IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन प्रभावी "मोटीव्हेटर" असावा.... आहेच. रायुडू , तिवारीसारखे नवोदित इतक्या कठीण परिस्थितीत रॉयलसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध बिनदिक्कत आपला स्वाभाविक खेळ खेळतात ! रायुडू तर एखाद्या कसलेल्या नियमित यष्टीरक्षकासारखा झपाटल्यागत झेपावतो !! "पोलार्ड हा प्रतिभावान "इम्पॅक्ट" खेळाडू आहे " असं म्हणून त्याला सतत संघात स्थान देणार्‍या सचिनच्या विश्वासाला पोलार्ड अफलातून खेळी करून सार्थ ठरवतो !!! फर्नांडो व मलींगा श्रीलंकेसाठी टाकत नसतील इतकी जीव तोडून मुंबईसाठी गोलंदाजी करतात !!!
सुरवातीलाच कॅलीससारख्याचा सोपा झेल धवनकडून सुटला. सचिनच्या त्यावेळच्या संयमाचं कौतुक वाटलं. मला वाटतं, त्याच्या ह्याच परिपक्वतेमुळे खेळाडू संघासाठी इतक्या आत्मीयतेने खेळतात.

भाऊ तुम्हाला अनुमोदन्...सचिन बरोबर आपण एका संघात आहोत एवढी प्रेरणा त्यांना पुरेसे आहे.
कालच्याच सामन्यात अनिल कुंबळेने मनःशांन्ती घालवली .कुंबळेच्या गोलंदाजीवर मिस्फील्ड झाले तर त्याच्या समोर उभे राहणे त्या क्षेत्ररक्षकाला कठीण जायचे (अगदी कुंबळे कर्णधार नसला तरी).
सचिन रत्नपारखीही आहे. पहिल्या हंगामानंतर त्याने नेहराला देऊन शिखर धवन घेतला, उथ्थप्पाला देऊन झहीर घेतला..उथ्थप्पा याच मोसमात चांगला खेळलाय. आयसीएल मधले रायुडू, सतीश पण त्याने हेरून ठेवले आणि त्यांची आधीच तयारी चालू असावी.
पण नायरला इतक्या उशिरा का उतरवले? बहुधा त्याची गोलंदाजी कमी पडत असावी. पोलार्ड्ची गोलंदाजी फळू लागल्यावर सतीश मॅकलरनची जागा नायरला देता आली.
भारतीय संघातले स्टार्स मात्र नुसत्या मोटिव्हेशनवर चालत नाहीत, त्यांना कॅरट बरोबर स्टिक पण लागते का?

नायरला दुखापत होती म्हणून तो खेळत नव्हता. सचिन फायनल खेळेल कारण त्यानंतर अनेक दिवस क्रिकेट ला आराम आहे त्यामुळे तो ही रिस्क सहज घेईल.

आज डेक्कन जिंकावे म्हणजे मुंबईला फायनल सहज जाईल. Happy

भरतमयेकर,
<<कुंबळेच्या गोलंदाजीवर मिस्फील्ड झाले तर त्याच्या समोर उभे राहणे त्या क्षेत्ररक्षकाला कठीण जायचे (अगदी कुंबळे कर्णधार नसला तरी).>> आधीच खजील झालेल्या क्षेत्ररक्षकाला खच्ची करण्यात आपले बरेच कप्तान माहीर आहेत ! आत्ताच हेडनचे ४वर व ६वर झेल सोडले गेले. गिलख्रिस्टची प्रतिक्रीया सचिनसारखीच संयमी व सौम्य होती !
[ ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्सवर्थ याला त्या देशाच्या बलाढ्य क्रिकेट संघात स्थान मिळत असूनही त्यान हॉकी
निवडलं, चार वर्षं संघावर प्रचंड मेहनत घेऊन त्या देशाचा हॉकीचा जबरदस्त संघ घेऊन तो मुम्बईच्या १९८२च्या विश्वचषकासाठी आला. पाकीस्तान वि. ऑस्ट्रेलिया अंतिम सामना होणार हे लगेचच स्पष्ट झालं.
उपांत्य सामना टाय-ब्रेकरवर गेला आणि ऑस्ट्रेलियाच्या ज्येष्ट व हुकमी खेळाडूने नेमका पेनल्टी स्ट्रोक
चुकवला व तो संघ स्पर्धेबाहेर गेला. तो धिप्पाड खेळाडू तर मैदानातच कोसळून ओक्साबोक्षी रडायलाच लागला. चार्ल्सवर्थ शांतपणे त्याच्याकडे गेला, त्या खेळाडूचं डोक आपल्या खांद्यावर घेऊन जवळ जवळ हंसत त्याला थोपटून आपल्या इतर सहकार्‍यांकडे घेऊन आला. त्याचवेळी, माझ्यासारखच अख्या स्टेडियमने कप्तानाचा एक आदर्श मनात कोरून ठेवला !]
बोअर नाहीना केलं ?

बिल्कुल नाही. असे साधेच किस्से माणसाचे मोठेपण दाखवून देतात.

तसा कुंबळे शांत आहे, पण काल काय झाल ते माहित नाही. सचिन पण द्रविडची कॅच झेलल्यावर प्रचंड आनंदी झाला होता. लिग मॅच मध्येही कोणीतरी आउट झाल्यावर हातातला बॉल एकदम जोरात खाली मारला होता. (आनंदानेच) पण ते सचिन कडून बघायला ऑड वाटले होते.

आजकाल गोलंदाज विकेट घेतल्यावर नृसिंहावतार का घेतात कळत नाही? हे स्पोर्टस सायकॉलॉजीतलं काही आहे का?म्हणजे त्याना तसं करा असं सांगितलं जातं का?
विंबल्डन जिंकल्यावर ओक्साबोक्शी रडत जमिनीवर कोसळणारा आंद्रे आगासी मला अजून पण आठवतो. जस्टिन हेना तर गौतम बुदधाचा अवतार वाटते.

अनेक बॅटसमननी त्यांना बेमौत चौके छक्के हाणल्यावर तसे करने एक व्हेन्ट ठरतो त्यांच्यासाठी. अन्यथा बॉलर्ससाठी काय आहे?

कुल ड्युड डिड ईट अगेन. Happy बॅड लक हैद्राबाद.

फायनल, मुंबई वि. चेन्नई...
बोला पब्लिक लावताय आकडा ???? Proud

ठरवून हारले लेकाचे हैद्रबाद.... गिली आणि गिब्स सुरुवातीपासूनच हारयच्या इराद्यानी खेळत होते... १४० हा अजिबात मोठा स्कोर नाही. आणि सहज करण्यासारखा आहे.. पण सुरुवातच जर टेस्ट मॅच सारखी केली तर काय होणार...
फिक्सिंग फिक्सिंग... Wink
फायनल मुंबईच जिंकणार.. लावताय आकडा...

हिम्सकूल आणि इतर खेळपट्टीचे जाणकार लोकहो, डी वाय पाटिल स्टेडियमची खेळप्ट्टी बदलल्यासारखी वाटत आहे का??

मुंबई बंगलोर आणी कालच्या सामन्यात मला हे जाणवत होतं.. बॅट बॉलवर येत नव्हता वगैरे म्हणतात ना तसं जाणवत होतं...

भरतमयेकर,
<<आजकाल गोलंदाज विकेट घेतल्यावर नृसिंहावतार का घेतात कळत नाही?>> माझा अंदाज :
टी-२० मध्ये बहुतेक विकेटस फलंदाजांने नाईलाजाने केलेल्या घाईमुळेच पडतात. त्यामुळे, गोलंदाजाना त्याचं फुकटचं श्रेय घेण्यासाठी कॅमेर्‍यापुढे असले चाळे केल्यावाचून गत्यंतरच नसावं !
हिम्स्कूल,
<<फिक्सिंग फिक्सिंग...
फायनल मुंबईच जिंकणार.. लावताय आकडा...>> तुम्हालाही "आंतली" खबर मिळालीय कीं काय !

डी वाय पाटिल स्टेडियमची खेळप्ट्टी बदलल्यासारखी वाटत आहे का?? >> ?
टेस्ट मॅच मध्ये पण शेवटच्या दोन दिवसात खेळपट्टी बदलते. त्या पिच वर सारख्या मॅच होत असल्यामुळे तिला मेंटेन करता येत नाही, मग पीच कोरडी होऊन भेगा पडतात व बॉल हातभर वळतो.

बर्‍याच रिपोर्टर लोकांना देखील क्रिकेट कळत नाही. ( म्हणजे रन्स, विकेट वगैरे कळतात पण इतर गोष्टी जसे पीच, आउटफिल्ड वगैरे) त्यामुळे हे वर्तमानपत्रात अश्या कंड्या पिकवतात असे वाटते. इग्नोर देम.

मुंबई बंगलोर आणी कालच्या सामन्यात मला हे जाणवत होतं.. बॅट बॉलवर येत नव्हता वगैरे म्हणतात ना तसं जाणवत होतं...>>
नंदिनी.. शक्यतो पाठोपाठच्या मॅच मध्ये त्याच खेळपट्टीवर नसतात.. शेजारी शेजारी तीन तर खेळपट्ट्या बहुतेक सगळ्याच ग्राऊंड वर असतात.. त्यामुळे मुंबई बगलोर आणि कालच्या मॅचची खेळपट्टी वेगळी असण्याची शक्यता खूप आहे.. नक्की माहित नाही....
बॅट बॉलवर येत नाही... हा अत्यंत वाईट excuse आहे.... अंतरराष्ट्रीय स्तरावर एवढे सामने खेळल्यानंतर बॉल नीट बॅट वर येत नाही म्हणून खेळायला जमले नाही असे म्हणणे खरे तर लाजिरवाणे आहे..
भारत विरुद्ध श्रीलंकाच्या कोलकत्ता(वर्ल्डकप.. तीच ती कांबळीची प्रसिद्ध मॅच) इथे झालेल्या मॅचमध्ये जसे घडले तसे जर असेल किंवा कोटला वर जसा बॉल कसाही येत असेल तसे असेल तर मग खेळता येत नाही म्हणल्यास अर्थ आहे.. पण अन्यथा ते फक्त हरल्यावर देण्याचे एक कारणच वाटते मला..

कालच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीत गिब्स आणि गिलीनी सुरुवात केली ती नक्की टी-२० ची नव्हती.. आणि त्या दोघांची तर वनडे मधलीही नव्हती.. राहुल द्रविड परवा त्यांच्यापेक्षा जोरात खेळत होता जिंकायच्या इराद्याने पण त्याचे दुर्दैव..

<<कालच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीत गिब्स आणि गिलीनी सुरुवात केली ती नक्की टी-२० ची नव्हती..>> अगदी खरंय. फलंदाजीतले एकवेळचे हे दोघे "टेररीस्ट" वयानुसार थोडे मवाळ होऊ शकतात पण निर्वाणीच्या सामन्यात त्यांची अशी गोगलगाय होणं ... नाही पटत !!

पण गिली अणि गिब्स या आय्पीएल मधे कुठे चाललेत?गिब्स्चा स्ट्राइक रेट ११३ आहे. गिलीचे आकडे जरा बरे आहेत पण सातत्य नाही शेवटच्या चार सामन्यात ७,९,१०,१५ धावा...फॉर्म नाही.गिब्स वाँडरर्स मधल्या ४३४ च्या पाठलागानंतर पुन्हा कधी तसा खेळला होता का? आफ्रिकेच्या संघात पण तो नाही ना आता?
भाऊ कितीकदा गोलंदाज मार न खाता विकेट मिळाली तरी आक्रस्ताळे होतात आणि हे फक्त २०-२० मधे नाही कसोटी मधे पण दिसते..आणि फलंदाजाला घायकुतीला आणणं हा गोलंदाजाचा विजयच ना? झहीरने मुलाखतीत म्हटलेय की २०-२० मधे पण मुंबईचे गोलंदाज धावा वाचवण्यापेकक्षा बाद करण्यावर लक्ष देतील.

मुंबई बगलोर आणि कालच्या मॅचची खेळपट्टी वेगळी असण्याची शक्यता खूप आहे..>>

शक्यता नव्हे, तसंच घडलं होतं. सुरुवातीच्या पिच रिपोर्टपासून ते शेवटच्या अवॉर्डपर्यंत याचा उल्लेख होत होता. शिवाय मला नाही असं वाटलं की कोणी पिच वाईट होती म्हणून आम्ही हरलो असं कारण देत बसलं होतं. कसोटी, ५०-५० किंवा २०-२० , प्रत्येक सामन्याचा शेवती कर्णधाराला हाच प्रश्न विचारला जाताना पाहिलाय "पिचबद्दल काय वाटलं". तेव्हा त्यत नवीन काही नाही.

भरतमयेकर यांनी वर लिहिलेच आहे गिब्स आणि गिलीच्या या वर्षीच्या फॉर्मबद्दल. त्याचबरोबर चेन्नईच्या गोलंदाजानाही योग्य ते श्रेय द्या की कधीतरी. प्रत्येकवेळी "मॅच फिक्सींग"चा चष्मा घालून पहायची गरज नाही. धोनीची कल्पक रणनिती, आक्रमक क्षेत्ररक्षण आणि त्याप्रमाणे अचूक गोलंदाजी ही कारण होती डेक्कनला धावा न करता येण्याची.

समीर ला अनुमोदन, धोनीने पंजाब विरुद्धचा सामना इर्फान पठाणच्या शेवटच्या षटकात फिरवला तेव्हा पुन्हा मॅच फिक्स का असे विचारले.हा धोनी वर अन्याय नाही का? धोनी असा सामना फिरवू शकतो हे आधी पाहिलेय ना आपण. लंकेविरुद्धच्या १८३ नाबाद आठवा.

धोनी हा धूर्त व जिगरी कप्तान आहे . शिवाय त्याला अफलातून "टेंपरॅमेंट" आहे व त्याचे गोलंदाजीतील व क्षेत्ररक्षणातील फेरबदल चेन्नईच्या यशाला कारणीभूत आहेत, हे वादातीत आहे. तरी पण गिब्स व गिलीचा
त्या मॅचमधील खेळ अनाकलनीय होता, असं मला अजूनही वाटतं. त्यांचा फॉर्म नाही हे एकदम मान्य पण त्यांचा फिटनेस स्पष्ट आहे, त्याना अनुभव प्रचंड आहे . असं असूनही, त्या दिवशी त्यांच्या खेळामध्ये जो नवशिकेपणा तीव्रतेने जाणवला, तो केवळ फॉर्मच्या अभावामुळे समर्थनीय ठरण्यासारखा नव्हता; थोडक्यांत, त्यांचा त्या दिवशीचा "अ‍ॅप्रोच" व "अ‍ॅटीट्यूड' खटकला, त्यानी मोठी धावसंख्या उभी केली नाही ,हे नाही खटकलं.
कॄपया मी हटवादीपणा करतो आहे असं समजू नये. पण "फॉर्म"चं अँटीबायॉटीक कशासाठीही वापरून
ते सवंग होतंय असं गेले कांही वर्षं मला जाणवतंय, म्हणून हा आगाऊपणा.

तरी पण गिब्स व गिलीचा त्या मॅचमधील खेळ अनाकलनीय होता, असं मला अजूनही वाटतं.>>

फक्त त्या मॅचमध्ये नाही तर यंदा सर्व सामन्यांमध्ये गिब्स, गिली, हेडन, रॉस टेलर हे व्यवस्थीत खेळू शकले नाही आहेत. अनेक कारणं आहेत. त्यांचा फॉर्म, एकंदर क्रिकेट सामने खेळण्याचा अभाव, चांगली गोलंदाजी, सुधारलेलं क्षेत्ररक्षण.

ओके, मला फक्त एक शंका आली होती. पटेल असे उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. Happy

बर्‍याच रिपोर्टर लोकांना देखील क्रिकेट कळत नाही. ( म्हणजे रन्स, विकेट वगैरे कळतात पण इतर गोष्टी जसे पीच, आउटफिल्ड वगैरे) त्यामुळे हे वर्तमानपत्रात अश्या कंड्या पिकवतात असे वाटते. इग्नोर देम.>>> केदार हे असे रिपोर्टर जास्त करून इलेक्ट्रॉनिक मीडीयामधे आहेत रे.. वर्तमानपत्रामधे लिहिणारे सीनीअर रिपोर्टर बरेच नॉलेजवाले आहेत.. ज्युनिअर्स बद्दल बोलूच नये!!!

फायनलला मी मुंबईला सपोर्ट करणार.. मॅच फिक्स असो वा नसो!!! कॅप्टन म्हणून धोनी कायमच ग्रेट ठरलेला आहे. स्वतः एखाद्या मॅचमधे अपयशी ठरला तरी इतराकडून गरज भासेल तसा खेळ "करवून" घेण्याची त्याची प्रतिभा आहे.

भाऊ आज डेक्कन चार्जर्सनी आज तुम्हाला समजवण्यासाठी खेळ केला का?
त्याना या वर्षी बहुधा मोटिव्हेशन नसावे. गेल्या साली त्यांना कलंक पुसून काढायचा होता. पण चार्जर्स पहिल्या सालापासूनच नाव मोठ लक्षण खोट असे आहेत्...गिल्ख्रिस्ट , गिब्स, सायमन्ड्स, आफ्रीदी अशी नावे पाहुन विरोधी क्षेत्ररक्षकाना मैदानात खुर्ची टाकून आराम करता येईल असे वाटले, पण आयपील ने दाखवले की इथे मोठ्या फटक्यांपेक्षा प्लेसमेंट महत्त्वाचे आहे. त्यांचे गोलंदाज मात्र नेहमीच भाव खाऊन गेले..पहिला साली आर पी सिंग, यंदा हॅरिस आणि ओझा तीनही साली.
आयपील ने गोलंदाजांनाही बरेच काही शिकवले, हे नक्की.

मोदी यांच्या ट्विटर वरील माहीती नुसार उद्या च्या आयपीएल-३ च्या सांगता सोहळ्यामधे ए.आर. रेहमान आणि लता मंगेशकर हे सहभागी होणार आहेत.
"Watch A R Rehman conduct the closing ceremony tomorrow. Lata Mangeshkar will honour us with a live performance."

भरतमयेकर,
<<पण आयपील ने दाखवले की इथे मोठ्या फटक्यांपेक्षा प्लेसमेंट महत्त्वाचे आहे.>> जर सुरवातीचे चेंडू सचिनच्या बॅटवर "मिड्ल" होत नसतील, तर टोलवाटोलवीच्या फंदात न पडता नेम़कं हेंच करून तो धांवसंख्या उभी करताना आपण बघतोच ना ! गिली, गिबससारख्या दांडग्या अनुभवी खेळाडूना "फॉर्म " नसताना असं खेळण्याची गरज उमजूं नये, हे खरंच खटकतं ! कालची "फुलटॉस"वरची गिलीची विकेट
म्हणजे कळसच होता ! आपल्या नवोदित खेळाडूंच खरंच कौतुक वाटतं !!
<<आयपील ने गोलंदाजांनाही बरेच काही शिकवले, हे नक्की.>> नि:संशय.

Pages