बेजबाबदार वृत्तपत्रे की श्रेय उपटण्याची वृत्ती
हे पोस्ट म्हणजे एखादा लेख नव्हे.
आज(२१.४.२०१०) लोकसत्ताच्या नागपूरच्या पत्रकार राखी चव्हाण बाईंनी लिहिलेल्या
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=639...
या बातमीमधे 'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक अरूण नलावडे असं छातीठोकपणे लिहिलेलं होतं. बहुतेक दिवसभर आलेल्या प्रतिक्रियांचा ओघ बघता एकही प्रतिक्रिया नेट एडिशनवर प्रसिद्ध न करता त्यांनी ती ओळच सरळ काढून टाकलेली आहे.
तस्मात छापील प्रतीमधे असलेल्या त्या ओळीसकटचा हा स्कॅन. वाचता यावी म्हणून ती ओळ मुद्दामून मोठी केली आहे.
हे असं खोटं छापून येण्याची ही पहिली वेळ नाही.
'श्वास' चित्रपटाचे दिग्दर्शक हे संदीप सावंतच होते. पटकथा आणि संवादही संदीप सावंत यांचेच होते.
अरूण नलावडे यांचा चित्रपटाच्या दिग्दर्शनाशी काहीही संबंध नाही. ते निर्माते आणि प्रमुख नट होते.
तरीही आजवर अनेकदा लोकसत्ताच नाही तर इतर विविध मोठ्या वृत्तपत्रांमधेही अतिशय सहजपणे दिग्दर्शकाच्या नावाच्या ठिकाणी अरूण नलावडे यांचेच नाव बिनदिक्कतपणे छापून आलेले आहे.
चित्रपटाच्या श्रेयनामावली मधे ही चूक नाही. नटमंडळी आणि तंत्रज्ञ(यापैकी मी एक) यांच्याही मनात दिग्दर्शक संदीप सावंतच याबद्दल संभ्रम नाही.
तरीही ही चूक अधूनमधून कोणी ना कोणी करत असतंच.
याला काय म्हणायचं?
नटालाच केवळ ग्रेट मानण्याच्या सामान्यांच्या वृत्तीतून पत्रकारही सुटले नाहीत असं मानायचं?
कि दिग्दर्शक आणि प्रमुख नट यात मोठा फरक असतो हेच या पत्रकारांना समजत नाहीये?
कि जाणूनबुजून नरो वा कुंजरो वा करत काही व्यक्तींकडून पत्रकारांची दिशाभूल केली जातेय?
कि लोकांची दिशाभूल करण्याचं काही व्यक्तींनी कंत्राटच दिलंय?
आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते? चूक झाल्यावर ती निदर्शनास आणून दिली तरीही त्यावर चुकीची दुरूस्ती होत नाही. सगळंच कॅज्युअली घेतलं जातं. यानंतर हेतूबद्दलच शंका यायला लागली तर चूक काय?
आजवर आम्ही (मी आणि संदीप सावंत) यासंदर्भात सार्वजनिकरित्या कधी बोललो नव्हतो. पण हा हेतुपुरस्सर वा हलगर्जीपणाने केला गेलेला माहितीचा प्रसार आता आमच्या नवीन कामासाठी त्रासदायक ठरतो आहे. त्यामुळे हे बोलण्याची गरज पडली आहे.
शुद्ध मूर्खपणा आहे हा! मी
शुद्ध मूर्खपणा आहे हा!
मी तिथे कमेंट्मध्ये लिहीले आहे श्वासचा दिग्दर्शक संदीप सावंत आहे व नलावडे नाही हे. आयएमडीबीची लिंकही दिलीय. बघु पब्लिश करतायत का!
हा निव्वळ बेजबाबदारपणा असु
हा निव्वळ बेजबाबदारपणा असु शकतो. ह्याच शुद्दीपत्र जर छापल तर हा चुकुन किंवा निष्काळजीपणे झालेली चुक समजावी.
जर ते हे करत नसतील तर ह्या लेखातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत.
मी पण सेम कमेंट टाकलीये
मी पण सेम कमेंट टाकलीये तिकडे.
बस्के, झकोबा आणि दिप्या धन्स
बस्के, झकोबा आणि दिप्या धन्स रे!
झकोबा,
पूर्वीही हा बेजबाबदारपणा झालेला आहे. आणि निदर्शनास आणून दिल्यावरही काही घडले नाहीये.
लोकसत्तात लगेच कॉमेंट दिसत
लोकसत्तात लगेच कॉमेंट दिसत नाही का ईईसकाळ सारखी? मीही कॉंमेट टाकलीय तो लेख वाचुन..
पत्रकारितेत किती भोंगळपणा कराल? बरं नजर्-चुकिने काना-मात्रा चुकला तर ठिक आहे इथे चक्क एकाच श्रेय दुसर्याला दिल जातय.
नी म्हणते तस मुद्दाम होत असेल तर नक्किच संतापजनक आहे.
प्राजक्ता... मला माहीत नाही
प्राजक्ता...
मला माहीत नाही मुद्दाम होतं की नाही ते.
मुद्दाम होत असेल तर पत्रकार की काही हितशत्रू करतात तेही माहीत नाही.
पण हे बरेचदा झाल्यावर makes one wonder....
नी मी तिथे पोस्टायचा प्रयत्न
नी मी तिथे पोस्टायचा प्रयत्न केला पण आत्ता पर्यंत दोनवेळा काही एरर आला. परत पोस्ट केलाय रिप्लाय तिथे.
मी पण प्रतिक्रिया नोंदवली पण
मी पण प्रतिक्रिया नोंदवली पण तिथे प्रतिक्रिया ० असाच आकडा दाखवला जातोय. काय प्रकार आहे? हे नेहमी व्हावे म्हणजे शंकेला नक्की वाव आहे
अगदी सहमत. योग्य व्यक्तीला
अगदी सहमत. योग्य व्यक्तीला योग्य ते श्रेय मिळालेच पाहीजे. भोंगळ पत्रकारितेचा तीव्र निषेध.
तिथे रिव्ह्यू केल्यावर तुमचा
तिथे रिव्ह्यू केल्यावर तुमचा मेसेज दिसेल असं सांगतायत. ते बहुतेक मटासारखेच असावेत गैरसोयीचे सगळे मेसेजेस दिसू न देणारे.
नीधप, वृत्तपत्रे अनावधानाने
नीधप, वृत्तपत्रे अनावधानाने (??) की मुद्दाम करतात हे माहित नाही. पण स्वतः अरूण नलावडे ह्या गोष्टीचा खुलासा करत नाहीत कां? की त्या पिक्चरने ऑस्करपर्यंत मजल मारलीये त्यामुळे ते श्रेय घ्यायला त्यांनाही बरं वाटतं?
हाही मुद्दा आहेच आडो, जर हे
हाही मुद्दा आहेच आडो, जर हे अनेक वेळा झालेले आहे तर नलावडेंनी तरी खुलासा करावा ना एकदा.
आडो आणि दिपूर्झा, आजवर
आडो आणि दिपूर्झा,
आजवर त्यांनी खुलासा केलेला नाही कधीही ही वस्तुस्थिती आहे.
का ते मला माहीत नाही.
नीधप, मग ते ही
नीधप, मग ते ही वृत्तपत्रांइतकेच दोषी आहेत.
नीधप,नलावडेंनी खुलासा केला
नीधप,नलावडेंनी खुलासा केला नसेल तर तु त्यांच्याशी बोलुनच बघ ना. काहि लोकांमधे नसत तेवढ सौजन्य खर बोलण्याच. मीहि बर्याच ठिकाणी त्यांचच नाव वाचलय, तेव्हा तु बोलुनच घे बघु.
किंवा त्या लेखिकेलाच मेल करून
किंवा त्या लेखिकेलाच मेल करून खुलासा केलास तर? अर्थात हा पर्याय तुझ्याही डोक्यात आला असेलच. जाणूनबुजून झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करणं एवढंच तर आपल्या हातात असतं.
नीधप, मीपण ती बातमी
नीधप, मीपण ती बातमी वाचली.
तूम्ही दोघानी, लोकसत्ताच्या संपादकाना आजच पत्र लिहून चूक निदर्शनास आणावि हे उत्तम.
ते खुलासा छापतीलच.
कमालीचा बेजबाबदारपणा, न
कमालीचा बेजबाबदारपणा, न केलेल्या श्रमाचे फळ चाखायला लोकं टपलेलेच आहेत... आऊटडोअर्स शी सहमत.
आणि चूक एकदा होते ठिके. परतपरत कशी काय होते?
--- परत परत होत आहे म्हणुन चुक नसावी, जाणतेपणी होत असावे असे वाटते.
लक्षात आणुन दिल्यावर वृत्तपत्रात 'चुकीची दुरुस्ती' आली तरी ज्यांनी पहिली चुकीची बातमी वाचलेली आहे त्या सर्वांच्याच नजरा दुरुस्तीवर पडतील असे नाही. थोडेफार नुकसान झालेलेच आहे...
उपायांमधे मला वाटतं (अ) सतर्क वाचकांची संपादकांना पत्रे, (ब) होणार्या अन्याया बद्दल संपादकांचे लक्ष वेळ पडल्यास कायद्याची मदत घ्यायची भाषा (कधी हिच भाषा समजते) म्हणजे... (क) वेगळा लेख त्याच वृत्तपत्रात (किंवा अन्यस्त्र) द्यायचा.
उदय, हे थोडेफार नुकसान एकदा
उदय,
हे थोडेफार नुकसान एकदा नाही तर अनेकदा झालेले आहे.
असो..
उपायांच्यात म्हणायचं तर पहिल्या वेळेला लोकसत्ताच्या ज्या लोकांशी संदीप फोन करून बोलला होता त्यांच्याशी यावेळेला थोड्या अधिक कडक शब्दात आणि प्लस केतकरांशीही बोलला आहे.
उद्या परवा स्पष्टीकरण व माफिपत्र येतंय का बघू.
मी हे सगळं ब्लॉगवर, माबोवर आणि अन्य संस्थळांवर टाकणं ह्याचा उद्देश जास्तीतजास्त लोकांपर्यंत योग्य ती माहीती पोचावी हाच आहे.
आणि शेवटी कायद्याचा आधार आहेच.
च्यायला मेहनत करे कोई, फल
च्यायला
मेहनत करे कोई, फल खाए कोई और?
इतक्यांदा चूक झाली म्हणतेयंस, मग गप्प बसलीस कशी आत्तापर्यंत?
जाब विचार ना त्यांना... पत्रकारिता करतात का झोपा काढतात?
निधप.... चुक ही अनावधानाने
निधप.... चुक ही अनावधानाने एकदा होउ शकते.. तीच चुक परत परत होउ लागली की त्यात नक्की काहीतरी काळेबेरे आहे असे समजावे... दुसरी महत्वाची गोष्ट जी मला श्वास च्या ऑस्कर वारी पासुन खुप जाणवली होती ती म्हणजे इतरांच्या तुलनेत संदीप प्रसिद्धी माध्यमांपासुन बरेच दुर रहातात.. खरेतर जेंव्हा एखादा चित्रपट नॉमीनेट होतो तेंव्हा त्याचे श्रेय दिग्दर्श्कालाच जायला हवे, पण या बाबतीत अरुण नलावडे ना जी प्रसिद्धी मिळाली ती आश्चर्यकारक आहे... यामागे जे काही राजकारण असेल ते असो.. पण मला वाटते की संदीपनी मिडीयाशी नक्की बोलले पाहीजे ...... केवळ निषेधाचे खलीते पाठवुन किंवा त्यांची चुक होते आहे असे सांगुन झोपेचे सोंग घेतलेले जागे होउ शकत नाहीत... सार्वजनीक ठीकाणी मि याहुन जास्ती काही लिहु शकत नाही पण सुज्ञास अधीक सांगणे न लगे.....
नीधप , यावर कायदेशीर कारवाई
नीधप ,
यावर कायदेशीर कारवाई करता येते का ? की प्रिन्टिन्ग मिस्टेक म्हणून हात झटकू शकतात हे लोक ?
नीधप- रामला अनुमोदन. मला तरी
नीधप- रामला अनुमोदन. मला तरी हे जाणुन बुजुन केलेलं वाटतं.
रामला संपुर्ण पाठिंबा..
रामला संपुर्ण पाठिंबा..
केदार, त्याबद्दल माहीती घेणं
केदार,
त्याबद्दल माहीती घेणं चालू आहे. पण त्यावर त्यांनी स्पष्टीकरण आणि दिलगिरी व्यक्त केली तर आपण काही करू शकत नाही बहुतेक.
रामला अनुमोदन... नीधप, मला
रामला अनुमोदन...
नीधप, मला वाटतं की संदीप सावंत यानी खरोखर पी आरचा आधार घेतलाच पाहिजे. हा नुस्ता जाणून बुजून केलेला खेळ नव्हे.. तर पब्लिकमधल्या इमेजचा देखील प्रश्न आहे.
श्वासचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं तेव्हा तेव्हा अरूण नलावडे हेच नाव समोर येतय.. यासाठी संदीप सावंत यानी थोडेफार प्रयत्न केले पाहिजेत.. शेवटी एका प्रतिभावंत दिग्दर्शकाला त्याचे पूर्ण क्रेडिट मिळालेच पाहिजे.
आणि वृत्तपत्रे ही चूक मुद्दाम करत नाहीत. पत्रकाराला जर चुकीचीच माहिती दिली गेली असेल तर काय करणार??? आणि हल्ली पत्रकारानी "माहिती शोधणे व माहितीची सत्यासत्यता पडताळणे" हे काम ऑप्शनला टाकलेले असतात.
करेक्ट नंदिनी. लेखिकेला सहज
करेक्ट नंदिनी. लेखिकेला सहज माहिती मिळाली ती तिने वापरली. तिने श्वासचे क्रेडिट्स तपासले असतील असं वाटत नाही. मुख्य म्हणजे श्री नलावडेंना नवीन चित्रपटासाठी पब्लिसिटी हवी आहे. त्यात त्यांना आपसूक कोणी श्वासचा दिग्दर्शक बनवत असेल, तर त्यांचं काय जातंय? जोवर कोणी समोरून ऑब्जेक्शन घेत नाही, तोवर ते 'अळिमिळी..'च करणार.
आपल्या श्रेयासाठी आपणच जागरूक असायला हवं. उद्याच्या उद्या वृत्तपत्राने शुद्धीपत्रक द्यायला हवे. माफीही मागायला हवी -अशा मागण्या तुम्हीच करा, म्हणजे हालचाल होईल. शुभेच्छा.
केदार .. वृत्तपत्रीय
केदार .. वृत्तपत्रीय कायद्यानुसार कुठल्याही कायदेशीर कारवाईसाठी तुम्हाला त्या पत्रकाराचा/लेखकाचा हेतु सिद्ध करावा लागतो... माझ्यामते या केस मध्ये कायदेशीर कारवाई होउ शकत नाही... जर त्या वृत्तपत्राला त्यांची चुक निदर्शनास आणुन दिली तर ६० दिवसांमध्ये त्यानी एका ओळीची दिलगिरी प्रसिद्ध केली तरी चालते.. चुभुदेघे
मी त्या लेखावर प्रतिक्रिया
मी त्या लेखावर प्रतिक्रिया लिहीलिये त्यात त्या लेखिकेला लिहीलंय की जरा गृहपाठ तरी करायचा होतात म्हणून.
श्वासचं नाव जेव्हा जेव्हा
श्वासचं नाव जेव्हा जेव्हा घेतलं जातं तेव्हा तेव्हा अरूण नलावडे हेच नाव समोर येतय.
येस, हे अगदी खरेय... कदाचित ते नाव जास्त फेमस असल्यामुळे असे घडत असेलही. आणि त्यामुळे ज्याने जे केलेय त्याला त्याचे श्रेय मिळत नाहीये.
पण जेव्हा कोणी श्वास शी किंवा इतर कशाशीही संबंधित काही लेख, माहिती वगैरे लिहुन ती चार लोक वाचत असलेल्या वर्तमानपत्रात छापतात, तेव्हा ती माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारीही त्या व्यक्तीवर येते.. असे न करणारे एक गाढव आणि माहिती तपासुन न पाहता ती छापणारे दुसरे गाढव..... हल्ली हे सगळीकडेच दिसुन येते.
Pages