Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 18:47
आपल्या घरी, कॉलनीत, सोसायटीत अथवा मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??
त्याचे वर्णन इथे प्रतिसादात लिहा अथवा प्रकाशचित्र चढवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या
आमच्या घरचा गणपती.
लालु, सहीच
लालु,
सहीच मूर्ती आहे. एकदम गोंडस आहेत बाप्पा.
मोदकाचे ताट कुठय?
आमच्या
आमच्या घरचा गणपती
आमच्या
आमच्या घरचा गणपती........................
लालू, आर्च,
लालू, आर्च, यश तिघांच्याही घरचे बाप्पा सुंदर आहेत!
आर्च, मोदक मस्त दिसताहेत!
लालू, यश, मोदक कुठे आहेत?
हा आमच्या
हा आमच्या घरचा गणपती..
==================
बोला...
गणपती बाप्पा....
मोरया....
बाली मधे
बाली मधे मी जी गणरायाची मुर्ती घेतली ती हीच मुर्ती! ज्वालामुखीपासून निर्माण झालेल्या दगडापासून तयार केलेली. मुषक वाहन असलेली मुर्ती खूप शोधली पण बालीत गणपतीचे वाहन मुषकाला मानत नाहीत. काळा रंग मी कधी वापरत नाही, तशा रंगाच्या वस्तू मी कधी विकत देखील घेत नाही. काळ्या रंगाचे काठ असलेली एक सुंदर साडी मी बहिणीसाठी विकत घेतली होती पण काळे काठ पाहून ती साडी रद्द करून नविन दुसरी विकत घेतली. ही मुर्ती घेताना मला तिचा काळा रंग पाहून विदर्भातील काळी कसदार मातीचं माझ्या डोळ्यांपुढे आली. कुणाला नजर लागू नये म्हणू आपण काळ्या रंगाची तिट लावतो. ही मुर्ती माझ्या घरात, अगदी दरवाज्यासमोर मी विराजमान केली आणि परदेशात माझ्यावर कुठेलच विघ्न येऊ देऊ नकोस हे एकच मागणे मी या मुर्तीला मागितले आहे. दर गणशोत्सवात मला जमेल तेवढे पूजन मी या मुर्तीचे करतो.. करत राहीन. गणेशोत्सवात ताजी दुर्वा, जास्वंदाची ताजी फुले, कोवळी आम्रपल्लवी मिळावी म्हणून मी इथल्या काही बागांमधे फिरलो तेंव्हा कुठे श्रींसाठी मला ही सोय करता आली. मग भल्या पहाटे माझ्या कडील पातेल्यात जास्वंदाची तुरेदार फुले पाहून मला कोण आनंद झाला. घरी देशात शाळकरी असताना अशाच कळ्या पाण्यात ठेवून दुसर्या दिवशी त्याची फुले देवासाठी उमलत. मला उकडीचे मोदक येत नाहीत.. कधी करून पाहिले नाहीत. म्हणून फक्त पुरणाचे मोदक केलेत. खरे तर ते गव्हाच्या कणकेत सारण भरून तळायचे होते पण सकाळी सकाळी आवरता आवरता मला तितका वेळ मिळाला नाही. म्हणून पुरण केले होते त्यालाच मोदकाचा आकार दिला. या मुर्तीला मी दुध-पाणी-तुलसीपत्र हे सर्व तांब्यात ठेवून मी तिला स्नान घातले आणि स्नान घालताना जेंव्हा ओम म्हंटले तेंव्हा मला प्रसन्नतेचा एक वेगळाच स्पर्श जाणवला.
माझा हा गणोबा तुम्हाला देखील विध्नांपासून दूर ठेवो..
गणपती बाप्पा मोरया!
|| ॐ गं
|| ॐ गं गणपतये नमः ||
इथे हलवले आहे...
हिम्स मस्त
हिम्स मस्त झालिये आरास..
बी, manakul छान..
मी ह्या
मी ह्या वेळी eco-friendly गणपती घरी करायचे ठरविले आणि गणपती बाप्पाच्या कृपेने सगळे छान झाले...तर हा आहे आमच्या घरचा गणपती बाप्पा!!
छान आहे ग
छान आहे ग एकदम बाप्पा आणि उंदिर तर खासच.
अरे वा
अरे वा प्रिती, छानच केला आहेस ग गणपती. कशाचा केलास?
मस्तच
मस्तच जमलाय गणपती आणि उंदिर दोन्ही
सगळ्या
सगळ्या बाप्पा.न्ना मनोभावे नमस्कार. सुरेख मुर्त्या आणि अप्रतिम सजावट मन अगदि प्रसन्न झाल. प्रिति अभिनन्दन! कणकेचा बाप्पा आणि उ.न्दिर केलायस का?
हा आमचा
हा आमचा गणपती बाप्पा.आम्ही श्री ची मुर्ती फायबर ची आणली आणि घरीच विसर्जन केली.
And mainly this Murti is painted by my wife.
Ganpati Bappa Morya..........
धन्स
धन्स अमृता, तृप्ती, आर्च, मराठमोळी!!
गणपती आणि उंदिर दोन्ही Michaels मधे मिळणार्या wet clay पासुन केले आहेत...पहिलाच प्रयत्न्न होता, पुढच्या वर्षी अजुन improvements करीन.
हा आमचा
हा आमचा गणपती बाप्पा.आम्ही श्री ची मुर्ती फायबर ची आणली आणि घरीच विसर्जन केली.
And mainly this Murti is painted by my wife.
Ganpati Bappa Morya..........
सगळ्यांचे
सगळ्यांचेच गणपती बाप्पा सुंदर आहेत!
प्रिती, पहिला प्रयन्त मस्तच!! eco friendly बाप्पा आवडले!
लालु, तुमच्या बाप्पाचे ध्यान विशेष आवडले!
लालू,
लालू, बाप्पांची मूर्ती मस्तच दिसतेय फेट्यात. भारतातून आणलेली की इथली?
आमचा
आमचा बाप्पा
एक बाप्पासाठी.. एक उंदीरमामासाठी..
नैवेद्य
भंडार... बाप्पाच्या आरतीसाठी
पुढच्या वर्षी लवकर या...
मनी,
मनी, बाप्पाची मूर्ती एकदम सुरेख. नैवेद्याचं ताट आणि मोदक - सगळं छानच दिसतय!
वाह.. मस्त
वाह.. मस्त फोटो आहेत.... एकदम homely looks आहेत सगळ्याच फोटोंमधे..
इथे हलवले
इथे हलवले आहे...
सर्वांचे
सर्वांचे लाडके नि सुंदर बाप्पा... वरिल सर्व फोटोंमध्ये मस्तच दिसताहेत..
इको फ्रेंडली गणपती पहिल्यांदाच बघितला.. छान..
मनकु.. रांगोळ्या मस्त.. अजुन येउदे..
-::- -::- -::--::--::--::--::-
गणा धाव रे.. मला पाव रे..
गणपती
गणपती कोकणातलो... आमच्या गावाकडलो..
गणराय निघाले गावाला... तेव्हा.. घरासमोरील अंगणात..
चैन पडे ना आम्हाला..
पायी हळु हळु चाला .. मुखाने गजानन बोला..
गणपती बाप्पा मोरया..
नदिच्या तिरी विराजमान..
-::- -::- -::--::--::--::--::-
गणा धाव रे.. मला पाव रे..
मस्त रे
मस्त रे योगी
ए काय मस्त
ए काय मस्त आहेत गणपती सगळ्यांचे..... खूप खूप छान वाटलं इतक्या गणपतींचं दर्शन घेऊन
लालु....एकदम पुणेशाही आहेत तुझे बाप्पा तर
आर्च तुझे मोदक तर अप्रतिम आहेत.
यश तुझा बाप्पा तर राजेशाही आहे
मनी सगळेच फ़ोटो प्रसन्न आहेत.
हिम्स..आरास खूप आवडली
बी......तुझं खरंच कौतुक वाटतं रे....... !!
प्रीती......छानच जमलाय गणपती आणि मोदक सुद्धा !!
विनय.....मस्तच केलाय तुझ्या बायकोने बाप्पा
माणक्या सही रे.....!! जबरी आल्या आहेत रांगोळ्या !!
यो....सगळेच फ़ोटो छान आलेत !!
हा आमचा
हा आमचा बाप्पा
आणि ही आरास
जयावी...........
जयावी........... तुझ्याकडचा गणपती पण छान आहे........ आरास पण छान आहे..............
जयावी, बाप्
जयावी,
बाप्पा मस्तच आणि आरासही सुंदर.
Pages