कुल्फी साठी:
१ टिन स्विटंड कंडेन्स्ड मिल्क - ३९५ग्रॅम टिन
१ टिन इव्हापोरेटेड मिल्क - ३७५ml टिन
३०० ml थिकन्ड (हेवी) क्रिम
१ कप बदाम चुरा
१ चमचा पीठीसाखर
केशर आणि वेलची पावडर आवडीनुसार
मँगो सॉसः
१ कप मँगो पल्प,
१ कप क्रिम
पिठी साखर चवीनुसार
थोडे केशर आणि वेलची पुड
सजावटीसाठी:
टोस्टेड बदाम
पिस्त्याचे तुकडे
ही कुल्फी सोप्पी आणि झटपट होणारी आहे. पण तरीही तितकीच चविष्ट!
- सर्वप्रथम फ्रिझर चे टेम्परेचर 'कोल्डेस्ट' वर सेट करावे.
कुल्फी बनवण्याची कृती:
- एका काचेच्या बोल मधे इव्हापोरेटेड मिल्क आणि कंडेंस्ड मिल्क एकत्र करावे.
- हँड ब्लेंडर स्टिक/हँड मिक्सर ने चांगले नीट घुसळुन घ्यावे. थोडे घट्टसर मिश्रण होईल.
- यात थोड्याश्या कोमट दुधात भिजवलले केशर आणि वेलचीची बारिक पुड घालावी.
- १ कप बदामाचा चुरा घालावा आणि नीट मिक्स करुन घ्यावे.
- दुसर्या मोठ्या काचेच्या बोल मधे क्रिम आणि १ चमचा साखर फेटुन घ्यावी. क्रिम चांगले डबल फुगले पाहिजे (फेटताना क्रिम फाटणार नाही याची काळजी घ्यावी)
- आता या ब्लेंड केलेल्या क्रिम मधे वरचे मिश्रण हळु हळु ओतावे. एकीकडे स्पॅट्युलाने हलके हलके मिक्स करावे.
- सगळे आता हलकेच नीट मिसळुन घ्यावे.
- ह्या बोल ला क्लिंग फिल्म लावुन फ्रिझर मधे ठेववा.
- साधारण दीड ते २ तासांनी मिश्रण बाहेर काढुन लाकडी चमच्याने फेटुन घ्यावे.
- मग हे मिश्रण कुल्फी मोल्ड किंवा लोफ टीन मधे ओतावे आणि फ्रीझ करावे.
मँगो सॉसः
- १ कप क्रीम पातेल्यात ओतुन मंद आचेवर गरम करायला ठेवावे.
- यातच केशर आणि वेलची पुड टाकावी.
- क्रिमवर थोडे बुडबुडे दिसायला लागले की गॅस बंद करावा. क्रिम गार होऊ द्यावे.
- गार झालेल्या क्रिम मधे मँगो पल्प आणि साखर घालुन हँड ब्लेंडर ने ब्लेंड करावे. सॉस तय्यार.
- सॉस डिस्पेन्सर बॉटल मधे भरुन हा सॉस गार करायला फ्रिज मधे ठेवावा.
सर्व्ह करताना:
पद्धत १: प्लेटमधे खाली मँगो सॉस पसरावा. त्यावर कुल्फी ठेवावी आणि वरतुन टोस्टेड बदाम्/पिस्ते पेरावे.
पद्धत २: कुल्फी मोल्ड मधुन काढुन प्लेट मधे ठेवावी. वरतुन टोस्टेड बदाम काप आणि पिस्ते पेरावे. शेजारी सॉस ची बाटली ठेवावी आणि हवा तेव्हढा सॉस घालुन कुल्फी मटकवावी.
१. कुल्फी मधे बदाम पुड घातली नाही तरी चालेल.
२. बदाम पुड च्या ऐवजी मँगो पल्प घातला तरी चालेल - मँगो कुल्फी करायची असेल तर.
३. मँगो सॉस नसला तरी काहिही हरकत नाही. नुसती कुल्फी पण झक्कास लागते.
४. वेळ असेल तर कुल्फी बनवायच्या आधी इव्हेपोरेटेड मिल्क एकदा उकळुन घ्यावे. मस्त खमंग टेस्ट येते कुल्फीला.
५. ही बेसिक रेसिपी आहे. तुम्हाला हवे तसे त्यात वेगवेगळे स्वाद घालता येतिल जसे रोज, स्ट्रॉबेरी इ. इ.
६. स्वादानुसार सॉस पण बदलता येतिल.
७. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेतेड मिल्क आणि क्रिम लो फॅट वापरुन बघु शकता. पण अस्सल मलई तेस्ट येइल की नाही माहित नाही.
कुल्फीचा फोटो घरी गेले की
कुल्फीचा फोटो घरी गेले की अपलोड करते. तो पर्यंत इमॅजीन करा
लाजो घरी गेल्यावर जरा १ टिन
लाजो घरी गेल्यावर जरा
१ टिन स्विटंड कंडेन्स्ड मिल्क
१ टिन इव्हापोरेटेड मिल्क
या टिन चे नक्की माप सांग ना...देशा प्रमाणे टिनचे स्टँडर्ड माप पण कदाचित बदलत असेल्..बाकी कृती एकदमच झकास दिसते आहे. अजून इकडे बरीच थंडी असल्याने कुल्फी पेक्षा गरम गरम काही तरी चे वातावरण आहे पण थोड्याच दिवसात करावीशी वाटेल.
लाजो मस्तच पण फोटु मस्टच आहे
लाजो मस्तच पण फोटु मस्टच आहे
mbjapaan, ईव्हॅपोरेटेड मिल्क
mbjapaan, ईव्हॅपोरेटेड मिल्क च्या टिन च माप लिहीलय. कंडेन्स्ड मिल्क च माप बहुतेक ३९५gms आहे पण घरी गेल्यावर नक्की बघुन लिहीते.
माझा बेसिक आणि बावळटासारखा
माझा बेसिक आणि बावळटासारखा प्रश्न मावशे कंडेन्स्ड मिल्क म्हणजे इथे जे मिल्क मेड टिन मिळत तेच ना मग इव्हॅपोरेटेड मिल्क टिन काय असत वेगळ? मुंबई/ठाणे/डोंबिवली सारख्या ठिकाणी कुठे मिळेल ते? आणि नसेल तर त्याला पर्याय काय? (बासुंदी/मसाले दुधासाठी जितक आटवतो तितक जर दुध घरी आटवल तर चालेल का ते?)
मी खाल्ली आहे या प्रकारची
मी खाल्ली आहे या प्रकारची कुल्फी. लईच भारी लागते! आता करुनच बघते:) धन्स ग लाजो!
कविता, कंडेन्स्ड मिल्क म्हणजे
कविता, कंडेन्स्ड मिल्क म्हणजे आपल्या इथे मिल्कमेड मिळतं तेच. इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे मिल्क पावडर.
लाजो, कन्डेन्स्ड मिल्क, क्रिम, एव्हॅपोरेटेड मिल्क, मँगो पल्प म्हणजे प्रचंड प्रमाणात कॅलरीज गं... जाम हेवी होत असणार ही डिश.
कवे, मिल्क्मेड, मिठाई मेट
कवे, मिल्क्मेड, मिठाई मेट म्हणजेच कंडेन्स्ड मिल्क.
इवइव्हॅपोरेटेड मिल्क मिळत की नाही माहित नाही देशात पण दुध आटवुन केलस तरी चालेल.
पण खर सांगु तु कशाला इतकी खतपट करतेस? तिकडे मस्त रेडिमेड मलई कुल्फी मिळते ती खायची इकडे आम्हाला मिळत नाही म्हणुन प्रयोग करावे लागतात. जीभेचे चोचले दुसर काय
इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे
इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे मिल्क पावडर<<< नाही$$$$$$
इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे आटवलेल्या दुधासारखेच. पातळं/लिक्विड असते.
मलाही कविताचाच प्रश्न
मलाही कविताचाच प्रश्न विचारायचा होता. घरीच दुध आटवून बनलेला खवा (खरंतर याला खवा म्हणण्यापेक्षा अगदी घट्ट रबडी म्हणायला हवं. खव्यापेक्षा पातळ अन रबडीपेक्षा घट्ट आहे) आहे ३-४ वाट्या. तो वापरुन बघू का?
ओके मावशे रेडिमेड मिळत ग पण
ओके
मावशे रेडिमेड मिळत ग पण घरी आयते गिनिपिग्ज आहेत तर का नाही करायचे प्रयोग
अल्पना, जरुर ट्राय कर पण तुला
अल्पना, जरुर ट्राय कर पण तुला त्यात थोडे दुध घालुन सरबरीत करुन घ्याव लागेल आणि प्रमाण पण अंदाजाने बघावं लागेल.
कवे अरे ते घरीच इव्होपरेटायच
कवे अरे ते घरीच इव्होपरेटायच नाही तर चितळे किंवा काका हलवाई कडून विकत आणायच फक्त त्यांना सांगताना बासुंदी मागायची
बघते ग. अग माझ्या चुलस साबा
बघते ग. अग माझ्या चुलस साबा अगदी दर १५ एक दिवसांनी घरी खवा बनवून पाठवतात. बरोबर ४-५ लिटर घरच्या गायीचं दूध.. २-३ पोतंभरून भाज्या. कॉलनीत सगळ्यांना वाटून सुद्धा मला हे सगळं कसं संपवायचं हा प्रश्न पडलेला असतो.
बासुंदी घातलित तर कै च्या कै
बासुंदी घातलित तर कै च्या कै गोड होईल कुल्फी.
आधीच कॅलरीज चा बॉम्ब आहे त्यात अजुन साखर म्हणजे मिसाईलच होईल
लाजो हल्ली चितळेंकडे डायबेटीस
लाजो हल्ली चितळेंकडे डायबेटीस वाल्यांची बासुंदी पण मिळते ती आणायची
इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे
इव्हॅपोरेटेड मिल्क म्हणजे मिल्क पावडर
मण्जु, आपल्या इथे हे इव्ह.... पण मिळत नाही आणि मिल्क पावडर पण मिळत नाही. डेअरी व्हाईटनर मिळतं मिल्क पावडर मागितली काय..
मी सरळ घरीच बासुंदी करते, बिनसारखेची आणि त्यालाच इव्ह... म्हणते.. खरे तर ते इव्ह.. च आहे.
लाजो, बाहेर सगळेच मिळते गं, पण आपण काहितरी नविन करत असताना आपली मुले आजुबाजुला बागडत असतात आणि पदार्थ कधी एकदा होतोय त्याची वाट पाहात असतात. आणि मग झाल्यावर त्यानी पहिला चमचा तोंडात घातला की आपण देवाचे नाव घेऊन त्यांच्या चेह-यावर प्रतिक्रिया शोधतो.. ही सगळी मजा विकतच्या पदार्थांमध्ये कुठुन येणार??????
रच्याकने, रेसिपी एकदम सोप्पी आणि मस्त.. आता आंब्याचा सिजन येतोयच.. तेव्हा हे कॅलॅरी बॉम्ब्स बनवायलाच हवेत...
लाजो, बाहेर सगळेच मिळते गं,
लाजो, बाहेर सगळेच मिळते गं, पण आपण काहितरी नविन करत असताना आपली मुले आजुबाजुला बागडत असतात आणि पदार्थ कधी एकदा होतोय त्याची वाट पाहात असतात. आणि मग झाल्यावर त्यानी पहिला चमचा तोंडात घातला की आपण देवाचे नाव घेऊन त्यांच्या चेह-यावर प्रतिक्रिया शोधतो.. ही सगळी मजा विकतच्या पदार्थांमध्ये कुठुन येणार?????? >>>>तुला मोदक ग साधना हवे तेव्हढे
आणि बिघडलाच असेल तरी पण दिसत ना लगेच चेहर्यावर त्यांना असे विविध भाव व्यक्त करता यावेत म्हणुन पण करायच ग कधी मधी घरी
हो दिसते ना... मी केलेला
हो दिसते ना... मी केलेला स्पॉंज केक केवळ इसेंस घालायला विसरल्यामुळे 'अंड्याचा वास येतोय' ह्या सबबीखाली चार दिवस फ्रिजमध्ये लोळतोय.......
ही कुल्फि मी करणार पुढच्या आठवड्यात.... कॅलरी बाँब असली तरी मी अशा वेळी दोनतिन तास दुसरे काहीच न खाता फक्त तेवढा एकच पदार्थ मोजकाच खाते आणि तसे केल्याने आपल्याला कॅलरी बाधत नाहीत असा मला शोध लागला आहे..
साधना, कवि, तुम्ही अगदी बरोबर
साधना, कवि, तुम्ही अगदी बरोबर बोलताय.
आपण कोणासाठी करतो? आपल्या नवरा आणो मुलांसाठीच
परवा मी कुल्फी करायला घेतली तर नवरा उत्सुकतेने बघत होता आणि मग मला दर तासाने विचारत होता झाली का? झाली का? म्हणुन. सेट झाल्यावर त्याला एक तुकडा दिला तर त्याने 'फ्स्स्क्लास!!!! एकदम ऑथेंटिक कुल्फी!!!!' अशी प्रतिक्रिया दिली. कित्ती छान वाटलं
करा तुम्ही आणि मला सांगा घरच्यांच्या प्र्तिक्रिया
लाजो ....
लाजो .... यम्म्म्म्म्म्म्म्म्मी, तोंडाला पाणी सुटलय फोटो नक्की अपलोड कर ग
साधना २ /३ तासच फक्त काही ही
साधना २ /३ तासच फक्त काही ही दुसर खात नाही ?? चला हा शोध लावल्या बद्दल धन्यवाद
म्हणजे मी निर्धास्त पणे खाईन
करण्याची शक्यता कमीच आहे, पण
करण्याची शक्यता कमीच आहे, पण वाचून तोंडाला पुरेसं पाणी सुटलेलं आहे एवढं नक्की.
काय मस्त दिसतायत कुल्फ्या!
काय मस्त दिसतायत कुल्फ्या!
ऑस्स्सम दिसतीये कुल्फी!
ऑस्स्सम दिसतीये कुल्फी! स्स्स्स्स्स्स्स! उन्हाळ्यात उन्हाळ्यात..
सेट झाल्यावर त्याला एक तुकडा दिला तर त्याने 'फ्स्स्क्लास!!!! एकदम ऑथेंटिक कुल्फी!!!!' अशी प्रतिक्रिया दिली. कित्ती छान वाटलं >> लाजो, लाजो खूप बोल्ल्लीस! हे असं ऐकायला कान आसुसले आहेत इथे! मी सिंडीच्या ग्रुपमधली आहे त्यामुळे नजरेनेच टप्प्याबाहेर करते, आजूबाजूच्यांना!
आईग्ग्ग...कसला जीवघेणा फोटो
आईग्ग्ग...कसला जीवघेणा फोटो आहे.
मी नक्की करणार ही कुल्फि.
यम्मी!
यम्मी!
हायला, फोटो एकदम खल्लास आहे.
हायला, फोटो एकदम खल्लास आहे. यम्मी यम्मी
लाजो खतरा फोटो एकदम
लाजो खतरा फोटो एकदम
फोटु एकदम भारी.. कोणीतरी चमचा
फोटु एकदम भारी.. कोणीतरी चमचा द्या रे मला......................
ते साईडचे पांढरे डिजाईन मुळचेच आहे की लाजो स्पेशल???
स्मिता, बिन्दास खा... पण फक्त कुल्फीच हाणायची... आधी जेऊन वगैरे मग वर स्विट डिश म्हणुन हाणलीस तर वाट लागेल.....
Pages