श्री. विजय तेंडुलकर - मराठी रंगभूमीला एक वेगळं वळण देणारे लेखक - यांचा प्रथम स्मृतिदिन १९ मे २००९ ला झाला. त्या दरम्यान चिन्मय दामले (चिनूक्स) यांनी त्यांचा नाटकांवर/व्यक्तिमत्वावर आधारित एक लेखमाला चालू करण्यासंबंधी विचारणा केली. हे का करावंसं वाटलं यासंदर्भात त्यांनी शेवटच्या लेखात ( श्रीमती विजया मेहता) लिहिलं आहे. मायबोली नेहेमीच अश्या नवीन उपक्रमांना पाठींबा देत आली आहे त्यामुळे नकाराचा प्रश्नच नव्हता.
हे सर्व मान्यवर त्यांच्या व्यवसायात कार्यमग्न असल्याने त्यांच्यांशी संपर्क साधून, पाठपुरावा करून हे लेख तयार करणं ह्याला बराच वेळ लागणार होता. त्यामुळे पुढील वर्षभर जसं शक्य होइल तसं एक एक लेख प्रकाशित करण्याचं ठरवलं. आजच्या शेवटच्या लेखाने या लेखमालेचा समारोप करत आहोत. आम्हाला खात्री आहे की तेंडुलकरांचा सहवास लाभलेल्या, त्यांच्याबरोबर काम केलेल्या या सर्वांकडून तुम्हाला तेंडुलकरांबद्दल, त्यांच्या नाटकांबद्दल नवीन माहिती मिळाली असेल.
हा उपक्रम या सर्व मान्यवरांच्या सहकार्याशिवाय पूर्ण होउ शकला नसता. त्याबद्दल खालील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
श्री. निळू फुले, श्री. भास्कर चंदावरकर, श्री. भालचंद्र पेंढारकर, डॊ. श्रीराम लागू, श्रीमती सुलभा देशपांडे, श्रीमती विजया मेहता, श्री श्याम बेनेगल, श्री. सतीश आळेकर, श्रीमती लालन सारंग, श्रीमती रोहिणी हट्टंगडी, श्रीमती सुहास जोशी, श्रीमती मेधा पाटकर, श्रीमती सुमित्रा भावे, श्री सुनील सुकथनकर, श्री विनय आपटे, डॊ. शिरीष प्रयाग, श्री अतुल पेठे, श्री अवधुत परळकर, श्रीमती सुषमा तेंडुलकर, डॊ. नरेंद्र दाभोळकर, डॊ. प्रकाश आमटे, डॊ. मोहन आगाशे, श्री गोविंद निहलानी, श्री अरुण काकडे, डॊ. गिरीश कर्नाड, श्री विक्रम गोखले, श्रीमती शांता गोखले, श्रीमती दीपा श्रीराम, श्री चंद्रकांत काळे, श्रीमती अमृता सुभाष, श्रीमती सोनाली कुलकर्णी, श्री राजू परुळेकर, श्री. मकरंद साठे, श्रीमती सुजाता देशमुख, श्री संजय भागवत, श्री गिरीश जयवंत दळवी, श्री जयंत उमाकांत देशपांडे, श्री सचिन कुंडलकर, श्री मोहित टाकळकर, श्री. कमलेश वालावलकर, श्री. विवेक रानडे, डॊ. हेमंत मोरपारिया, श्री. संतोष अयाचित, श्रीमती शुभांगी पांगे, राजहंस प्रकाशन, पुणे, पॊप्युलर प्रकाशन, मुंबई, मौज प्रकाशन गृह, मुंबई, पुणे मराठी ग्रंथालय, उत्कर्ष ग्रंथालय, पुणे, आविष्कार, मुंबई, ललितकलादर्श, मुंबई.
या संग्रहातील एक लेख टंकीत करण्यात मदत केल्याबद्दल अंशुमन सोवनी (आर्फी) यांचे आभार. सर्वात शेवटी गेले वर्षभर ह्या सर्वांचा सातत्याने पाठपुरावा करून ही वाचनीय लेखमाला मायबोलीकरांसमोर सादर केल्याबद्दल चिन्मय दामले यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. यापुढेही त्यांच्याकडून असेच भरीव काम होत राहो या शुभेच्छांसह ही लेखमाला संपवत आहोत.
या लेखमालेतील सर्व लेख या दुव्यावर पहायला मिळतील.
अनूमोदन. पुढील लेखमालेसाठी
अनूमोदन. पुढील लेखमालेसाठी शुभेच्छा!
मी सर्व लेख नाही वाचलेत पण
मी सर्व लेख नाही वाचलेत पण जरुर वाचणार आहे. इतक्या सर्व दिग्गज कलाकारांकडून माहिती गोळा करुन, त्यांच्याकडून अधिकृतरित्या अनुमती मिळवून -- इथे मायबोलीकरांना विजय तेंडूलकरांबद्दल इतके काही वाचायला दिले त्यासाठी चिन्मयचे लक्ष लक्ष आभार. त्यासाठी त्यानी वेचलेले कष्ट, त्याची चिकाटी, त्याची अभिरुची, त्याचा लोकंसंग्रह, लेखणाची प्रत-कुवत-वेग-नियमीतपणा, तेंडूलकरांवरचे त्याचे प्रेम -- सर्व कसे प्रशंसनीय आहे. याकरिता प्रशासकांनी केलेली मदत त्यासाठी त्यांचेही आभार. पुढील लेखमालिकेसाठी शुभेच्छा!
आर्फी, तुझेही आभार. तू तिथे अमेरिकेत आणि हा देशात इकडे, तुम्ही दोघांनी कुठली पद्धत अवलंबीली हे लेखण करताना हेही वाचायला आवडेल. कारण शेवटी पानावर केलेले कच्चे लिखाण आणि मग मायबोलीवर केलेले शेवटचे लिखाण यात जास्त श्रम आले. म्हणून तुमची देवाणघेवाण करण्याची पद्धत वाचायला आवडेल.
ह्या लेखमालेबद्दल चिन्मयचे
ह्या लेखमालेबद्दल चिन्मयचे खूप आभार...
त्यासाठी त्यानी वेचलेले कष्ट, त्याची चिकाटी, त्याची अभिरुची, त्याचा लोकंसंग्रह, लेखणाची प्रत-कुवत, तेंडूलकरांवरचे त्याचे प्रेम -- सर्व कसे प्रशंसनीय आहे. >>> ह्याला अनुमोदन !
तसेच ह्या उपक्रमाला प्रोत्साहन आणि सहकार्य दिल्याबद्दल मायबोली प्रशासनाचेही आभार...
चिन्मय.. पुढील लेखनासाठी शुभेच्छा...
चिन्मय- आभारी आहे. या
चिन्मय- आभारी आहे. या लेखमालेनी एक सामान्य वाचक म्हणुन मला बरेच काही गवसले, आणि मायबोलीवरचे अतिशय उत्तम असे दस्ताऐवजीकरण तेही व्यावसायिक (निव्वळ हौशी पातळीवर न राहता) स्वरूपात असे तयार झाले. या लेखमालेकडे नामवंत प्रकाशकांपैकी कोणाचीतरी मेहेनजर जाईल आणि पुस्तकस्वरुपात ही लेखमाला प्रकाशीत होईल अशी एक आशा मनी आहे.
मायबोली प्रशासनाने या उपक्रमाला सक्रिय पाठिंबा दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार.
पग्याच्या एकूण एक शब्दाला
पग्याच्या एकूण एक शब्दाला अनुमोदन.
भावना व्यक्त करायला शब्द तोकडे पडतात.... ह्या उपक्रमासाठी झटलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार!!
चिन्मय, आम्हाला असाच श्रीमंत करत रहा
लेखमाला खरोखरंच उत्कृष्ट
लेखमाला खरोखरंच उत्कृष्ट होती.
अशा गोष्टी एका जागी संग्रहित असल्या की त्याला डॉक्यूमेन्टेशनचे स्वरुप येते. आणि हे अत्यंत महत्वाचे असूनही त्यासाठी लागणार्या कष्ट, चिकाटी अभावी किंवा त्याचे मूल्यच न उमगल्याने ते आपल्याकडे केले जात नाही. सगळे महत्वाचे विचार, लेख विस्कळीत स्वरुपात इकडे तिकडे रहाते. इथे हे सर्व एकत्रित उपलब्ध असल्याने एक किती विस्तृत काळाचा पट, कलावंताचा प्रवास नजरेसमोर सहज उलगडत जातो. अजून काही वर्षांनी जर एखाद्याला काही अभ्यास करण्यासाठी किंवा हा काळ माहित करुन घेण्यासाठी संदर्भांची गरज पडली तर इथे हे सहज उपलब्ध राहिल.
चिन्मय दामलेंनी यासाठी जी मेहनत घेतली, जो दर्जा सांभाळला ते अत्यंत प्रशंसनीय आहे. यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार. खूप आनंद दिला या लेखमालेने. त्यांच्या दुसर्या अन्न वै प्राणा: मालिकेमधूनही ते असेच महत्वाचे डॉक्यूमेन्टेशन एकत्रित करत आहेत.
मायबोली प्रशासकांनी या सर्वाला वाव दिला, प्रोत्साहन दिले, जागा उपलब्ध करुन दिली यासाठी तर त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
चिन्मयला पुढील सर्व उपक्रमांसाठी शुभेच्छा!!
ह्या लेखमालेने बरंच काही
ह्या लेखमालेने बरंच काही शिकवलं, नवीन खूप काही कळलं. धन्यवाद चिनूक्स ह्या मेहनतीबद्दल. प्रचंड उत्साहाने आणि चिकाटीने ही लेखमाला तू पूर्ण केलीस. मायबोली प्रशासनाचेही आभार, ह्यासाठी वेगळी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल.
चिन्मय, आर्फी आणी या उपक्रमास
चिन्मय, आर्फी आणी या उपक्रमास सहाय केलेल्या अन्य सर्वांचे मनःपुर्वक आभार. खूप काही मिळाले या लेखमालेतून.
खूपच मोठे आणि महत्वाचे
खूपच मोठे आणि महत्वाचे काम....
वरच्या सर्वांनाच
वरच्या सर्वांनाच अनुमोदन...
चिनुक्स तुझे कौतुक करावे आणि आभार मानावे तेवढे थोडेच आहेत...
hats off to you
मायबोलीनेच स्वतःचे प्रकाशन सुरु करुन पुस्तकरुपाने ही लेखमाला प्रसिद्द केली तर बहार येईल (अर्थात प्रताधिकाराबाबत काही अडचण नसेल तर)
मायबोलीकर पत्रकार मित्रांनी ह्या उपक्रमाला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी द्यावी असेही मला वाटते
खरंच कौतुकास्पद !!
खरंच कौतुकास्पद !!
मायबोली प्रशासनाचे
मायबोली प्रशासनाचे ,लेखमालेसाठी सहकार्य करणार्या सर्व मान्यवरांचे व खास म्हणजे चिन्मय
दामले यांचे सकस लेखनासाठी मनापासून आभार .
गेले अनेक महिने खूप कष्ट घेऊन
गेले अनेक महिने खूप कष्ट घेऊन ही लेखमाला तयार करताना मी चिन्मयला पाहिलं. ही कल्पना जितकी महान होती, तितकेच महान चिन्मयने ती साकार करण्यासाठी घेतलेले कष्ट. माझ्याबद्दल बोलायचं, तर यातले काही लेख अक्षरशः मनात अढळपद मिळवून गेले. त्याचे कारण माझे श्रद्धास्थान 'तेंडूलकर' इथे ठायीठायी दिसत, व्यक्त होत होते- हे तर होतेच, पण त्याव्यतिरिक्त- या लेखांची सुंदर प्रस्तावना, आभाळाएवढा मोठ्या व्यक्तींचे 'तें'बद्दलचे मनोगत आणि त्या अनेक प्रसंगातून समोर येणारे तेंचे बहुरंगी, बहूढंगी, जगावेगळे, महान व्यक्तिमत्व- हेही. या लेखमालेत पुढच्या लेखांची मी खरोखर आसूसून वाट बघत असे, तसे चिन्मयला सांगतही असे. हे लेख आता रोज, दरहप्त्याला दिसणार नाहीत- याचे वाईट वाटते आहे.
ही लेखमाला लवकरच पुस्तकरुपात दिसेल, अशी आशा.
चिनुक्स तेंडुलकरांवर
चिनुक्स तेंडुलकरांवर लेखमालिका करण्याची कल्पनाच मुळात भन्नाट होती, आणि ती तितक्याच समर्थपणे पेलल्याबद्दल तुझे खुप खुप आभार.
या लेखमालिकेमुळे तेंडुलकरांचे माझ्या मनातील स्थान अजुनच वरती गेले आहे.
तसेच आपल्या मराठीत अनेक महान गोष्टी होऊन गेल्या आहेत पण त्यांची कुठेच काही माहिती मिळत नाही.
मला अनेक इंग्रजी चित्रपटांनी जसे भारावुन टाकले तसे तेडुलकरांच्या नाटकांनीही भारावून टाकले पण जशी तो चित्रपट त्याची निर्मीती याविषयी माहीती उपलब्ध असते तसे मराठीच्या बाबतीत नव्हते.
ते उपलब्ध होणे खुपच महत्वाचे वाटते. मराठीतील इतरही संगीतकार किंवा नाटककार/लेखक यांच्यावर या प्रकारच्या लेखमालिका करता येतील असे वाटते.
शेवटी वरील मायबोलीकरांना अनुमोदन देत ही लेखमालीका पुस्तक रुपाने मिळेल अशी अपेक्षा करतो
चिनुक्स पुन्हा एकदा या लेखमालीकेविषयी आभार !!!!
चिन्मय, खरोखर तुझ्या मेहनतीला
चिन्मय, खरोखर तुझ्या मेहनतीला सलाम! तुझे आभार ,धन्यवाद मानावे तेवढे थोडेच आहेत.
प्रशासकांनीही असेच उपक्रम करत रहावे, अशा शुभेच्छा!
आर्फीचे तर आभार मानूच या पण, अरभाटनेही मदत केली असा उल्लेख चिनूक्सने केला आहे , म्हणून त्याचेही आभार!
फारच स्तुत्य. नुकतेच अ-जून
फारच स्तुत्य. नुकतेच अ-जून तेंडूलकर म्हणून रेखा इनामदार साने ह्यांनी संपादित केलेले एक पुस्तक वाचले. इथले काही लेख त्यांनी घेतले असते तर अजून बहार आली असती.