Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
बालाजी कोठे गेला? ओरिसाला !
बालाजी कोठे गेला?
ओरिसाला !
बालाजी कोठे गेला? ओरिसाला !>>
बालाजी कोठे गेला?
ओरिसाला !>> तामीळनाडू
ओरिसावाला देवाशिष मोहन्ती
ओरिसावाला देवाशिष मोहन्ती होता नाही का?
सचिनवर टीका करण्यार्यांना
सचिनवर टीका करण्यार्यांना चोख प्रत्त्युत्तर.. सर्व सचिन च्या पंख्यांसाठी पर्वणीच !!
http://sachinandcritics.com/
देवाशिष मोहन्ती हाच बालाजी
देवाशिष मोहन्ती हाच बालाजी आहे का?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
असेलहि. इथे कुणाला ओळखू येतात?
पाकिस्तान क्रिकेट मध्ये
पाकिस्तान क्रिकेट मध्ये धांगडधिंगा...
युनुस खान आणि महम्मद युसूफ वर अंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्यास कायम स्वरुपी बंदी
शोएब मलिक आणि राणा नावेद वर एक वर्षाची बंदी..
शाहिर अफ्रिदी, कमरान अकमल आणि उमर अकमल वर महिने प्रोबेशन आणि २०-३०लाख दंड..
हा सगळा ऑस्ट्रेलियामधील मॅचेस मधे केलेल्या खेळाचा परिणाम..
http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/top-stories/PCB-impose...
हा हा!! पाकड्यांच काही सांगता
हा हा!! पाकड्यांच काही सांगता येत नाही.
पण शाहरुख खान त्यांना आय पी
पण शाहरुख खान त्यांना आय पी एल साठी त्याच्या संघात घेऊ शकेल. अगदी सगळ्यांना. मग ते २० का ३० लाख दंड सहज भरू शकतील. तो खरे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डच विकत घेऊ शकेल. मग भारतीय क्रिकेट प्रेमी मंडळींची मज्जा.
पाक क्रिकेट मधे अशा
पाक क्रिकेट मधे अशा अनाउन्समेंट म्हणजे निगोशिएशन ची पहिली स्टेप असते
मग काही दिवसांनी त्यांच्या बोर्डातले अधिकारी आपले पद सोडतात, वर पासून खालपर्यंत अधिकारी बदलतात आणि बाहेर गेलेले खेळाडू परत येतात. मॅच फिक्सिंग चे आरोप जोरात असताना हे झाले आहे, पण हे फिक्सिंग मुळे, अंतर्गत वादविवादांमुळे, ऑस्ट्रेलिया दौर्यातील कामगिरीमुळे की आणखी कशामुळे हे कळणे कठीण आहे. आधी मुळात एवढी फालतू कामगिरी होत असताना (ऑस्ट्रेलियात एकही विजय नाही) यांना मॅच आणखी फिक्स करायला कोण पैसे द्यायला तयार होते कोणास ठाउक?
आणि असे हे लोक एकाहून एक गोत्यात येत असताना आयपील मधे हे नसल्याचे लोकांना दु:ख होत होते हे आश्चर्यच आहे. कदाचित या बंडाळ्या उघड झाल्यानेच बिडिंग झाले नसेल यांच्या नावाचे. त्या उमर अकमल ची गंमतच आहे. दोन मॅच मधे बरेच झेल सोडल्यावर कमरान अकमल ला काढल्याचे कळल्यावर मी ही खेळणार नाही वगैरे वक्तव्ये करून बसला, प्रत्यक्षात खेळला पण विशेष काही केले नाही आणि शेवटी कमरान बरोबर यालाही शिक्षा झालीच.
आपलेच जुने भाऊ बन्द आहेत ते.
आपलेच जुने भाऊ बन्द आहेत ते. शेवटी संस्कृती एकच. आपल्या पद्धती जरा सॉफिस्टीकेटेड आहेत...
युसुफ योहाना निवृत्त होतोय.
युसुफ योहाना निवृत्त होतोय. कर्णधार होंण्यासाठी धर्म बदलून सुद्धा त्याची उपेक्षाच झाली. आता तर त्याच्यावर आजीवन बंदी आली आहे. एक चांगला फलंदाज (कसोटी सरासरी : ५३+, मर्यादित षटकांचे सामने सरासरी : ४२+) पाकिस्तानी क्रिकेटच्या राजकारणाला बळी पडलाय.
http://www.cricinfo.com/pakistan/content/current/story/453675.html
मुरलीधरन रिटायर होतोय. '
मुरलीधरन रिटायर होतोय.
' दुसरा ’ च्या तालावर भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होतोय. गॅले इथं १८ जुलैपासून सुरू होणारा भारत वि. श्रीलंका हा कसोटी सामना मुरलीचा शेवटचा सामना असेल. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं आज मुरलीच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6135687.cms
मुरलीधरनला विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची आशा आहे पण, कामगिरीच्या आधारावर जर संघात स्थान मिळू शकत नाही, असे निवड समिती सदस्यांना वाटत असेल तर त्याआधीच निवृत्ती जाहीर करताना मला आनंद होईल, असेही त्याने सांगितले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=838...
श्रीलंकेच्या मालिकेत झहीर
श्रीलंकेच्या मालिकेत झहीर खेळणार नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
खांद्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या आगामी क्रिकेट कसोटी मालिकेत भारताचा द्रुतगती गोलंदाज झहीर खान खेळू शकणार नसून त्याच्याऐवजी अभिमन्यु मिथुन याला संधी देण्यात आली आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सरचिटणीस एन. श्रीनिवासन यांनी ही माहिती दिली. झहीर खान याने आपण खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे कळविल्यानंतर निवड समितीच्या सदस्यांनी चर्चा करून मिथुनला त्याच्याऐवजी संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=838...
त्याला ८ विकेट्स हव्या आहेत
त्याला ८ विकेट्स हव्या आहेत ८०० होण्यासाठी. जरूर मिळूदेत, पण भारत जिंकून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे झहीरचे ट्विट. Shoulder is
हे झहीरचे ट्विट.
Shoulder is troubling me a little need to sort it out ...hope to be back soon ... Important season ahead ...
लढाईला सुरुवात होण्यापूर्वीच सेनापती घायाळ होऊन शिबिरात. पण त्याला पुढल्या महायुद्धातल्या स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे.
पुन्हा श्रीलंकेबरोबर मालिका
पुन्हा श्रीलंकेबरोबर मालिका !!! गेल्या २ वर्षात भारत श्रीलंकेबरोबर कसोटी व मर्यादित षटकांच्या किमान ६-७ मालिका खेळला असेल. भारत वि. श्रीलंकेचे सामने बघून अगदी कंटाळा आलाय. आता एक्-दीड महिन्यांपूर्वीच भारत्-श्रीलंका-झिम्बाब्वे अशी तिरंगी मालिका झाली. त्या पाठोपाठ झालेल्या आशिया कपमध्ये श्रीलंका होताच. भारताला दुसरा देश सापडत नाही का क्रिकेट खेळायला? दर २-३ महिन्यांनी चालले आपले श्रीलंकेशी खेळायला.
पुढल्या वळणावर ऑस्ट्रेलिया
पुढल्या वळणावर ऑस्ट्रेलिया आहे मास्तुरे
ऑस्ट्रेलियाशी खेळून झाल्यावर
ऑस्ट्रेलियाशी खेळून झाल्यावर परत श्रीलंकेबरोबर भारतात मालिका असेलच. नंतर जानेवारीमध्ये विश्वचषकाचा सराव म्हणून परत भारत्-श्रीलंका एकमेकांबरोबर खेळतीलच.
ऑक्टो. मधे घरी ऑस्ट्रेलिया,
ऑक्टो. मधे घरी ऑस्ट्रेलिया, नंतर न्यू झीलंड (घरीच) आणि मग द आफ्रिकेचा दौरा आहे. बरे झाले सीझन पॅक करून टाकला. नाहीतर तेव्हढ्यात लंकेला बोलावले असते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ऑक्टो. मधे घरी ऑस्ट्रेलिया,
ऑक्टो. मधे घरी ऑस्ट्रेलिया, नंतर न्यू झीलंड (घरीच) आणि मग द आफ्रिकेचा दौरा आहे.
>>
म्हणाजे आधी कांगारू राईड, मग कीवी क्रश आणि नंतर अफ्रिकन सफारी...
रच्याकने, भारत कांगारू
रच्याकने, भारत कांगारू विरुद्ध घरच्या मैदानावर शेवटची १-डे सेरीज केंव्हा जिंकला आहे?
जबरी इंटरेस्टिंग प्रश्न आहे -
जबरी इंटरेस्टिंग प्रश्न आहे - बर्याच वर्षांत नाही. तसे १९९६ च्या तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलिया एकही मॅच न जिंकता परतली होती (त्यातील ती दसर्याची बंगलोर ची मॅच फेमस आहे - श्रीनाथ आणि कुंबळे ने "काढलेली"). शेवटी क्रिकईन्फो बघावे लागले - तब्बल २४ वर्षांपूर्वी भारताने घरची वन डे सिरीज जिंकली होती १९८६-८७ मधे!
एकूण भारताने फक्त एकदाच वन डे सिरीज जिंकली आहे त्यांच्याविरूद्ध! (तिरंगी वगैरे मालिकांमधे बर्याच वेळा हरवले आहे त्यांना. उदा: २००८ साली ऑस्ट्रेलियामधे) बरीच इंटरेस्टिंग माहिती मिळाली हे शोधताना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा श्रीलंकेबरोबर मालिका
पुन्हा श्रीलंकेबरोबर मालिका !!! गेल्या २ वर्षात >>> केकता कपूर पुरस्कृत आहे का मालिका?
त्यातील ती दसर्याची बंगलोर ची मॅच फेमस आहे - श्रीनाथ आणि कुंबळे ने "काढलेली"). >>> अगदी अगदी... तशिच आणखी एक दसर्याची मॅच... झहीर, युवराज आणि कैफच्या एकदिवसय पदार्पणाची![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे महान लोक जुलै- ऑगस्टमधे
हे महान लोक जुलै- ऑगस्टमधे श्रीलंका दौरा का ठेवतात? निम्म्या मॅचेस पावसात धुवून निघतात. त्यात पुन्हा टेस्ट आहेत म्हणजे आण्खी चिडचिड![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
>>> तब्बल २४ वर्षांपूर्वी
>>> तब्बल २४ वर्षांपूर्वी भारताने घरची वन डे सिरीज जिंकली होती १९८६-८७ मधे!
बरोबर. भारताने ती मालिका ३-२ अशी जिंकली होती. रमण लांबा त्या मालिकेत खूप फॉर्मात होता. त्यानंतर आजतगायत भारताने भारतात ऑस्ट्रेलियाला हरविलेले नाही.
मला टेस्ट बघायला फार आवडतात,
मला टेस्ट बघायला फार आवडतात, पण श्रीलंकेविरुद्ध नाय बॉ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चला, काय करणार, दुधाची तहान ताकावर.
>>मला टेस्ट बघायला फार
>>मला टेस्ट बघायला फार आवडतात,![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
तुला काय कामधाम नसत का बे?..... पाच पाच दिवस चालतात त्या
हे २०-२० चालू झाल्यापासुन वन-डे पण बोअर होतात... टेस्ट कोण बघेल राव?
अहो म्हणजे पाच दिवस कधीही
अहो म्हणजे पाच दिवस कधीही टि.व्ही. लावला तरी खेळ चालू असतो म्हणून हो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टेस्ट म्हणजे खरंच टेस्ट असते, खेळाडूचे सगळे गुण पणाला लागतात. संयम, आक्रमण, कल्पकता, जे जे काही असतील ते. आणि सगळ्या उणीवा उघड्या पडतात.
आपल्याला बुवा टेस्टच आवडतात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यातील ती दसर्याची बंगलोर
त्यातील ती दसर्याची बंगलोर ची मॅच फेमस आहे - श्रीनाथ आणि कुंबळे ने "काढलेली"). >>> अगदी अगदी... तशिच आणखी एक दसर्याची मॅच... झहीर, युवराज आणि कैफच्या एकदिवसय पदार्पणाची
>>
पहिली मॅच टायटन कप मधली होती... १९९६ ची
दुसरी २००१ मधे आयसीसी नॉकाअऊटची नैरोबी मधली...
जहीर आणि युवराजचं पदार्पण आधीच्या केनिया विरुद्धच्या सामन्यात झालं होतं...
कैफ चं माझ्यामते नंतर झालं...
पण ते चमकले या सामन्यात... काही क्षणचित्रे-
युवराजनी केलेल्या ८७ वगैरे धावा,
प्रसादनी लास्ट बॉलला मैदानात येऊनही चक्क विकेट न टाकता ब्रेट ली ला लाँग ऑफ वरून मारलेला षटकार,
आणि झाहीर नी अप्रतिम यॉर्कर वर उडवलेला स्टीव्ह वॉ चा त्रिफळा...
या दोन्ही मॅचेस दसर्याला झाल्या होत्या...
तसंच १९९८ च्या ऑसी-झिम्बाब्वे बरोबरच्या घरच्या मालिकेत आपण सर्व लीग मॅचेस जिंकलो होतो पण फायनल हारलो...
अजय जडेजानी गाजवलेली मालिका...
पूर्ण मालिकेत फक्त एकदा बाद... ते ही अंतिम सामन्यात...
(झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या सामन्यात कानिटकर सामनावीर होता... ३५ धावा आणि ३ बळी (यात मरे गुडविन चा घेतलेला कॉट अँड बोल्ड अफाट होता...)
दुसर्या सामन्यात भारताची अवस्था २५/३, तिथून अझर आणि जडेजाची २७५ ची नाबाद भागिदारी...)
क्रिक इन्फो वर कोण वाचत आहे
क्रिक इन्फो वर कोण वाचत आहे का वेस्ट इन्डिज ऑल टाइम ११ बद्दल?
मधल्या फळीतल्या ३ जागांसाठी यातले ३ निवडायचे आहेत.
जॉर्ज हॅडली
एव्हर्टन विक्स
क्लाइड वॉलकॉट
फ्रँक वॉरेल
रोहन कन्हाय
क्लाइव्ह लॉइड
ऑल्विन कालिचरण
लॉरेन्स रो
विव्ह रिचर्ड्स
ब्रायन लारा
शिवनरिन चंडरपॉल
निवडा!...महाकठीण काम!:)
Pages