ते 'कथा एका मॅरेज सर्टिफिकेटची' वाचलं आणि मला माई आज्जीचा भारी किस्सा आठवला. ती आता नवद्दीच्या आसपास असेल. पण आहे एकदम डॉन! म्हणजे तिच्या वयाकडे बघून ती फिरकी घेईल हे कुणाच्या स्वप्नातही नसतं - आणि अशा वेळेस ती एकदम साळसूद चेहर्यानं गूगली टाकते!
एक एप्रिलला तिच्या घराच्या, आपल्याच फोनच्या आसपासही नाही जायचं - नाहीतर कितीही तयार असलात तरी तुमची विकेट गेलीच म्हणून समजा! तशी सटकफटक असली तरी स्वभावाला मात्र माईआज्जी एकदम गोड! लोकांना आवर्जून मदत करणार, ह्या वयातही लोकांना तर्हेतर्हेचे पदार्थ करून खावू घालणार (म्हणजे फक्त भारतीयच पदार्थ असं नाही बरं का!) वगैरे.
असो, पण तो आजचा विषय नाही! आजचा विषय आहे बर्थ सर्टिफिकेट. साधारण पंधरा वगैरे वर्षापूर्वीची गोष्ट. तर झालं असं तिच्या नातीचं बर्थ सर्टिफिकेट हवं होतं. माझा मामा फेर्या घालून घालून थकला, पण सर्टिफिकेट मिळायला काही तयार नव्हतं. मग एके दिवशी माई आज्जीनं डिक्लेअर केलं 'तुम्हा लोकांना जमत नसेल तर आता मीच जाऊन आणते' - आणि एकदा ठरवल्यावर पार पाडलं नाही तर ती माई आज्जी कसली!
मग ती गेली 'जन्म मृत्यू नोंदणी' कार्यालयात. एका काऊंटरवर जाऊन म्हणाली 'इथले साहेब कोण आहेत? मला त्यांना भेटायचय.'
तो माणूस म्हणाला, "काय काम आहे मला सांगा. मी बघतो."
"ते काही नाही मला साहेबांनाच भेटायचय" इती माई आज्जी.
असं बर्याच वेळ झाल्यावर त्या माणसाला तिच्या वयाचा मुलाहिजा बाळगणं भाग होतं. शेवटी तो तिला साहेबांकडे घेऊन गेला. म्हातारी बाई बघून (आणि खरंतर तिच्या व्यक्तिमत्वातच असा काही गुण आहे की माणूस तिला बघता क्षणीच मऊ/नम्र होतो.) साहेब एकदम आदबीन वागता झाला. 'बसा आजी. काय काम होतं', तो म्हणाला.
'मला मृत्यूचा दाखला हवा होता': आजी.
'मृत्यूचा दाखला? बरं, कुणाचा" : साहेब
निर्विकार चेहर्यानं आजी "माझा" असं उद्गारत्या झाल्या.
"तुमचा?" : साहेब खूर्चीवरून फिजीकली उडायचाच फक्त बाकी राहिलेला
"हो, माझा!" आजी
अजूनही आजींचा अंतस्थ हेतू न कळल्यानं साहेब बिचारा 'जिवंत माणसाचं डेथ सर्टिफिकेट देता येत नाही' हे समजावून सांगण्याच्या प्रयत्नात.
"ते माहित आहे हो" आजी
आता मात्र साहेबाला काय प्रकार चाल्लाय ते कळेना.
"ते माहित आहे हो, पण माझ्या नातीचा जन्म होऊन पंधरा वर्ष झाली, माझा मुलगा अजून हेलपाटे घालतोय जन्म दाखला मिळवण्यासाठी. मग माझ्या मृत्यूनंतर माझ्या नातेवाईकांनी किती वर्ष हेलपाटे घालायचे? ते काही नाही. माझ्या करता कुणाला त्रास नको मी गेल्यावर. मला आताच माझ्या मृत्यूचा दाखला द्या कसा!"
साहेब भर थंडीत घामाघूम!
आणि थोड्याच वेळात १००% काम होऊन माईआजी विजयी मुद्रेनं ऑफिसच्या बाहेर!
बर्थ सर्टिफिकेट (लघुकथा/किस्सा)
Submitted by नानबा on 9 March, 2010 - 10:05
गुलमोहर:
शेअर करा
सह्हीच. ग्रेट आहेत माईआज्जी.
सह्हीच. ग्रेट आहेत माईआज्जी. तुझ्या माईआज्जींसारख्यांचीच गरज आहे या सरकारी कार्यालयातील लोकांना धडा शिकवायला.
लय भारी माई आज्जी
लय भारी माई आज्जी
सही!
सही!
जय हो माईआज्जी!
जय हो माईआज्जी!
सही आहे ही माईआजी तुझी नानबा
सही आहे ही माईआजी तुझी नानबा
नानबा माईआज्जी ग्रेट!
नानबा माईआज्जी ग्रेट!
माईआज्जी ग्रेट !!! आणि बाकीचे
माईआज्जी ग्रेट !!! आणि बाकीचे किस्सेही
आज्जी एकदम झक्कस..
आज्जी एकदम झक्कस..
जबरीच, एकदम आवडला किस्सा
जबरीच, एकदम आवडला किस्सा
हेहेहे..सही आहेत आजी....
हेहेहे..सही आहेत आजी.... मस्त किस्सा!!
जबरी... एकदम डेंजरसली
जबरी... एकदम डेंजरसली सुपर-आज्जी!
म्हणजे आजिंचा धिरेका झटका
म्हणजे आजिंचा धिरेका झटका जोरसे लगे.
मस्तच आहे आज्जी एकदम
मस्तच आहे आज्जी एकदम
मज्जा..
मज्जा..
सही आहेत आजी. असंच पाहिजे या
सही आहेत आजी. असंच पाहिजे या लोकांना.
>>माझ्या बहिणीला तिचे बर्थ सर्टिफिकेट इंग्रजीत हवे होते. ती परदेशात, आम्ही भारतात, असा कारभार.
मग आईवडील घालत होते खेटे त्या कार्यालयात.... त्यात टोलवाटोलवी तर इतकी की विचारू नका!
हे अरुंधतीने लिहिलंय म्हणून सहज माहिती म्हणून सांगते, परदेशाशी संबंधित कुठल्याही कामासाठी (व्हीसा, उच्च शिक्षण, नोकरी इ.) जन्म्/लग्न्/शैक्षणिक प्रमाणपत्रे इंग्रजीतून लागतात हे खरे आहे. वर दिल्यानुसार ती इंग्रजीतून करुन घेण्यास अनेक खेटे घालावे लागतात. त्यापेक्षा सोपं म्हणजे ती इंग्रजीत प्रोफेशनल भाषांतरकाराकडून ट्रान्सलेट करुन घेऊन, सर्टीफाय/अॅटेस्ट्/नोटराईज करुन घेणे. बहुतेक कामांसाठी अशी अॅटेस्टेड भाषांतरीत आवृत्ती चालते.
(मी व्यवसायाने भाषांतरकार आहे व परदेशी व्हीसा, ग्रीन कार्डे, युनिव्हर्सिटी अॅडमिशन्स वगैरे कामांसाठी अनेक मराठी/हिंदी/जपानी जन्म्/लग्न्/ शैक्षणिक प्रमाणपत्रे/मार्कलिस्ट्स इंग्रजीमध्ये भाषांतरीत केल्या आहेत.
हे सांगण्यात माझा काहीही स्पेशल हेतू नाही. वाचलं म्हणून सांगितलं इतकंच. गैरसमज नसावा.)
जबरी..च आहे तुझी आज्जी
जबरी..च आहे तुझी आज्जी
<<ह्या वयातही लोकांना
<<ह्या वयातही लोकांना तर्हेतर्हेचे पदार्थ करून खावू घालणार>>
अरे बापरे
मस्त आजी आणि सर्व किस्से
मस्त आजी आणि सर्व किस्से सही!!
स्सॉलिड
स्सॉलिड
वर्षा, बरोबर आहे तुझं. मला
वर्षा, बरोबर आहे तुझं. मला काही महिन्यांपूर्वी जपानला पेपर्स पाठवायचे होते तेव्हा बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट कॉपीज वगैरे ट्रान्सलेट करुन अटेस्ट करुन घेतल्या होत्या घरच्यांच्या.
सही!!!! कुठे असते ग ही
सही!!!! कुठे असते ग ही माईआजी? भेटायला हवं एकदा
हाहा..मस्तच आहे की तुझी डॉन
हाहा..मस्तच आहे की तुझी डॉन आज्जी.. give her a warm hug from me
(No subject)
जाम झकास किस्सा आहे. अक्खी
जाम झकास किस्सा आहे. अक्खी मोठ्ठी कथा झाली असती, उगीच लघुकथा केलीत... 'आजी नंबर १' आहेत ह्या!!
झकास किस्सा
झकास किस्सा
मस्त किस्सा!
मस्त किस्सा!
Pages