Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21
गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अ आ इ ई, मास्टरजीकि आई
अ आ इ ई, मास्टरजीकि आई चिठ्ठी
चिठ्ठी मे से निकला मच्छर
असे शब्द होते त्या किताबमधल्या गाण्याचे.
आर्डी चे धन्नो कि आखोंमे प्यार का सुरमा, हे पण त्यातलेच.
मधुबालाच्या महल मधले, घबराके जो हम सबसे, हे गाणे गाणार्या राजकुमारी कडून पण त्याने एक गाणे या सिनेमात गाऊन घेतले होते, (तिचे ते शेवटचे गाणे ठरले )
पण ते रोज अकेली आये, किताब मधले नाही बहुतेक.
खट्टामिठा खट्टामिठा चे शिर्षक गीत पण छान होते.
(ये जीना है अंगूर का दाना
खट्टामिठा खट्टामिठा
खट्टामिठा खट्टामिठा )
इन फॅक्ट राकेश रोशन आणि
इन फॅक्ट राकेश रोशन आणि त्याची हिरॉईन>> तिचे नाव बिंदीया गोस्वामी.
दिवाना मस्ताना हुवा दिल पडद्यावर बघताना तितके छान वाटत नाही. आशाचे 'पॅमॅग' असं वेडावून दाखवणे सादर करायला मधुबालाच लागते, सुचित्रा सेनला ते तितकेसे छान जमलेले नाही. पण ती त्या सिनेमात अफलातून दिसली आहे. 'देखनेमे भोला है' मात्र एक अप्रतीम गाणं आहे - आशाचा आवाज आणि सु.से.ची अदाकारी.
वहिदाने आशाची सगळीच गाणी फुकट घालवली आहेत - भवरा बडा नादान है, पान खाये ही त्यातली ठळक उदाहरणे. पण 'एक फूल चार काटे' मध्ये 'बनवारी रे जिने का सहारा तेरा नाम रे' ह्या लताच्या गाण्यात ती सुंदर दिसली आहे. चेहर्यावर शून्य भाव आणि पांढरी साडी - मिराबाईच जणू.
<<कधी कधी दूध कसे सरफेस खाली
<<कधी कधी दूध कसे सरफेस खाली उकळत राहते तसे ह्यासिनेमातील विनोदाचे आहे.>> या वाक्यासाठी मामी, हैद्राबादला येणार तेंव्हा तुमास्नी नक्की भेटणार, बोलवा अगर न बोलवा.
आशाचे 'पॅमॅग' असं वेडावून
आशाचे 'पॅमॅग' असं वेडावून दाखवणे सादर करायला मधुबालाच लागते, सुचित्रा सेनला ते तितकेसे छान जमलेले नाही>> इथे मधुबाला आणि देव आनंद खरंच हवे होते. अच्छाजी मै हारी चलो मान जाओ ना.. मधे मधुबाला जे काही करते ते अप्रतिम!! तिचे चिडल्यासारखे एक्स्प्रेशन असताना मधेच ती खुदकन हसते.. तेव्हा खरोखर स्वर्गीय सुंदरी वाटते.
माधवने व लिहिले आहे, कि आशाची
माधवने व लिहिले आहे, कि आशाची गाणी वहिदाने फूकट घालवली. आठवायला लागलो तर किती कमी गाणी आशाने गायली, तिच्यासाठी.
कदाचित वहिदाच, लतासाठी आग्रही होती का ? (अगदी रंग दे बसंती मधल्या चार ओळी गायला पण लताच होती) संगीतकारही आशावर अन्यायच करायचे (तिला कायम दुय्यम अभिनेत्रींची गाणी द्यायचे. )
गाईड मधे आशाचा आवाज नाही (हा सल तिने कायम ठेवला ) प्रेमपुजारीत असलेच तर तिचे गाणे, जाहिदासाठी असेल. रंगिला रे, लताने छान गायलेय. वहिदाचा झिंगल्याचा अभिनयही खास, पण त्यातला विद्ध भाव, आशा उत्तम प्रकारे सादर करु शकली असती. प्रेमपुजारीतच, वहिदाचा एक भांगडा आहे,
दूंगी तेणू, रेशमी रुमाल, हो बाके जरा देरे आना, वहिदा नाचलीय पण छान, पण आवाज लताचाच आहे.
रेश्मा और शेरा, मधे आशाला गाणे नाही. मुझे जीने दो मधल्या गाण्यांचा उल्लेख मी इथेच केला होता.
वहिदा धर्मेंद्र (आणि जया भादुरी ) यांच्या फागूनमधे पण वहिदाचे गाणे (पिया संग खेलो होरी) लताचेच आहे.
तिसरी कसम मधल्या, पान खायो सैंया हमारो, याबाबत मात्र, माझे मत वेगळे आहे. यात वहिदाचा रोल कंपनीवाली बाई (नौटंकी) चा असला तरी, ती तितकी उठवळ नसते. त्यामूळे त्या नाचात संयम दाखवणे गरजेचे होते ( असेच मत प्रसिद्ध मोहिनीअट्ट्म नर्तिका कनक रेळे, यानी व्यक्त केले होते) यातच आशाचेच, हाय गजब कही तारा टूटा, असे गाणे आहे, पण ते सिनेमातच अर्धवट आहे. तशी यातच स्टेजवर गायलेली लताची पण गाणी आहेत (मारे गये गुलफाम, आणि, रात ढलने लगी, चांद छुपने चला )
दोन्हीचे सादरीकरण साधेच आहे. मारे गये तर अगदीच बाळबोध आहे, पण ती त्या सिनेमाची गरज होती.
(या सिनेमात १६/१७ गाणी आहेत )
आदमी मधे पण वहिदासाठी आशाला गाणे नाही. कलके सपने आजभी आना, आशाही उत्तम गायली असती ( पण नौशाद तर आशाच्या आवाजाला जाहीरपणे उठवळ आणि बाजारू म्हणाला होता )
पत्थर के सनम मधे आशाला वहिदासाठी गाणे नाही. नीलकमल मधे, हे रोम रोम मे बसनेवाले श्याम, असे अप्रतिम भजन आहे. पण आशा ने गायलेले भजन, अभिनेत्रींसाठी सोप्पा पेपर असतो. आशा इकडे, सगळा प्राण ओतून गाते, या बयांना, केवळ पांढरी साडी नेसून, कूष्णाच्या मूर्तीसमोर बसायचे असते. हातात तंबोरा असला, डोळ्यात ग्लिसरीन असले कि आणखी काय्येक करायला नको. (अगदी ज्यूली मधल्या, साचा नाम तेरा , पर्यंत हेच चालले होते )
तर सांगायचा मुद्दा, आशाने वहिदासाठी फार गाणी गायलीच नाहीत. पण कुणाला आणखी आठवत असेल, तर लिहा रे.
मधुबालाचं हे गाणं किती छान
मधुबालाचं हे गाणं किती छान चित्रीत केलंय.
उनसे प्यार हो गया... चित्रपट: बादल
http://www.youtube.com/watch?v=VQ8CcUH266U
आणि हे पणः जानू जानू रे (इन्सान जाग उठा मधलं)
http://www.youtube.com/watch?v=207pM0Gk1Ro&feature=related
डाव्या विचारसरणीचा पुरस्कार
डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे जे काहि चित्रपट आले होते (नया दौर, लीडर, पैगाम, बहारोंके सपने ) त्यापैकी ईन्सान जाग उठा, हा एक. यात एका धरणाच्या बांधकामाची पार्श्वभूमी होती. मधुबाला आणि मिनू मुमताज (मेहमूदची बहिण ) या दोघी तिथल्या कामगार. मधुबाला सुनिल दत्त च्या प्रेमात तर मिनू, मुकरीच्या. आशा आणि गीता चे गायनही मस्त. याच सिनेमात, ये चंदा रुसका, ना ये जापान का असे गाणे आहे (रफीचे) यात मधुबालाला तो एक क्रेनमधे बसवतो. (असे एकमेव गाणे असावे, हिंदी सिनेमात ) तिचे अधून मधून, मुझे नीचे उतारो, असे ओरडणे (पण शब्द नाहीत ) पण आहे.
याच नावाचा, श्रीदेवी आणि मिथून चक्रवर्ती चा सिनेमा आला होता. त्यात म्हणे श्रीदेवी चे अप्रतिम नृत्य होते, पण मी नाही पाहिला तो.
राजेश खन्नाच्या, बाई मी पतंग उडवीत होते, टाईप नाचाचा वैताग यायचा. पण तरीही त्याचे आणि मुमताज चे, जय जय शिवशंकर, काटा लागे ना कंकर, हे गाणे मला खुप आवडते. तो ढेरपोट्या, भांग घोटणारा माणूस, किशोर आणि लता (लताच ना ? ) चे गायन पण जमून आले आहे. किशोरने गायनात आणि त्या दोघानी नाचात, मस्त धुडगूस घातला आहे.
हो लताच. किशोर चा धुडगूस जबरी
हो लताच. किशोर चा धुडगूस जबरी आहे. त्या ढेरपोट्याचे शब्द ही किशोर नेच म्हंटलेत बहुधा.
बाई मी पतंग उडवीत होते, टाईप नाचाचा>>>
मिथुन चा तो 'जाग उठा इन्सान'. त्यात दोन गाणी खूप मस्त होती 'आयी परबतोंपे झूमती घटा/मै नाचू तू बन्सी बजा" आणि बहुधा 'गोरी तेरे पैरो की पायलिया पर मेरा नाम लिख दे', बहुधा दोन्ही किशोर-आशा ची होती.
मुळ इन्सान जाग उठा मधले जानु
मुळ इन्सान जाग उठा मधले जानु जानु रे गाणे अतिशय सुंदर आहे. दोन मैत्रिणींनी अगदी मज्जा केलीय गाण्यात.
मिथुन्-श्रीदेवी-राकेश रोशनचा 'जाग उठा इन्सान' अतिशय सुंदर चित्रपट आहे. मुळ दाक्षिणात्य चित्रपटाची हिंदी आवृत्ती आहे. त्यात राकेश रोशनच्या वडीलांच्या भुमिकेत तेलुगू शंकराभरणम मधला गायक आहे. सगळ्यांचे काम अतिशय सुंदर आहे. हरिजन मिथुन आणि ब्राम्हण श्रीदेवीचे प्रेम, मग तिचे ब्राम्हण राकेशशी लग्न. पण हे लग्न सफल होत नाही. या चित्रपटात ब्राम्हण्य म्हणजे काय आणि कोणाला ब्राम्हण म्हणायचे यावरही अतिशय सुंदर चर्चा आहे. नेहमीसारखा बटबटीत नाहीये हा चित्रपट. शेवटही अतिशय करूण तरीही पटणारा. नेहमीसारखा नवरा हेच भारतीय स्त्रीचे नशीब आणि सगळे विसरुन त्याच्याकडेच जायला पाहिजे हा संदेश नाहीये.
यात श्रीदेवीचे नृत्य अर्थात असणारच, पण त्याहीपेक्षा राकेशला जेव्हा जेव्हा तो तिला पत्नी म्हणुन पाहू इच्छितो तेव्हा ती देवीच्या रुपात दिसते तेव्हाचे तिचे रुप अतिशय सुंदर आहे.
राजेश खन्नाच्या, बाई मी पतंग
राजेश खन्नाच्या, बाई मी पतंग उडवीत होते, टाईप नाचाचा वैताग यायचा>>>>
ओ साथिया, रात ढलने लगी, चांद
ओ साथिया, रात ढलने लगी, चांद छुपने लगा काय गाणे आहे! उफक पर खडी है सहर .... काय शब्द. अप्रतिम.
धन्नो की आंखो में व्हय तेच चे. ट्याव ट्यावं ट्यावं असा एक इफेक्ट लै भारी होता गाण्यात.
जय जय शिव शंकर अल्सो ऑल टाइम फेवरिट. त्यात मुम्मु अशी गोरी दिसली आहे ना. खवाच निव्वळ, आणि चेहर्यावर किती ते प्रेमळ भाव. काय ती हिरवाइ. ते मंदिर. ते बाकीचे लोक. ओ मोरे राजा बडे जतनासे सींचूं रे तेरी फुलवारी!!!!!! मला कामात कधी कधी आपण हे का व काय करतो आहोत असा प्रशन पडतो तेव्हा म्हणायची ही माझी फेवरिट लाइन आहे. ( तो तसा नाच करताना? अग बाबौ )
बाई मी पतंग उडवीत होते, टाईप नाचाचा>>>> अगदी अगदी. आणि सर्व निळा ड्रेस कोण घालील माइ का लाल?
दहावीचा भुगोलचा पेपर दुसर्या दिवशी होता व हे गाणी छायागीतला आले होते. मी पुस्तक चक्क बंद करून गाणे बघितले होते. आमच्या बाबांसमोर एवढेच बंड करणे शक्य होते त्या काळात. ते त्या गाण्यासाठी केले!.
क्रेन मधील अजुन एक गाने रफ्ता रफ्ता .... धरम व रेखा. ओफो मैने ऐसा तो नहि कहा था.
जानु जानु रे मस्त. शेवटी पायल चा शॉट आहे ना. बघते.
जुन्या महबूबातील सर्व गाणी मस्त. राजेश व हेमा लै थोराड दिसतात. व ह्यांना लग्न करायला दुसर्यांचा विरोध असतो ते ऐकून घेतात व जीव देतात. क्काही ही. गोरी तेरी पैजनिया, पर्बत के पीछे, चलो री.
आप के शहर मे. पुनर्जन्म सागा. हेमा अगेन मस्त नाचली आहे.
देस परदेस मधील ही गाणी छान आहेत. एक पब मधले गाणे लै भारी. व स्टिरीवो वर काय कुट्ते अगदी.
ये देस परदेस मधे शेवटी पियानो अगदी छान छोटासा पीस आहे. बर्फी च्या तुकड्या सारखा.
यादोंकी बारात मधील मला आप के कमरे में व ते पाचगणी पठारावरील मेरी सोनी. फेवरिट. रोम्यान्स ची कल्पना त्याच्या पुढे जात नाही. हम किसीसे कम नही मधील कॉम्पटिशन वर सेपरेट पोस्ट लिहीन इतका त्याचा शोध घेतला आहे. आर्डी अॅट हिज बेस्ट.
आता बघा ही गाणी नकोत का जवळ कायम!
आपके कमरे मे कोई रहता है>>
आपके कमरे मे कोई रहता है>> एकाच चित्रपटात अनेक एकसोएक गाणी असली की काही झकास गाण्यांवर अन्याय होतो,हे त्यातलच एक. त्यात एका ठिकाणी किशोर,आशाला गायला बोलवतो मग ती घाबरते आणि मग हळूहळू चाल पकडून गाते. हा सगळा पीस संवादासकट किशोर-आशाने जो रंगवलाय की बस्स! आवाजातून अभिनय म्हणतात तो हा आणि हे कॅलिबर ओळखून संवाद हिरो-हिरॉइनला न देता त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड करणारा आरडी सर्वात ग्रेट!
http://www.maayboli.com/node/5189
मामी, एवढ्याश्या आयूष्यात काय
मामी, एवढ्याश्या आयूष्यात काय काय जवळ ठेवायचे हो ? लता आशाने झोळी कधीच फाडली.
मधुबाला ने उरलेली लक्तरे उचलून नेली.
<अँकी, धूम मचाले ची
<अँकी, धूम मचाले ची कोरिओग्राफी शामक दावर ची आहे.>
हो बरोबर
<धूम २, मधल्या धूम मचाले च्या काहि स्टेप्स बघताना असे वाटते कि याने स्वतःचा तोल कसा सावरला असेल ?>
मि शामकची स्टुडंट आहे. आणि आमचे जे इन्ट्रक्टर आहेत ते त्या गाण्यात त्याच्याबरोबर डान्स करायला होते. मि प्रत्यक्षात त्यांचा डान्स पाहिला आहे. पारणे फिटतात डोळ्यांचे. (चित्रपटातील गाण्यात खुप टेक्स असतात, पण नो डाउट र्हितीकही छान डान्सर आहे)
एकाच चित्रपटात अनेक एकसोएक
एकाच चित्रपटात अनेक एकसोएक गाणी असली की काही झकास गाण्यांवर अन्याय होतो,हे त्यातलच एक. त्यात एका ठिकाणी किशोर,आशाला गायला बोलवतो मग ती घाबरते आणि मग हळूहळू चाल पकडून गाते. हा सगळा पीस संवादासकट किशोर-आशाने जो रंगवलाय की बस्स! आवाजातून अभिनय म्हणतात तो हा आणि हे कॅलिबर ओळखून संवाद हिरो-हिरॉइनला न देता त्यांच्याच आवाजात रेकॉर्ड करणारा आरडी सर्वात ग्रेट!>>>>>>> प्रचंड अनुमोदन!
मामी, एवढ्याश्या आयूष्यात काय
मामी, एवढ्याश्या आयूष्यात काय काय जवळ ठेवायचे हो ? लता आशाने झोळी कधीच फाडली.
मधुबाला ने उरलेली लक्तरे उचलून नेली.>> खरे. मग तलत किशोर मुकेश रफी? त्यांचे कर्ज आहे. मी एक भावपूर्ण ललित लिहिले होते पण त्यामागील प्रेम इथे फारसे समजले नाही कुणाला. थांबा लिंक देते.
http://www.maayboli.com/node/13963
एक अप्रतीम गाणे आहे: सीने में
एक अप्रतीम गाणे आहे:
सीने में सुलगते है अरमां आखों में उदासी छायी है.
ये आज तेरी दुनिया से हमें तकदीर कहां ले आयी है.
कुछ आंख में आंसू बाकी है जो मेरे गम के साथी है
अब दिल है न दिल के अरमां है बस मै हूं तेरी तनहायी है.
ना तुझसे गिला कोइ हम को ना कोइ शिकायत दुनिया से
दो चार कदम जब मंजील थी किसमत ने ठोकर खायी है.
कुछ ऐसी आग लगी मन में जीने भी न दे मरने भी न दे.
चुप हूँ तो कलेजा जलता है बोलूं तो तेरी रुसवाइ है.
क्लासिक असल्या मुळे अगदी कमी वाद्यव्रुन्द आहे. तलत च्या आवाजात सुरू होते. अगदी ह्रिदय पिळवटून टाकणारी सुरावट आहे मग लता येते. हळूवारपणाची कमाल आहे. हे तलतच गाउ शकतो. अगदी शहाळ्याच्या आतील खोबरे - मऊ मलइ दार स्वर. मग लता चुप हूं अस म्हणते कि काय सांगू. हे गाणे भावायला बरेच जगले असले पाहिजे. एक दोन सॉलिड लाइफ चेंजिन्ग अनुभव असले पाहिजेत पदरी. अगदी मॅक्स परिणाम हवा असेल तर रात्री गार वार्याला बसावे. पोरे बाळे झोपून गेलेली असावीत. डोळे मिटून गाणे ऐकावे. सिनेमाचे नावच तराना आहे व त्यात हा एक अद्भुत नजराणा आहे. खरेतर इथे लिरिक्स लिहीत नाहीत पण हे फारच खास गाणे आहे म्हणून बरे का.
खरे. मग तलत किशोर मुकेश रफी?
खरे. मग तलत किशोर मुकेश रफी? त्यांचे कर्ज आहे.>> आणि हे कर्ज चुकवायची माझीतरी इच्छा नाही
तलतचा आवाज म्हणजे आजदेखील मला जादू वाटते. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामधे त्याचा आवाज काय ऐकू आला असता...
"जलते है जिसकेलिये.. तेरी आंखोके दिये.." दिवस रात्र हे गाणं सतत ऐकू शकते,, ,,
कुठे मिळेल बरे हे ऐकायला.
कुठे मिळेल बरे हे ऐकायला. शोधावे लागेल आता.
मामी एक असेच जुने गाणे होते (:अरेरे:) माझ्याकडे. तुला माहित आहे का त्या पिक्चरचे नाव? लता आणि मुकेशचे आहे.
बडे अरमानोंसे रखा है बलम तेरी कसम
प्यार कि दुनिया में ये पहला कदम हो हो पहला कदम
जुदा न कर सके हमको जमाने के सितम.....
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=UkAJDDh993M हे जास्त चांगले आहे.
मी त्या हिरोईनला बराच वेळ ओळखूच शकले नाही. शम्मीला नेहमी आईच्या भुमिकेत पाहिलेय, असे नाचताना पहिल्यांदाच
धन्यवाद गं साधना. मला
धन्यवाद गं साधना. मला ऑफिसमध्ये युटुब नाही बघता येत घरी जाउन नक्की पाहिन, ऐकेन.
ऐक.. मस्तच आहे...
ऐक.. मस्तच आहे...
बडे अरमानोंसे रखा है बलम तेरी
बडे अरमानोंसे रखा है बलम तेरी कसम
प्यार कि दुनिया में ये पहला कदम हो हो पहला कदम
जुदा न कर सके हमको जमाने के सितम.....
चित्रपट : मल्हार
धन्यवाद आशुतोष. साधना आत्ता
धन्यवाद आशुतोष.
साधना आत्ता ऐकले गाणे बर्याच वर्षानंतर. माझ्याकडे लताच्या लाइव्ह शोच्या कॅसेटमध्ये हे गाणं होतं. ती कॅसेट माझ्या नवर्याच्या मित्राने घेउन गेलेली आणुनच दिली नाही आणि ते गाण मी कधीच कुठे दुसरीकडे ऐकले नव्हते.लाइव्ह मध्ये ती खुप मस्त म्हणाली होती मुकेशबरोबर.
ती कॅसेट माझ्या नवर्याच्या
ती कॅसेट माझ्या नवर्याच्या मित्राने घेउन गेलेली आणुनच दिली नाही
देणारे तुम्ही वेडे आणि असला खजिना हाती आल्यावर तो परत न करणारा तो शहाणा
मामी कुणाकुणाची नावे घेऊ ?
मामी कुणाकुणाची नावे घेऊ ? लेख वाचला होता आधी !!
यांचे चित्रीकरण मी बघितले नाही, पण तलतचे, माझे अत्यंत आवडते गाणे.
आंखोंमे मस्ती शराबकी, और होठोंपे लाली गुलाबकी
है आयी कहासे झुमके, मेरे आँगनमे पंखुडी गुलाबकी
असे काहितरी शब्द आहेत, खुप छान चाल आहे.
तलतचेच, रुस्तम सोहराब मधे, मौदन दरा, असे काहिसे शब्द असलेले गाणे आहे.
या सिनेमातली सगळीच गाणी मस्त होती.
सुरैया चे, ये कैसी अजब दास्ताँ हो गयी है, रफी आणि मन्ना डे चे, फिर तूम्हारी याद आयी पडद्यावर देखील छान आहेत. आणि सरताज आहे ते लताचे, ए दिलरुबा, नजरे मिला, रहने ना दे, कोई गिला.
(पडद्यावर कुणी अनोळखी नटी आहे ) पण या गाण्याची चाल आणि गायन, थेट काळजात कट्यार, दुसरी उपमाच नाही.
अत्यंत अनवट चाल, पण तिने असे काहि गायलेय. उफ
>बडे अरमानोंसे रखा है बलम
>बडे अरमानोंसे रखा है बलम तेरी कसम
प्यार कि दुनिया में ये पहला कदम हो हो पहला कदम
जुदा न कर सके हमको जमाने के सितम.....
चित्रपट : मल्हार >> माझं ही भयंकर आवडतं गाणं...
अशीच अजून.... ज्याचं चित्रिकरण मी कधीच पाहिलेलं नाही.
पण तरिही प्रचंड आवडणारं लताचं माया सिनेमातलं गाणं -
"ऐ दिल कहाँ तेरी मंझिल ना कोई दीपक है
ना कोई तारा है, दूर है जमीं दूर आसमां...
किसलिये मिल मिल के दिल टूटते है,
किसलिये बन बन महल टूटते है
किसलिये दिल टूटते है....
पत्थर से पुछा, शीशे से पुछा
खामोश है सबकी जुबां.....
लताने अक्षरश: जीव ओतलाय, माया मध्ये माला सिन्हा आहे ना?
तिने भजं केलं नसलं गाण्याचं म्हणजे मिळवली... मी पाहिलंच नाहिये
तेव्हढीच दृष्टी आड सृष्टी...
'आजा नाच ले' मधलं 'इश्क हुवा
'आजा नाच ले' मधलं 'इश्क हुवा ही हुवा' मस्त आहे बघायला पण. शब्द, अर्थ, चाल सगळंच मला आवडलं.
पलभर में ये क्या हो गया, वो
पलभर में ये क्या हो गया, वो मै गयी वो मन गया,
चुनरी कहे सुनरी पवन, सावन लाया अबके सजन,
दिनभर मुझे यूं सताए, उनबीन अब तो रहा नही जाए |
शबाना आझमीवर चित्रित झालेल्या काही नितांत सुंदर गाण्यापैकी माझे आवडते एक. राजेश रोशनचे एक बेहतरीन कंपोझिशन, अमित खन्नाचे हळुवार शब्द त्यात लता मंगेशकरचा गोड आवाज हे सारे कानावर अक्षरशः मोरपिस फिरवल्याचा आभास निर्माण करतात. "दिनभर मुझे यूं सताए, उनबीन अब तो रहा नही जाए" यात "नही" आणि "जाए" यामध्ये लताजीने जो हलकासा pause घेतला आहे तो तर केवळ लाजवाब. शेवटी ज्याप्रकारे गिटार वाजवली आहे ती तर खल्लास!!! (जी Audio Version मध्ये नाहि आहे :()
संपूर्ण गाणे हे बॅकग्राऊंड ला वाजत असल्याने नायिकेला कुठेहि चेहर्यावर कृत्रिम हावभाव करायची गरजच भासली नाही. त्यात शबाना आझमीचा नैसर्गिक अभिनय तर अप्रतिमच. प्रेमात पडलेली नायिका, तीचे ते टिपिकल बंगाली पेहरावात तिचे सगळीकडे वावरणे, आपल्याच धुंदित असणे हे गाण्यात कुठेही खटकत नाहि. तिसर्या कडव्यात "आयी बहारे सिमट के.......कहने लगी वो लिपट के" यात नायिकेचे फुलं गोळा करत अल्लडपणे बागडणे गाण्याला चारचांद लावतात. "चुनरी कहे सुनरी पवन, सावन लाया अबके सजन," या ओळींप्रमाणेच हिरवागार "सावन" बॅकग्राऊंड दाखवला आहे.
खरे तर "स्वामी" चित्रपटातील सगळीच गाणी छान आहेत. येशुदास यांचे "का करू सजनी आये ना बालम", किशोर कुमारचे "यादों में वो..", आशा भोसले व येशुदास यांचे "आज कि रात (भग जाऊंगी......अपने राजा के संग भाग जाऊंगी)" हि ऐकायला मस्तच वाटतात.
हाही चित्रपट मी पाहिला नाहि
http://www.youtube.com/watch?v=MhgOst3B03g
योगेश२४: १००% सहमत.
योगेश२४:
१००% सहमत. "स्वामी"मधली सगळीच गाणी छान आहेत पण "पलभर में" का जवाब नही...
Pages