माझे मातीचे प्रयोग - २

Submitted by रूनी पॉटर on 28 August, 2008 - 18:25

हा अजुन एक प्रयत्न माझ्या कुंभारकामाचा. आपल्या सगळ्यांच्या सुचनांचे स्वागतच आहे.
या सगळ्या वस्तू भाजण्यासाठी bisk firing आणि ग्लेझिंग साठी gas firing केलेल्या आहेत.

१. बॉक्स
या साठी स्लॅब पद्धत वापरली आहे.
brown_box.jpg

२. मेणबत्तीचे स्टॅन्ड
Candle_stand.jpg

३. मशरुम्स
mushrooms.jpg

४. छोटीशी ताटली अंगठ्या आणि कानातले ठेवायला
jwellary_dish.jpg

५. चहा आणि दूधाची किटली
IMG_2860.jpg

फोटो बघुन कळतेच की अजुन मला (रंगकाम) ग्लेझिंग नीट जमत नाही ते. सराव करायला हवा.
माझे या आधीचे प्रयोग माझे मातीचे प्रयोग
इथे बघता येतील.

गुलमोहर: 

मस्तच ! मश्रुम्स, बॉक्स आवडले.. मेणबत्ती स्टँड त्या गोडू मेणबत्तीमुळे एकदम सही दिसतोय !! Happy

अगं रुनी, कित्ती छान आहेत सर्व. केटली सही दिसत्ये.

सगळे छान आहे ग. एक सल्ला देउ का? क्लिअर किंवा पांढरा ग्लेझ फक्त पांढ-या मातीवर वापर. नाहीतर ते राखाडी दिसते (पिचर्सचा खालील भाग).
ओहाटा ग्लेझ आहे का पहिल्या कॅनिस्टरचा आणि प्लेटचा? छान बसलाय. तुला कोणकोणते ग्लेझेस उपलब्ध आहेत?
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

छान दिसतय सर्वच. बॉक्स आणि मशरुम मस्तच.

मलाही मश्रूम जास्त आवडला. बाकीचंही सगळं चांगलंच जमलंय.

झकास झकास! Happy ये हुई ना बात!
त्या बॉक्सच्या झाकणाची "झिगझॅग" आयडीया आवडली! :)...;
(हात नुस्ते शिवशिवताहेत!)

ग्लेझबद्दल तपशीलात माहिती कळेल का?

आपला, लिम्बुटिम्बु

रूनी सुंदरच झालीत भांडी. तो पहिला बॉक्स आणि चौथी ताटली फार आवडली.
पहिला भाग पण मस्तच. आणि माहिती पण छान दिलीयस.
फक्त हे सगळं करून कुठं भाजायला न्यावं लागतं की तंदूरसारखी छोटी kiln मिळते यार्डमधे वगैरे वापरण्यासारखी ?

वा छानच आहेत सगळ्या वस्तू.
मला पण असं काहितरी करावसं वाटतं.. इकडे कुठे कोणी शिकवतं का?
मला त्या टेराकोटाच्या वस्तु सुद्धा खूप आवडतात.
लिंबु भाउ तुम्हाला माहित असेल तर मला जरा सांगा ना.

काय सुरेख वस्तू केल्या आहेस रुनि! पहिला बॉक्स आणि किटल्या मला खूप आवडल्या!
ही सगळीच प्रोसेस कशी असते वगैरे जाणून घ्यायला आवडेल Happy

--------------------------------------
सलोनासा सजन है और मै हूँ
जिया में इक अगन है
और मैं हूँ..

मस्तच.. ती ताटली आवडली.. (तिचे आकारमान थोडेसे बदलून एक ऍश ट्रे पण होउ शकतो Happy )
पण अंगठ्या आणि कानतलं ठेवायच्या ताटलीत एमपी३ प्लेयर आणि मेडल्स का ठेवली आहेत?

मश्रुम छानच आहेत.

मस्तच गं रुनी!! मशरुम्स इतके आवडले!! बॉक्स आणि मेणबत्ती स्टँडही सहीच!!

रुनी
सगळ्याच वस्तू मस्त आहेत. पण मला किटल्या आवडल्या.

त्या किटल्या एकदम मस्त आहेत. गणपती उत्सवातल्या स्पर्धांमधे बक्षिस म्हणून मिळतील का? मी लगेच तयारीला लागतेच मग!
कसं केलं हे सगळं त्याचे तपशील पण वाचायला आवडतील.
टण्या एम पी ३ प्लेयर अन मेडल्स? आईला रोहिणीची वेब लिंक पाठवतेच आता थांब Happy

रुनी........मस्त झालीयेत गं सगळी भांडी Happy मला मश्रुम्स सगळ्यात जास्त आवडले.

मिनोती,
हे सगळे ग्लेझ सराव करण्यासाठी दिलेत, भांड्यांवर कसे रीएक्ट होतात ते बघायला. मला क्लास मध्ये कुठले ग्लेझ आहेत ते बघायला हवे, एकच सेमीस्टर वापरले त्यामुळे नाव लक्षात नाही रहात कशाचे. आता या सेम मध्ये परत वापरले की थोडी जास्त ओळख होईल.
कोन १० साठी पांढरी माती म्हणजे बी-मेक्स का? मी पोर्सेलीन वापरलेले नाहीये अजुन.

लिंबुटिंबु, ग्लेझ बद्दल मी जरा वाचुन आणि सरांना विचारुन मग माहिती टाकते. यावेळी सरांना सांगुन ठेवलय की ग्लेझ तयार करतांना मी येणार आहे मदत करायला, त्यामुळे जास्त माहिती मिळेल.

संघमित्रा अग आमच्या कॉलेज मध्ये आहे भट्टी हे सगळे भाजायला त्यामुळे तिथेच भाजते मी सगळे. काही स्टुडीओ पण तुमचे काम भाजुन देतात.
घरच्या छोट्या भट्टीबद्दल मला फारशी माहिती नाहीये.

डॅफो एखाद्या आर्ट इनस्टीट्यूट मध्ये चौकशी कर, तिथे असतील असे क्लासेस, नाहीतर कुंभारवाड्यात विचारु शकतेस. पुण्यात अल्काच्या पुढे पुना हॉस्पीटलचा चौक आहे तिथे मी एकदा रस्त्यावर मातीची भांडी विकतात त्यांना विचारले होते शिकवाल का म्हणुन पण ते नाही म्हणाले होते. Happy
मग मिनोतीचा लेख वाचला २००६ च्या मायबोली दिवाळी अंकात मध्ये आणि मग क्लास शोधुन काढलाच.

पूनम एकदा यावर लेख लिहायला घ्यायचाय पण आधी त्याबद्दल पुरेसे वाचन करायला हवे म्हणजे मला नीट माहित होईल.

टण्या तुला खरच असले भलते सलते काहीतरी दिसतय तिकडे, शोनू ने चांगला उपाय सुचवलाय Proud

शोनू, गणेशोत्सवात लिहायला घेतले आहेसच, एका वर्षाची गोष्ट पुर्ण केलीस तर नक्की पाठवुन देईन म्हणते त्या किटल्या. Happy

बाकीच्या सगळ्यांना पण मनापासुन धन्यवाद आवर्जुन प्रतिसाद दिल्याबद्दल. असे प्रतिसाद बघितल्यावर हुरुप वाढतो वेड्यावाकड्या प्रयोगांचे फोटो टाकायला.

रुनी, बी मिक्स किंवा सान्टा बार्बारा हे दोन्ही पांढरे क्ले आहेत. त्यावर सगळे ग्लेझेस छान दिसतात. तु वापरलेला क्ले थोडा ग्रॉग असलेला आहे असे वाटते. बी मिक्स आणि सांटा बार्बारा दोन्ही क्ले अगदी मऊ असतात. पोर्सलीन अगदी लोण्यासारखा मऊ असतो. आजच पहिल्यांदा साधारण ५ पौंडाचा एक बाऊल केलाय. एवढा पोर्सलीन थ्रो करताना माझ्या पेशन्सचा पिट्ट्या पडला!!

पुढे करशील तेव्हा क्लेबॉडी आणि ग्लेझेस ची नावे लिहुन ठेव ग. मला पण उपयोगी पडतील.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

रूनी मस आहे भांडी... मश्रूम एकदम भारी आणि त्या किटल्या पण.. Happy

टण्या एम पी ३ प्लेयर अन मेडल्स? >>> मग ते मोठे चौकोनी आणि गोल कानातले आहेत???????? आवरा... वेट लिफटींग केल्याचा फिलिंग येत असेल कानांना.. Uhoh

जबराच आहे तुझे मातीचे प्रयोग Happy
.............................................................

रुनी, मस्तच गं एकदम.... मी आजच पाहिले... मला 'ताटली' खुप आवडली.

टण्या, तुला ते मेडल का बरे दिसले?? Uhoh

अडम, एवढा पण मोठा आकार आणि वजन नाहीये हां त्या कानातल्यांचं...

मस्त माहीती,सुरेख फोटु! तो बॉक्स फार छान आहे. साधारण केवढा (size) आहे तो? जमल्यास एखादा video पण टाक ना...