क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिनने आज सईद अन्वर व झिंबाब्वेचा चार्ल्स कॉन्वेंट्री या दोघांचाही विक्रम मोडला आहे.

१६ ऑगस्ट २००९ रोजी बांगलादेशविरुद्ध झिंबाब्वेच्या चार्ल्स कॉन्वेंट्रीने तर २१ मे १९९७ रोजी भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सईद अन्वरने १९४ धावा केल्या होत्या.

एकदिवसीय सामन्यात सर्वोच्च धावा करणारे पहिले दहा मानकरी असे...

सचिन तेंडुलकर ... (२००)
चार्लस कॉन्वेंट्री ... (१९४)
सईद अन्वर ... (१९४)
विविअन रिचर्ड्स ... (१८९)
सनथ जयसूर्या ... (१८९)
गॅरी कर्स्टन ... (१८८)
सचिन तेंडुलकर ... (१८६)
एम. एस. ढोणी ... (१८३)
सौरव गांगुली ... (१८३)
मॅथ्यू हेडन ... (१८१)

ibollytv.com वर मस्त स्ट्रीमिंग आहे... मला अजूनही विश्वास बसत नाही..

नंबर १ चा बॉलर ला झोडले..
नंबर २ ची टीम च्या चिंधड्या उडवल्या..
१०० रन्स फक्त चौकार मारुन..
शेवटच्या बॉल पर्यंत ५० ओव्हर्स खेळले..
रनर घेतला नाही.. (सैद अन्वर ने रनर घेतला होता.. जवळ्-जवळ पूर्ण इनिंग)
परत तेवढ्याच उत्साहाने सगळ्यांच्या आधी मैदानावर फिल्डिंगला..
अरे साक्षात परमेश्वरालाही हेवा वाटेल..

<जिंकलो रे जिंकलो!!!!>

थांबा. त्यांचे मुख्य फलंदाज, पार्नेल, स्टेन व लांगेव्हेल्ट अजून बाद व्हायचे आहेत. ते निदान ३९० पर्यंत तरी नेतील ४९. ४ षटके होईस्तवर! Proud

सचिनला २०१० हे साल जबरदस्त भाग्याचे ठरले आहे. या वर्षाच्या पहिल्या २ महिन्यातच त्याने लागोपाठ ४ कसोटीत ४ शतके केली. आता मर्यादित षटकांच्या सामन्यातले पहिले द्विशतक आणि जागतिक विक्रम. त्याचा हा फॉर्म अजून किमान १४ महिने म्हणजे पुढील विश्वचषकापर्यंत टिकावा (मार्च - एप्रिल २०११ पर्यंत) हीच त्या आकाशातल्या बापाकडे प्रार्थना !

२००७ मध्ये तो एकूण ७ वेळा ९० ते ९९ या दरम्यान बाद झाला होता (६ वेळा एकदिवसीय सामन्यात व एकदा कसोटीत). ते वर्ष त्याला जरा विचित्रच गेले होते.

सचिनने आता निवृत्त व्हावे. त्याला आता फारशा धावा करता येत नाहीत. असा सल्ला आगाऊपणे ईयान चॅपेलने २-३ वर्षांपूर्वी दिला होता. त्याची त्यानंतर अनेकवेळा "Egg on the face" किंवा "Foot in the mouth" अशी अवस्था सचिनने केली आहे. आज त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

हैद्राबादला न्यु झीलंडविरुद्धच्या सामन्यातही सचिनला स्ट्राईक मिळाली नव्हती. नाहीतर त्याचवेळी त्याचं द्विशतक झालं असतं.

जबरी! मागे २-३ वेळा जवळ जाउन झाले नव्हते. न्यूझीलंड मधे मागच्या वर्षी (माबो पुणे गटग झाले त्याच दिवशी) १६३ वर त्याला क्रॅम्प्स आल्याने थांबावे लागले होते.

रॉबिन, तसे वाटत नाही. धोनी दुसर्‍या बाजूने जमतील तेवढे रन्स काढत होता असे दिसते. पण मी क्रिकइन्फो ची कॉमेंटरी बघून सांगतोय, प्रत्यक्ष मॅच पाहिली नाही. डीव्हीडी साठी आत्ताच नं लावला पाहिजे Happy

धोनीने सचिनला शेवटी स्ट्राईक न देऊन द्विशतक रोखण्याचा प्रयत्न केला असे नाही का वाटत?>>ह्यांना आवरा रे कोणीतरी.

सचिन ४६ व्या ओव्हरमधे दोनदा दोन दोन धावा काढून झाल्यावर पाठ नि मांड्या दाबत होता ते पाहिले नाही का ? It looked to me a deliberate attempt by Dhoni to give some breather to Sachin. दोनशे झाल्यावर second last ball ला सचिनने single refuse केली नि धोनीला strike ठेवून दिला तो लक्षात नाहि आला का ? खरच प्रत्येक बाबतीमधे असे read between the lines करायची गरज आहे का ? एव्हढा मस्त दिवस आहे, enjoy करा कि.

असाम्या.. अनुमोदन.. Happy

आपण सिरीज जिंकून दुसरा नंबर राखला.. त्याबद्दल पूर्ण संघाचेपण अभिनंदन.. Happy

बाकी ओवर्स चं मला माहित नाही आणी मी मॅच प्रत्यक्ष पण बघितली नाही.. पण..

48.6 Steyn to Dhoni, 1 run, 91.6 mph, Dhoni keeps the strike for the last over, his partner's on 199, drilled down the ground to long-off for a single

या बॉलनंतर खरच मनात शंकेची पाल चुकचुकली होती की धोनी मुद्दाम असे करतोय की काय. शेवटच्या सहा चेंडुत काहीही होऊ शकतं. कदाचित परत त्याला स्ट्राईक मिळाला ही नसता.

>>सचिन ४६ व्या ओव्हरमधे दोनदा दोन दोन धावा काढून झाल्यावर पाठ नि मांड्या दाबत होता ते पाहिले नाही का ? It looked to me a deliberate attempt by Dhoni to give some breather to Sachin. दोनशे झाल्यावर second last ball ला सचिनने single refuse केली नि धोनीला strike ठेवून दिला तो लक्षात नाहि आला का ? खरच प्रत्येक बाबतीमधे असे read between the lines करायची गरज आहे का ? एव्हढा मस्त दिवस आहे, enjoy करा कि.

अगदी अगदी....धोनी असे कधीच नाही करणार!!

enjoy enjoy !!!

>>धोनीने सचिनला शेवटी स्ट्राईक न देऊन द्विशतक रोखण्याचा प्रयत्न केला असे नाही का वाटत?
हे आले आगलावे ! Proud
असाम्या अनुमोदन. सचिनला ब्रीदर मिळाला पाहिजे हेच धोनीच्या मनात होते.

आणि लोकहो त्याला 'सर' कशाला म्हणता? आपल्याला त्या ब्रिटिश उपाधीची गरज नाही >>> अगदी अगदी. सकाळी अँक्याने लिहील्यावरच वाटले होते की हे लिहावे, पण मॅच बघायची होती म्हणून .. ...

अमोल तुला मी सकाळी फोन करणार होतो पण सकाळचे चार बिर वाजले असते म्हणून सोडला.:)

>>अमोल तुला मी सकाळी फोन करणार होतो पण सकाळचे चार बिर वाजले असते म्हणून सोडला
मी दोन वाजता सुरूवात बघून झोपायला गेलो, तेव्हाच वाटले होते की साहेब १००+ करणारच. सकाळी उठल्यावर २०० चा आकडा पाहून अगदी भरून आले !

नंद्या नंबर देऊन ठेव. पुढच्यावेळी तुला उठवतो. Happy
शॉट सिलेक्शन कसले भारी होते, आणि अगदी सहज, जणू काही गल्ली क्रिकेट चालू आहे. दिनेश कार्तिक बद्दल वाईट वाटले. १०० व्हायला हवे होते, सच्या त्याचासोबत पण कसला सहज होता, जणू काही द्रविड् किंवा गांगूली बरोबर पार्टनरशिप करतोय. सगळचं कसं जबरी!!

48.6 Steyn to Dhoni, 1 run, 91.6 mph, Dhoni keeps the strike for the last over, his partner's on 199, drilled down the ground to long-off for a single>>समजा नसती घेतली हि धाव नि एका धावेने हरलो असतो तरी उद्या इथे शंख झाला असता कि "टिमपेक्षा रेकॉर्ड मह्त्वाचे वाटते ह्यांना. माज आलाय पैशाचा" इत्यादी इत्यादी. थोडेसे archives browse केले तर तुला तशा अर्थाची पोस्टसुद्धा सापडेल. Happy पाहिली असतीस तर कळले असते कि अगदी शेवट्च्या ball वर सिक्स मारून दोनशे करायची गरज पडली असती तर ते सुद्धा जमवले असते महाराज्यांनी आज, एव्हढा control होता आज. Happy

थोडेसे तारतम्य वापरायला मरण नसावे माझ्यामते !!!

याची देही याची डोळा टिव्हीवर पाहिल कालच द्वीशतक. Happy

२०० झाल्यावर पुर्ण शक्तीने शिट्ट्या वाजवल्या आणि वरात डान्स केला मी आणि माझ्या पोराने. Happy

ग्रेट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

काल ४६व्या ओव्हरपासून शेवटपर्यंत एका मित्राला फोनवरून स्कोअर सांगत होतो...
२०० होईपर्यंत फोन ठेवायचा नाही असं ठरवलं होतं...

२० मिनिटाचा कॉल...

फायनलला सच्याला रेस्ट ..

सच्या अन सेहवाग फायनल वनडेत नाहीत. त्या ऐवजी तो मुरली विजय हा बॅट्समन अन अभिमन्यू हा बॉलर टिम मध्ये येईल.

सच्याला बसवून काय फायदा? तो जबरी फॉर्म मध्ये आहे. सेहवागचे ठिक होते कारण तो इन्जूर्ड आहे. टू मच !!

सच्या, सेहवाग, गंभीर, युवी, भज्जी, झहीर अन प्रविण कुमार ही आख्खी मेन टिम शेवटच्या वन डे त नसणार.

http://www.cricinfo.com/indvrsa2010/content/story/449962.html

अरे मला उलट वाटले होते बसवावे, कारण आता २-३ महिने वन डे नाहीत (टेस्ट्स ही), त्यामुळे आता विश्रांती घेतली तरी चालेल. आता आयपी एल आणि मग वर्ल्ड ट्वेन्टी-२० आहेत.

आता ही मॅच डेड रबरच आहे ना? फक्त मला वाटले होते की सचिन, अहमदाबाद चे फॅन्स आणि स्पॉन्सरर्स यांना ते अजिबात मान्य नसेल (त्याला बसवणे) Happy

मॅच डेड रबर आहेच पण तरिही इंटरनॅशनल आहे, सद्याचा फॉर्म बघता, अजून एक १०० टाकू शकतो तो. पुढचे २-३ महिने काहीच नाही, त्यामुळे ह्या सिझनचा शेवटचे १०० बघायला मजा आली असती. तो १०० शतकांच्या च्या इतका जवळ आहे की त्याने ते करावेत असे वाटते. जर तो फॉर्म मध्ये नसला असता तर काही प्रश्चच नव्हता, पण फॉर्म मध्ये असताना बसवने, पचवायला अवघड जात आहे. Happy

अमोल.. श्रिसन्थ कुठलाही असला तरी त्याची बोलिंग बघुनच मी तस म्हणालो होतो.. आज(पण) बघीतला का कसा चोप दिला त्याला... हा म्हणे आपला फ्रंट लाइन बोलर! भारतातल्या पाटा विकेट्सवर बाकीच्यांची पण तिच गत होते म्हणा..

केदार.. म्हणुनच मी म्हणतो की पाच स्पेशिलिस्ट......(?.. आपल्या फास्ट बोलर्सना स्पेशलिस्ट म्हणुन म्हणताना हसु येते.. झहीरचा व प्रविण कुमारचा अपवाद सोडुन.. माझ्या मते प्रविण कुमार डोके वापरुन बोलिंग करतो).......बोलर्सना भारतातल्या वर्ल्ड कपमधे घेउन काही फायदा नाही.. अभिषेक नायर आणि श्रिसंथ्-नेहरा यांच्या बोलिंग इकॉनॉमीमधे फारसा फरक असणार नाही याची मला खात्री आहे. उलट अभिषेक बर्‍यापैकी फटकेबाजी करु शकतो. आजच्या मॅचमधे श्रिसंथ-त्यागी व अभिमन्यु मिथुन ऐवजी रैनाला बोलिंग देउन बघायला पाहीजे होती.. त्यागी-मिथुन्-श्रिसंथ यां तिघांनी मिळुन त्यांच्या शेवटच्या पाच षटकात ७५ धावा दिल्या! हे आपले फ्रंट लाइन बोलर्स!मिथुनला कळले असेल की रणजी ट्रॉफी व साउथ आफ्रिका... यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्याला एक वेळ मी माफ करीन.. त्याचा पहीलाच सामना होता पण.. श्रिसंथ? त्याला का घेतात संघात हे मला न उलगडलेले एक कोडे आहे.मला वाटत अजित आगरकरला परत एकदा संधी देउन बघीतली पाहीजे त्याच्या व नेहराऐवजी.

आपल्या दुय्यम बोलर्सची तर पार दैनाच उडवली साउथ आफ्रिकन बॅट्समननी आज.. आता आपले दुय्यम फलंदाज काय करतात ते बघु..

मला वाटत अजित आगरकरला परत एकदा संधी देउन बघीतली पाहीजे त्याच्या व नेहराऐवजी.>>>
त्यापेक्षा कपिलदेवलाच का घेत नाहीत? नवीन पिढीतील टॅलेन्टला शोधण्याच्या ऐवजी आता का बालाजी आणि आगरकर शोधायचे? एवढा देश वांझ झालाय का?

आगरकर ९८ साली आलाय, अजून २-३ वर्षे क्रिकेट खेळू शकतो (आयपी एल मधे आहे). किती चांगली बोलिंग करेल माहीत नाही. फिल्डिंग मात्र इतर बोलर्स पेक्षा खूप चांगली आहे, बॅटिंग सुद्धा. जोपर्यंत झहीर, इरफान, बालाजी जोरात होते तोपर्यंत विचार करायची गरज नव्हती, पण आता दयनीय अवस्था आहे.

बालाजी कोठे गेला?

Pages