IPL २०१०

Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13

आजपासून तिसर्‍या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

यंदा सर्वाना (USA वगळ्ता Sad ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही Happy

इथे पहा http://www.youtube.com/ipl

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मित्रा॑नो,

तुम्ही एक निरिक्षण केले का? आय्.पी. ल. च्या माध्यमातुन सगळ्या देशाचे काही खेळाडु एकत्र आल्या मुळे चा॑गल्या थरारक सामने बघायला मिळत आहे. काही सामने शेवटच्या चे॑डु पर्य॑त चुरशिचे होतात. एरवी एका मे॑का॑विरुध्द खेळणारे काही महान खेळाडु आय्.पी. ल. च्या माध्यमातुन यात एकत्र खेळत असल्याने, हा अनमोल क्षण आहे.
ते॑डुलकर्-जयसुर्या, कॅलिस्-कु॑बळे,गा॑गुली-ख्रिस गेल, लक्ष्मण- गिलख्रिस्ट,........... या सगळ्या॑ना एकत्र खे़ळताना बघण्याची मजा काही वेगळीच आहे.
पण एक मात्र नक्की या आय्.पी. ल. च्या माध्यमातुन भारताला व सर्व खेळाडु॑ना प्रच॑ड प्रमाणात पैसा मिळाला. काल परवा पर्य॑त आय्.पी. ल. ला विरोध करणारे देश आता आय्.पी. ल. च्या सामन्या नुसार आपले सामने पुढे ढकलतात कि॑वा अगोदर घेतात. एवढेच नाही तर अगदी आय्.सी.सी (इ॑टरनॅशल क्रिकेट काउ॑न्सिल) सुद्धा आपल्या भारतापुढे नतमस्तक झाला, आणि २०१० ची २०-२० विश्वकर॑डक स्पर्धा पुढे ढकलावी लागली.
यावरुन भारताची वाटचाल "सुपर पावर" च्या दिशेने होत आहे. हे सिद्ध होत आहे.
जय हि॑द, जय भारत.

आय सी सी = इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल. अर्थात त्याचे काम क्लबसारखे चालत असेल म्हणा.शरद पवार त्याचे पुढले अध्यक्ष.. प्रेसिडेंट इलेक्ट.

वॉर्न नी जादू दाखवली...

९६ च्या वर्ल्डकप सेमीफायनल मधे विंडीजला असंच वॉर्न च्या बॉलिंगनी झोपवलं होतं त्याची आठवण आली...
विकेट्स ची आकडेवारी काहीही असो... वॉर्न कधीही मुरलीपेक्षा चांगला बॉलर आहे....

Points Table मधे शेवटी NRR असे असते. त्याचा अर्थ काय? ते कसे ठरवतात?

DLF Maximum म्हणजे काय? कार्बनकमाल म्हणजे काय?

उत्तरे सांगितल्यास बरे वाटेल. धन्यवाद.

NRR म्हणजे नेट रन रेट...संघाने केलेल्या धावांची धावगती आणि दिलेल्या धावांची धावगती (धावगती=धावा/षटके) यातला फरक.
मुंबई-राजस्थान मॅच. मुंबई २० षटकात २१२ धावा गती - १०.६ राजस्थान २० षटकात २०८ धावा गती १०.४ नेट ०.२.
असे दर सामन्यागणिक जोडले जाते.मुंबैने आतापर्यंत ९४२ चेंडुत १४३२ धावा केल्या आणि ९५५ चेंडुत १२२७ धावा दिल्या त्यांचा नेट रन र्रेट ९.१२१-७.७०९= १.४१२.
मुंबईचे हे दोन्ही रेट सगळ्यात चांगले आहेत्..म्हणजे आमची पोरं सगळ्यात हुश्शार.
एखादा संघ २० षटकांच्या आत सर्वबाद झाला तरी त्यानी फलंदाजीसाठी २० षटके घेतली असेच मानले जाते.तर विरुद्ध संघाने गोलंदाजीसाठी २० षटके घेतली असे.
DLF maximum ,कार्बन कमाल हे स्पॉन्सर्सची नावे पुन्हा पुन्हा घेण्याचे निमित्त आहे. षटकार घेतला की घ्या डीएलेएफ चे नाव आणि झेल घेतला की कार्बनचे. थोड्या दिवसांनी एक धाव, २ धावा, धावबाद, यष्टिचित , निर्धाव चेंडू, षटक, त्रिफळा यांना पण प्रायोजक मिळतील.

एन आर आर म्हणजे नेट रन रेट . तो कसा काढतात माहीत नाही. बहुधा त्याचा उपयोग कुठे टाय झाला तर करतात वाटते. कार्बन कमाल म्हनजे कार्बन या मोबाइल कम्पनीने स्पोन्सर केलेला कमाल कौशल्याचा कॅच आणि बहुधा मॅन ऑफ द मॅच. की सिक्सर असए काही तरी आहे.

नेट रन रेट-
खेळणार्‍या संघांच्या रन रेट मधील फरक
समजा अ संघानी २० ओव्हर्समधे १४० धावा केल्या, तर रन रेट ७
उत्तरादाखल ब संघ १८ ओव्हर्समधे १३५ धावा काढू शकला तर रन रेट ७.५
रन रेट मधील फरक ०.५
त्यामुळे
अ संघाचा नेट रन रेट = -०.५
ब संघाचा नेट रन रेट = +०.५
टेबल मधील अकडे = आत्तापर्यंतच्या सामन्यांमधील नेट रन रेट ची बेरीज

DLF Maximum = सिक्सर (प्रत्येक सिक्स च्या वेळेस हा उल्लेख होण्यासाठी DLF पैसे मोजतंय... सर्वाधिक षटकार मारणार्‍याला बक्षीस देतंय...)

कार्बन कमाल = कॅच (प्रत्येक कॅच च्या वेळेस हा उल्लेख होण्यासाठी कार्बन मोबाईल पैसे मोजतंय... सर्वात अवघड कॅच घेणार्‍याला बक्षीस देतंय... मधंतरात काही लोकांना कॅच घेण्याचे संधी देऊन प्रत्येक कॅच घेणार्‍याला एक फोन आणि त्या प्रत्येक कॅच मागे ब्रेस्ट कॅन्सर असोसिएशन ला २५००० रुपये देतंय...)

मुंबई इन्डियन्सचे fair play चे ९ गुण कापले गेले. कुठे, कसे, केव्हा? कुणाला कळले का?
संथ षटकगतीबद्दल की हरभजनने केलेल्या शिविगाळीबद्दल?हरभजनने जे केले ते प्रत्येक संघात कोणीना कोणी करत आलाय. सौरभ तिवारी बाद झाल्यावर त्यालाही गोलंदजाने शिव्या दिलेल्या वाचता आल्या. वर्गातल्या नाठाळ मुलाकडे शिक्षकाचे विशेष लक्ष असते तसे हरभजन्चे होते का? म्हणजे त्याच्या वागण्याचे मी समर्थन करतोय असे नाही.

उत्तरादाखल ब संघ १८ ओव्हर्समधे १३५ धावा काढू शकला तर रन रेट ७.५ >>

माझ्या मते जर मॅच रिडुयस झाली नसेल तर ब सन्घाचा रनरेट ६.७५ असेल .

tonaga | 31 March, 2010 - 14:31
रायडू , सतिश वगैरे फार विश्वासार्ह वाटत नाहीत. साहेब गेल्यावर नीट लढतील याची खात्री नाही. विशेषतः बंगलोरकरांविरुद्ध खात्री वाटत नाही...

अँकी तुमच्या फॉर्म्युलानुसार विजेत्या संघाचा रनरेट उणे तर पराभूत संघाचा अधिक आहे.
>>
नेट रन रेट च्या बाबतीत हे होऊ शकतं..

''नेट रन रेट च्या बाबतीत हे होऊ शकतं..''
कसं काय? IPL मधल्या कोणत्या सामन्यात असे झाले आहे का?

''समजा अ संघानी २० ओव्हर्समधे १४० धावा केल्या, तर रन रेट ७
उत्तरादाखल ब संघ १८ ओव्हर्समधे १३५ धावा काढू शकला तर रन रेट ७.५
रन रेट मधील फरक ०.५''
ब संघ १८ षटकात सर्वबाद झाला असला तरी त्यांची धावगती १३५/२० षटके अशीच असेल. दुसरी फलंदाजी करणारा संग जेव्हा काही चेंडू वाचवून विजयी धावसंख्या गाठतो तेव्हाच प्रत्यक्ष वापरलेले चेंडू धावगतीसाठी मोजतात. उदः ब संघाने १८ षटकांत १४४ धावा केल्या तर त्यांची धावगती ८ आणि निव्वळ धावगती १. अ संघाची उणे १.

नेट रन रेट च्या बाबतीत हे होऊ शकतं.. >>
भरत यान्च् बरोबर आहे
असे कधीही होउ शकत नाही . याला कारण ही आहे .
नाहितर ५० षटकात ३५० धावा होउ शकत नाहीत म्हणून साखळी सामन्यात (league ) एखादा सन्घ २० षटकात १६० धावात सर्वबाद होएल आणी +१ ( ८-७) रनरेट घेईल जे योग्य नाही

एखादा सन्घ २० षटकात १६० धावात सर्वबाद होएल >> जर संघ सर्वबाद झाला तर त्याच्या ओव्हर्स या पूर्ण धरल्या जातात.. तेव्हा रन रेट ८ नाही .. ३.२ असेल

इथे विकिची लिंक पहा.. आणि क्रिकइन्फोवरही आहे..
http://static.cricinfo.com/db/ABOUT_CRICKET/EXPLANATION/NETRR.html
http://en.wikipedia.org/wiki/Net_run_rate

एखादा सन्घ २० षटकात १६० धावात सर्वबाद होएल >> जर संघ सर्वबाद झाला तर त्याच्या ओव्हर्स या पूर्ण धरल्या जातात.. तेव्हा रन रेट ८ नाही .. ३.२ असेल >>>
केदार मी पण तेच समजावत होतो की जर अ‍ॅन्किची पद्धत वापरली तर तो जिन्कणार्या सन्घावर अन्याय होईल .
रनरेट ३.२ च होईल Current Method ने . Happy

दादा आता ऐकत नाही ! खरंय. कालच्या सामन्यातलं त्याचं क्षेत्ररक्षण बघून तर अवाक व्हायला झालं . पुढे येऊन चेंडू सीमापार टोलावण्याची त्याची लय अजून कायम आहे पण ऑफ साईडचा क्षेत्ररक्षकांचा चक्रव्यूह भेदून चौकार मारण्याच्या दादाच्या खासीयतीला जरा ग्रहण लागल्यासारखं वाटत. एकंदरीत,
शेन वॉर्न, मुरली, अनिल, गिलख्रिस्ट ई. सर्वच 'कालच्या दादांचा" खेळ आयपीएल २०१०मुळे पुनःप्रत्ययाचा आनंद देतो आहे, हे खरं.

दरिद्री जनतेसाठी पैसे नसणार्‍या ह्या देशात असे पैशाचे धंदे नेहमीच चालू असतात, जनतेचे योग्य
प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी त्यातीलच हा एक.

दिलीप ,

असू द्या हो . या निमित्ताने तेवढीच चलनाची उलाढाल होतेय , थोडा का असेना Black Money बाहेर येतोय यातच समाधान मानायच .
आणी IPL नसती झाली तर हे माल्ल्या आणी अम्बानी काय हे करोडो रूपये गरिबाना दान करणार होते का ? पडूनच राहिले असते त्यान्च्या तिजोरित .
जोवर सरकार स्वत:चा पैसा घालत नाहिये तोवर चालू दे . Happy

बंगलोर हारले परत काल.....
स्कोअर तसा बरा केला होता पण बॉलिंग फारच गचाळ केली Sad
असो...

>>> दादा आता ऐकत नाही ! खरंय. कालच्या सामन्यातलं त्याचं क्षेत्ररक्षण बघून तर अवाक व्हायला झालं

दादाने भारतातर्फे खेळताना क्षेत्ररक्षणात, झेल घेण्यात व धावा घेताना कधीही अशी चपळाई दाखविलेली नाही. आता या उतारवयात तो अचानक असा चपळ झालेला आहे. ही शाहरुख देत असलेल्या पैशांची करामत तर नव्हे ?

''दादाने भारतातर्फे खेळताना क्षेत्ररक्षणात, झेल घेण्यात व धावा घेताना कधीही अशी चपळाई दाखविलेली नाही. आता या उतारवयात तो अचानक असा चपळ झालेला आहे. ही शाहरुख देत असलेल्या पैशांची करामत तर नव्हे ''

दादाला पैशाची ददात कधीच नव्हती.. बहुतेक क्रिकेटला कायमचा राम राम ठोकण्यापूर्वी टी-२० मध्यही स्वतःचे नाव विजेता कप्तान आणि जिगरबाज खेळाडू म्हणून नोंदवायची तीव्र इच्छा असावी.

>>विजेता कप्तान आणि जिगरबाज खेळाडु?
गांगुली हा एक सुदैवी कप्तान आणि स्वार्थी, आत्मकेंद्रित खेळाडू होता!

<जोवर सरकार स्वत:चा पैसा घालत नाहिये तोवर चालू दे .>

आय पी एल ला करमाफी देण्याचा प्रस्ताव मान्य झाला का? फक्त आय पी एल या कंपनीलाच कर माफ की संघांचे मालक, खेळाडू यांनाहि करमाफी?

Pages