बदाम-मलाई कुल्फी विथ मँगो सॉस (फोटोसहित)

Submitted by लाजो on 4 March, 2010 - 22:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कुल्फी साठी:
१ टिन स्विटंड कंडेन्स्ड मिल्क - ३९५ग्रॅम टिन
१ टिन इव्हापोरेटेड मिल्क - ३७५ml टिन
३०० ml थिकन्ड (हेवी) क्रिम
१ कप बदाम चुरा
१ चमचा पीठीसाखर
केशर आणि वेलची पावडर आवडीनुसार

मँगो सॉसः
१ कप मँगो पल्प,
१ कप क्रिम
पिठी साखर चवीनुसार
थोडे केशर आणि वेलची पुड

सजावटीसाठी:
टोस्टेड बदाम
पिस्त्याचे तुकडे

क्रमवार पाककृती: 

IMG_1458.JPG

ही कुल्फी सोप्पी आणि झटपट होणारी आहे. पण तरीही तितकीच चविष्ट! Happy

- सर्वप्रथम फ्रिझर चे टेम्परेचर 'कोल्डेस्ट' वर सेट करावे.

कुल्फी बनवण्याची कृती:

- एका काचेच्या बोल मधे इव्हापोरेटेड मिल्क आणि कंडेंस्ड मिल्क एकत्र करावे.
- हँड ब्लेंडर स्टिक/हँड मिक्सर ने चांगले नीट घुसळुन घ्यावे. थोडे घट्टसर मिश्रण होईल.
- यात थोड्याश्या कोमट दुधात भिजवलले केशर आणि वेलचीची बारिक पुड घालावी.
- १ कप बदामाचा चुरा घालावा आणि नीट मिक्स करुन घ्यावे.
- दुसर्‍या मोठ्या काचेच्या बोल मधे क्रिम आणि १ चमचा साखर फेटुन घ्यावी. क्रिम चांगले डबल फुगले पाहिजे (फेटताना क्रिम फाटणार नाही याची काळजी घ्यावी)
- आता या ब्लेंड केलेल्या क्रिम मधे वरचे मिश्रण हळु हळु ओतावे. एकीकडे स्पॅट्युलाने हलके हलके मिक्स करावे.
- सगळे आता हलकेच नीट मिसळुन घ्यावे.
- ह्या बोल ला क्लिंग फिल्म लावुन फ्रिझर मधे ठेववा.
- साधारण दीड ते २ तासांनी मिश्रण बाहेर काढुन लाकडी चमच्याने फेटुन घ्यावे.
- मग हे मिश्रण कुल्फी मोल्ड किंवा लोफ टीन मधे ओतावे आणि फ्रीझ करावे.

मँगो सॉसः

- १ कप क्रीम पातेल्यात ओतुन मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
- यातच केशर आणि वेलची पुड टाकावी.
- क्रिमवर थोडे बुडबुडे दिसायला लागले की गॅस बंद करावा. क्रिम गार होऊ द्यावे.
- गार झालेल्या क्रिम मधे मँगो पल्प आणि साखर घालुन हँड ब्लेंडर ने ब्लेंड करावे. सॉस तय्यार.
- सॉस डिस्पेन्सर बॉटल मधे भरुन हा सॉस गार करायला फ्रिज मधे ठेवावा.

सर्व्ह करताना:
पद्धत १: प्लेटमधे खाली मँगो सॉस पसरावा. त्यावर कुल्फी ठेवावी आणि वरतुन टोस्टेड बदाम्/पिस्ते पेरावे.

पद्धत २: कुल्फी मोल्ड मधुन काढुन प्लेट मधे ठेवावी. वरतुन टोस्टेड बदाम काप आणि पिस्ते पेरावे. शेजारी सॉस ची बाटली ठेवावी आणि हवा तेव्हढा सॉस घालुन कुल्फी मटकवावी.

IMG_1461.JPG

वाढणी/प्रमाण: 
एव्हढ्या मिश्रणात ६-८ लोकांना पुरेल इतकी कुल्फी होते. पण खरतर २-३ लोकच फस्त करतात :)
अधिक टिपा: 

१. कुल्फी मधे बदाम पुड घातली नाही तरी चालेल.
२. बदाम पुड च्या ऐवजी मँगो पल्प घातला तरी चालेल - मँगो कुल्फी करायची असेल तर.
३. मँगो सॉस नसला तरी काहिही हरकत नाही. नुसती कुल्फी पण झक्कास लागते.
४. वेळ असेल तर कुल्फी बनवायच्या आधी इव्हेपोरेटेड मिल्क एकदा उकळुन घ्यावे. मस्त खमंग टेस्ट येते कुल्फीला.
५. ही बेसिक रेसिपी आहे. तुम्हाला हवे तसे त्यात वेगवेगळे स्वाद घालता येतिल जसे रोज, स्ट्रॉबेरी इ. इ.
६. स्वादानुसार सॉस पण बदलता येतिल.
७. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेतेड मिल्क आणि क्रिम लो फॅट वापरुन बघु शकता. पण अस्सल मलई तेस्ट येइल की नाही माहित नाही.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट आणि माझे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो घरी गेल्यावर जरा
१ टिन स्विटंड कंडेन्स्ड मिल्क
१ टिन इव्हापोरेटेड मिल्क
या टिन चे नक्की माप सांग ना...देशा प्रमाणे टिनचे स्टँडर्ड माप पण कदाचित बदलत असेल्..बाकी कृती एकदमच झकास दिसते आहे. अजून इकडे बरीच थंडी असल्याने कुल्फी पेक्षा गरम गरम काही तरी चे वातावरण आहे पण थोड्याच दिवसात करावीशी वाटेल.

mbjapaan, ईव्हॅपोरेटेड मिल्क च्या टिन च माप लिहीलय. कंडेन्स्ड मिल्क च माप बहुतेक ३९५gms आहे पण घरी गेल्यावर नक्की बघुन लिहीते.

माझा बेसिक आणि बावळटासारखा प्रश्न मावशे कंडेन्स्ड मिल्क म्हणजे इथे जे मिल्क मेड टिन मिळत तेच ना मग इव्हॅपोरेटेड मिल्क टिन काय असत वेगळ? मुंबई/ठाणे/डोंबिवली सारख्या ठिकाणी कुठे मिळेल ते? आणि नसेल तर त्याला पर्याय काय? (बासुंदी/मसाले दुधासाठी जितक आटवतो तितक जर दुध घरी आटवल तर चालेल का ते?)

कविता, कंडेन्स्ड मिल्क म्हणजे आपल्या इथे मिल्कमेड मिळतं तेच. इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे मिल्क पावडर.

लाजो, कन्डेन्स्ड मिल्क, क्रिम, एव्हॅपोरेटेड मिल्क, मँगो पल्प म्हणजे प्रचंड प्रमाणात कॅलरीज गं... जाम हेवी होत असणार ही डिश.

कवे, मिल्क्मेड, मिठाई मेट म्हणजेच कंडेन्स्ड मिल्क.
इवइव्हॅपोरेटेड मिल्क मिळत की नाही माहित नाही देशात पण दुध आटवुन केलस तरी चालेल.

पण खर सांगु तु कशाला इतकी खतपट करतेस? तिकडे मस्त रेडिमेड मलई कुल्फी मिळते ती खायची Happy इकडे आम्हाला मिळत नाही म्हणुन प्रयोग करावे लागतात. जीभेचे चोचले दुसर काय Proud

इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे मिल्क पावडर<<< नाही$$$$$$

इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे आटवलेल्या दुधासारखेच. पातळं/लिक्विड असते.

मलाही कविताचाच प्रश्न विचारायचा होता. घरीच दुध आटवून बनलेला खवा (खरंतर याला खवा म्हणण्यापेक्षा अगदी घट्ट रबडी म्हणायला हवं. खव्यापेक्षा पातळ अन रबडीपेक्षा घट्ट आहे) आहे ३-४ वाट्या. तो वापरुन बघू का?

अल्पना, जरुर ट्राय कर पण तुला त्यात थोडे दुध घालुन सरबरीत करुन घ्याव लागेल आणि प्रमाण पण अंदाजाने बघावं लागेल.

कवे अरे ते घरीच इव्होपरेटायच Happy नाही तर चितळे किंवा काका हलवाई कडून विकत आणायच Proud फक्त त्यांना सांगताना बासुंदी मागायची

बघते ग. अग माझ्या चुलस साबा अगदी दर १५ एक दिवसांनी घरी खवा बनवून पाठवतात. बरोबर ४-५ लिटर घरच्या गायीचं दूध.. २-३ पोतंभरून भाज्या. कॉलनीत सगळ्यांना वाटून सुद्धा मला हे सगळं कसं संपवायचं हा प्रश्न पडलेला असतो.

बासुंदी घातलित तर कै च्या कै गोड होईल कुल्फी.
आधीच कॅलरीज चा बॉम्ब आहे त्यात अजुन साखर म्हणजे मिसाईलच होईल Happy

इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे मिल्क पावडर
मण्जु, आपल्या इथे हे इव्ह.... पण मिळत नाही आणि मिल्क पावडर पण मिळत नाही. डेअरी व्हाईटनर मिळतं मिल्क पावडर मागितली काय..

मी सरळ घरीच बासुंदी करते, बिनसारखेची आणि त्यालाच इव्ह... म्हणते.. खरे तर ते इव्ह.. च आहे.

लाजो, बाहेर सगळेच मिळते गं, पण आपण काहितरी नविन करत असताना आपली मुले आजुबाजुला बागडत असतात आणि पदार्थ कधी एकदा होतोय त्याची वाट पाहात असतात. आणि मग झाल्यावर त्यानी पहिला चमचा तोंडात घातला की आपण देवाचे नाव घेऊन त्यांच्या चेह-यावर प्रतिक्रिया शोधतो.. ही सगळी मजा विकतच्या पदार्थांमध्ये कुठुन येणार?????? Happy

रच्याकने, रेसिपी एकदम सोप्पी आणि मस्त.. आता आंब्याचा सिजन येतोयच.. तेव्हा हे कॅलॅरी बॉम्ब्स बनवायलाच हवेत...

लाजो, बाहेर सगळेच मिळते गं, पण आपण काहितरी नविन करत असताना आपली मुले आजुबाजुला बागडत असतात आणि पदार्थ कधी एकदा होतोय त्याची वाट पाहात असतात. आणि मग झाल्यावर त्यानी पहिला चमचा तोंडात घातला की आपण देवाचे नाव घेऊन त्यांच्या चेह-यावर प्रतिक्रिया शोधतो.. ही सगळी मजा विकतच्या पदार्थांमध्ये कुठुन येणार?????? >>>>तुला मोदक ग साधना हवे तेव्हढे Happy

आणि बिघडलाच असेल तरी पण दिसत ना लगेच चेहर्‍यावर Wink त्यांना असे विविध भाव व्यक्त करता यावेत म्हणुन पण करायच ग कधी मधी घरी Proud

हो दिसते ना... मी केलेला स्पॉंज केक केवळ इसेंस घालायला विसरल्यामुळे 'अंड्याचा वास येतोय' ह्या सबबीखाली चार दिवस फ्रिजमध्ये लोळतोय....... Happy

ही कुल्फि मी करणार पुढच्या आठवड्यात.... Happy कॅलरी बाँब असली तरी मी अशा वेळी दोनतिन तास दुसरे काहीच न खाता फक्त तेवढा एकच पदार्थ मोजकाच खाते आणि तसे केल्याने आपल्याला कॅलरी बाधत नाहीत असा मला शोध लागला आहे.. Happy

साधना, कवि, तुम्ही अगदी बरोबर बोलताय.

आपण कोणासाठी करतो? आपल्या नवरा आणो मुलांसाठीच Happy
परवा मी कुल्फी करायला घेतली तर नवरा उत्सुकतेने बघत होता आणि मग मला दर तासाने विचारत होता झाली का? झाली का? म्हणुन. सेट झाल्यावर त्याला एक तुकडा दिला तर त्याने 'फ्स्स्क्लास!!!! एकदम ऑथेंटिक कुल्फी!!!!' अशी प्रतिक्रिया दिली. कित्ती छान वाटलं Happy

करा तुम्ही आणि मला सांगा घरच्यांच्या प्र्तिक्रिया Happy

लाजो .... यम्म्म्म्म्म्म्म्म्मी, तोंडाला पाणी सुटलय Happy फोटो नक्की अपलोड कर ग

साधना २ /३ तासच फक्त काही ही दुसर खात नाही ?? चला हा शोध लावल्या बद्दल धन्यवाद Proud
म्हणजे मी निर्धास्त पणे खाईन Proud

ऑस्स्सम दिसतीये कुल्फी! स्स्स्स्स्स्स्स! उन्हाळ्यात उन्हाळ्यात.. Happy

सेट झाल्यावर त्याला एक तुकडा दिला तर त्याने 'फ्स्स्क्लास!!!! एकदम ऑथेंटिक कुल्फी!!!!' अशी प्रतिक्रिया दिली. कित्ती छान वाटलं >> लाजो, लाजो खूप बोल्ल्लीस! हे असं ऐकायला कान आसुसले आहेत इथे! मी सिंडीच्या ग्रुपमधली आहे त्यामुळे नजरेनेच टप्प्याबाहेर करते, आजूबाजूच्यांना! Lol

फोटु एकदम भारी.. कोणीतरी चमचा द्या रे मला......................

ते साईडचे पांढरे डिजाईन मुळचेच आहे की लाजो स्पेशल??? Proud

स्मिता, बिन्दास खा... पण फक्त कुल्फीच हाणायची... आधी जेऊन वगैरे मग वर स्विट डिश म्हणुन हाणलीस तर वाट लागेल.....

Pages