कल्लोळातील उरलेसुरले(वृत्तांतासह)
डीजेच्या नजरेतून एक झलक-
"आपका कुछ सामान
हमारे पास पडा है
डायपर के कुछ भीगे भीगे पॅक्स रख्खे है
हो और किसिका पारोसा एक स्वेटर पडा है
वोह स्वेटर लौटादू
आपका वो वो सामान लौटादू
पडझड है कुछ....
है ना?
पडझड है कुछ बेसमेन्ट कि
गिरनेकी नौबत
मस्तीमे किसीने वॉल पे एक लाथ मारी थी
बेसमेन्ट कि वो वॉल अभी तक काप रही है
बेसमेन्ट रिपेअर करवा दो
मेरा वो बेसमेन्ट लौटा दो
शेवटचं कडवं सायोच्या कान्देपोहे साठी :
११६ मोहरीचे दाणे
एक तुम्हारे बाग का onion
गिले लेमन कि खुशबू
उष्टे तुम्हारे चमचे कुछ
उष्टे खरकटे डब्बे भी कुछ
याद दिलादु
सब लौटादू
तेरा वो कचरा लौटा दू !
एक इजाजत दे दो बस
जब कचरा फेकूंगी
पोहे भी वही दफनाउंगी..
पोहे भी वही दफनाऊंगी !!
-दीपांजली
'डीसीला एक जीटीजी करावं' असा प्रस्ताव इस्ट कोस्टला सहसा जिथे जीटीजी होतात तिथल्याच, म्हणजे बाराच्या जीटीजीत कोणी बाराकरांनीच एकदा मांडला (बाकी कंपूंनी नोंद घ्यावी). एरवी जिथली मेजॉरिटी तिथे जीटीजी असा प्रकार असल्याने आम्ही डीसीकर उठून बाराला जायचो. पण अॅक्टिव्ह डीसीकर मेम्बरांच्या संख्येत २ वरुन एकदम ५ ते ६ अशी प्रचंड वाढ झाल्याने इथेही एखादे जीटीजी होऊ शकेल याबद्दल थोडी आशा निर्माण झाली. बाहेरुन कोणीच नाही आले तर निदान ४-५ टाळकी तरी असावीत हो.
आमचे गाव तसे बघण्यासारखे आहे त्यामुळे बरेच जणांनी ते आधीच बघितले असण्याची शक्यता, पण तरीही बाहेरगावहून येणार्यांना जीटीजी व्यतिरिक्त काहीतरी आकर्षण (आमिष) असावे म्हणून चेरी ब्लॉसमची वेळ निवडली. सर्वसाधारण कार्यक्रमाच्या रुपरेषेत 'डीसी भेट' हे मुख्य आकर्षण ठेवले. पण तरीही 'आम्हाला मायबोलीकरांना भेटून गप्पा मारण्यातच जास्त इन्टरेस्ट आहे' असे रोखठोक उत्तर देऊन कार्यक्रमाच्या मूळ उद्देशाचे महत्त्व लक्षात घेतले ते बाराकरांनी! (बाकी कंपूंनी नोंद घ्यावी).
मेनू ठरवणे आणि इतर व्यवस्था करणे यापलिकडे मला काही काम नव्हते. सगळ्यांचे सगळे जेवण घरी बनवायची कल्पना मनांतसुद्धा येऊ दिली नाही. तरी 'तुझे बटाटेवडे मस्त असतात असं ऐकलंय, ते मस्ट्च आहेत हां मेनूमध्ये!' अश्या एका माबोकरणीच्या (ते सुद्धा भारतातल्या, म्हणजे 'मदतीला ये' म्हणायची सोय नाही) स्तुतीपर दबावाला बळी पडून तसा विचार थोडावेळ केला, मग सोडून दिला. बाकी सांस्कृतिक कार्यक्रम ठरवावे लागत नाहीत, माबोकर एकत्र आले की ते आपोआपच होतात हे आधीच्या अनुभवावरुन माहीत होते. विनय आणि भाई असल्यावर काय काळजी. हे बाराकरच बरं का! (बाकी कंपूंनी....)
जीटीजीचा दिवस जवळ येऊ लागला.. बरीचशी तयारी झाली पण ऐनवेळी सगळे व्यवस्थित होईल की नाही या चिंतेनं थोडाफार तणाव जाणवू लागला, पण वाटलं माबोकर आहेत, आपलेच लोक आहेत. कमीजास्त झालं तर घेतील समजून. आदल्या दिवशी सुट्टी टाकली.. दिवसभरात काम संपवायच्या गडबडीत जास्त फिरकता न आल्याने ८ तारखेला संध्याकाळी इकडे चक्कर मारली तर काय! चक्क मुख्य पानावर "मायबोलीचा अमेरिकेतील आजपर्यंतचा सर्वात मोठा मेळावा. अजून हा धागा पहिला नसेल तर लवकर पहा आणि येण्याचे ठरवा." अशी बातमी. मी तसे काही करायला सांगितले नव्हते हो. म्हणजे एरवी सांगावे लागते असे नाही पण २ दिवस राहिलेत आणि "येण्याचे ठरवा"? आत्ता?? हे वाचून एकदम २०-२५ लोक वाढले तर काय करायचे या विचाराने मला घाम फुटला. सगळ्या प्लॅनिन्गचे बाराच वाजले असते! (पण तसे काही झाले नाही.. हुश्श )
उलट ऐनवेळी ३-४ लोकांनी टांग मारत असल्याचे कळवले. प्रिती, माणूस, बाईमाणूस आणि असामी. हे शिट्टी कंपूवाले बरं का! पण मग विनयने (अर्थातच बाराकर) ३ लोक वाढत असल्याचे कळवले आणि बॅलन्स केले. (शिट्टीकरांनी नोंद घ्यावी).
कोणत्याच कंपूत नसलेल्या फिलीहून मेधा(शोनू), लोन स्टार स्टेटमधून लोन स्टार सीमा आणि 'अचूक' सशल यांचे ९ च्या रात्रीच आगमन झाले. शोनू साडेदहाच्या सुमारास आली तेव्हा आम्ही दोघं लास्ट मिनट ग्रोसरीला गेलो होतो, तिने बिचारीने किती वेळा बेल वाजवली माहीत नाही. पोरांनी अर्थातच अजिबात लक्ष दिले नव्हते. पण तेवढ्यात आम्ही घरी पोचलोच. सीमा आणि सशलचे विमान साधारण एकाच वेळेला येणार होते, त्या दोघी एअरपोर्टवर आधी भेटल्या मग शोनू आणि मी त्यांना घेऊन रात्री ११:३० च्या सुमारास घरी आलो. मग गप्पा मारत जेवण आटोपले. एक दीड वाजला तरी सशल झोपायचे नाव काढेना. अचूक वेळेप्रमाणे झोप येत नाही असे काहीतरी म्हणत होती पण तिला एका वेगळ्या रुममध्ये टाकून बाकीचे झोपले.
दुसर्या दिवशी तसं आरामात आवरावं म्हटलं, बारा(वेळ) शिवाय कोणी पोचणार नाही. तर कसलं काय. ११ च्या ठोक्याला बाराकर हजर! (नोंद घ्यावी.. ) वेळेवर म्हणजे किती वेळेवर यावं.. मी कपडेसुद्धा बदलले नव्हते.. बाराकर आले मागोमाग बाकी कंपू. फचिन दिसल्यावर त्याला म्हटलं, बरं झालं पुन्हा आलास.. तेवढ्यात अमृता आणि किरण आले, म्हणाले आम्हीही पुन्हा आलो.. हे शिट्टी कंपूवाले हं. माझ्याकडे एकापेक्षा जास्त वेळा येणारे शिट्टी कंपूत सर्वाधिक होते, ते बाराकरांपेक्षा लांब रहातात तरीही (बाराकरांनी नोंद घ्यावी). या बाबतीत सर्वांनी यापुढे शिट्टीकरांचा आदर्श ठेवावा. त्यानंतरच्या १० तारखेच्या कार्यक्रमांचा वृत्तांत आता सर्वांना माहीतच आहे...
अॅटलांटा कंपूपैकी पराग सोडल्यास कोणालाच मी पूर्वी भेटलेले नव्हते. एवढी मोठी ट्रीप त्यांनी विश्वास टाकून ठरवली आणि जीटीजी बरोबरच डीसी भेटीचा कार्यक्रमही पार पाडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बाकी कंपू डीसीला भेट न देताच पळाले. याच कंपूतील परागने आणलेल्या खव्याच्या पोळ्यांबद्दल त्याचे खास आभार. तसेच बाकीचे काही २ जणांचा कंपू असलेले स्वाती, ज्ञाती, अंजली, झारा-समीर, अजय-भावना यांचे काम, व्याप सांभाळून, वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आभार.
११ च्या सकाळी साडेआठला सीमाची परतीची फ्लाईट होती, सशलची संध्याकाळी साडेपाचला होती. सीमा गेल्यानंतर बाकी कंपूबरोबर डीसी, की मूव्ही/शॉपिन्ग असा विचार करत असताना झारा-समीर रुनीकडे जाणार असे कळले. मग मी आणि सशलही रुनिकडे गेलो. तिथे भरपूर गप्पा आणि रुनी-नितीन यांच्यातर्फे इथिओपिअन लंच जेवून आम्ही तीनच्या सुमारास निघालो. ४ वाजता मी सशलला एअरपोर्टवर टाकले आणि घरी जायला निघाले. घर एकदम सुनं वाटत होतं. सर्वांना निरोप दिल्याने आणि मुख्यतः वसंतात बाहेर बागडल्यामुळे माझ्या डोळ्यातून (आणि नाकातून) नकळत पाणी वाहू लागले.. आणि घसा दाटून आला.
सगळ्यांच्या वृत्तांतातून जीटीजी आवडल्याचे, घराचे, व्यवस्थेचे कौतुक वाचून आनंद झाला. इथे राहिल्यावर कालांतराने मोठी घरं, एकापेक्षा जास्त घरं होऊ शकतात. पण ती कधी अशी माणसांनी गजबजली नाहीत तर त्यांचा काय उपयोग?
या कार्यासाठी माझ्या आख्ख्या कुटुंबाने जी मदत केली त्याला मोल नाही, त्यांच्या पाठिंब्याशिवाय यातले काहीही शक्य झाले नसते.
-लालू
सही लालु आणि फॅमिली !
सही लालु आणि फॅमिली !
उरलेल्या अन्नाबद्दल आहे का
उरलेल्या अन्नाबद्दल आहे का काय?
आता लालूच्या चष्म्यातुन नेमकं
आता लालूच्या चष्म्यातुन नेमकं कसं झालं जीटीजी ते असेल. बच के रहो रे बाबा!
किंवा "लॉस्ट अँड फाउंड"
किंवा "लॉस्ट अँड फाउंड" सेक्शन असेल हा.....एक स्वेटर साइझ ३४, रंग मळकट पिवळा .. इ इ
आता लालूच्या चष्म्यातुन नेमकं
आता लालूच्या चष्म्यातुन नेमकं कसं झालं जीटीजी ते असेल. बच के रहो रे बाबा!>>>>> लालु, महाग्गटग का गं
लालू हि शुद्ध फसवणुक आहे
लालू हि शुद्ध फसवणुक आहे
ज्ञाती, रॉयल्टी टाक..
ज्ञाती,
रॉयल्टी टाक..
लालु च्या चष्म्यातून : "आपका
लालु च्या चष्म्यातून :
"आपका कुछ सामान
हमारे पास पडा है
डायपर के कुछ भीगे भीगे पॅक्स रख्खे है
हो और किसिका पारोसा एक स्वेटर पडा है
वोह स्वेटर लौटादू
आपका वो वो सामान लौटादू
पडझड है कुछ....

है ना?
पडझड है कुछ बेसमेन्ट कि
गिरनेकी नौबत
मस्तीमे किसीने वॉल पे एक लाथ मारी थी
बेसमेन्ट कि वो वॉल अभी तक काप रही है
बेसमेन्ट रिपेअर करवा दो
मेरा वो बेसमेन्ट लौटा दो
शेवटचं कडवं सायोच्या कान्देपोहे साठी :
११६ मोहरीचे दाणे
एक तुम्हारे बाग का onion
गिले लेमन कि खुशबू
उष्टे तुम्हारे चमचे कुछ
उष्टे खरकटे डब्बे भी कुछ
याद दिलादु
सब लौटादू
तेरा वो कचरा लौटा दू !
एक इजाजत दे दो बस
जब कचरा फेकूंगी
पोहे भी वही दफनाउंगी..
पोहे भी वही दफनाऊंगी !!
डिजे लय भारी.
डिजे
लय भारी.
आता मी लिहिलं नाही तरी
आता मी लिहिलं नाही तरी चालेल..
डीजे
डीजे
(No subject)
डीजे, सही एकदम
डीजे,
सही एकदम
मस्तच
मस्तच
डीजे
डीजे
लालू बघा, सरळ सरळ मी काही
लालू बघा, सरळ सरळ मी काही लिहायची गरज नाही असं म्हणतेय.
सह्ही
सह्ही
(No subject)
परत एकदा कल्लोळ
परत एकदा कल्लोळ
वा वा डिजे.... आपका कुछ सामान
वा वा डिजे.... आपका कुछ सामान
बाकी ही शुध्द बनवाबनवी वाटतेय
डिजे!
डिजे!
(No subject)
***मायबोली छोट्या जाहिराती
***मायबोली छोट्या जाहिराती ***
हरवला आहे. लालूच्या चष्म्यातून.. नाही गॉगल मधून महाग्गटग उर्फ वासंतिक महाकल्लोळ
DJ

त्यात अजून एक सायोच्या कांदेपोह्यांचं पण कडवं अॅड कर
शेवटचं कडवं सायोच्या
शेवटचं कडवं सायोच्या कान्देपोहे साठी :
११६ मोहरीचे दाणे
एक तुम्हारे बाग का onion
गिले लेमन कि खुशबू
उष्टे तुम्हारे चमचे कुछ
उष्टे खरकटे डब्बे भी कुछ
याद दिलादु
सब लौटादू
तेरा वो कचरा लौटा दू
एक इजाजत दे दो बस
जब कचरा फेकूंगी
पोहे भी वही दफनाउंगी..
पोहे भी वही दफनाऊंगी !!
(No subject)
डीजे सही
डीजे सही
शुध्द बनवाबनवी >>> हे शुद्ध
शुध्द बनवाबनवी >>> हे शुद्ध तूपासारखं काहितरी दिसतंय ..
DJ, 'तेरा कुछ सामान' मस्तच!
काय धमाल आहे इथे !!
काय धमाल आहे इथे !!
DJ बहोत सही जा रही हो |
DJ बहोत सही जा रही हो |
तेरा वो कचरा लौटा दू>> च्या
तेरा वो कचरा लौटा दू>> च्या ऐवजी "पोहे नही तो चिवडा लौटा दूं" असं टाक.. लालूने चिवडा दिला होता परत
Pages