Submitted by हर्ट on 19 April, 2010 - 03:25
शरिरावर इतर कुठलाच अपाय होणार नाही अशा पद्धतीने मला वजन वाढवायचे आहे. मी शाकाहारी आहे. सात्विक आहार आवडतो. कृपया सहजशक्य उपाय सुचवा. आभारी आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोज चार केळी खा ..असा सल्ला
रोज चार केळी खा ..असा सल्ला मला काहि वरषान्पुर्वी doctor ने दिला होता.तेव्हा मी खुप बारीक होते म्हणुन.
व्यायाम करायचा आणि मग १५
व्यायाम करायचा आणि मग १५ मिनिटांनी व्यवस्थित सात्विक पण भरपेट जेवायचे.
लग्न कर.
लग्न कर.
बुवा अगदी बरोबर!!
बुवा
अगदी बरोबर!!
बुवा नुसतं लग्न करुन नाही
बुवा नुसतं लग्न करुन नाही होणार काही. बायको सुगरण हवी ना. सुगरण मुलीशी लग्न कर असं म्हणा
नी, म्हणजे भरपेट हादडण्या
नी, म्हणजे भरपेट हादडण्या आधी व्यायाम ना? - हे तर मी वजन उतरवण्यासाठी करतेय कित्येक वर्षे

तरीच मग.. ...
बी , तुमच्या इथ Ensure मिळत
बी , तुमच्या इथ Ensure मिळत का? त्यांचे प्रोडक्ट वेट बॅलन्स साठी पॉप्युलर आहेत.
त्यांचा वेट गेन साठी एक प्रोडक्ट आहे. अतिशय चांगल आहे ते. योग्य प्रकारे वजन वाढवायच असेल त्यांच्यासाठी.
दुसर म्हणजे व्यवस्थित खावुनही वजन वाढत नसेल तर थायरॉइड लेव्हल चेक करुन घे.
सीमा, मी शोधून पाहीन ENSURE
सीमा, मी शोधून पाहीन ENSURE इथे. अधूनमधून खायचीप्यायची होणारी परवड त्यासोबत दगदग आणि या ना त्या गोष्टींचं दडपण ही कारणे तर हमखास आहेतचं वजन कमी असायला/व्हायला. पण केवळ वरण भात भाजी पोळीच्या जेवणामधे फळफळावळाच्या व्यक्तीरिक्त इतर काही सहजशक्य पदार्थांचा समावेश करता येईल का त्याबद्दल मी इथे मदत मागत आहे. तसा मी बालपणापासूनचं कमी वजनाचा आहे. कित्येकांचे वजन वाढलेले मी पाहिले आहे मग माझेचं का नाही वाढतं :०( :०( धन्यवाद!
बी तुझा BMI किती आहे सध्या ?
बी तुझा BMI किती आहे सध्या ?
तसा १९ असायला हवा ना? पण माझा
तसा १९ असायला हवा ना? पण माझा १८ पुर्णांक ८४ आहे. थोडे वजन हवे आहे.
Ideal BMI १८.५ ते २४.९ आहे
Ideal BMI १८.५ ते २४.९ आहे .
१८.५ पेक्षा BMI कमी असेल तर अंडरवेट मानलं जात , तुझा १८.८४ म्हणजे काठावर आहे , वजन वाढवायला भरपुर चान्सेस आहेत तुला .
लग्न कर. >>> म्हणजे तुझे वजन
लग्न कर. >>> म्हणजे तुझे वजन वाढेल आणि बायकोचे कमी होईल
जोक्स अपार्ट. नुसतं खा म्हणुन
जोक्स अपार्ट. नुसतं खा म्हणुन काही खाललं जाणार नाही. बारिक लोकांचं एक तर बर्याच वेळा मेटॅबोलिस्म फास्ट (इंग्रजी शब्दांकरता माफी असावी) असतं अन वजन कमी असल्यामुळे एनर्जी कमी लागते त्यामुळे अर्थात भुक पण कमी असते. खाण्या करता भुक वाढवायची गरज आहे, नुसतं वजन वाढवायला खाललं पाहिजे म्हणुन खाललं जाणार नाही.
वेट्स चा व्यायाम सरवात उपयोगी ठरेल. जास्त कार्डियोच्या फंदात पडू नकोस (आणखीन बारिक होशील). नुसतं काहिही खाऊन वजन वाढवण्यापेक्षा वेट ट्रेनिंग करुन त्यानंतर आहारातले कार्ब्स, प्रोटीन्स वाढवणे सगळ्यात उत्तम. शाकाहारी असशील तर डाळी, टोफू वगैरे खाऊन सुद्धा प्रोटीन्स चं प्रमाण वाढवता येतं.
'वजन कमी' हे वरदान आहे.. ते
'वजन कमी' हे वरदान आहे.. ते कशाला वाढवतोस.. कुठे कुस्ती खेळायला जायचे आहे...?
मी पण गंभीरपणे सांगतोय. जग धावत सुटलंय बारीक व्हायला आणि तुला वजन वाढवायचे आहे..
ह्यावर्षी लग्न झाल्यावर वजन
ह्यावर्षी लग्न झाल्यावर वजन कमी कसं करायच बीबी वर दिसेल बी तुम्हाला.
ट्रेनर लावून मसल बिल्ड करता
ट्रेनर लावून मसल बिल्ड करता येइल. पण फॅट वाढ्वायची काय गरज आहे? जिम मध्येच बेस्ट सल्ला मिळेल. खरेच इतका कमी बीएम आय म्हण्जे वरदान आहे रे. मला वाट्ते आजकाल मुलींसाठी जसे ब्रायड्ल पॅकेज असते तसे मुलांसाठी पण असते. त्यात वजन स्किन केअर ग्रूमिन्ग वगैरे सगळेच येते. म्हणजे लग्नाच्या रिसेप्शनच्या दिवशी चांगले दिसता येते.
वजन वाढ्विणारा आहारः
१) जिलेबी व गरम आटीव दूध नाशत्याला.
२) तूप लावलेले पराठे.
३) चीज व बटाट्याचा वापर.
दुपारी झोप काढणे, जेवताना
दुपारी झोप काढणे, जेवताना टीव्ही न बघणे (त्याने रक्तदाब वाढून अपचन होते!),.भूक लागली की मगच खाणे.सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःचे शरीर जसे आहे तसे त्यावर प्रेम केले तर तेदेखील आपल्या प्रयत्नांना रिस्पाँड करते.
खजुर आणि तुप खाउन व योगासने
खजुर आणि तुप खाउन व योगासने करुन ४ वर्शांपुर्वी माझे कमी असलेले वजन वाढवले होते. आता कमी करण्याचे उपाय शोधत आहे ती गोष्ट वेगळी.
हो, खजुर दुधात रात्री भिजवुन
हो, खजुर दुधात रात्री भिजवुन ठेवायची आणि सकाळी खायची. ह्याने माझंही वजन जेव्हा कमी होतं तेव्हा वाढलेलं. आता स्वाती म्हणतेय तसचं कमी करायच्या मागेय
ratri chanadal bijat theun
ratri chanadal bijat theun sakali ti khavi aani tyabarobar sukh khobar hee khave
मला पण वजन वाढवायचे आहे. मी
मला पण वजन वाढवायचे आहे. मी अन्डरवेट आहे...:( मला सुद्धा काही उपाय सांगा...
लग्नात मी डोळ्याने दिसावी, अशी इच्छा आहे...;)
प्रिती/स्वाती,
तुम्ही म्हटल्याप्रमाणे खजुराचा उपाय करुन बघते..:)
यू लकी पीपल! ( चकली खात खात!)
यू लकी पीपल! ( चकली खात खात!)
बी, चांगल्या आहारतज्ञाला भेट.
बी,
चांगल्या आहारतज्ञाला भेट. ते दिवस भराचा तक्ता देतात. वजन वाढवाय्चे/ कमी करायचे असेल तर त्यासाठी खायच्या/ न खायच्या गोष्टींनी इतर काही अपाय होत नाहीये ना, ते बघणे महत्वाचे. ते आहारतज्ञच करु शकतात. नाहीतर वजन वाढवायला आता फॅटी प्रकार खायचे आणि नंतर वजनासोबत च कॉलेस्टेरोल ही वाढलेले कळायचे!! तसे नको व्हायला. ( हे सर्व आई आहारतज्ञ असल्याने माहीतेय...)
लग्नात मी डोळ्याने दिसावी,
लग्नात मी डोळ्याने दिसावी, अशी इच्छा आहे...
हे बघ, वजन कमी असणे ही काही
हे बघ, वजन कमी असणे ही काही टेन्शन ची बाब नाही.
मी व्यवसायाने आहारतज्ञ आहे....म्हणुन काही गोष्टी सांगु शकते....बघ प्रयत्न करुन!
एक तर महत्त्वाची बाब म्हणजे...दिवसातुन ६ वेळा खा...त्यात मुख्यत्वे दुध, फळे म्हणजे केळी यांचा समावेश कर. आता थंडी आहे तर एक आड एक दिवस अंडे खा..जरी पक्कि शाकाहारी नसशील तर ठीक आहे..पण चालत असेल तर आवर्जुन खा!
तुमचि भुक कमी असते तर थोडे थोडे पण सतत खा!
जेवणात उसळी, पालेभाज्या, दुग्ध्जन्य पदार्थ खा! भरपुर सुका मेवा, खजुर ब्रेकफास्ट मधे खावे.
त्याच बरोबर थोडा व्यायाम करा!
कोणतेही मैद्याचे पदार्थ, जास्त तेलकट पदार्थ, बाहेरचे पदार्थ ताळावेत.
रोज ब्रेकफास्ट मात्र टाळू नये!
या अशा आणि अनेक लहान गोष्टी वजन वाढावायला मदत करु शकतील.
वजन कमी असेल तरी शरीरातील फॅट
वजन कमी असेल तरी शरीरातील फॅट चे प्रमाण जास्तं असु शकते..तेव्हा जिम मधली मंडळीच नीट सल्ला देऊ शकतील. उगाच तूप आणि बा़कीचे पदार्थ खाऊन शरीरातलं फॅट परसेंटेज वाढवण्यात अर्थ नाही...
प्राची ला अनुमोदन..
वय - २४ वजन ४२ हाईत - ५ फूट ७
वय - २४ वजन ४२ हाईत - ५ फूट ७ इंच ...
माझ्या मते एवढा कमी वजन कोणाचाही नसेल...
धन्यवाद प्राची!! तुम्ही
धन्यवाद प्राची!!
तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयत्न करुन बघते.
अजुन एक म्हणजे मला बाकी कुठलाही त्रास नाही. heamoglobin पण चांगले आहे. stamina चा सुद्धा काही
problem नाही. भुक सुद्धा खुप लागते!! पण वजन काही वाढत नाही.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहारात बदल करते!
त्याच बरोबर थोडा व्यायाम करा>>>
नक्की कुठला व्यायाम करायला हवा?
प्रसन्न आणि
प्रसन्न आणि सगळ्यांसाठी.
http://www.wikihow.com/Increase-Your-Appetite
मेटॅबोलिस्म कसा वाडवाय्चा ?
मेटॅबोलिस्म कसा वाडवाय्चा ?
Pages