बडबड गीत

Submitted by कविन on 22 April, 2010 - 01:05

आईची हाक आली पळा पळा Proud
कामाची यादी सांगते पळा पळा
हे पुसुन ठेव, ते भरुन ठेव
म्हणे आंबे खुप खाल्लेस;
अता थोड जेव
जेवणात काय? तर पोळी नी भाजी
महिन्यातुन एकदाच म्हणे खावी पावभाजी Sad
उन्हात नको जाऊ म्हणे "सनस्ट्रोक होईल"
गर्दीत नको धावु "पळवुन कोणी नेईल"
घड्याळाची टिकटिक,
आईची किटकिट थांबतच नाही
मनासारख वागता येतच नाही Sad

सानुच्या आवाजात

गुलमोहर: 

मस्त कविता.....

अचानक बालपणाची आठवण आली......

मला सुद्धा वाटायचं, काय हि किटकिट थांबतच नाही...

खरच छान कविता, ;;;;;;;;;;;;;; फोडतय.

Wink Wink Wink

मंजात्ते तुझ्यामुळेच लिहिली गेलेय हो ही कविता का काय आहे ते Proud आणि इतक्या जुन्या कवितेला अचानक उर्जितावस्था आलेय म्हणजे घरोघरी बच्चेकंपनीने "नवीन काय पण ऐकव" अशी मागणी वजा हट्ट नोंदवलेला दिसतोय Proud