जुलै २०१२ चा महिना होता आणि नुकतेच एक मोठे रीलीज झाले होते त्यामुळे नुकतीच काळ्या पाण्यावरून सुटका झाल्यासारखे वाटत होते. त्यातच २०११ मध्ये आमचे युवराज अगदीच लहान असल्यामुळे फारसे कुठे जाणे (मुंबई - पुण्याच्या खेपा सोडल्या खेरीज) झाले नव्हते. त्यामुळे आता श्रमपरिहारासाठी कुठेतरी जावे असे वाटू लागले होते.
म्हणुन मग बंगलोरच्या आसपासच्या विकएंड साठिच्या ठिकाणांचा शोध सुरु झाला. कुठेतरी जाऊन पडुन रहावे असे ठिकाण शोधत असताना रंगनथिट्टू पक्षी अभयारण्याला जाण्याचा बेत पक्का झाला आणि एका शनिवारी सकाळी सहकुटुंब सहपरिवार निघालो. रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य म्हैसुर आधी व श्रीरंगापटना च्या नंतर आहे. बंगलोर पासुन साधा:रणपणे १२० किमी वर. ह्या अभयारण्याजवळच KSTDC चा मयुरा रिव्हर व्ह्यु हा नितांत सुंदर रिसॉर्ट आहे. हा रिसॉर्ट कावेरी नदीच्या किनारी आहे. अतिशय शांत, हिरवागार व प्रसन्न परिसर आहे हा. बंगलोर मध्ये रहाणार्याने किमान एकदा तरी ह्या रिसॉर्ट ला भेट द्यावी. म्हैसुर मधील बरेच लोक ईथे दुपारी फक्त जेवण करायला व आराम करायला येतात. ह्या रिसॉर्ट मध्ये कावेरी मध्ये बोटिंग करायची पण सोय आहे. असो.
रमतगमत ईथे दुपारी १ वाजता पोहोचलो. जेवण व थोडा आराम करुन ४ वाजता अभयारण्यापाशी पोहोचलो. अभयारण्या च्या २ वेळा आहेत. एकदा सकाळी व एकदा संध्याकाळी. ह्या अभयारण्यात एक तलाव आहे व मध्ये २-३ बेटे आहेत. सर्व पक्षी ह्या तलावाच्या किनारी वा बेटावर असतात. ह्या तलावात बर्याचशा नैसर्गिक मगरी पण आहेत. ईथे बोटीची व्यवस्था आहे. बोटवाले तुम्हाला अर्धा ते पाऊण तास फिरवतात.
संध्याकाळी भटकंती आटोपुन परत रिसॉर्ट वर आलो. रिसॉर्ट वाल्यांनी मस्त कँपफायर लावुन दिला होता. गप्पा, खाणे-पिणे, पिक्षनरी ह्यात संध्याकाळ घालविली. दुसर्या दिवशी सकाळी परत अभयारण्याला भेट दिली. दुपारी रिसॉर्ट वरुन निघालो. ईथे जवळच फिश-लँड म्हणुन एक रेस्टॉरंट आहे. ईथे सी-फूड अप्रतिम मिळते. तेथे ताव मारला. येताना चन्नापटना ला थांबलो. येथे लाकडी खेळणी बनविण्याचा फार मोठा उद्योग चालतो. ईथे थोडी-फार खरेदी करुन रविवारी संध्याकाळी परत घरी आलो.
प्रचि १
रिसॉर्ट समोरील कावेरी.
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
Pale Billed Flowerpecker
-
-
-
प्रचि ५
Painted Stork
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
Painted Stork
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २३
Pied Kingfisher
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
Cattle Egret (Breeding Plumage)
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
-
-
-
प्रचि २८
Asian Openbill Stork
-
-
-
प्रचि २९
-
-
-
प्रचि ३०
-
-
-
प्रचि ३१
-
-
-
प्रचि ३२
-
-
-
प्रचि ३३
White Ibis
-
-
-
प्रचि
-
-
-
प्रचि ३४
-
-
-
प्रचि ३५
Egret
-
-
-
प्रचि ३६
-
-
-
प्रचि ३७
-
-
-
प्रचि ३८
Intermediate Egret
-
-
-
प्रचि ३९
Night Heron
-
-
-
प्रचि ४०
पाखरांची शाळा
-
-
-
प्रचि ४१
वटवाघुळे
-
-
-
प्रचि ४२
-
-
-
प्रचि ४३
-
-
-
प्रचि ४४
-
-
-
-----------------------------------------------------------------------------------------------------
अतुल्य! भारत - क्रमशः
आगामी आकर्षण - पट्टडक्कल, कर्नाटक.
"अतुल्य! भारत " मालिकेतील मागील प्रदर्शित भाग पहाण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर क्लिक करा:
http://www.maayboli.com/node/15407
क्लास हा शब्द कमी पडेल एवढे
क्लास हा शब्द कमी पडेल एवढे प्रचंड सुंदर प्रचि फुलपाखराचे प्रचि तर ___/\___
सुप्पर्ब!! प्रचि २०, २५, ३७
सुप्पर्ब!!
प्रचि २०, २५, ३७ भयंकर आवडले. प्रचि ३७ मधे त्या पक्षाच्या पंखांची नक्षी सुंदर आलीये.
शेवटच्या ४४ मधे मगर हसतेय वाट्टे!
फारच सुंदर प्र चि .......
फारच सुंदर प्र चि ....... हॅट्स ऑफ.....
मस्त आहेत सगळे फोटो.. २३
मस्त आहेत सगळे फोटो.. २३ खुपच आवडला.
खुप सुंदर.. काय एकेक मुद्रा
खुप सुंदर.. काय एकेक मुद्रा टिपल्यात !
मस्त् प्रकाशचित्रे..!
मस्त् प्रकाशचित्रे..!
क्ला
क्ला sssssssssssssssssssssssssssssssssssssssssss सिक!!!!
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम अतुल्य
नेहमीप्रमाणेच अप्रतिम अतुल्य मार्को पोलो
फोटो मस्त आहेत. ह्या तलावात
फोटो मस्त आहेत.
ह्या तलावात बर्याचशा नैसर्गिक मगरी पण आहेत. ईथे बोटीची व्यवस्था आहे. बोटवाले तुम्हाला अर्धा ते पाऊण तास फिरवतात>>> त्याच तलावात??? अगा बाबौ!!!
मी तर बोट राइड घेणार नाय बा...
जबरदस्त रे चंदन !
जबरदस्त रे चंदन !
मार्को.. कित्ती दिवसांनी?
मार्को.. कित्ती दिवसांनी?
खूप सुरेख फोटो.
ए ते मगरीचे फोटो किती अंतरावरून काढलेत?
सुंदर !!
सुंदर !!
फारच मस्त.... मार्को का जादु
फारच मस्त....
मार्को का जादु चल गया.....
धन्स लोक्स... दक्षिणा, त्या
धन्स लोक्स...
दक्षिणा,
त्या दगडावरच्या मगरी १५ ते २० फूटांवर होत्या. पण तशा त्या पोहोत असल्या तर अगदी तुमच्या बोटी शेजारून ८-१० फूटांवरून देखिल जातात.
एक से बढकर एक प्रचि. कसले
एक से बढकर एक प्रचि. कसले क्लियर आलेत सगळेच प्रचि.
मित्रा, तू तुझ्या प्रचिंची वाट पहायला लावतोस पण जेंव्हा प्रचि येतात तेंव्हा डोळ्यांची पारणं फेडणारी असतात.
लगे रहो मित्रा.....
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
लय भारीच... प्रचि ७ मधला
लय भारीच... प्रचि ७ मधला पेंटेड स्टार्क कसला वेगळा उठून दिसतोय.. नर आणि मादी असे प्रकार आहेत का??
उडणार्या पक्षांचे सगळे फोटो जबरी आलेत..
प्रचि १५, १६, १९ मध्ये बॅक ग्राऊंड मुद्दाम पांढरी केली आहे का?
धन्स जिप्सी आणि हिम्स... नर
धन्स जिप्सी आणि हिम्स...
नर आणि मादी असे प्रकार आहेत का?>>>
होय. रंगीत आहे तो नर आहे.
प्रचि १५, १६, १९ मध्ये बॅक ग्राऊंड मुद्दाम पांढरी केली आहे का?>>
नाही. मागे मो़कळे आकाश आहे. त्या दिवशी आकाश पुर्णपणे आभ्राच्छादित होते त्यामुळे बॅकग्राऊंड पांढरी दिसते आहे.
I went to this place where
I went to this place where huge efforts was put by Dr. Salim Ali.
If you are first time user of DSLR then you can take a boat ride take the photos you have taken ( photos are offcourse good which you have taken by the way )
Local people have killed lot of birds here unfortunately. so its difficult to see.
May be these birds you can see in specific season, but otherwise there are only few.
If you are coming with your girlfriend or wife this is nice spot to spend some time
अद्भूत फोटो. सगळेच फोटो खूप
अद्भूत फोटो. सगळेच फोटो खूप खूप खूप आवडले.
हायला... हे बघितलचं नव्हत मी
हायला... हे बघितलचं नव्हत मी आधी ... सगळे प्रची मस्त रे .... एक से एक
जबरदस्त आलेत सारेच .......
जबरदस्त आलेत सारेच .......
अप्रतिम!!!....
अप्रतिम!!!....