सिंगापूरमधील गणेशोत्सव, मराठमोळी कार्यक्रम आणि साहित्य वाचन..
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही महाराष्ट्र मंडळ, सिंगापूर येथे उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. ही आहे या वर्षीची सजावट आणि राजवाड्यात विराजमान झालेले गणोबा...
पहिल्याच दिवशी, अगदी कामाचा दिवस असूनही, भल्या पहाटे २५० भाविकांनी गणरायाची स्थापना करण्यासाठी, ग्लोबल इंडियन स्कूल मधे आपली उपस्थिती दाखवली. पाच दिवस गणरायासाठी आणि त्याच्या भक्तांसाठी विविध मराठमोळी कार्यक्रम मंडळाने ठेवले आहेत. यात मंडळातील स्थानिक बालकलाकारांनी केलेला गाण्यांचा कार्यक्रम, साहित्यप्रेमींनी केलेला पुस्तक वाचनाचा कार्यक्रम, 'विविधा' मंचतर्फे असणारा नृत्याचा कार्यक्रम, महेन्द्र गणपुळे यांचा 'हास्यनगरी' हा कार्यक्रम आणि या खेरीज स्थानिक मराठी बच्चेकंपनींचा मराठमोळी सांस्कृतीक कार्यक्रम असणार आहे. पाचव्या दिवशी खास अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन, जिलबीची पंगत, गणरायची थाटामाटात मिरवणूक आणि सोबत स्थानिक मराठी जनता नेहमीप्रमाणे लेझीम नृत्य सादर करणार आहे.
आणि दुसरे छायाचित्र आहे, साहित्यप्रेमींनी केलेल्या पुस्तक वाचनाचे. यावेळी गौरी देशपांडे, पु. ल. देशपांडे, दुर्गा भागवत, व. पु. काळे, श्री. ना. पेंडसे, जी. ऐ. कुलकर्णी, शांता शेळके, रवींद्र भट, बाबासाहेब पुरंदरे, प्रभाकर पणशीकर, दुर्गा खोटे, संजय सोनवने, वसंत पोतदार, लक्ष्मीबाई टिळक, डॉ. नरेंद्र जाधव इत्यादी लेखकांचे साहित्य वाचले. सर्वच श्रोत्यांना मंडळाचा हा अभिनव उपक्रम फार आवडला. या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट म्हणजे राधिका ठाकूर या ११ वर्षाच्या मुलीने व. पुंचे 'एकबोटे' ही विनोदी कथा वाचून सर्व श्रोत्यांचे खूप मनोरंजन केले आणि कार्यक्रमाला बहार आणली. सोबत हा दिलासा देखील दिला की परदेशात मराठी भाषा रुजते आहे. या कार्यक्रमाची सुरवात माय माउली संत ज्ञानेश्वरांवरील रवींद्र भट यांच्या 'इंद्रायणीकाठी' या पुस्तकातील एका लेखानी झाली. संपूर्ण कार्यक्रम रात्रीचे ८:३० पासून ११:३० पर्यंत चालला.
अरे वा ....
अरे वा .... गणपती बाप्पा मोरया
>> सोबत हा दिलासा देखील दिला की परदेशात मराठी भाषा रुजते आहे.
महत्वाचं.... खूप खूप महत्वाचं. राधिकाला माझ्यातर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा सांगशील का ?
बी छानच रे..
बी छानच रे.. उत्तम उपक्रम..
बी, बाप्पा
बी, बाप्पा छान आहेत. छान उपक्रम.
उत्तम
उत्तम उपक्रम !
इंद्रायणीकाठी चे लेखक रवींद्र भट आहेत.
***
If dreams are like movies, then memories are films about ghosts...
मी वरील
मी वरील लेख जशाचा तसाच ई सकाळ यांना पाठविला. या लोकांनी मात्र त्या लेखाचे काहिच्या काही केले:
http://www.esakal.com/esakal/09052008/MAZA_GANAPATIDFC2A6E39B.htm
माझे नाव देखील तिथे नाही. शिवाय व्याकरणाच्या चुका आणि जे कार्यक्रम झाले नाहीत ते झालेत असे लिहिले
सकाळ सारखे वृत्तपत्र अशा चुका करतो, या नंतर कानाला खडा..