Submitted by मन्या२८०४ on 25 June, 2008 - 13:03
या मराठी वाक्याचा अर्थ सांगा:
येते हिमाद्रीकन्यापतीसुतललना यौवनामाजि जेंव्हा
रामस्त्रीनामकानात्यजुनउरत ते पिडीते होय तेंव्हा
हस्ती हस्तींद्रव्रुंदांतकमुखरिपूचे नामपुर्वार्ध नाही
यालागी भूसुतेशाअरीअनुजप्रिया स्वल्पही येत नाही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिसरी ओळ
तिसरी ओळ झेपत नाहीये काही.
हिमाद्रीक
हिमाद्रीकन्यापतीसुतललना > रात्र
रामस्त्रीनामकानात्यजुनउरत >> सीत ? ढेकूण
हस्ती > कर
हस्तींद्रव्रुंदांतकमुखरिपूचे >> मकर मधला म उडवून कर
भूसुतेशाअरीअनुजप्रिया >> सुलोचना
रात्र जेंव्हा भरात येते तेंव्हा ढेकूण चावल्यामूळे करकरा खाज सुटून अजीबात झोप लागत नाही.
(असा अर्थ मी, लालू नि गजाने मिळून काढला आहे)
सही
सही
पहिल्या शब्दाचा अर्थ रात्र असा होतो का ? मी आपलं शारदा, सरस्वती करत बसलो होतो. रात्र हा अर्थ कसा होतो ?
***
Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.
बाप रे! काय
बाप रे! काय अगम्य भाषेत लिहीलंय... वाचतानाच इतकं कठिण जातंय....
असामी,
असामी, लालू आणि गजा, Hats off! तुम्ही लिहिलेला अर्थ कितपत योग्य आहे हे मला माहित नाही, पण इतके किचकट लिखाण संयमाने वाचून त्याचा अर्थ लावला तुम्ही!!
असामी ने
असामी ने लावलेला अर्थ थोडासा बरोबर आहे.
हिमाद्रीकन्या = नदी, तिचा पती समुद्र, त्याचा सुत चंद्र त्याची ललना म्हणजे रात्र यौवनात येते म्हणजेच मध्यरात्र
रामस्त्री म्हणजे सीता, तिच्या नावातला काना काढला की उरत ते सीत म्हणजे थंडी,
हस्तींद्र = श्रेष्ठ असे हत्ती, म्हणजे हत्तींच्या कळपाचा नाश करणारा तो सिंह, त्याचे मुख असलेला नृसिंह आणि त्याचा रिपू हिरण्यकश्यपू, त्याच्या नावाचे पूर्वाध म्हणजे हिरण्य म्हणजे सोनं
भूसुता = सीता, तिचा ईश = राम, त्याचा अरी रावण, त्याचा अनुज कुंभकर्ण, त्याची प्रिया निद्रा
थोडक्यातः
मध्यरात्री थंडी वाजते पण पांघरूण घ्यायला पैसे नसल्यामुळे झोप लागत नाही
असं आहे
असं आहे होय ते!
पहिल्या २ ओळी ठीक पण नंतर आम्ही वेगळा अर्थ काढला.


हस्ती हस्तींद्रव्रुंदांतकमुखरिपूचे - यात हस्ती म्हणजे 'हात' म्हणजे 'कर'. तसंच हत्तीचा शत्रू मकर त्यातला 'म' गाळून पुन्हा 'कर' अशी आम्ही 'करकर' केली.
पुढचे भूसुता = सीता, तिचा ईश = राम, त्याचा अरी रावण इथपर्यन्त ठीक मग आम्ही कुंभकर्णाऐवजी बिभीषणाकडे गेलो, त्याच्या बायकोचे नाव 'सुलोचना'. म्हणजे काहीतरी डोळ्यांशी संबंधित. म्हणून 'यालागी भूसुतेशाअरीअनुजप्रिया स्वल्पही येत नाही' चा अर्थ 'जरासुद्धा डोळा लागत नाही, झोप येत नाही' असा काढला. आणि सीत चा अर्थ 'थंडी' माहित नव्हता. मग 'करकर' शी जुळवाजुळव म्हणून 'ढेकूण'.
झोप उडवणारे कोडे होते पण!
मी अजून एक
मी अजून एक (बळेंच) अर्थ लावला -
हिमाद्रीकन्या - पार्वती, तिचा पती - शंकर, त्याचा सुत - गणपती, त्याची ललना - शारदा, सरस्वती... सरस्वती ऐन भरात असताना (अचानक) तिला थंडी वाजू लागते... म्हणजे writer's block आला... अशावेळी अर्थातच लेखकास हिरण्य मिळत नाही आणि परिणामी त्याची झोप उडते.
लेखनाच्या ऐन भरात जर writer's block आला तर उपजीविकेस तो बाधक ठरून लेखकाची झोप उडते
***
Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.
slarti, एकदम
slarti,
एकदम सही...
स्लार्टी,
एकदम भन्नाट
हुश्श! आता
हुश्श!
आता याचा अर्थ सांगा.
अलिकुलवहनाचे वहन आणित होते
शशिधरवहनाने ताडिले जाण माते
नदिपतिरिपु ज्याचा तात भंगोनी गेला
रविसुत महिसंगे फार दु:खित झाला.
अलिकुलवहन
अलिकुलवहनाचे वहन >> अली म्हणजे भुंगा, त्याचे घर कमळ, त्याचे वाहन पाणी
शशिधरवहनाने >> चंद्र धारण करणार्या शंकराचे वाहन नंदी म्हणजे बैल
नदिपतिरिपु ज्याचा तात >> नदीचा पती समुद्र, ज्याचा शत्रू अगस्ती, त्याचा पिता मडके
रविसुत >> सूर्याचा मुलगा कर्ण
====================Spoiler Alert =================
========================== =================
========================== =================
========================== =================
========================== =================
========================== =================
========================== =================
========================== =================
म्हणजे पाण्याने भरलेले मडके घेऊन येताना बैलाने धडक देऊन मडके फोडले नि खाली पडल्यामूळे कानाला लागले.
याचा अर्थ
याचा अर्थ काय?
चारी चंद्र भुतलवटी एके दिनी देखिले
रामासन्मुख रावणास ह्र्दयी सीता धरी आदरे
ऐसे वृत्त विचित्र बरवे चाले पहा सर्वदा
बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षण्मासिचा वायदा
ए काय
ए काय चाललय काय नक्की इथ?? ही नक्की मराठीच आहे नं?
दीपक
"People come into your life for a reason or a season. They bring joy and lessons!!!"
मन्या, तो
मन्या, तो वृत्ताचे उदाहरण असलेला उखाणा आहे का? शार्दुलविक्रिडीत? CBDG
अर्थ नाही आला अजून..
चारही
चारही चंद्र म्हणजे रामाचा मुखचंद्र, सीतेचा मुखचंद्र, आकाशातला चंद्र, आणि चंद्रहारातला चंद्र
रावण म्हणजे पदर, थोडक्यात चांदण्यारात्री रामाला पाहून सीता आदराने पदर सावरते....
ए काय
ए काय चाललय काय नक्की इथ?? ही नक्की मराठीच आहे नं?
तेच तर! एकहि इंग्रजी शब्द न वापरता मराठी? आश्चर्यच आहे!
इथे कोडी
इथे कोडी घालणारे आणि सोडवणारे सगळेच महान आहेत
मन्या ....
मन्या .... महान !!!
आहेस तर तु इथे ..
अरे बापरे
अरे बापरे डोकं फाटायची वेळ आली. मस्त आहे एकेक कोडी. कळत नाही ही वेगळी गोष्ट पण जे कळत नाहे ते मस्तच असावे किंवा कधी कधी बेकार असा आपला (गैर) समज आहे.

पण इथे मस्तच आहे.
ही ओळ सकाळ
ही ओळ सकाळ मधे भटक्या जमातींवर लेखमाला यायची त्यात वाचल्याचे आठवते आहे. बघा कुणाला अर्थ ठावुक आहे का ?
"हरण कासवाच्या पोटी परळ जनला"
.
आणि हा शब्द म्हणजे टाइम पास आहे- "इश्काचे बुक"
इश्काचे
इश्काचे बुक म्हणजे प्रेमग्रंथ?
"हरण
"हरण कासवाच्या पोटी परळ जनला">>>>>>>
हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्मला. तो शब्द 'परळ' नसून 'परळात' आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
'माता' रिटर्न्स.
तो शब्द
तो शब्द 'परळ' नसून 'परळात' आहे >>>> अच्छा.
.
इश्काचे बुक चा अर्थ मीच सांगते- स्केच बुक. त्याचे इश्काचे बुक असे होते- स्केच बुक - इस्केच बुक - इश्केच बुक - इश्काचे बुक.
मी तर
मी तर वाचतानाच clean bold झाले
किती अवघड आहे..............
अर्थ
अर्थ सांगा:
ऐके हो रमणी विचित्र करणी म्या देखिली लोचनी
वापी एक असे, मनोहर दिसे अत्यंत ते तुंबुनी
वेल मधे असे, एक फुल तया शोभिले
होता शुष्क विचित्र घडले, वेले फुला भक्षिले
----------------------- -----
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
-----------------------
दिवा?
मलाही तेच
मलाही तेच वाटले पण ताणून ओढून वाटले.
मला माहीत
मला माहीत आहे पण मी नाही सांगणार...
सांगितल तर तुम्हाला कळेल ना मला कळाल नाही आहे ते..
रावण
रावण म्हणजे पदर.. ? अगस्तीचा बाप मडके... ? काय हे लॉजिक्/शब्दभेद ?
Pages