आमचा गणपती

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हा आमच्या घरचा गणपती
ganapati.jpg
.
आणि ही त्याची सजावट
माट्टोळी
matoli.jpg
.
आणि ही रांगोळी आमच्या चूलत बहीणीने काढलेली (वय वर्षे १० )
rangoli1.jpgrangoli2.jpg
.
तळटीप : मला फोटू काढायला जमत नाहीत त्यामूळे आहेत ते फोटू कृपया बघणीय मानून घ्यावेत.

विषय: 

केदार,

फोटो छान आलेत. माट्टोळी हा सजावटीचा प्रकार आहे का? असेल तर ही सजावट विशिष्ट पद्धतीनेच करावी लागते का? (म्हणजे, आढ्याला वगैरे?)
बाकी वय वर्ष १० च्या मानाने तुझ्या चुलत बहीणीची रांगोळी माझ्या मते तरी 'उत्तम' या कॅटेगरीत मोडते. कारण मला स्वतः (वय वर्ष नाही सांगत :P) रांगोळीचे साधे ठिपके सुद्धा एका सरळ रेषेत काढता येत नाहीत. Happy

केदार, माटोळी मस्तच रे! कित्ती दिवसांनी पाहिली... रांगोळीतल मोर छान आलाय!

दक्षीणा , आय टी धन्यवाद Happy
माटोळी हा एक गोव्या कोकणातला सजावटीचा प्रकार आहे. गणेश मूर्तीच्या वर लाकडी फळ्यांवर विवीध फळे , पाने बांधतात. सजावटीचा एक सुंदर प्रकार. निसर्गाच्या वरदानामूळेच असेल कदाचित पण शक्यतो कृत्रीम गोष्टींचा वापर सजावटीसाठी टाळण्यात येतो.

कोण म्हणतय तुला फोटु काढायला जमत नही , अरे छान आले की ... गणपती बाप्पा मोरया ...

चिन्नू , गुरूजी धन्यवाद Happy
अहो ती कॅमेराची कमाल आहे माझी नाय कै Proud

केदार.. छानच रे..
-::- -::- -::--::--::--::--::-
Yo Rocks !! तुम्ही म्हणाल जसं..
-::- -::- -::--::--::--::--::-

केदोबा मस्त रे गणपती. Happy
रांगोळी छान काढली आहे.
माटोळी मधली लाकडी फळ सावंतवाडी पेशल आहेत काय??

मला फोटू काढायला जमत नाहीत त्यामूळे आहेत ते फोटू कृपया बघणीय मानून घ्यावेत.>>>
ह्या वाक्याची जरुरी नव्हती रे. तु चाफ्याचा मैतर असल्याने आम्ही समजुन घेतलय. काय चाफ्या बरोब्बर ना Proud

आम्ही मालवणात याला "माटी" असे म्हणतो. नेहमी लाकडाची बांधलेली चौकट बांधूनच ठेवलेली असते. त्याला दरवर्षी पावसाळ्याच्या आसपास येणारी औषधी फळे, पाले माटीला बांधतात. म्हणजे ती माटीबरोबरच सुकत रहातात आणि वेळप्रसंगी वापरता येतात. हल्ली सजावटीच सामान पण वापरतात.