IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॅकी नं१ - कोहलीनं स्वतःची विकेट टाकणं शहाणपणाचं होतं हे एकदम मान्य. पण माझी नजरचूक नसेल, तर कोहलीची नजर चेंडुवर होती व हाताने त्याने धाव नको असे स्पष्ट खुणावले होते; पीटरसन बेधडक धावत सुटला होता. पण तसं नसेल, तर माझे शब्द मागे घेतो.
भरतमयेकर - अगदी ह्याच परिस्थितीत एखादा ऑस्ट्रेलियन वा ईंग्लिश खेळाडू कोहलीच्या जागी असता,
तर पीटरसनने इतक्या उघडपणे आगपाखड केली असती का, असाही प्रश्न सहज विचारता येईल.
[ खेळाचा आनंद घ्यायचा सोडून मी उगीचच वितंडवाद घालतोय असा माझा मलाच संशय येतोय ! क्षमस्व ]

भाऊ,
पीटरसन वर्णद्वेषी आहे , असे सुचवायचे आहे का? असू शकेल. दक्षिण आफ्रिका सोडून तो इन्ग्लंड्च्या संघात सामील झाला याचे कारण तसेच काही होते ना? (आता इंग्लिश संघात कधीकधी आशियाई खेळाडू जास्त असायचे - मग तो कुठे जाईल?ऑस्ट्रेलिया)
वॉर्न पुढल्या आयपील मधे नसणार.
पण पुढली आयपील असेल का? मऊ लागले म्हणून कोपराने खणू नये हे ललित मोदीना कळले तर ठीक.

आयपीएल चे आर्थिक गणित नक्की काय आहे? का हे सगळे 'बूम' च्या तत्त्वावर चाललेले आहे? म्हणजे या सगळ्यातून नंतर कधीतरी प्रचंड पैसा मिळेल या समजाने गुंतवणूक केली जात आहे. काही हुशार लोकांना आधीच लक्षात येउन वेळेवर बाहेर पडतील (काही ठिकाणी वाचले की बर्‍याच संघांचे आत्ताचे मालक लोक बाहेर पडायला बघत आहेत).

खेळाडूंना पैसा मिळत आहे हे उघड आहे. बाकी अजून कोणाला उत्पन्न मिळत आहे? स्टेडियम च्या मालक क्रिकेट संघटना, स्थानिक विक्रेते वगैरे सोडले तर?

भरतमयेकर,
पीटरसनला वर्णद्वेषी नाही म्हणणार मी; पण जो संयम इंग्लीश, ऑस्ट्रलियन खेळाडूंशी वागताना तो दाखवेल तसा आशियातल्या नवोदित खेळाडूंना न दाखवला तरी चालेल अशी खोलवर रुजलेली भावना
मला बर्‍याच गोर्‍या खेळाडूत जाणवते [ कदाचित तो माझाही न्यूनगंड असू शकतो]. अर्थात, आताचे भारतीय तरूण खेळाडू असल्या गोष्टीना दाद देत नाहीत, हे ही अभिमानाने नमूद करायला हवे.
आणि हो, काल दादाचा तो अफलातून झेल व नंतरच्या दादाछाप फलंदाजीने डोळ्याचे पारणे फिटले !
फारएन्ड,
माझ्या माहितीप्रमाणे, प्रत्येक संघाच्या मालकाना सर्वच मिळकतीचा एक हिस्सा मिळतो. शिवाय, जाहीरात
तर होतेच.[दारुची कायद्यानुसार जाहीरात करता येत नाही म्हणून माल्ल्यासाहेबाना आयपीएलमुळे
"रॉयल चॅलेजर" "किंगफीशर"चं अ‍ॅडव्हर्टायझींग बजेट किती छान उपयोगी पडलं !] आपल्या मालकीचा संघ एकही सामना जिंकला नाही , तरी मालक तोट्यात जाण्याची शक्यता अगदीच कमी असते [अर्थात,
मी जे वाचलंय, ऐकलंय त्यानुसार].

धन्यवाद भाऊ. थोडी मिळकत असणार याची कल्पना आहेच. पण गुंतवणूक आणि उत्पन्न यात 'ब्रेक ईव्हन' होउन त्यांना फायदा होतो किंवा कधी होईल याबद्दल उत्सुकता आहे.

दादाची इनिंग बघतो आता यूट्यूब वर. दादाचे कॅचिंग आधीही चांगले होते (स्लिप मधे नसायचाच सहसा तो त्यामुळे ते कौशल्य किती आहे माहीत नाही), फक्त बाकी फिल्डिंग फारशी विचारू नका Happy बाकी दादा बद्दल आता वाद घालण्यात काही अर्थ नाही, येथील जुनी पाने चाळली तर बरेच काही सापडेल.

मीही ऐकले की करार संपत आहेत. वॉर्न ने मुलाखतीत तसे म्हंटले आहे.

फारेंडा, आयपीलचे आख्खे आर्थिक गणित यावर एक लांबलचक पोस्ट लिहावेसे वाटतय.. Happy

करार संपले तरी ते नविन बनवू शकतात (कित्येकानी बनवलेले देखील असावेत)

<<फारेंडा, आयपीलचे आख्खे आर्थिक गणित यावर एक लांबलचक पोस्ट लिहावेसे वाटतय.. >>
नंदिनीजी, खरंच खूपच कुतूहल आहे सर्वाना. लिहाच तुम्ही.

>>> वॉर्न पुढल्या आयपील मधे नसणार.

शेन वॉर्नप्रमाणे जयसूर्या तसेच गिलख्रिस्ट हे सुद्धा पुढील आयपीएल मध्ये नसतील.

इरफान पठाणची शेवटची ओव्हर पाहिलि (४,२,६,६ आणि गुड लेन्ग्थ बॉल ) की मॅच फिकक्सिन्ग ची शन्का येते Sad
वाटत हे लोक आपल्याला खेळवतायत Sad

>>> इरफान पठाणची शेवटची ओव्हर पाहिलि (४,२,६,६ आणि गुड लेन्ग्थ बॉल ) की मॅच फिकक्सिन्ग ची शन्का येते

इरफान पठाण हा चांगली गोलंदाजी करणे अपेक्षित आहे तर युसुफ पठाणने चांगली फलंदाजी करणे अपेक्षित आहे. परंतु इरफान फलंदाजी चांगली करत आहे तर त्याची गोलंदाजी अतिशय खराब आहे. युसुफ त्याच्या बरोबर उलटे करत आहे.

अमेरिकेत राहणार्‍या मंडळींसाठी, घरी डायरेक्ट टीव्ही असल्यास : चॅनल १०१ वर सध्या हे सामने दाखवल्या जाताहेत. कुठलेही अतिरिक्त शुल्क न भरता. (प्रमोशनल.)

>>> इरफान पठाणची शेवटची ओव्हर पाहिलि (४,२,६,६ आणि गुड लेन्ग्थ बॉल ) की मॅच फिकक्सिन्ग ची शन्का येते >>
"मॅच फिकक्सिन्ग "बद्दल छातिठोकपणे कांहीच सांगता येत नाही. पण माझी एक वैयक्तिक खंत मात्र आहे.
कपिल देवसारख्या खिलाडू वॄत्तीच्या, क्रिकेटवर निस्सीम प्रेम असणार्‍याचा व विशेषतः नवोदित खेळाडूंविषयी निखळ आस्था असणार्‍याचा सहभागही असता, तर आयपीएलचं "ओरीएंटेशन " क्रिकेट कडे जास्त व पैशांकडे कमी झालं असतं. कपिलला खलनायक ठरवून आयसीएलचं विसर्जन केलं गेलं तेव्हांच मनात कुठेतरी पाल चुकचूकली होती.
आयपीएलमधील चांगल्या खेळी, अप्रतिम क्षेत्ररक्षण व अटीतटीच्या सामन्यांचा आनंद चाखतानाही ही खंत कायम आहे.

इर्फान पठाण गोलंदाज म्हणून संपल्याला युगे लोटली. धन्यवाद द्या चॅपेल गुर्जींना.
युसुफ पठाण सेहवागच्या पावलावर पाऊल टाकून चाललाय. मी असाच खेळणार, मला असेच खेळता येते. १० सामन्यात एकदा मस्त खेळून जिंकून दिले की झाले बाकीचे ९ डाब लोक विसरतात. पाकिस्तान मधे द्रविड आणि सेहवाग सलामीच्या जोडीच्या भागीचा विश्वविक्रम मोडण्यासाठी फक्त मैदानात उतरले होते आणि नवाबाने पुढचा विचार न करता थर्ड मॅनला झेल दान केला. आणि वर म्हणतो मला मागचे काही माहीत नाही. "कोण ते विश्वविक्रमवीर?" (पंकज रॉय आणि विनू मंकड). हा विक्रम नुकताच ग्रॅम स्मिथ आणि नील मॅकेन्झी यांनी नुकताच मोडला.

आयपीएल्चे फायदे - भारतातल्या नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची संधी. पहा रवींद्र जाडेजा ला वॉर्नची शिकवणी. रोहित शर्माचे अफलातून क्षेत्ररक्षण -गिब्स/सायमंडसच्या सोबतीचा परिणाम. भारताला एक चांगला स्लीप क्षेत्ररक्षक मिळेल.
भाऊ, विरुद्ध संघातल्या खेळाडूला डिवचताना तो बहुधा नवखा किंवा डिवचला जाऊ शकणारा (जसे हरभजन, युवराज) आहे हे पाहूनच तोंड उघडले जाते ना?
नाहीतर आपला(?) श्रीसंत सचिनला डिवचणार (चॅलेंजर कप, नेट प्रॅक्टिस, किंवा चार चौकार खाऊन, सामना हातातून निसटल्यावर बाद घेतला की WWF सारखी प्रतिक्रिया देणार! त्याचे नाव बदलायला हवे.)

आयपीएलमधील चांगल्या खेळी, अप्रतिम क्षेत्ररक्षण व अटीतटीच्या सामन्यांचा आनंद चाखतानाही ही खंत कायम आहे. >>> अनुमोदन Sad

IPL 20/20 च्या ३ र्‍या वर्ल्डकपला युवराज व युसुफ पठाणच्या ऐवजी उथप्पा व कोहली असायला पाहिजे होते.

फारेंडा. आज उद्या लिहिते रे... थोडे आकडे शोधायला लागतील.

IPL 20/20 च्या ३ र्‍या वर्ल्डकपला युवराज व युसुफ पठाणच्या ऐवजी उथप्पा व कोहली असायला पाहिजे होते>> मला समजलं नाही हे... वर्ल्डकप आणि आयपीएल दोन भिन्न सीरीज आहेत..

भरतमयेकर,
डिवचण्यावरून टोनी ग्रेग- वाडेकरच्या संदर्भातला एक किस्सा आठवला. मुंबईतल्या एका कसोटीत टोनी ग्रेग वाडेकरला सतत ऑफ स्टंपच्या खूप बाहेर बोलींग करत होता व वाडेकरला नाईलाजाने सोडाव्या लागणार्‍या प्रत्येक चेंडुनंतर तो वाडेकरला खिजवत होता. टी.व्ही.ची सोय नसल्याने प्रेक्षकांचाही गैरसमज होवून त्यानी वाडेकरची हूर्यो करायला सुरवात केली. ग्रेगचं पुढचं षटक सुरू होण्यापुर्वी वाडेकरने अंपायरची परवानगी घेतल्यासारखं करून ऑफ स्टंप उचलून खूप बाहेर नेवून ठोकण्याचं नाटक केलं व ग्रेगला हे ठीक आहे का असं खुणावलं. क्षणार्धात सर्वांच्या लक्षांत खरा प्रकार येऊन ग्रेगचीच हुर्यो सुरू झाली ! तात्पर्य : डिवचणं सगळ्यांच्याच बाबतीत होत असतं पण त्याला दिलेल्या प्रतिसादावरून खेळाडूचं नवखेपण किंवा परिपक्वता लक्षात येते. [ गावसकर, तेंडूलकरसारख्यानी तर फलंदाजी करताना कान बंद ठेवण्याची कलाच आत्मसात केली असावी !]
<<आयपीएल्चे फायदे - भारतातल्या नवोदित खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची संधी. >> बिल्कुल सही ! [म्हणजे, खर्‍या क्रिकेटप्रेमींपुरते तरी !]
गुरूजी,
<< IPL 20/20 च्या ३ र्‍या वर्ल्डकपला युवराज व युसुफ पठाणच्या ऐवजी उथप्पा व कोहली असायला पाहिजे होते.>> मलाही तीव्रतेन असंच वाटतं

आयपीएलचे आर्थिक गणितः

आयपीएल ही बीसीसीआयचीच एक उपसंस्था आहे. अशा प्रकारच्या लीगची कल्पना ललित मोदीने १९९९ मधे माडली होती. मात्र त्यामधे ५०-५० सामने असल्याने हा प्लॅन फीझीबल होउ शकला नाही. त्यानंतर झी ग्रूपच्या सुभाष चंद्राने २४ जुलै २००७ ला आयसीएल (इंडियन क्रिकेट लीग) ची घोषणा केली आणि बीसीसीआय खडबडली. १३ सप्टेंबर २००७ ला दिल्लीमधे आयपीएलची घोषणा करण्यात आली.

बीसीसीआयतर्फेच आयपीएल असल्याने यामधे बहुसंख्य भारतीय आणि विदेशी खेळाडूनी भाग घेतला होता. त्यामुळे आयपीएलची युएसपी ही कायम विविध खेळाडू हीच राहिली आहे. नोव्हेंबर २००७ ला आयपीएलच्या टीम्ससाठी बिड्स मागवण्यात आल्या, यामधे भारतातील बहुतेक सर्व उद्योगपतीनी भाग घेतलाच होता. आश्चर्यकारक रीत्या या मधे बॉलीवूडचा समावेश देखील झाला. शाहरूख खान प्रिटी झिंटा यासारख्या नावानी आयपीएलला ग्लॅमरचे अजून एक स्वरूप प्राप्त करून दिले.

यामधे अनिल अम्बानी (अहमदाबाद) आणि सहारा ग्रूप (कानपूर) हे सर्वात कमनशीबी ठरले कारण त्याची कागदपत्रामधे काही तांत्रिक त्रूटी आढळल्याने त्याचे बिड्स रद्द ठरवण्यात आले.

यामधे आठ शहराना फ्रँचाईझी देण्यात आल्या. त्या खालीलप्रमाणे: (पुढे त्याची रूपयामधे किम्मत आहे)

१. मुंबई: रीलायन्स ग्रूप : ४४१कोटी
२. दिल्ली: जीएमार सीमेंट्स ३३१ कोटी.
३. मोहाली: नेस वाडिया, प्रीटी झिंटा, मोहित बर्मन, गौरव बर्मन, आदित्य आणि अरविंद खन्ना. करन पॉल, ३०० कोटी.
४. कोलकता: रेड चिलीज : २९६ कोटी.
५. हैद्राबादः डेक्कन क्रोनिकल ग्रूप: ४२२ कोटी
६. जयपूरः ईमर्जिंग मीडीया २६४ कोटी.
७. चेन्नई: इंडिया सीमेंट्स ३५९ कोटी.
८. बंगलोर: युबी ग्रूप ४४० कोटी.

यानंतर डीसेंबर २००७ सॅटेलाईट प्रक्षेपणाचा हक्काचा लिलाव करण्यात आला. कारण, जरी मॅचेस ग्राऊडवर खेळवल्या तरी तिकिटाच्या किमतीपेक्षाही जास्त पैसा हा टेव्हीवरच्या अॅडमधून येणार हे सरळ आहे. हा लिलाव वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रूपने ८६०० कोटीना दहा वर्षासाठी विकत घेतला.
यामधे अर्थात लाईव्ह मॅचेस, खेळाडूच्या मुलाखती व इतर कार्यक्रम याचा समावेश आहे.वर्ल्ड्स स्पोर्ट्स ग्रूपने विविध देशामधे करार करून याचे हक्क पुन्हा विकले.
एव्हाना मीडीयाला आणि पर्यायाने लोकाना आयपीएल ही फक्त एक क्रिकेट लीगच नाहिये तर बरंच काही आहे हे समजून चुकलं होतं.

बीसीसीआय हा क्रिकेटमधला सर्वात मोठा गुंड हे काही सांगायला नकोच त्यामुळे इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल ने देखील आयपीएलला मान्यता दिली. पाठोपाठ जवळपास सर्वच कसोटी खेळणार्या देशानी आयपीएलला मान्यता दिली. तरी पहिल्या आयपीएलमधे एंग्लिश बोर्डने ताठरपणा दाखवलाच. पण खेळाडूना देखील आयपीएलमधे खेळणे जास्त पसंद असल्याने बहुतेक बोर्ड्स झुकले.
आणि आयपीएलमधे धडाधड खेळाडू साईन व्हायला सुरूवात झाली. या सर्वामधेच आयपीएल्साठी जाहिरातदाराची रांग लागली.

टायटल स्पोन्सर्सः डीएलेफ ५० मिलियन डॉलर्स. (५ वर्षासाठी)
असोसिएट स्पोन्सरः हीरो होंडा २३ मिलियन डॉलर्स (५ वर्षासाठी)
पेप्सी १२ मिलियन डॉलर्स (५ वर्षासाठी)
एअरलाईन आणी अम्पायर स्पोन्सर्स: किंगफिशर २५मिलियन डॉलर्स
हॉस्पिटॅलिटी स्पोन्सरः आयटीसी ग्रूप.

याव्यतिरिक्त अजून एक १०० डील्स आयपीएलने साईन केलेल्या आहेत. दरवर्षी या डील्स वाढतच आहेत कारण, आयपीएलमधे पैसा गुंतवणे जाहिरातदारना सोयीचे पडते.

याव्यतिरिक्त प्रत्येक टीमचे स्वतःचे वेगळे प्रायोजक आहेत. तसेच, टीम्स स्वतःच्या फ्रँचाईझीमधून शेअर्स विकू शकतात. राज्स्थान रॉयल्सचे काही भाग राज कुंद्राने मागच्या वर्षी खरेदी केले.

२० फेब्रूवारी २००८ला आयपीएलच्या खेळाडूचा आठ टीमसाठी लिलाव झाला. याम्धे सचिन तेंडूलकर (मुंबई) सौरव गांगूली (कोल्कता) विरेंद्रर सहवाग (दिल्ली) युवराज सिंग (मोहाली) राहुल द्रविड (बंगलोर) हे आयकॉन प्लेअर्स होते आणि याच टीमसाठी खेळणार होते. लक्ष्मणने स्वतःहून आयकॉन प्लेअर न बनणे पसंद केले कारण त्यामुळे हैद्राबादला इतर खेळाडूसाठी जास्त पैसे खर्च करता आले असते.
ही संकल्पना "माझी टीम" ही लोकामधे रूजवण्यात यावी म्हणून सुरू केली होती. यापुढील आयपीएलम्धे कदाचित याही खेळाडूचा लिलाव होओ शकतो.

प्रत्येक टीमच्या सर्वात जास्त किंमत घेऊन विकत घेतलेल्या खेळाडूपेक्षा २०टक्के अधिक मानधन या आयकॉन प्लेअर्सना देणे बंधनकारक आहे.

यामधे अँडॄ फ्लिंटोफ आणी केविन पीटर्सन हे आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू आहेत. ($१.५५ मिलियन्स)

आयपीएल हे पुढील १० वर्षात २ बिलियन डॉलर्स इतके रेवेन्यु देइल असा अंदाज आहे. यापैकी ४० टक्के आयपीएल कडे जाईल. ५४ ट़क्के टीम्समधे वाटला जाईल आणी ६ टक्के ही बक्षिसाची रक्कम म्हणून वापरली जाईल.

हे झाले आयपीएलचा इन्कम विषयी.

आता खर्चाविषयी (आयपीएलने खर्चाचे आकडे कधीच प्रसिद्ध केलेले नाहीत.)

आयपीएलला स्टेडियम्सना एक ठराविक रक्कम द्यावी लागते. त्याबदल्यात स्टेडियम वापरणे, तीकीटविक्री इत्यादि सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जातात. आयपीएल हा बीसीसीआयचा भाग असल्याने स्टेडियम्स मिळवणे हे फारसे कठीण व महागाचे काम नाही.

आयपीएल सर्व मॅचेस व एव्व्हेंट्स ऑर्गनाईज करण्यासाठी काही एजन्सीज व कंपन्याना ठराविक मुदतीसाठी घेते. यामधे एव्हेंट मॅनेजमेंट, अ‍ॅडव्हर्टायज्मेंट, ऑफिशीअल वेबसाईट, पी आर एजन्सी, सीक्युरीटी याचा समावेश होतो. यासाठी आयपीएलला पैसे मोजावे लागतात. तसेच, आयपीएलचा सर्व अधिकार्‍याची सॅलरी इतर ईव्हेंट्स इत्यादि खर्च आहेतच.

कुणाला काही शंका असल्यास नक्की विचारा. वरील सर्व आकडे हे आयपीएलने रीलीज केलेल्या प्रेस रीलीजमधलेच आहेत.. त्यामुळे त्यात शंका नाही. मात्र अजून काही माहिती हवी असल्यास नक्की विचारा!!

>>> IPL 20/20 च्या ३ र्‍या वर्ल्डकपला युवराज व युसुफ पठाणच्या ऐवजी उथप्पा व कोहली असायला पाहिजे होते>> मला समजलं नाही हे... वर्ल्डकप आणि आयपीएल दोन भिन्न सीरीज आहेत..

हे वाक्य पुढीलप्रमाणे हवे.

"20/20 च्या ३० एप्रिलपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणार्‍या ३ र्‍या वर्ल्डकपला युवराज व युसुफ पठाणच्या ऐवजी उथप्पा व कोहली असायला पाहिजे होते"

20/20 च्या ३० एप्रिलपासून वेस्ट इंडिजमध्ये सुरू होणार्‍या ३ र्‍या वर्ल्डकपला युवराज व युसुफ पठाणच्या ऐवजी उथप्पा व कोहली असायला पाहिजे होते"

आणि रवींद्र जाडेजाऐवजी प्रग्यान ओझा, पियुष चावलाऐवजी अमित मिश्रा का नको?
मला तर वाटते चज्यांचे कसोटी संघात बस्तान बसले आहे त्यांना (सेहवाग्,गंभीर्,धोणी, झहीर, हरभजन, युवराज) २०-२० मधे घेऊच नये. तेवढाच त्यांच्यावरचा ताण कमी, नव्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायची संधी , तेही अपेक्षांच्या ओक्ष्याशिवाय आणि मग भारतीय निदान २०-२० कडे खेळ म्हणून पाहतील्..युद्ध किंवा देशाच्या इभ्रतीचा प्रश्न म्हणून नव्हे. आइस्लंडच्या ज्वालामुखीची राख सध्या या विश्वचषकावर आहे...

पुढल्या लिलावात मुंबईने पार्थिव पटेलला विकत घ्यायला हवे. धड यष्टिरक्षकाशिवाय ३ मोसम पुरे झाले.नाहीतरी चेन्नईने त्याला मुरतच ठेवला आहे.

नंदिनी... खुप चांगले आणी माहीतीपुर्ण पोस्ट.. तुला पंजाबच्या एका सामन्याचे तिकीट बक्षीस.. Proud
काही शंका...
जर या सर्व टीम्स ना मिळुन ५४ टक्के रक्कम मिळणार असेल तर ती त्यांच्या परफॉरमन्स वर अवलंबुन आहे का?? का सर्व टीम्स ना समान पैसे मिळणार???
हे सर्व संघ जो अ‍ॅड, मॅनेजमेंट वगैरे खर्च करत आहेत तो कोण बेअर करेल???
या टीम्स ना या ५४ टक्क्या शिवाय अजुन काही उत्पन्नाचे सोर्स आहेत का???

बीसीसीआय हा क्रिकेटमधला सर्वात मोठा गुंड >> एक्स्युज मी ?? तुला ५-७ वर्ष आधीचे क्रिकेट मधील बीसीसीआयचे स्थान, भारतीय (एकुनच उपखंडातील सर्व देश) ह्यांना मिळणारी वागणूक व ICCचे पोलिटिक्स माहीत आहे का? दोन वर्षांपूर्वीच्या भज्जी-सायमंडस वाद?
MCC ने ICC ला गुंडाळून ठेवलं होत इतके वर्ष. त्यामुळे प्लिज बीसीसीआय नाव ठेवण्याआधी इतिहास तपासा. आता गोर्‍यांची मग्रुरी कमी होऊन उपखंडातील लोकांना मान मिळू लागला आहे. सुनील गावस्करांचा देखील ह्याच विषयावर ICC शी मोठा वाद दोन-तीन वर्षांपूर्वी झाला होता ते जाणकारांना आठवत असेलच.
मला वाटतं जेंव्हा आर्थिक गणित काय असे कोणी म्हणत आहेत तेंव्हा त्यांना असे विचारायचे आहे की एवढे पैसे खर्च होउनही टीम ओनर्स कसे फायद्यात येतील? कारण वरिल आकडे हे जाहिर झालेले आहेत, पण फायदा कसा?

ह्यावर निश्चित अशी आकडेवारी काहीही उपलब्ध नाही, त्यामुळे हर्षा भोगले सारखे स्तंभ लेखक ट्रान्सपरन्सी हवी असे लिहीतात. स्पॉन्सर्स मुळे भरपुर पैसे टीम ओनर्स मिळतात, ज्या टीम मध्ये जास्त प्रसिद्ध खेळाडु त्या टीम ओनर कडे सर्वात जास्त पैसा स्पॉन्सरशिप मुळे येतो, सचिन, धोणी, युवी हे फार मोठे ब्रॅन्ड आहे, इतके की " युवीचे ब्रॅन्ड नेम त्याचा प्रत्यक्ष खेळापेक्षा मोठे आहे" असे सांगणारा एक लेख चारेक दिवसांपूर्वी आला होता. Happy

NBA नंतर सर्वात महागडा गेम म्हणजे आयपील असे स्टॅट मात्र क्रिकइन्फोवर आहे.

केदार, बीसीसीआय "गुंड" आर्थिक बाबतीमधे नक्कीच आहे, मुळात क्रिकेटमधे येणारा पैसा हा बीसीसीआयच्या कृपेने आला आहे हे तरी मान्य असेलच ना?? किंबहुना भारतीय उपखंड क्रिकेटचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. इथे मला गुंड म्हणजे "दादा" अथवा "सशक्त" या अर्थाने म्हणाय्चे आहे.. बाकी वाईट अर्थ अपेक्षित नाही. मुळात आयसीएलला "बेकायदेशीर" ठरवून मगच आयपीएलला मात्र "कायदेशीर" ठरवण्यात आले होते!!! यामध्ये मी बीसीसीआयला काहीही नाव ठेवत नाहीये. बीसीसीआयचे आयसीसीमधे असलेले किंवा पूर्वीचे स्थान याविषयी काहीही बोलायचे नाहीये. इथे मी फक्त आर्थिक बाबीविषयीच लिहत आहे हे कृपया ध्यानात घ्या!!!

मला वाटतं जेंव्हा आर्थिक गणित काय असे कोणी म्हणत आहेत तेंव्हा त्यांना असे विचारायचे आहे की एवढे पैसे खर्च होउनही टीम ओनर्स कसे फायद्यात येतील? कारण वरिल आकडे हे जाहिर झालेले आहेत, पण फायदा कसा?>>>>
या टीम्स ना या ५४ टक्क्या शिवाय अजुन काही उत्पन्नाचे सोर्स आहेत का?????>>>>

टीम्सना पैसा कसा मिळतो हे मी वर लिहिलय. प्रत्येक टीमचे स्वतःचे स्पॉन्सर्स आहेत. त्याचबरोबर ब्रँड व्हॅल्यु आणि मर्चंडायझिंग हे मुख्य आर्थिक मार्ग आहेतच. त्यामुळे वरील जाहीर झालेले आकडे आयपीएलच्या कमाईचे आहेत. प्रत्येक टीमची वेबसाईट बघितल्यास त्याचे स्पॉन्सर किती व प्रेस रीलीज बघितल्यास त्यानी किती पैसे दिले ते लक्षात येइल.

सर्व टीम्सना ५४ टक्के समान मिळतील मात्र हळू हळू ही टक्केवारी कमी होत जाणार आहे. (४५ टक्के पर्यंत) कारण तवर टीमचे स्वतःचे आर्थिक मार्ग विकसित झालेले असतील. टीमचा फायदा हा या सर्वावर अवलंबून असेल. आकडेवारी मात्र अजून् कुणीच जाहीर केलेले नाहीत. पहिल्या वर्षी केकेआरने ब्रेक ईव्हन केल्याची बातमी मात्र दिली होती.

सर्वात खराब कामगिरी केलेले संघ देखील त्यामुळे फायद्यात आहेत. (केकेआर आणि किंग्ज पंजाब) असं ते म्हणतायत!!!

हे सर्व संघ जो अ‍ॅड, मॅनेजमेंट वगैरे खर्च करत आहेत तो कोण बेअर करेल???
>>>

राम, बहुतेक संघानी एक स्वतंत्र कंपनी स्थापन केलेली आहे जी या टीम्सचे काम सांभाळते. तो खर्च अर्थात टीमच्या मालकानेच कराय्चा आहे. त्यामुळे अ‍ॅड, मॅनेजमेंट, नविन खेळाडूना ग्रूम करणे ही कामे टीमनेच करायची आहे. अर्थात त्यामधे आयपीएल व इतर संबंधित एजन्सीज मदत करतातच. उदा. सेटवर टीमच्या अ‍ॅड्स दाखवल्या जातात तो एअर टाईम टीम्सना डिस्काऊंटमधे मिळतो. कित्येकदा स्पॉन्सर्स स्वतःची अ‍ॅड टीमच्या प्लेयर्सना घेऊन बनवतात ती अ‍ॅड स्पॉन्सर्स स्वतः बनवतात आणि एअर टाईम देखील स्वतः विकत घेतात. इथे टीम प्लेयर्स हे फक्त "मॉडेल्स" म्हणून काम करतात. त्याना अर्थात पैसे मिळतात आणि टीमचे ब्रॅंडिग होते.

मुळात क्रिकेटमधे येणारा पैसा हा बीसीसीआयच्या कृपेने आला आहे हे तरी मान्य असेलच ना >>

नाही नंदिनी. क्रिकेट मध्ये पैसा चालू झाला तो दर्शकांमुळे. ( पण विकत घेणार कोण? हे लक्षात घे. Happy ) टिव्ही स्वस्त झाल्यमुळे गावोगावी टिव्ही झाले, दर्शक वर्ग वाढला, क्रिकेट मध्ये नेमके तेंव्हा तीन तारे चमकु लागले, मुख्य म्हणजे भारत जिंकू लागला. ( टिव्ही असूनही हॉकी का बघत नाहीत तर भारत जिंकत नाही म्हणून ! ) ह्या सर्वांना पॅकेज मध्ये भारताची क्रिकेट बॉडीच विकू शकते म्हणून बीसीसीय श्रिमंत झाले. (बीसीसीआय श्रिमंत होते म्हणून स्पॉन्सर आले, खेळाची लोकप्रियता वाढले असे नाही, तर ते नेमके उलट आहे. बीसीसीआय श्रिमंत नंतर झाले.) अर्थकारण.

मुळात आयसीएलला "बेकायदेशीर" ठरवून मगच आयपीएलला मात्र "कायदेशीर" ठरवण्यात आले होते >> आयसील ही भारतातील क्रिकेट कंट्रोलिंग बॉडी नव्हतीच. फक्त भारतानेच नाही तर इतरही देशाने आयसीएल वर बंदी आणली होती. आयपीलला कायदेशीर ठरवण्यात आले नाही तर आयपील कायदेशीराच आहे. हा फरक आहे. Happy

असो आपण क्रिकेट कडे वळू. Happy

केदार, बीसीसीआय श्रींमंत कसे झाले हा प्रश्न नाहिये रे!!
आयअपीएल यशस्वी व्हायला बीसीसीआय्चा पैसा कसा वापरला गेला हा मुद्दा आहे!! पहिल्या आयपीएलमधे इंग्लिश आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाबरोबर वाजलेच होते की... मस्करेन्हास वगळता एकही इंग्लिश क्रिकेटपटू पहिल्या आयपीएलमधे नव्हता.. नुकसान त्या खेळाडूचे झाले.. बीसीसीआय अथवा आयपीएलचे नव्हे!!

असो आपण क्रिकेट कडे वळू>> मुंबई इंडियन्स १३३ Sad

Pages