Submitted by एम.कर्णिक on 17 February, 2010 - 01:32
डांग डिंग डिंगा, पाणीभरला फुगा
बंटीनं केलं टुश्श, फुगा झाला फुश्श
बंटीचा आंगा ओला, म बम् बम् बोला
म बम् बम् बोला, की बम् बम् बोला ऽऽ
डांग डिंग डिंगा, बंटी आता नंगा
भुडभुडगंगा घाला नाय्तर चालू करील दंगा
मालिशवाल्या आंटीला कामं पाय्जेत प्लेंटी
म्हणुन तिला कारंज्याने भिजवी* रोज बंटी
अग अग आई, टेबल** मांड बाई
बंटीला लागली भूक त्याला लौकर दुदु देई
बंटीचे बाबा, ओ लौकर लौकर चला
नाईटड्रेस, डाय्पर नि सॉक्स त्याला घाला
आजोबा या, नि बंटीला घ्या
हातावर खांद्यावर झोपवायला न्या
बंटीबाळ आता झोपायच हं लौकर
नाय्तर दुखेल म आजोबांची कंबर
नको नको बंटी आता लावू नको भोंगा
डांग डिंग डिंगा कि डांग डिग डिंगा ऽऽ
* मालिश करणारी बाई बंटीने सुसु करून भिजवले की खूष होते. म्हणते 'Today I shall get more job orders'.
** आईच्या मांडीवर ठेवायची नर्सिंग पिलो हे बंटीचं टेबल
गुलमोहर:
शेअर करा
बंटीचे बाबा, ओ लौकर लौकर
बंटीचे बाबा, ओ लौकर लौकर चला
नाईटड्रेस, डाय्पर नि सॉक्स त्याला घाला >>> बाबांना सगळ्या असलीच कामे मिळतात का ?
मुकुंददा, मस्तच आहे.....हे गाणं म्हणनार्या बनुताई डोळ्यासमोर उभ्या राहील्या !
वा... मस्तच
वा... मस्तच
छान! इतर कवितांप्रमाणेच ही
छान! इतर कवितांप्रमाणेच ही कविताही मस्त!
वा! बंटी आणि बनुताईची खुप
वा! बंटी आणि बनुताईची खुप दिवसांपासुन वाट पहात होते!
नेहमीप्रमाणे मस्त
नेहमीप्रमाणे मस्त
नेहमीप्रमाणेच छान
नेहमीप्रमाणेच छान
नको नको बंटी आता लावू नको
नको नको बंटी आता लावू नको भोंगा
डांग डिंग डिंगा कि डांग डिग डिंगा ऽऽ
.
एकदम मस्त....... मोगॅम्बो खुश हुवा.
मस्त
मस्त
छान बालकविता. शब्दांची सुंदर
छान बालकविता. शब्दांची सुंदर जुगलबंदी. छोटंसं बाळ समोर उभं राहिलं!
मी विचारणारच होते बाळ मोठं झालं की काय, हल्ली कविता नाही दिसत म्हणून!
खरेच मस्त.. बनुताईला मिस
खरेच मस्त.. बनुताईला मिस केले बरेच दिवस.. म्हटले दुबईला जाऊन आम्हाला विसरल्या काय???
मस्तच
मस्तच
मजेदार आहे. कारंजे
मजेदार आहे. कारंजे