डांग डिंग डिंगा

Submitted by एम.कर्णिक on 17 February, 2010 - 01:32

डांग डिंग डिंगा, पाणीभरला फुगा
बंटीनं केलं टुश्श, फुगा झाला फुश्श

बंटीचा आंगा ओला, म बम् बम् बोला
म बम् बम् बोला, की बम् बम् बोला ऽऽ

डांग डिंग डिंगा, बंटी आता नंगा
भुडभुडगंगा घाला नाय्तर चालू करील दंगा

मालिशवाल्या आंटीला कामं पाय्जेत प्लेंटी
म्हणुन तिला कारंज्याने भिजवी* रोज बंटी

अग अग आई, टेबल** मांड बाई
बंटीला लागली भूक त्याला लौकर दुदु देई

बंटीचे बाबा, ओ लौकर लौकर चला
नाईटड्रेस, डाय्पर नि सॉक्स त्याला घाला

आजोबा या, नि बंटीला घ्या
हातावर खांद्यावर झोपवायला न्या

बंटीबाळ आता झोपायच हं लौकर
नाय्तर दुखेल म आजोबांची कंबर

नको नको बंटी आता लावू नको भोंगा
डांग डिंग डिंगा कि डांग डिग डिंगा ऽऽ

* मालिश करणारी बाई बंटीने सुसु करून भिजवले की खूष होते. म्हणते 'Today I shall get more job orders'.
** आईच्या मांडीवर ठेवायची नर्सिंग पिलो हे बंटीचं टेबल

गुलमोहर: 

बंटीचे बाबा, ओ लौकर लौकर चला
नाईटड्रेस, डाय्पर नि सॉक्स त्याला घाला >>> बाबांना सगळ्या असलीच कामे मिळतात का ? Proud

मुकुंददा, मस्तच आहे.....हे गाणं म्हणनार्या बनुताई डोळ्यासमोर उभ्या राहील्या ! Happy

नको नको बंटी आता लावू नको भोंगा
डांग डिंग डिंगा कि डांग डिग डिंगा ऽऽ
.
एकदम मस्त....... मोगॅम्बो खुश हुवा. Happy

छान बालकविता. शब्दांची सुंदर जुगलबंदी. छोटंसं बाळ समोर उभं राहिलं!
मी विचारणारच होते बाळ मोठं झालं की काय, हल्ली कविता नाही दिसत म्हणून!