मित्र आणि मैत्रिणिंनो,
"अतुल्य! भारत" ह्या मालिकेतल्या "लडाख" ह्या पहिल्या भागाला आपण जो उस्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल शतशः धन्यवाद.
"अतुल्य! भारत" ह्या मालिकेतला दुसरा भाग "शुभ्र काश्मिर" मी आपल्या पुढे सादर करत आहे. ह्यामध्ये मी काश्मिरची हिवाळ्यातली काढलेली प्रकाशचित्रे प्रदर्शित करीत आहे.
धन्यवाद,
चंदन.
थोडक्यात माहिती -
सिझन (हिवाळा): डिसेंबर ते फेब्रुवारी. (१५ जानेवारी ते फेब्रुवारी अतिशय योग्य)
प्रेक्षणिय स्थळे - श्रीनगर , गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम.
आम्ही पाहिलेली स्थळे- श्रीनगर , गुलमर्ग, पहेलगाम
दिवस - ४ ते ५
श्रिनगर ला २ प्रकारे जाता येते.
१) दिल्ली - श्रीनगर - दिल्ली flight.
२) दिल्ली - जम्मू- श्रीनगर highway. बरेचदा अति बर्फवॄष्टीमूळे हा मार्ग हिवाळ्यात बंद असतो आणि गाड्या १०-१० दिवस अडकतात.
श्रिनगर चा विमानतळ वायू दलाच्या ताब्यात असल्यामूळे हा विमानतळ कधीच बंद नसतो.
प्रवासवर्णन -
आम्ही श्रिनगर ला जाण्यासाठी दिल्ली येथुन जानेवारी २४ ला सकाळच्या विमानाने निघालो. आधिच थंडी, त्यात काश्मिर ला जाणार असल्याने वूलन थर्मल्स, जॅकेट्स, स्वेटर्स, लेदर ग्लवज, कानटोप्या, लोकरी पायमोज्यांच्या २ जोड्या अशी सर्व तयारी केली होती.
जानेवारी २३: दिल्ली वरून सकाळचे विमान पकडून दूपारी १२:३० वाजता श्रीनगर च्या विमानतळावर उतरलो. बाहेर कडाक्याची थंडी होती. विमानतळावर हात धुवायला नळ सुरु केला आणि विजेचा झटका बसवा तसा झटका बसला. तापमान २-३ अंश सेल्सिअस होते. कार बूक केली होती म्हणून ड्रायव्हर घ्यायला आला होता. तिथुन श्रीनगर ला गेलो. लश्कराचे अस्तित्व पदोपदी जाणवत होते. श्रीनगर शहरात साधा:रणपणे प्रत्येक २० ते ३० फूटांवर एक जवान तैनात होता. शहराबाहेर तिच परिस्थिती १०० ते २०० फूट अशी होती. ह्या जवानांचा आपल्याला काहीही त्रास होत नाही. उलट ते आहेत म्हणून सुरक्षित वाटते. असो. off season असल्यामूळे ५०० ते १००० च्या दरम्यान छान हॉटेल मिळते. हॉटेल श्रीनगर मध्येच घ्यावे कारण की श्रीनगर हे गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहेलगाम यांच्या मध्यभागी पडते. आम्ही houseboat घेणार होतो. पण आमचा ड्रायव्हर म्हणाला की सर्व houseboat चे मालक दल सरोवराचे पाणी वापरायला देतात आणि सांडपाणी पुन्हा सरोवरामध्येच सोडुन देतात. Yuk. खरे खोटे देव जाणे. पण कशाला विषाची परीक्षा घ्या म्हणून आम्ही houseboat च्या फंदात नाही पडलो. बरीच हॉटेल्स पाहून एक छानसे हॉटेल घेतले. हॉटेल मध्ये प्रत्येक खोली मध्ये छान fireplace होती. प्रत्येक गादी मध्ये electric heater होता. नाहीतर त्या थंडी मध्ये गादी पण एव्हडी थंड असते की त्यावर झोपावेसे वाटत नाही. आधिच हाताला झटका बसला होता. आता कुठे कुठे बसायचा.... असो. सामान ठेवून आणि फ्रेश होउन दल सरोवर पहायला बाहेर पडलो. सरोवराजवळ तर आणखिनच थंड वाटत होते. एथे प्रत्येकाने आपल्या अंगात एक झगा घातला होता आणि त्या झग्यात "कांगडी" होती. कांगडी म्हणजे एक छोटे मडके असते. त्यात निखारा असतो आणि हे मडके एका वेताच्या टोपलीमध्ये ठेवलेले असते. चालता फिरता heater. पुढचे ४ दिवस आम्ही जिथे जाऊ तिथे आधी कांगडी शोधत होतो. असो. शिकारे घेउन दल सरोवर पहायला निघालो. दल सरोवर हे तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. हिवाळा असल्यामूळे सर्व डोंगर बर्फाच्छादीत होते. दल सरोवराच्या मध्यभागी एक छोटिशी बागदेखिल आहे. दल सरोवरात चक्कर मारून दल सरोवरामधल्या बाजारात गेलो. हा बाजार पाण्यावर आहे. तरंगता नव्हे. तिथे थोडी फार शाली, over coats, jackets, dress material अशी खरेदि केली. दल सरोवर पाहुन झाल्यावर श्रीनगर च्या बाजारात गेलो. ईथे अक्रोड, आणि केशर फार छान मिळते. ते घेतले. तसा आमचा ग्रुप निर्व्यसनी पण तेवढाच रसिक. म्हणले काश्मिर ला आलो आहोत तर काश्मिर ची थंडी enjoy करावी म्हणून येताना वाईन घेतली. आमच्या एका हौशी मित्राने पुण्यावरून येताना बॅग मध्ये पॅक करून हुक्का आणि निरनिराळे flavors आणले होते. हॉटेल वर आल्यावर fireplace समोर बसुन वाईन, हुक्का व काश्मीरी कबाब यांचा आस्वाद घेतला. फार छान अनुभव होता. असा पहिला दिवस घालवला.
जानेवारी २४: आज गुलमर्ग ला जाण्याचा बेत ठरला. गुलमर्ग हे श्रीनगर पासून ३ ते ४ तासांवर आहे. मध्ये एका ठिकाणी थांबुन बर्फामध्ये जाण्यासाठि लागणारे gum boot आणि trenchcoat घेतले. गुलमर्ग ला जाता जाता snowfall सुरू झाला. सर्वजण आयुष्यात प्रथमच snowfall बघत होते त्यामूळे सर्वांना खूप आनंद झाला. गुलमर्ग ला पोहोचल्यावर तुम्ही sledge घेऊ शकता, skiing करू शकता किंवा तिथल्या cable car मधुन सैर करू शकता. सर्वांनी बर्फात भरपूर मजा केली. खाली छाती पर्यंत बर्फ आणि वरुन snowfall त्यामूळे वेगळाच आनंद वाटत होता. पण हाच snowfall हळू हळू वाढत गेला आणि थोडाफार भितीदायक वाटायला लागला. तोपर्यंत ३-४ तास झाले होते. सर्व जण खेळून आणि हुंदडून थकले होते. तोपर्यंत ड्रायवर चा पण फोन आला की snowfall जास्त होतो आहे, रस्ते बंद होण्याची शक्यता आहे तेव्हा आता निघा.सर्वजण आटोपुन परत श्रीनगर ला आलो.
जानेवारी २५: आज पहेलगाम चा बेत ठरला. पहेलगाम हे श्रिनगर पासुन ४ तासांवर आहे. तिथे पण भरपुर बर्फ होता पण हलकासा पाऊस ही होता. त्यामूळे एवढे फिरता नाही आले. तरी पण मजा आली. पहेलगाम च्या रस्त्यावर खुप cricket bat च्या factories आहेत. येताना तेथे थांबलो. आमच्या काही मित्रांनी bats खरेदी केल्या. तसेच ह्या रस्त्यावर केशराची शेते देखिल आहेत.
जानेवारी २६: आम्हि आज सोनमर्ग ला निघालो. पण २ तास प्रवास केल्यावर असे कळले की अति बर्फवॄष्टिमूळे सोनमर्ग चा रस्ता बंद झालेला आहे. आमचा mood off झाला. तेथून परत श्रिनगर ला आलो. आज २६ जानेवारी असल्यामूळे सर्वत्र कडकडित बंद होता म्हणून शहरातील सर्व दूकाने बंद होती. रस्त्यावर चिट पाखरू ही नव्हते. उध्या दूपारची परतीची flight असल्यामूळे आज शंकराचार्य मंदिर पहायचे ठरले. मंदिर दल सरोवरासमोरील डोंगरावर आहे. येथून श्रिनगर व दल सरोवराचा छान देखावा दिसतो. संध्याकाळी शालीमार बागेला भेट दिली. हिवाळा असल्यामूळे बागेत जास्त झाडे वा फूले नव्हती. बाग पाहून परत hotel वर आलो.
जानेवारी २७: आज सकाळी थोडा time pass केला. दल सरोवर जवळच असल्यामूळे परत एकदा जाऊन फोटोज काढले. परत hotel वर येऊन bags आवरुन दिल्ली ला प्रयाण केले.
---------------------------------------------------------------------------
प्रकाशचित्रे
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर
दल सरोवर.
दल सरोवर.
दल सरोवरामधील बाजार
दल सरोवर. संध्याकाळी
दल सरोवर. संध्याकाळी
दल सरोवर. संध्याकाळी
दल सरोवर, श्रिनगर व श्रिनगर चा राजवाडा
---------------------------------------------------------------------
शालिमार बाग
शालिमार बाग. संध्याकाळी.
---------------------------------------------------------------------
शंकराचार्य मंदिर
---------------------------------------------------------------------
गुलमर्ग च्या वाटेवर...
गुलमर्ग च्या वाटेवर...
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
गुलमर्ग
---------------------------------------------------------------------
पहेलगाम
पहेलगाम
चिनाराची गोठलेली पाने, पहेलगाम.
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
पहेलगाम
केशराचे शेत
केशराचे शेत
केशराचे शेत
एक गाव.
कांगडी... आमची तारणहार...
बॅट चा कारखाना, पहेलगाम
काश्मिरचा ग्रुप
---------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत. क्रमशः
आगामी आकर्षण - हिमाचल प्रदेश.
मागील प्रकाशित भाग पाहण्यासाठी खालि दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
http://www.maayboli.com/node/15407
व्वाह चंदन व्वाह!!!!!! पुन्हा
व्वाह चंदन व्वाह!!!!!!
पुन्हा एकदा नेत्रसुखद फोटोंची मेजवानी.
लेख आणि अर्थातच फोटो अ प्र ति म!!!!!!
सुरेखच फोटो चंदन
सुरेखच फोटो चंदन
पुन्हा एकदा, नादखुळा फोटो
पुन्हा एकदा, नादखुळा फोटो !!!
१ नंबर...
अप्रतिम! फोटो कितीही वेळा
अप्रतिम!
फोटो कितीही वेळा पाहीले तरी समाधान होत नाहीये. सगळेच फोटो आवडले. तो संध्याकाळच्या दल लेकचा एकच दिवा असलेला फोटो जामच आवडला.
चंदन सही जा रहे हो! लगे रहो!
चंदन पुन्हा एकदा अल्टिमेट
चंदन पुन्हा एकदा अल्टिमेट फोटोज. आधीचे लडाखचे फोटो बघितल्यावर आता छानच फोटो बघायला मिळणार याची खात्री झालीये. पांढर्या शुष्क (बर्फाच्या) फोटोंमध्ये केशराच्या शेताच्या हिरवागार फोटो झकासच. बाकी दल लेकचा फोटो भारीच आहे. मला खरंतर तुमचा साधा डिजीटल कॅमेरा आहे यावर विश्वासच बसत नाहीये.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
कसले एकेक भारी फोटोज आहेत..
कसले एकेक भारी फोटोज आहेत.. मस्तच !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दल सरोवर, केशराची शेती आणि पेहेल्गाम चा घराचा फोटू झ्याक एकदम..
तुमचा साधा डिजीटल कॅमेरा आहे यावर विश्वासच बसत नाहीये >> ओडी याना अनूमोदन![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काय अप्रतिम फोटो
काय अप्रतिम फोटो आहेत...!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमचा साधा डिजीटल कॅमेरा आहे यावर विश्वासच बसत नाहीये >> अनूमोदन.
फोटो अप्रतिम
फोटो अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव! गारेगार वाटलं फोटो
वॉव! गारेगार वाटलं फोटो पाहून! मस्तच!
सुरेख आहेत फोटो!
सुरेख आहेत फोटो!
ते गुलमर्ग आहे की गुलमार्ग?
ते गुलमर्ग आहे की गुलमार्ग? मी आजवर गुलमार्ग असाच उच्चार केला.. असो.. चंदन छान उपक्रम!!!!
आऊटडोअर्स, केदार आणि
आऊटडोअर्स, केदार आणि गंगाधर,
माझा canon powershot S2 IS तुम्हाला सर्वात शेवटचा फोटो "काश्मिरचा ग्रुप" मध्ये दिसेल.
आमच्या ही ने गळ्यात घातला आहे.
चंदन
बी, काश्मिरी लोक त्याचा
बी,
काश्मिरी लोक त्याचा उच्चार "गुलमर्ग" असा करतात. त्याचे मूळ नाव "गौरीमार्ग" असे आहे.
चंदन
वा! अप्रतिम! सुंदर.
वा! अप्रतिम! सुंदर. फोटोग्राफी तर लाजवाब आहे.
मस्त. पहिल्याच फोटोला
मस्त. पहिल्याच फोटोला तोंडातून 'अहाहा!' गेलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही गेलो होतो तेव्हाही गुलमर्गला असाच बर्फ पडलेला होता. पण पहल्गाम मात्र स्वच्छ सूर्यप्रकाशात आणि हिरवंगार पहायला मिळालं होतं. २०-२२ वर्षं झाली त्याला पण अजूनही ती दृष्यं डोळ्यांसमोरून हलत नाहीत.
बाकी, दल सरोवरातल्या सुप्रसिध्द 'चार चिनार'चा एकही फोटो कसा काय नाही?
अफलातुन आहे दल सरोवर
अफलातुन आहे दल सरोवर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चंदन अहो तुमच्यावर अविश्वास
चंदन अहो तुमच्यावर अविश्वास दाखवतच नाहीये, म्हणून तर वरच्या पोस्ट मध्ये दिवा टाकलाय. पण तुमचे फोटो हे SLR च्या तोडीचे आहेत, मला लडाखच्या वेळेस ते जाणवलं, म्हणून मी असं म्हणतेय. अर्थात तुमच्याकडे फोटो काढण्यासाठी आवश्यक असलेली दृष्टी आहे, त्यावर ही खूप काही अवलंबून असतं.
कमाल आहेत फोटोज.. चंदन,
कमाल आहेत फोटोज.. चंदन, धन्यवाद फोटोद्वारे हे नेत्रसुख दिल्याबद्दल..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा एकदा अप्रतिम फोटो. २५
पुन्हा एकदा अप्रतिम फोटो. २५ वर्षापूर्वी काश्मिरला गेलो होतो त्याच्या आठवणी ताज्या झाल्या.
अप्रतिम् फोटोज मागच्याच
अप्रतिम् फोटोज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मागच्याच वर्षी गुलमर्ग ला गेलो होतो. दल लेक नाही पहायला मिळाले इलेक्शन मुळे फक्त एक दिवसात गुलमर्गला जाउन बाकी प्लॅन कॅन्सल झाला
गुल म्हणजे फुलं आणि गुलमर्ग म्हणजे फुलांचे मैदान. इथे मे महिन्यानंतर खूप फुलं असतात असं आम्हाला सांगितलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच ! हे फोटो पण भारी
मस्तच ! हे फोटो पण भारी आहेत.. वर्णन नंतर वाचतो..
फोटोज खुप मस्त आहेत. ते दल
फोटोज खुप मस्त आहेत. ते दल सरोवरचे तर अप्रतिम आहेत.
मागच्यासाखेच, सुंदर फोटोज!
मागच्यासाखेच, सुंदर फोटोज!
खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प च
खुप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प च सुंदर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम!! भारताचा स्वर्ग
अप्रतिम!! भारताचा स्वर्ग काश्मिर.
सुंदर!!
सुंदर!!
मस्त, दाल सरोवर झकास
मस्त, दाल सरोवर झकास
पुन्हा एकदा स्वप्नातली
पुन्हा एकदा स्वप्नातली चित्रे... सुंदर..
सुरेख चित्रं.
सुरेख चित्रं.
पुन्हा एकदा उत्तम
पुन्हा एकदा उत्तम प्रवासवर्णन.....आणि अतुल्य फ़ोटोग्राफ़ी !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंत्रमुग्ध केलं सगळ्या फ़ोटोंनी. खरोखर स्वर्गीय सौंदर्य आहे काश्मीर म्हणजे !
Pages