आह .. साझ !
Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली!
आत्ता तेच वाजतंय - क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या!
किती वर्षं मागे गेले मी एका गाण्यात! हा पिक्चर - १९९७ चा. त्याचसुमारास तो टीव्हीवर लागला होता. आय थिंक तो थिएटर्स मध्ये प्रदर्शित झालाच नाही की काय कोणास ठाऊक! खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती म्हणूनच असेल. असो. तर तो पिक्चर किती कैक कारणांनी बघावासा वाटत होता.
- तथाकथित लता मंगेशकर व आशा भोसलेच्या नात्यातील गुंतागुंत त्यात दाखवल्यामुळे.
- शबाना आझमी व अरूणा इराणी लीड रोल मध्ये.
- झाकीर हुसेनचे संगीत !!!!
- झाकीर हुसेन ऍक्टर म्हणून!
एकदाचा तो टीव्ही वर दाखवला. आणि मी तेव्हा लगेचच व्हीसीआर सरसावून बसले होते, व आख्खा मुव्ही मी रेकॉर्ड केला होता.
व नंतर अगणित वेळा पाहिला.
कथा खूपच कॉम्प्लेक्स. मान्सी वृंदावन व बन्सी वृंदावन या दोघी बहिणी. त्यांचे वडिल नाव विसरले, वृंदावन (रघुविर यादव) अतिशय उत्तम गाणारे, परंतू दारूच्या व्यसनाने वाट लागलेली. लोकांकडे पैसे मागून मागून दारू पिणे इथपर्यंत व्यसन गेले. एका श्रोत्याने दारूसाठी भिक काय मागतोस म्हटल्यावर त्याने चिंब पावसात दारूच्याच नशेत पण त्वेषात म्हटलेले "बादल घुमड बढ आये’ हे सुरेश वाडकरांच्या आवाजातले मेघमल्हारातले गाणे. अक्षरश: काटे येतात ते पाहताना. (मी ९८ साली हार्डली १५-१६ वर्षांची असेन. संगीतातले काहीही न कळता इतकं कळलं .. संगीत अफाट आहे या पिक्चरचे.) हातासारशी गाणे ऐकाच!
http://www.youtube.com/v/vji36gxM9-g
मुली लहान असताना मोठीने दिदिगिरी करून पुढे पुढे केल्याचे प्रसंग आहेतच. पण मोठं झाल्यावर सुद्धा मान्सी बन्सीचे घाईघाईने लग्न लावून देते. तिला गाणं म्हणू देत नाही तसं बन्सीबरोबरच आपल्यालाही संताप येतो. बन्सी शेवटी लग्न मोडून गाण्यात करिअर करायला येते. आणि सुरू होते दोघींची स्पर्धा. रायव्हल्री. मान्सीचा इतका राग येतो ना. (अरूणा इराणी फार्र फिट्ट आहे या रोल मध्ये. अजुनही तिचा चेहरा आठवून राग येतोय मला. मस्त काम!)
शेवटी ती वेळ येतेच. जेव्हा बन्सीला मिळालेले गाणं मान्सी चोरते. (म्हणजे तिच्याऐवजी गाते) . [ असं म्हणतात ते प्रत्यक्षातले गाणं म्हणजे : ए मेरे वतन के लोगो.] तेव्हा मात्र बन्सीच्याही सहनशक्तीचा कडेलोट होतो. व एक नाते नाहीसे होते.
पुढे बन्सी संगीतकाराच्या प्रेमात पडते. [ हा आपला आर्डी असावा. ] या दोघांचे एक गाणे मला अतिशयच आवडते!! हेच ते क्या तुमने है केहे दिया.
http://www.youtube.com/v/y5z8liQ6RDw
पण इथे अजुन एक नात्यांची वीण येते. बन्सीची मुलगी कुहू(आयेशा धारकर) ही झाकीर हुसेनच्याच प्रेमात पडलेली असते. हे जेव्हा बन्सीला समजते तेव्हा ती स्वत:हून ब्रेक अप करते नाते. परंतू हा धक्का सहन न होऊन झाकीर हुसेनचा अपघात होतो. (की आत्महत्या. आठवत नाही. ) या धक्क्यातून बन्सी गाणं सोडते.
पुढे बरेच वळणं आहेत. मला नीट्शी आठवत नाहीत. पिक्चरची सीडी पण दिसली नव्हती कुठे.
मला काही फार कळत नाही. किंवा मी पिक्चर पाहीला तेव्हा तर काहीच कळत नव्हतं. पण असा काही सुंदर घेतलाय ना हा पिक्चर. साधा सुधा, पण तितकाच वेगळा. मला अजुनही शबानाचे सर्व कपडे देखील आठवतात.
जाऊदे.. सद्ध्या तरी ही काही गाणी ऐका अजुन.
http://www.youtube.com/v/UdTHIPFW3sA
http://www.youtube.com/v/WyyauAr50pM
हे श्रेय घोषालच्या आवाजतले सापडले आहे. पण देवकी पंडीतचे अर्थात सुंदर आहे!
http://www.youtube.com/v/nj9iozaBB9M
असे हे साझ पुराण. काय बोलू अजुन. मी फार खुष आहे आज ! नुसती हीच गाणी वाजणार आता. याहू !!!!!!
अपडेट : बिगफ़्लिक्स वर आहे हा मुव्ही !! धान्ताडान.. http://broadband.bigflix.com/home/Movie/1357/Saaz
हं, गाणी बिणी आठवत नाहीयेत,
हं, गाणी बिणी आठवत नाहीयेत, पण हा पिक्चर पाहिल्या/ऐकल्यासारखा का वाटतोय? किंवा असाच , ह्याच कथानकावर आधारित आणखी कोणता जुना पिक्चर होता का?
तुमसे मिली जो जिंदगी...सीली
तुमसे मिली जो जिंदगी...सीली हवा.... हे गाणे ह्याच चित्रपटातले आहे ना ? बस्के, माझ्याकडे हे गाणे तर नक्कीच आहे. पण क्या तुमने पण असेल. सापडले तर पाठवते तुला.
तुमसे मिली जो जिंदगी...सीली
तुमसे मिली जो जिंदगी...सीली हवा.... हे मला आठवत नाहीये.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी आत्ताच मुव्ही पाहतीय. बघते त्यात आहे का..
मिळाले तर दे पाठवून!
सायो, मला नाही कल्पना..
बस्के सहीच गं माझा पण आवडता
बस्के सहीच गं माझा पण आवडता मुव्ही हा. असाच टिव्हीवर पाहीलेला मी पण कॉलेजला असताना. इथे अमेरिकेत आल्यावर dvd लायब्ररी चालू केली आणी तिथे मिळाला परत पाहायला.....ऑफिसमधे युट्यूब बंद आहे![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विकांताची सुरूवात आता घरी जाऊन आधी हा मुव्ही पाहाते.
सीली हवा हे लिबास सिनेमातलं
सीली हवा हे लिबास सिनेमातलं गाणं आहे. गुलजार + आर डी बर्मन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याशिवाय 'खामोश सा अफसाना' आणि 'फिर किसी शाख ने फेकी छाँओ' ही पण 'लिबास'मधली.
बाई धा पयकी धा
बाई धा पयकी धा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बस्के, अगदी मनातले लिहिले
बस्के,
अगदी मनातले लिहिले आहेस. अप्रतिम गाणी. यु ट्युबवर मागेच सापडली होती. पण बिगफ्लिक्सच्या लिन्कसाठी खुप खुप आभार. जुम्मेकी रात साझ के नाम!
बस्के, मी ज्या चित्रपटांच्या
बस्के, मी ज्या चित्रपटांच्या चुकूनही वाटयाला जात नाही असा वाटला होता तेव्हा. यातील गाणी चांगली आहेत माहीत नव्हते. ऐकून बघतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सेम अनुभव आम्ही मागच्या वर्षी
सेम अनुभव आम्ही मागच्या वर्षी घेतला. असंच ब्राऊझींग करताना आधी हे गाणं आणि नंतर हा पिक्चर सापडला. पूर्वाला आणि मला, दोघांनाही परत एकदा आवडला....
शाळेत असताना तबला शिकत होतो (निनादही शिकत होता बरं का!!). तेव्हा झाकीर हुसेन सारखा तबला वाजवणं हे स्वप्न होतं. तेव्हा अचानक एक दिवशी हा पिक्चर टिव्ही वर दाखवला. तेव्हा आजच्या सारखं कुठल्याही पिक्चर्ची आजच्या सारखी सात सात आठ आठ दिवस आधीपासुन जाहीरात करत नसत. (आज हा पिक्चर दाखवला गेला तर सात दिअवस आधी पासुन "इस शनिवार दखीये दो बेहेनोंका मुकाबला" वगैरे अशी जाहीरात करतील). असो. पण जाहीरात न केल्या मुळे अनेक जणं ह्या सुंदर सिनेमाला आणि त्याहुनही सुंदर झाकीरच्या संगीताला मुकले.
झाकीर हुसेन हा कलाकार मला त्याच्या शुद्ध तबला वादनाबरोबरच त्याने इतर देशातील कलावंतां बरोबर केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगां मुळेही आवडतो..ही बघा झलक
http://www.youtube.com/watch?v=pNtpqj7ij0g&feature=player_embedded
अरे वा बरेच फॅन्स आहेत की
अरे वा बरेच फॅन्स आहेत की साझचे..!![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
विनायक : तूही शिकायचास तबला? जबरी. आणि तू साझ पाहीलास ते अजुन जबरी. तेव्हढं मात्र निनादला शिकव! फारेण्डासारखा तोही वाट्याला जात नाही अशा पिक्चर्सच्या!
बस्के, मस्त लिहिलं आहेस. या
बस्के,
मस्त लिहिलं आहेस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या चित्रपटाची सीडी व कॅसेट प्लस म्युझिकनं बाजारात आणली होती. ही कंपनी बुडून बरीच वर्षं झाली. तसंच या चित्रपटातली यशवंत देव, राजकमल यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही सुंदर आहेत. 'बादल उमड बढ आये' हे गाणं यशवंत देवांचं आहे.. पडद्यावर रघुवीर यादवनं झोकात सादर केलं आहे.
सई परांजप्यांना चित्रपटातल्या गाण्यांत विविधता हवी होती, म्हणून त्यांनी या संगीतकारांकडून गाणी करून घेतली.
'सरदारी बेगम', 'दरमियां' हे चित्रपटही याच सुमारास प्रदर्शित झाले. त्यांच्या ध्वनिफितीही प्लस म्युझिकनं बाजारात आणल्या होत्या, आणि ही गाणीही दुर्लक्षितच राहिली. 'सरदारी बेगम'मधल्या आशा आणि आरती अंकलीकरांच्या कजर्या निव्वळ अप्रतिम आहेत. 'दरमियां'मधलं 'पिघलता हुआ ये समा' हे गाणंही मस्त.
हो चिनुक्स, चार संगीतकार
हो चिनुक्स, चार संगीतकार आहेत. पण मला झाकीर हुसेनमुळे जास्त उत्सुकता होती! ( या मुव्हीत तो अॅक्टींग पण सही करतो. हिमान देसाई! जाम क्युट!
)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अॅक्चुअली फार एक्साईट होऊन लिहीले होते मी हे. बर्याच गोष्टी निसटल्यात. आज मुव्ही पाहीला तेव्हा बरीच गाणी सुद्धा आठवली बाकीची. ( सुननेवाले सुद्धा जबरी आहे गाणं.)
मला लवकरात लवकर आनंद शेअर करायचा होता बस्स.
वाह साझ! छान बस्के. माझाही
वाह साझ!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान बस्के. माझाही आवडता पट आणि सुंदर गाणी.
सरदारी बेगम पण छान आहे.
छान लिहिलस बस्के. मला पाहायचा
छान लिहिलस बस्के.
मला पाहायचा आहे हा सिनेमा. तेंव्हा राहून गेलेला. हे गाणं खूप सुंदर आहे.
सरदारी बेगम मधलं चाहे मार डालो राजा , राह में बिछी है ही गाणी खुप्प वेळा ऐकलेली. तसंच माझं अजून एक फेवरेट 'तेहजीब' मधलं ' आपको मुझसे गिला होता ना शिकवा होता'..
ओह... क्या याद दिला दी
ओह... क्या याद दिला दी यार...
क्या तुमने है कह दिया... मस्त गाणं.. ऐकण्यापेक्षा पहावे असे गाणे. शबाना काय समरस होऊन गाण्याची एक्टिंग करते त्यात. असं वाटतं, गाणं गाताना कवितापण अशीच बेभान होऊन गायली असेल. तिचे एक्स्प्रेशन्स मस्त आहेत. आपणही तसेच डोलू लागतो.
अजून एक गाणं आहे ना दोघींच... शबाना प्रोफेशनली गायला सुरुवात करते तेव्हाचं. तेही मस्त आहे. अरुणा इराणीने पण जोरकी टक्कर दिलेय शबानाला.
मीपण दूरदर्शनवरच पाहिलेला आठवतो. तेव्हा झाकीरचा मॄत्यु वगैरे नीटसं कळलं नव्हतं. नंतर परत एकदा पाहिला तेव्हा बर्याच गोष्टी नव्याने कळल्या. त्या त्या वयानुसार कसा वेगवेगळा इंटरप्रेट करतो ना आपण कोणताही सिनेमा? पहिल्यांदा पाहिला तेव्हा शबानाचं झाकीरला नाकारणं योग्य वाटलेलं, पण नंतर पाहिला तेव्हा तिच्याबद्दल कणव दाटून आली. सगळं मिळूनही ती केवढी एकाकी आणि हतबल असते ना? गलबलून आलं तिची पोकळी जाणवली तेव्हा. तिचं गाणं सोडणं हलवून गेलं.
चर्चा चाललेली त्याप्रमाणे जर ही खरंच मंगेशकर भगिनींची कथा असेल तर आशा परत ग्रेट वाटते....ग्रेटेस्ट...
बरीच लांबली पोस्ट. पण बरेच दिवस लपून बसलेला मनातला एक कोपरा खळबळवलास बस्के...
बस् काय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राची सहमत सगळ्याला.. आशा
प्राची सहमत सगळ्याला..
आशा भोसले कायमच माझ्यासाठी जास्त ग्रेट आहे. लता बद्दल मी शक्यतो बोलतच नाही.. ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बास करते आता.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी तू एक लिहीलेस ते मला फारच पटले. लिप सिंकीग काय जबरी केलेय शबानाने. खरंच गातीय असे वाटते. अरूणा इराणी आगाऊ वाटते गाताना.
असो. माझ्याच फार कमेंट्स होतायत.
<चर्चा चाललेली त्याप्रमाणे जर
<चर्चा चाललेली त्याप्रमाणे जर ही खरंच मंगेशकर भगिनींची कथा असेल तर आशा परत ग्रेट वाटते.>
आर. डी. बर्मन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवरून काही लोकांनी आशाताईंवर काही आरोप केले होते. त्यानंतर आशाताईंच्या मुलीने, वर्षा भोसलेने, फिल्मफेअर मासिकात Saturday's Child या नावाने एक लेख लिहिला होता. www.indianmelody.com/ashaarticle1.htm हा तो लेख.
हा लेख शबाना आझमींनी वाचला, आणि आशाताईंच्या आयुष्यावर चित्रपट निघावा असं त्यांना वाटलं. एका दिग्दर्शिकेने हा चित्रपट करावा म्हणून त्यांनी हा लेख सई परांजप्यांना दिला, आणि या दोघींनी आशाताईंच्या व्यक्तिमत्वाभोवती चित्रपट काढण्याचं नक्की केलं. मात्र वाद टा़ळण्यासाठी अनेक तपशिलांमध्ये बदल केले (ओपी + आरडी = झाकीर, मोठ्या बहिणीचा मृत्यू, धाकट्या बहिणीच्या मुलीनं गाणं सुरू ठेवणं इ). चित्रपट तयार झाल्यावर एका मुलाखतीत सई परांजपे म्हणाल्या होत्या की, 'स्मिता पाटील आज असती, तर मोठ्या बहिणीची भूमिका शबानाला देऊन धाकट्या बहिणीची भूमिका मी स्मिताला दिली असती.' (गोनीदांनाही स्मितामध्ये आशा दिसायची. 'जैत रे जैत'ची चिंधी म्हणजे आशाताई. पडद्यावर ती भूमिका स्मिताने करावी म्हणून गोनीदांनी आग्रह धरला होता.)
भूमिकेच्या तयारीसाठी अरुणा इराणी आणि शबाना या दोघींही कविता कृष्णमूर्तीच्या ध्वनिमुद्रणांच्या वेळी उपस्थित राहायच्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बरेच वाद निर्माण झाले. मा. दीनानाथांना दारू प्यायलेलं दाखवणं मंगेशकरांना आवडलं नाही. तसंच, लताबाईंची व्यक्तिरेखाही. शिरीष कणेकर, मोहन बाघ यांनी या चित्रपटाविरुद्ध लिहिलेले लेख लोकप्रभेत, म.टा.मध्ये वाचलेले आठवतात. पुढे काही वर्षांनंतर लता मंगेशकर खासदार झाल्यावर राज्यसभेत सतत अनुपस्थित असायच्या, आणि 'मी गायिका आहे, संसदेत माझं काय काम?' असं समर्थनही त्यांनी केलं. त्यावर शबाना आझमी यांनी लताबाईंवर टीका केली होती. या टीकेचा संबंधही कणेकरांनी या चित्रपटाशी जोडला होता..
बस्के,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या चित्रपटाबद्दल लिहिलंस म्हणून अनेक धन्यवाद.
वा वा..किती वर्षांनी परत
वा वा..किती वर्षांनी परत पहायला मिळाला हा चित्रपट पुन्हा! धन्यवाद बस्के.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्राची खरंच गं. त्या वयात दूरदर्शनवर पाहताना न जाणवलेल्या खुप गोष्टी आज अगदी भिडल्या.
गाणी बहारदार...all time favorite....अहाहा...रात ढलने लगी....आज झोप छान लागणार.
किंवा अजिबात लागणार नाही
मीही हा चित्रपट दुरदर्शनवरच
मीही हा चित्रपट दुरदर्शनवरच पाहिलेला. मी झाकिरसाठी पाहिला. तो संगितकार म्हणुन खुप क्यूट दिसलाय यात. मला यातले त्याचे आणि आयेशाचे प्रसंग आठवताहेत. विषेशतः तो आयेशाला सांगतो की तो तिचा होणारा पपा आहे, तो सिन खुप छान आहे.
शेवटी आयेशा गायिका होते, तिला अवॉर्ड मिळते आणि त्या कार्यक्रमात मायलेकी परत एक होतात असे दाखवलेय असे मला अंधुक अंधुक आठवतेय. गाणी अतिशय सुंदर होती हे आठवतेय, पण गाणी अजिबात आठवत नाहीयेत. घरी जाऊन युटुबवर पाहायला पाहिजेत.
चिनुक्स, माहितीबद्दल धन्यवाद.
मला लता = अरुणा हे पटले नाही. चित्रपटातली मोठी बहिण जरा जास्तच व्हिलनिश दाखवलीय आणि धाकटी जरा जास्तच भोळी असे मला तेव्हा वाटलेले. कदाचित माझे आशाएवढेच लतावरही प्रेम असल्याने वाटले असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लता-आशाचे द्वंद्व म्हणता
लता-आशाचे द्वंद्व म्हणता येणार नाही पण अजून एक चित्रपट आठवतोय - लेकिन.गाणी अप्रतिम.सर्व गाणी लतादीदींची.फक्त एक गाणे आशाताईचे.पण अप्रतिम.झूठे नैना बोले.त्या गाण्याचे चित्रिकरण पण अप्रतिम.दीदींची सगळी गाणी एका बाजूला आणि आशाचे हे एक गाणे.(कदाचित मी आशाताईंची पंखी असल्यामूळे असेल!! जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.)
झूठे नैना बोले झुठे नैना
झूठे नैना बोले
झुठे नैना बोले, सांची बतिया... अप्रतिम गाणे आहे....
बस्के- साझ मधली गाणी आणि
बस्के- साझ मधली गाणी आणि पिच्करही आवडत नाही, तरी आपण शोधत असलेलं गाणं सापडणे यासारखी दुसरी आनंददायक गोष्ट नाही. तुझ्या भावना पोचल्या एकदम.
दिप्स- सरदारी बेगम बद्द्ल अगदी अगदी. काय गाणी, काय गाणी, काय शब्द. जीव ओवाळुन टाकावा अशी.
झुठे नैना बोले, सांची
झुठे नैना बोले, सांची बतिया... अप्रतिम गाणे आहे....>>>> अत्ता आठवले तरी अंगावर शहारा आला. खुपच सुंदर गाणे आहे. कदाचित मीही लता पेक्षा आशाची जास्त फॅन आहे, म्हणुन असेल. (आशा भोसले कुठेही दिसली म्हणजे टिवीवर किंवा पेपरात तरी माझी लेक म्हणते, की ही आईची गॉड आहे.)![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बस्के, या चित्रपटावर खूप टिका
बस्के,
या चित्रपटावर खूप टिका झाली होती. (त्या नंतर सई परांजपेंचा चित्रपट आला का ?)
अत्यंत हलके फुलके सिनेमा करणार्या सई नी हा सिनेमा का केला, असे पण विचारले जात असे.
एका कार्यक्रमात, आशाने थेट झाकिरवर पण तोफ डागली होती.
असो.
झुठे नैना बोले, हे लेकीनमधेल आशाचे एकमेव गाणे. हेमावर चित्रीत झालेय. (बाकि लताची पण ग्रेट आहेत. यारा सिलि सिली, केसरीया बालमा, सुनियो जी ग्रेटच आहेत. केसरीया बालमा चे मुळ गीत, लताने कॅसेट मधे गायले आहे. तिचे आणि हृदयनाथ चे (बहुदा हिदितील एकमेव ) द्वंद्व गीत पण याच चित्रपटात आहे.
झुठे नैना बोले वर हेमाचा अभिनय मला बेतास बात वाटला. हे गाणे बिलासखानी तोडि रागातले आहे. याच रागातले, लताचे, दिया ना बुझे रे आज हमारा (सन ऑफ इंडिया ) जास्त गहिरे आहे.
या गाण्यात, आशा बरोबर पं सत्यशील देशपांडे आहे, आणि त्यानी या गाण्याची मूळ चीज, कहन या अल्बममधे गायलीय. आशा आणि सत्यशील, यानी, शशि कपूरच्या विजयेता, मधे, मन आनंद आनंद चायो, असे अप्रतिम गाणे गायलेय. (पडद्यावर रेखा आणि दाजी भाटवडेकर)
जुन्या आठवणी जाग्या केल्यास
जुन्या आठवणी जाग्या केल्यास बस्के. मीही तेव्हा झाकिर हुसेन साठी सिनेमा पाहिलेला. आता पुन्हा पाहिन नव्याने.
मी हा सिनेमा इथे एकदा शनिवारी
मी हा सिनेमा इथे एकदा शनिवारी इंटरनॅशनल चॅनेलवर बघितलेला ९८-९९ मध्ये. खरेच खुप मस्त होता गाणीही अप्रतिम होती. पण कुठेतरी लताला विलन दाखवलेले मनाला पटले नाही. सिनेमा बघताना सतत आशा-लताची तुलना शबाना -अरुणा इराणीशी होत होती. व कुठेतरी आपल्या श्रद्धेला तडा गेल्यासारखे वाटत होते. का माहित नाही.
मला सिनेमा फारसा आवडला नव्हता
मला सिनेमा फारसा आवडला नव्हता तेव्हा. आता परत बघायला हवा. गाणी मात्र निर्विवाद सुरेख आहेत.
अप्रतिम गाणी. क्या तुमने है
अप्रतिम गाणी.
क्या तुमने है कह दिया.. माझे अत्यंत आवडते गाणे. युट्युबवर बघून मजा येत नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पिक्चर लहान्पणी पाहिलेला तेव्हा इतका आवडला नव्हता (समजला नव्हता असे म्हटलत तरी चालेल)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता पुन्ह एकदा बघायला हवा.
बस्के, खूप खूप धन्यवाद.
बस्के, खूप खूप धन्यवाद. आत्ताच हा चित्रपट पाहून संपवला. मी ही कॉलेजमध्ये असताना टीव्हीवर पाहिला होता तेव्हा अतिशय आवडला होता. गाणी आवडली होती पण त्यापेक्षा जास्त कथा आवडली होती. मंगेशकर भगिनींची कथा अशी ह्या चित्रपटाबद्दल खूप हवा होती. ती उत्सुकता मनात घेऊनच तेव्हा चित्रपट बघायला सुरुवात केली होती. पण पाहता पाहता जाणवत गेलं की ही काही हुबेहूब त्यांच्या आयुष्याची कथा नाही. कितीतरी तपशील बदलले आहेत. त्यामुळे केवळ वॄंदावन भगिनींची कथा ( very loosely based on Mangeshkar sisters ) म्हणून चित्रपट पाहिला आणि तो खूप आवडला ( चित्रपट बनवण्यामागची प्रेरणा कदाचित लतादीदी, आशाताई आणि त्यांच्यातील नातं असेलही पण म्हणून जिगसॉ पझल जुळवल्यासारखे त्यांच्या आयुष्याचे तुकडे ह्या चित्रपटात बसवता येत नाहीत. )![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यानंतर खूपदा हा चित्रपट शोधायचा प्रयत्न केला पण कुठे सापडला नाही. आज तुझ्यामुळे परत बघता आला
मलाही खुप आवडला होता हा
मलाही खुप आवडला होता हा चित्रपट...
त्यात एक अरुणा-शबानाचे द्वंद्व गीत रेकॉर्ड केले जात असतानाचा प्रसंग आहे. त्यावेळी अरुणा शबानाला गायची संधीच देत नाही, असा एक सीन आहे. ते गाणेही खुप छान आहे.
Pages