Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 18:47
आपल्या घरी, कॉलनीत, सोसायटीत अथवा मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??
त्याचे वर्णन इथे प्रतिसादात लिहा अथवा प्रकाशचित्र चढवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती
गणपती बाप्पा मोरया .-----
सगळेच बाप्पा , आरास सुन्दर ..............
यो रोक्स चा गावचा गणपती बघून डोळे भरून आले........
पायीच्या
पायीच्या घागरी रुण्-झुण वाजती,
नाचत नाचत आले गणपती,
त्यांच्या नादाने अंबर डोलती,
शंकर्-पार्वती कौतुन पहाती !!!
हा आमच्या घरचा बाप्पा-
आणि ह्या आईच्या घरच्या गौराई-
ही बाप्पासाठी थोडी फुले
काय मस्त
काय मस्त वाटलं इथे येऊन. सगळ्यांच्या सजावटीपण एकदम मस्त.
ह्या वेळी
ह्या वेळी गणपती साठी मुंबईला जाता नाही आलं ...घरचे गणपती miss केले..
पण इथे बंगलोर मध्ये आमच्या नंदी गार्डन्स मधिल हे गणेशोत्सवाचे पहिले वर्ष.. सोसायटित ह्या वर्षी प्रथमच गणेशोत्सव झाला.
:)गणपती बप्पा मोरया....
गणपती बाप्पांचा किती थाट्माट..
मोदकांनी भरून गेलंय सग्गळं ताट ...
चैन पडेना आम्हाला......
गणपती
गणपती बाप्पा मोरया!!!
मंगलमुर्ती मोरया!!!
सिन्ड्रेल
सिन्ड्रेला बाप्पाचा हार किती छान केला आहेस....गौरी पण मस्त...तु दिलेल्या गणेशवेलाच्या बिया मी पण लावल्या आणि त्याला पण फुले आली आहेत. धन्स गं!!
.
संपदा मोदक मस्तच झालेत..नैवेद्य केळीच्या पानावर..छानच.
सगळ्या
सगळ्या फोटोंमध्ये जे आणि जेवढे मोदक आहेत ते सगळे इकडे पाठवून द्या बरं लवकर.
बाप्पा मोर्या !
परागकण
सगळे
सगळे बाप्पा एकदम झक्कास आहेत
यावर्षी
यावर्षी सिंगापुरात असल्याने घरचा गणपती घरीच करायचं ठरवलं. गणपती न रंगवता पूजेत सांगितल्याप्रमाणे पार्थिव- म्हणजे मातीचाच - ठेवला. आरासही केळीच्या पानांनी रचली.
जवळूनः
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
अप्रतिम!!!
अप्रतिम!!! आरास खूपच छान दिसत्ये.
सर्वांचे
सर्वांचे बाप्पा आणि आरास व नैवेद्य छान!
फ, बाप्पाचे डोळे सुरेख आलेत. मूर्ती एकदम झकास.
हे आमचे
हे आमचे बाप्पा..
माझ्या आजोबांचे मामा हे पुरी पीठाचे शंकराचार्य होते. त्यांनी आजोबांना पंचधातूचा एक साचा दिला होता. हा साचा वापरूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी बाबा शाडूच्या मातीची मूर्ती तयार करतात. या मूर्तीची उंची तीन इंच आहे.
पूर्वी बाप्पा आमच्याकडे सव्वा महिना राहत. रोज सकाळी मूर्ती तयार करायची, आणि संध्याकाळी विसर्जन करायचं. मूर्ती तळव्यावर ठेवून आजोबा ब्रह्मणस्पतीसूक्ताचा अभिषेक करत. दर अनंत चतुर्दशीला ११११ मोदकांचा गणेशयाग असे.
आता मात्र गणपतीचा मुक्काम फक्त दीड दिवस असतो.
फा तुमच॑
फा तुमच॑ कैतुक वाट्ल.
सगळ्या बाप्पा॑ना मनापासून मोरया.
गणपती
गणपती ब्लूमिंग्टन इलिनॉयमधला
आम्ही नितिन, विभा आणि जय महाजन ब्लूमिंग्टनमध्ये इलिनॉय स्टेट मध्ये राहतो. जयचा जन्म झाल्यापासून गणपती बसवायला सुरुवात केली. हा आमचा तिसरा गणेशोस्तव, पाच दिवसांसाठी बसवितो.
अमेरीकेमध्ये सहजपणे उपलब्ध होणार्या सामानातून सुंदर सजावट व मांडणी करण्याचा आनंद काही औरच असतो. ह्या वर्षी थर्माकोलचा 'कलश' बनविला. पताकाही घरीच बनविल्या त्यामुळे महाराष्ट्रातच असल्यासारखे वाटले.
दररोज आरतीला ३०-४० मित्र-मंडळी होती. एकूण पाच दिवसांत जवळपास १५० लोकांनी गणपतीचे दर्शन व प्रसादाचा आनंद घेतला.
चौथ्या दिवशी लोकल 'आर्ट ऑफ लिव्हींग' ग्रुप ला आमंत्रित करुन भजनाचा कार्यक्रम आयोजीत केला. विशेष म्हणजे हा भजनाचा कार्यक्रम अमेरिकन व्यक्ती Ken Thornton याने लीड केला. Ken शंकर, गणपती, कॄष्ण आदिंचे भजन गीटार सोबत सुरेख गातो. सर्वांनी भजनाचा आनंद लुटला.
पाचव्या दिवशी गणपतीचे " गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या!" घोषणेने विसर्जन केले.
आपला,
नितिन महाजन
गणपती भजन कार्यक्रम भाग - १
[video:http://video.google.com/videoplay?docid=8384792112201554164&hl=en]
गणपती भजन कार्यक्रम भाग - ३
[video:http://video.google.com/videoplay?docid=-5076435113507815211&hl=en]
व्वा..!! सगळ्
व्वा..!!
सगळ्यांचेच बाप्पा खूप सुंदर आहेत....
परदेशी असलेल्यांनी साजरा केलेला गणेशोत्सव आवडला..त्यांचे मनापासून अभिनंदन!
यो...तुमचो गावाकडलो बाप्पा तर... विचारायची सोयचं नसा...
चिनूक्स..सूरेख आहे साचेबद्ध मूर्ती....पण आता फक्त दिड दिवस...करमत नसेल ना त्यामूळे..
गणपती बाप्पा मोरया.....!
नितीन..भजन
नितीन..भजन खूपचं सूरेख झालयं...
अरे वा
अरे वा मस्तच. खूप कौतूक वाटले. आपला गणपती सगळ्याना मोह पाडतो. माझी एक अमेरीकन मैत्रीण सुद्धा अशीश गणपतीची भक्त आहे. एकदा ती इथे माझ्या आईकडे आली होती गणपती असताना नी अगदी मुर्तीच्या प्रेमात पडली म्हणाली there is something in this idol that attracts me and gives me immense pleasure to see.
फ, गणपती
फ, गणपती खुपच छान झालाय!!
सगळ्यांचे
सगळ्यांचे गणपती आणि आरास अप्रतीम आहे. फ, गणपती मुर्ती खुप सुरेख
फ,
फ, गणेशमूर्ति सुन्दर बनली हे! सिमिट्री (हाच शब्द ना?) चान्गली साधली हे ते डोळ्यात दिसते! कोणत्या मातीची, कोणी केली?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
फ दादा
फ दादा मूर्ति एकदम मस्त झाली आहे.
मला लक्षात आलेल्या काही गोष्टी..
गणपती सरळ सोंडेचा वाटतो आहे. म्हणजे ह्या फोटोत तरी.
आणि त्याचा दात पण उजवा तुटला आहे.. पेण च्या मूर्तिंचा डावा दात तुटलेला असतो...
==================
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे
खराच मन
खराच मन अगदी प्रस्सन्ना झाले.थोड्यावेळ महाराश्ट्रात गेल्यासारखे वाट्ले.
अप्रतीम मुर्त्या,सुरेख आरास आणी नैवेद्य ही.
इथे हलवले
इथे हलवले आहे...
गावाकडच्य
गावाकडच्या घरी महालक्ष्म्या बसवतात ..
त्यांचे काही फोटो .
हे मुखवटे ..
हे फोटो लक्ष्मी बसवल्या नंतर
हा नेवैद्य ...
हा रांगोळीने पाऊलं काढायचा प्रयत्न मी केलेला
****************************
खुपच
खुपच सुंदर! महालक्ष्मि म्हणजे मोठाच खटाटोप असतो, त्यांचि मांडणि, अधले दिवशिचा फुलोरा, दुसरेदिवशिचा पुरणाच्या पोळिचा बेत, दिवे, सोळा भाज्यांचि भाजि, तिसरेदिवशिचि बोळवण. तुमचे फोटो बघुन सगळ्या जुन्या आठवणि ताज्या झाल्यात. खुप खुप धन्यवाद हे फोटो इथे टाकल्याबद्दल.
मराठमोळे,
मराठमोळे, तू आठवणीन्बद्दल बोलतेस,
मी तर म्हणतो की माझ्यासारख्या कित्येकान्ना "हे अस अस, इतक इतक करायच असत/केल जात आपल्या धार्मिक रितीरिवाजान्प्रमाणे" हे देखिल कळून येत हे! हा एक फायदाच नाही काय?
सर्वच फोटो छान!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
सुरेख आणी
सुरेख आणी प्रसन्न मुखवटे
दीप मस्त
दीप मस्त फोटोज....
महालक्ष्मींचे मुखवटे खूपच सुंदर दिसतात... खास करून गौरी सजवल्यावर .. आणी गौरी जेवतात त्या दिवशी तर फारच प्रसन्न मुद्रा असते..विलोभनिय..
पाउलं पण चांगली काढली आहेत... माझ्या माहेरी सुद्धा.. गौरी आणताना अशिच ठिकठिकाणी.. दुध दुभतं.. घराच्या मुख्य कपाटा जवळ .. स्वयंपाकघरात चुली पुढे ( आता कट्ट्याजवळ).... सर्वत्र पाउलं रेखाटत.. त्या त्या ठिकाणी गौरीला आणून... विचारायचं महालक्ष्मी आली .. कशाच्या पायी ? ... सोन्याच्या पायी...
धन्स दीप...
छानच काम केलेस तु हे फोटोज टाकून.. आठवणी .....:)
खूप सुंदर
खूप सुंदर फोटो आहेत गणपती बप्पा आणी गौरींचे!
सिंड्रेला, माझ्या आई कडे पण सेम अश्याच उभ्या गौरी असतातं.
काय मस्त तेज असतं ना त्यांच्या चेहर्यावर.
गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी हळदीकुंकू झालं की रात्री आजी हळदं कुंकू कोयरीत सपाट भरून ठेवत असे.
मग गौरी विसर्जनाच्या दिवशी सकाळी कोयरी उघडून पाही, त्यावर म्हणे तिला छोटे पावलांचे ठसे उमटलेले दिसतं, ते म्हणजे गौरी येऊन गेल्याची खूण
लिंबूटिंब
लिंबूटिंबू, मूर्ती मीच केली. मूर्ती घडवतानादेखील काही फोटो काढलेत. ते इकडे चढवलेत.
हिम्या, सोंड सरळ नाहीये.. समोरून वाटत असेल. पण तसंही समर्थ रामदासांनी आरतीत 'सरळ सोंड' वर्णिलीच आहे. :फिदी:. बाकी, दाताबद्दलचे निरीक्षण अचूक!
दिपूर्झ्या, सही फोटो आहेत! गौर्यांचे मुखवटे आणि विशेषकरून डोळे चितारणारे चितारी जबर कसबी असतात. अतिशय सात्विक आणि वात्सल्यपूर्ण डोळे रंगवतात.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
Pages