आता एवढ्या सगळ्यांनी वृत्तांत लिहिल्यावर, डिसीचाही एक तरी हवाच!
लालू आणि मी आठवडाभर आधीपासून कायकाय जमवाजमव करावी लागेल याची चर्चा करत होतोच, पण तयारीसाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याची खरी जाणीव झाली ती लालूच्या मुलाची Academic challenge आणि माझ्या मुलाची Model UN conference तारीख नेमकी त्याच दिवशी लागल्यावर. शुक्रवारी लालूला फोनवर मारे म्हटले, मी लवकर येईन, खव्याच्या पोळ्यांसाठी तूप कढवून आणेन आणखी असेच बरेच काही. संध्याकाळी लोणी आणून तूप कढवले, केक आणला. १२ खुर्च्या तळघरात होत्या. चि. विनयला वेळ नव्हता, तर चि. समीरच्या मदतीने वर आणल्या. सकाळी तयारी करताना वेळ कमी पडेल म्हणून लग्न-मुंजीचे कपडे रद्द केले, काही नट्टा-पट्टा न करता साधाच पोषाख करून तशीच घाईने निघाले. (हो, नाहीतर म्हणतील भ. मे!) चि.समीरचा हट्ट चालू होताच "मानस नाही, मी काय करू?" त्याला म्हटले "राहुल आहे, भरपूर पास्ता करून घेतला आहे, तुझ्या वाढदिवसाचा केक आहे, व्हिडिओ गेम आहेत, मग तुला काय चिंता?" १० वाजता कसेबसे बाहेर पडलो. लालूच्या घराजवळ पाच मिनिटावर आल्यावर आठवले, तूप विसरले, तबला विसरले, आणखी काय काय कोणास ठाऊक!
लालूच्या दारात शिरतानाच शरणागती पत्करली आणि माझ्या पुढेच आलेल्या झकास आणि श्री. सुमंगल यांना खुर्च्या आत आणण्यासाठी मदत मागितली. तूप विसरल्याचे सांगितले, तर कार्टा माझ्या घरातील तुपाचा डबा आणू शकेल का, असा विचार झाला. कार्ट्याला माझ्या घरातल्या खुर्च्या सापडतील, पण तूपाचा डबा? त्यापेक्षा मी म्हटले, मी कढवते घरात लोणी असेल तर. लालूच्या फ्रीजमधे थोडेसे लोणी होते, बोलता बोलता तूप कढले. सीमा फुलांची सजावट करत होती. शोनू पण मदत करत होती. आम्ही सर्वांनी सा.खि. आणि इडली चटणी खाल्ली. रूनी आली, झकास आणि श्री. रूनी जेवण आणायला गेले. ज्ञाती आली. तेवढ्यात श्री. लालू यांचा फोनही आला की मानस पुढच्या राऊंडला गेला असल्याने त्यांना यायला थोडा वेळ लागेल. थोड्याच वेळात झकास आणि श्री. रूनी जेवण घेऊन आलेसुद्धा. जेवण टेबलावर मांडत असतानाच बाराची बस आली. शोनू आणि मी तिच्या कॅमेरातील फोटो उतरवून घ्यायच्या मागे लागलो.
थोडे ओळखा पाहू झाले, आणि आटलांटा, नॉर्थ कॅरोलिनाची मंडळी आली. पुन्हा थोडे ओळखा पाहू. माझी सगळ्यांशी ओळख झाली नाहीच, पण मायबोलीवर ROM मधे असल्याने संदर्भाने बरीच माणसे ओळखता आली.
जेवण उत्तम होतेच, खव्याच्या पोळ्या आपण जास्त खाऊ शकत नाही, म्हणून इतरांनाच आग्रह करून संपवण्याचा प्रयत्न केला. इतर बरेच गोडाचे पदार्थ होते, पण पोट गच्च भरल्याने मी त्या वाटेला गेले नाही, आणि उत्तमोत्तम पदार्थांना मुकले.
सांस्कृतिक कार्यक्रम व ओळख परेड छान पार पडली, त्यातच मधे चहा समारंभ झाला. मुले बाहेर खेळत होती. माझ्या मुलाने (चि. विनय) फोटोपुरते आपले तोंड दाखवले, वेबमास्तर आणि मास्तरीणबाईंची ओळख करून घेतली व दोन्ही मुलगे पटकन गाडीत बसून निघूनही गेले, जाताना उरलेला पास्ता थोडा आम्हाला हवाय असे सांगून गेले. कोणाला काय आवडते...
इकडे घरात बोरकूट, मसाले, पुस्तके, बियाणे, उरलेले खाण्याचे पदार्थ असे वाटप चालू होते, ते मला कळलेच नाही. पण तरी थोड्या घोसाळ्याच्या बिया आणि काही पुस्तके हाती लागली. सगळ्या बशी निघेपर्यंत थांबले, आम्ही मुलीकडची माणसे ना (माझी गाडी सगळ्यात आत होती!) धनंजयने खुर्च्या गाडीत लावून दिल्या, आणि पास्त्याचा एक ट्रे आणि थोड्या खव्याच्या पोळ्या घेऊन मी घरी आले. (पग्याची आणि लालूची कृपा आहे).
असेच जीटीजी पुन्हा व्हावेत, अर्थात अशीच कोणाकोणाची कृपा व्हावी आणि सर्वांना अशी चविष्ट पक्वान्ने पुन्हा चाखायला मिळावीत.
---समाप्त---
डिसीत वसंत बहरला
Submitted by स्वाती_दांडेकर on 13 April, 2010 - 23:38
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! आमचा पण रिपोर्ट आला..
अरे वा! आमचा पण रिपोर्ट आला.. मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळे झाले म्हटलं आमचाच राहिला की काय!
छान. (>> मुलीकडची माणसे?
छान.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(>> मुलीकडची माणसे? मुलगी कोण, लालू का? :P)
छान लिहीलय!!
छान लिहीलय!!
लालूच असावी. तिच्या माहेरची
लालूच असावी. तिच्या माहेरची माणसं म्हणजे आपणच माबो जनता.
मुलाकडच्यांना 'हम भी कुछ कम नहीं' दाखवायला सारखे कपडे बदलत नव्हती का? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
स्वाती, तुमचाही वृत्तांत छान. आणि मदतीबद्दल धन्यवाद.
मस्त स्वाती!! तुमच्या
मस्त स्वाती!! तुमच्या मदतीबद्दल खुप धन्यवाद!
आमचा साफ अनुल्लेख ?
आमचा साफ अनुल्लेख ?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
छान लिहिलय.. होस्टांचा एकतरी
छान लिहिलय..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
होस्टांचा एकतरी वृत्तांत आला शेवटी..
तुम्ही सगळ्यांना पोळ्या वाढल्या ते बरं झालं.. सगळ्यांना मिळाल्या व्यवस्थित..
थोड्या खव्याच्या पोळ्या घेऊन मी घरी आले. (पग्याची आणि लालूची कृपा आहे). >>>>> गटगला उपस्थित माबोकरांनो... खाव्याच्या पोळ्या स्वाती दांडेकरांच्या घरी गेल्या ह्यात माझा खर्रच काही हात नाही... पोळ्यांची सगळी "अफरातफर" लालूनेच केली होती..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खुप मस्त वाटल तुमच्याशी गप्पा
खुप मस्त वाटल तुमच्याशी गप्पा मारुन त्या दिवशी. छान लिहिलय. सिंपल आणि स्वीट एकदम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बिया दोडक्याचा आहेत.
हो आणि दोडकी फार गोsssssड
हो आणि दोडकी फार गोsssssड आहेत बर्का
(सीमा कूकीजच्या आइसिंगसाठी दोडक्याचे क्रीम वापरते की काय अशी मला शंका येतेय :फिदी:)
मस्त वृतांत. पण आम्हाला
मस्त वृतांत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण आम्हाला पोळीवर तूप नाही मिळाल.
छान वृत्तांत .
छान वृत्तांत :).
>> लालूच्या फ्रीजमधे थोडेसे
>> लालूच्या फ्रीजमधे थोडेसे लोणी होते
पण तूप बरंच दिसत होतं. डीसी/व्हीएकरांची 'थोडेसे लोणी'ची डेफिनिशन काय आहे?
किंवा 'थोड्याश्या लोण्यात भरपूर तुपा'ची कृयोजाटा.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. तिकडे किती तयारी आणि
छान. तिकडे किती तयारी आणि गडबड होती त्याच अंदाज आला. छान व्यवस्था केलीत तुम्ही सर्वांनी.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मला पास्ता आधी दिसलाच नाही. संध्याकाळी पाहीला.
स्वाती, पास्ता लहान मुलांसाठी
स्वाती, पास्ता लहान मुलांसाठी होता.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
म्हणुनच तर पाहिजे होता तिला.
म्हणुनच तर पाहिजे होता तिला.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
छान प्रांजळ वृत्तांत.
छान प्रांजळ वृत्तांत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे वृत्तांत..
छान आहे वृत्तांत..
सीमा
सीमा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान!
छान!
डीसीचा पण आला... चला.. आता
डीसीचा पण आला... चला.. आता लँकॅस्टरचा एक आणि कॅलिफोर्नियाचा एक आले की झाले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इतर वृत्तांतात सर्व डिटेल
इतर वृत्तांतात सर्व डिटेल आहेच. पुन्हा तेच तेच होऊ नये म्हणून आणि सगळे लिहीपर्यंत रात्र फार झाली म्हणून काही नावे घ्यायची राहिली. त्याबद्दल क्षमस्व. कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
शिट्टीबद्दल म्हणताय का ?
शिट्टीबद्दल म्हणताय का ? अरेरे तुम्ही क्षमस्व वगैरे म्हणू नका हो. मी गम्मत करत होते.
मस्त लिहिलय
मस्त लिहिलय
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गटगच्या तयारीचा वृत्तांत!
गटगच्या तयारीचा वृत्तांत! मस्तच!
लालू अन सर्व मदतनिसांचे आभार!
आला आला डीसीचा पण वृत्तांत
आला आला डीसीचा पण वृत्तांत आला.
स्वाती, मस्तच हो. चांगला
स्वाती, मस्तच हो. चांगला लिहिलाय तुम्ही डीसीचा वृत्तांत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मलाही खव्याच्या पोळ्या तुमच्यामुळे मिळाल्या..
(No subject)
Pages