Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.
बर्याच रीक्षा, 207, 407 वर
बर्याच रीक्षा, 207, 407 वर मागे मूलांची नावे लिहीलेली असतात. "अजय, विजय,गीता सोनू" इत्यादी इत्यादी.
आणि खाली लिहीलेलं असतं " नानाची कृपा" आता कोण कोणाची कृपा समजायचं??!!
आता कोण कोणाची कृपा समजायचं
आता कोण कोणाची कृपा समजायचं <<< सगळी मुलं 'नानाची कृपा' हा. का. ना. का...
काही नंबर प्लेट्स
काही नंबर प्लेट्स
या सर्व गाड्या एकाच ठिकाणी
या सर्व गाड्या एकाच ठिकाणी कशा काय सापडल्या तुम्हाला ?
महेश, तो फोटोंचा कोलाज आहे.
महेश, तो फोटोंचा कोलाज आहे.
स्वप्ना चम्मत ग ! आम्हाला
स्वप्ना चम्मत ग ! आम्हाला माहिती होत आधीच
या सर्व गाड्या एकाच ठिकाणी
या सर्व गाड्या एकाच ठिकाणी कशा काय सापडल्या तुम्हाला ? >>> बरीच मेहनत करावी लागली हो
ई-पत्रामधुन आले आहेत
काल प्लेझंटन , कॅलिफोर्निया
काल प्लेझंटन , कॅलिफोर्निया मधे पाहिलेल्या गाडीचा नंबर.

ह्या सर्व नंबर प्लेट्स सकाळ
ह्या सर्व नंबर प्लेट्स सकाळ मधे आल्या होत्या
ते वरच्या वाघ, हिरा
ते वरच्या वाघ, हिरा वगैरेंसारख्या नंबर प्लेट आरटीओ लावू कसे देतात? गाडीचा नं दिसतच नाही.
मयूरेश....
मयूरेश....:स्मित:
मयूरेश कोण
मयूरेश कोण
एका स्कोर्पिओ च्या मागे
एका स्कोर्पिओ च्या मागे महाराजानच्या राज्मुद्रे च चित्र होत आनी लिहिल होत....
"बघतोस काय ? मुजरा कर .....! "
"बघतोस काय ? मुजरा कर .....!
"बघतोस काय ? मुजरा कर .....! ":)
काल एका सुमोपाठी लिहिलेले
काल एका सुमोपाठी लिहिलेले वाचले 'बघ माझी आठवण येते का ? '
सुमोने धडक दिली तर नक्की
सुमोने धडक दिली तर नक्की येईल.
मी वाचलेल वाक्य ''पाहतेस काय
मी वाचलेल वाक्य ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''.
आणि नाही पाहिलस तर खड्ड्यात
आणि नाही पाहिलस तर खड्ड्यात पडशील
हा बीबी वाहनांच्या मागे
हा बीबी वाहनांच्या मागे लिहिलेल्या वाक्यांसाठी आहे हे कबूल. पण इतकी मजेशीर पाटी पाहिली एका दुकानावर की लिहिल्याशिवाय रहावत नाहिये. शिवाजीपार्कला सेनापती बापटांच्या पुतळयाजवळून ओव्हन फ्रेशकडे जाताना फडकेंची लॅब लागते. तिच्या बाहेरच एका मोचीची टपरी आहे त्यावर त्याचं नाव लिहिलंय - कि.स. सोनावणे
विकेन्डला पाहिलेल्या काही
विकेन्डला पाहिलेल्या काही गाडयांवरील वाक्यं:
१. झाडे लावा, झाडे जगवा, सुरक्षित अंतर ठेवा
सुरक्षित अंतर गाड्यांत का झाडांत ते माहित नाही
२. खुबसूरत हू मै, मुझे नजर मत लगाना, कसम है रोजीकी पीकर मत चलाना
३. Keep distance, 50 foots
foots हे अनेकवचन इंग्रजांना फेफरं आणेल. आणि एव्हढं अंतर भारतातल्या रस्त्यातल्या गाड्यांत ठेवलं तर काश्मिर ते कन्याकुमारी गाड्यांची लाईन लागेल.
४. जागते रहो, भागते रहो
बहुतेक चोर, काळाबाजार करणारे....थोडक्यात राजकारणी लोकांना हा संदेश दिसतोय
५. रस्त्याची अखंडता, देशाची एकात्मता
ह्यातला संबंध कळला नाही. तरी एका मोठ्या खड्ड्यातून गाडी (आणि आम्ही!) सहीसलामत बाहेर पडल्यावर रस्त्याच्या कडेला हा बोर्ड पाहिला. त्यामुळे देशाची एकात्मता ज्या दिशेने चालली आहे त्याबद्दल नवल वाटायचं आता काही कारण नाही
६. We two, ours one
भाषांतरकाराचे पाय धरावेसे वाटतात
मी इकडे एक जीप पाहिली
मी इकडे एक जीप पाहिली होती.
मॉडिफाय केलेली.
एकदम जबरी चिकनी बनवली आहे ती जीप. मिलटरी ग्रीन रंग, ओपन टप, जाडजाड चाकं..
त्या जीपच्या मागे लिहिलली ही दोनच वाक्य.
who needs hummer
when you blow up by jeep
त्या मॉडीफाय जीपला शोभतात ही वाक्य.
मला फोटुच काढायचा आहे त्या जीपचा.
एका गाडीच्या मागे लिहिलेले
एका गाडीच्या मागे लिहिलेले पाहिले: "Dog is my copilot"
एका जीपवर लिहिलं होतं: साधू
एका जीपवर लिहिलं होतं:
साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
'बुरी नजर वाले,तेरा मुंह
'बुरी नजर वाले,तेरा मुंह काला' हे तर एम पी च्या बहुतेक सर्वच ट्रक्सच्या मागे लिहिलेलं असतं
अजून काही "मिलेगा
अजून काही
"मिलेगा मुकद्दर"
"जय शेरां वाली"
"धीरे चलाओ, घर पर कोई आपका इन्तजार कर रहा है"
'गाड़ी शाहनवाज की, सवारी हवाई-जहाज की !'
'दम है तो पास कर, नही तो बर्दाश्त कर'
'चक दे फट्टे, नप दे गिल्ली, सुबह जलंधर, शाम मे दिल्ली'
एम पी च्या एका शाळेच्या बस मागे हे लिहिलेले असायचे
' मुझे मत छेड, मै तो बच्चोंवाली हूं"
पुण्यात विमाननगर मधे आर.टी.ओ.
पुण्यात विमाननगर मधे आर.टी.ओ. चा एक बोर्ड पाहिला:
दोन मुलांत अंतर आवश्यक, तसेच दोन वाहनांत देखील
- मी अजून डोकं खाजवतोय ह्याचा अर्थ काय ते?
- मी अजून डोकं खाजवतोय ह्याचा
- मी अजून डोकं खाजवतोय ह्याचा अर्थ काय ते? >>>>
==================================
दोन मुलांत अंतर - वयाचं
दोन वाहनांमध्ये - कीप सेफ डिस्टंस (सुरक्षित अंतर राखा)
डोकं जर अजून खाजत असेल तर डॉक्टरला दाखवा ...
नाशिकमधल्या एका रिक्शामागे -
नाशिकमधल्या एका रिक्शामागे - 'लाजली बघ'.
एका ट्रकमागे - 'Love is sveet poijan'. प्रेमामुळे ट्रक ड्रायवरची पार वाट लागली असावी.
मी एका ट्रकच्या डाव्या बाजूला
मी एका ट्रकच्या डाव्या बाजूला नाव वाचलं "राज". उजव्या बाजूला होतं "उध्दव". मध्ये २-३ मुलींची नावं होती आणि खाली एक ओळ होती "दैव जाणिले कुणी"
असंच एका ट्रकमागे लिहीलेलं
असंच एका ट्रकमागे लिहीलेलं बघण्यात आलं - बाईने सुंदर साडी नेसली म्हणून बाई चांगली होत नाही
Pages