्यान देइल.जर कोणा मध्यमवर्गीय (अर्थातच व्ही आर एस वाल्या) मराठी माणसाला विचारल तर तो म्हणेल दर साल दर शेकडा ८ टक्के दराने वाढते तेच खरे प्रेम. जर कोणा चित्रपट कलाकाराला विचारल तर तो म्हणेल ' दर वर्षी जे बदलते (म्हणजे प्रेम, प्रेयसी नव्हे) तेच प्रेम होय'. जर कोणा डॉक्टर किन्वा वैद्याला विचारल तर तो तपासण्या केल्याचा आव आणून म्हणेल, ' ह्रुदयाचे अनियमीत आकूंचन आणि प्रसरण आणि नाडीची अनियमीतता म्हणजेच प्रेम. (एखादा कुशल गोल्ड मेडलीष्ट, व्यवहारी डॉक्टर ह्यालाच बॉडीली रेस्पीरेटरी डिसॉर्डर असे म्हणून भले मोठे सुबक प्रिस्क्रीपशन लीहून देइल.)
तर थोडक्यात काय तर प्रेमाची वैश्विक मान्यताप्राप्त व्याख्या अजून बनलेली नाहीये.प्रेमा तूझा रंग कसा तर तो ज्याला जसा जाणवेल तसा. त्याच प्रमाणे आपल ते प्रेम आणि दूसर्याच ते लफड असही आपल्या तो बाब्या आणि दूसर्याच ते कार्ट या न्यायाने म्हणता येइल. असाच कोणी एक महाभाग (जरी महाभाग असलो तरी तोमी नव्हेच) आपल्या चौकस नयनांनी रस्त्यावरच्या सुबक ठेंगण्या, नव यौवना, रूप गर्विता वगैरे वगैरे न्याहाळत बसी. आणि जर त्यातली एखादी आवडलीच तर तडक जाउन तिला गाठे आणि विचारे , " माझ आय लव यू आहे,तूझ काय ?". आणि बरेचदा उत्तर ऐकण्यासाठीही थाम्बत नसे. उगाचच नकार, प्रेमभंग अशी झंजट नको.त्यान्यायाने त्याचा सक्सेस रेट १०० टक्के होता. यथावकाश सालाबाद प्रमाणे त्याचही (अरेरे त्याचही ) लग्न झाल. त्याचा लग्नसोहोळा (अगदी रजीस्टर्ड मेरेज असल तरी सोहोळाच तो) पार पाडला आणि तोही सुखाने नान्दू लागला.
तसे म्हटले तर प्रेमाची लक्षणे अनेक आहेत. झोप उडणे,भूक न लागणे, शेरो-शायरी सुचणे (आणि इतरांची झोप शेरोशायरीने उडवणे) अशी. अगदीच प्रेमभंग झाला तर दूसर प्रेम शोधता येत की (मार्च परीक्षा जमली नाही तर ऑक्टोबर परीक्षा असतेच की) आणि तेही नाहीच जमल तर कवीतांच उत्पादन सुरू करता येत.
प्रेमवीर प्रेयसीला , तूझ्यासाठी चांदण्याचा हार करेन येथपासून ते तूझ्यासाठी चन्द्रावर दोन बेडरूम्च घर बांधेन अस काहीस सांगत असतो (माझी मध्यम वर्गीय मराठी मानसिकता मला २ बेडरूमच्या पूढे जाऊच देत नाही). किन्वा तूझ्यासाठी इंद्रधनूष्याचे रंग आणेन अशी राजकीय आश्वासन देत असतो.कारण चंद्रावर जरी घर बांधल तरी अजून तरी प्रुथ्वी ते चंद्र अशी शटल सेवा सुरू झाली नाहीये, त्यामूळे ते बांधलेल घर बघायला जाणार कोण? त्यापेक्षा, खार घरला २ बेडरूमच (पून्हा २ बेडरूमच) घर बांधेन तेथे २४ तास नळ असेल (अगदी पाणी नसल तरी) अशी विधायक आश्वासन तो का बर देत नाही? किन्वा तूझ्यासाठी अमेरीकन डायमंड चा सेट आणेन अस का बर सांगत नाही. म्हणजेच अव्यवहारी प्रेमात व्यवहार्य असतच की.
त्यातही प्रेम 'सामनेवाले खीडकी' वाल असेल तर अतिउत्तम. प्रेयसीला पहाताच, प्रियकराला आंगावर कोणीतरी चांदण्या शिम्पडल्याचा भास होतो (खर तर छत गळत असत). प्रेयसीच्या कटाक्षाने ह्रुदयी कळा ऊठत असतात (प्रत्यक्षात दूपारी बेसूमार हादडल्याचा तो परिणाम असतो). प्रेयसी वारंवार खिडकीत येउन आपल्याला दर्शन देतेय आस त्याला वाटत असत ( खर तर प्रेयसी धूतलेले कपडे वाळत घालायला किन्वा खिडकीत बसलेल्या कावलेल्या कावळ्याला उडवायला आलेली असते). आणि अचानकच एक दिवस प्रेयसीच्या घरी कसली तरी गडबड जाणवते. 'सबसे आगे सबसे तेज' मोलकरीणी कडून कळत की, त्या मूलीच लग्न ठरलय आणि आज त्यांच्याकडे देवकार्य आहे.मग काय विचारता? आकाशातला तारका उल्का बनून आपल्या मस्तकावर कोसळल्याचा भास प्रियकराला होतो.दुख्खी मनाला बर वाटाव म्हणून उदरात जास्तीच अन्न सामावल जात. आणि प्रेमाचा एकमेव साक्षीदार तो प्रेयसीच्या खिडकीवरचा तो कावणारा कावळा, प्रियकराच्या खिडकीवर स्थानपन्न झालेला असतो.
खचलेल्या प्रियकराला अचानक जाणवत की पूढच्या महीन्यात आपली परीक्षा का काय ते आहे.पूस्तक शोधायला हवीयेत. कॉलेज नावाच्या वास्तूत आपल्याला प्रवेश करायला हवाय. आपला अटेंडन्स पूर्ण झालेला नाहीये. आणि जड अंत:करणाने एक दिवस तो कॉलेजमध्ये प्रवेश करतो.केंटीन मध्ये चहा तयार नाही म्हणून नाईलाजाने लेक्चरलाही बसतो. आणि अचानकच त्याच लक्ष समोरच्या वर्गाकडे जात. तेथे तिसर्या बाकावर एक सुकूमार, सुकोमल नवयौवना स्थानापन्न झालेली असते. प्रियकराला आंगावर चांदण्या शिम्पडल्याचा भास होतो.छातीत कसली तरी कल उठते. ईतकच काय तो कावलेला कावळाही वर्गासमोरच्या झाडाच्या फान्दीवर विराजमान झालेला असतो. आणि प्रियकराच वेड मन गुणगुणू लागत 'प्यार किये जा.प्यार किये जा.'
नितिन
नितिन
माझी मध्यम वर्गीय मराठी मानसिकता मला २ बेडरूमच्या पूढे जाऊच देत नाही). खरच हि एक ओळ विचार करायला भाग पाड्ते मराट। मानसाला पण शेवटि मराटि माणुस विचार करण्या पलिकडे काय करु शकतो.नाहि का?
माझी मध्यम वर्गीय मराठी मानसिकता मला २ बेडरूमच्या पू>>>
बन्धो
आता १ BHK हे सुद्धा स्वप्नातीत झालय रे. मुंबई असो वा पुणे.
प्रेम
नहितरि आता प्रेमाच्या अश्याच व्याख्या बनल्या आहेत.
हि नहितर ति....
चांगलं
चांगलं लिहिलंय केदार..
मस्तSSSSSSच
छानच रे केदार भाऊ!!!
आवडेश!!!
केदार, मी बरचं उशिरा वाचलयं.
केदार,
मी बरचं उशिरा वाचलयं. पण लेख अगदी फर्मास आहे.......
प्यार क्या है ...... बस इक
प्यार क्या है ...... बस इक ख्वाब है दिवानेका !!!!
(No subject)
(No subject)
'प्यार किये जा.प्यार किये
'प्यार किये जा.प्यार किये जा.>> ह्म्म्म्म खरंय