Submitted by प्रज्ञापाटील on 19 April, 2010 - 22:02
झाडाच्या फळातील बी मधून पुन्हा नवीन झाड वाढतं - या जीवनचक्रासारखं गोल-गोल म्हणत राहण्याचं हे गाणं - माझे वडील विश्वनाथ खैरे यांनी नातवंडांसाठी खास लिहिलेलं.
झाडाचं खोड जाडजूड
खोडाला फांदी लांबलचक
फांदीला डहाळी लवलवती
डहाळीला देठ लागले किती
देठाला पान हिरवं गार
पानाला शिरा जाळीदार
देठापाशी लागलं फूल
फुलामध्ये पाकळ्या गोल
फूल गेलं, फळ आलं
फळ पिकलं, गळून पडलं
फळातलं बी मातीत गेलं
पाऊस आला, बी रुजलं
बियाचं झालं रोप कोवळं
रोप वाढलं, वर-वर गेलं
मुळं गेली खोल-खोल
झाड वाढलं गोल-गोल
झाडाचं खोड जाडजूड...
गुलमोहर:
शेअर करा
आहा, काय सुंदर कविता आहे.
आहा, काय सुंदर कविता आहे. पाठ्यपुस्तकात पाहिजे अशी कविता
छान
छान
सुंदर गं कविता,खुपच सहज ...
सुंदर गं कविता,खुपच सहज ...
मस्तच आहे ही कविता
मस्तच आहे ही कविता
मस्तय... भोंडल्यालाही
मस्तय... भोंडल्यालाही म्हणायला हरकत नाही मस्त रिदम आहे!
छानंयं.
छानंयं.
(No subject)
खुप छान आहे!
खुप छान आहे!
सगळ्यांना कविता आवडली हे
सगळ्यांना कविता आवडली हे वाचून खूप आनंद झाला!
अगो - मी ही कविता शिशुभारती (बोस्टन जवळची भारतीय शाळा) मधे मराठी तिसरीला शिकवली होती. मुलांना समजली आणि आवडली.
आशूडी - भोंडल्याचं पण गाणं आहे त्यांनी लिहिलेलं - नदीबाईचा भोंडला - ते आता लौकरच टाकेन मायबोलीवर.
मस्तच आहे ग कविता ,
मस्तच आहे ग कविता ,
झक्कास्स्स्स्स्स्स्स
झक्कास्स्स्स्स्स्स्स
छान
छान
नदीबाईचा भोंडला इथे आहे:
नदीबाईचा भोंडला इथे आहे: http://www.maayboli.com/node/15573