हे बघ गड्या, गडबड नाय पायजे. कुनी बगितलं म्हंजी आपुन कामतून गेलू समज."
"नाय गडबड नाय हुनार. म्या डोळ्यानी बगितलय. मुसलमानाची बायकूच गेली. आन ती पोटूशी व्हती."
"लई ब्येस. आता त्वांड वाईच गप ठिवायचं. कुणाला कसला शकबी नाय आला पायजे.. काय ? " राम्याच्या या प्रश्नावर म्हाद्याने मान डोलावली. हल्ली रोज ते एकत्र दिसत. गावाबाहेरच्या माळावर तासनतास बसलेले असत. कधीकधी काळे कपडे घातलेल्या बाबांबरोबर दिसत असत. गाव म्हणत होते दोघे अघोर पंथाच्या नादाला लागलेत !!
गाव खरेच म्हणत होते. गुप्तधनाच्या आशेपोटी काळ्या जादूकडे वळालेल्या दोघांना काळ्या जादूच्या जगाची ब-यापैकी माहिती झाली होती. तशातच गर्भवती असताना मेलेल्या स्त्रीच्या हाताचे हाड जवळ असेल तर वाट्टेल ते करता येते हे कानावर पडल्यापासून तर त्यांना याच एका ध्यासाने झपाटलेले होते. काहीही करून असे हाड मिळवायचेच या जिद्दीने दोघेही पेटलेले होते. स्मशानभूमीवर, पंचक्रोशीतल्या मयतींवर त्यांची घारीसारखी नजर होती. काही महिने घालवल्यावर हिंदूंच्या मयतीमागे मेहनत करण्यात काही अर्थ नाही हे त्यांना कळून चुकले होते. अग्निसंस्कारांमुळे काही काही शिल्लक राहत नव्हते.
म्हणून आता मुसलमानांच्या मयतीवर नजर होती आणि आज त्यांना आनंदाची बातमी मिळाली होती !
एक गर्भार बाई मयत झाली होती. वादशहा सय्यद हा गावातला खाटीक. बायको गर्भवती असल्याने सध्या खुशीतच होता. बेगमला कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्याला होऊन गेले होते. पण अचानक बेगमला त्रास सुरू झाला. सुईणीला बोलावणे पाठवले. बाळ पाच महिन्यांचे असल्याने आणि बेगमला होणारा त्रास लक्षात आल्याने तिने लवकरात लवकर डॉक्टरला बोलवा किंवा हिलाच तालुक्याच्या गावाला हलवा असा आग्रह धरला. प्रकरण गंभीर आहे हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले होते. ताबडतोब गाडी जोडून निघेपर्यंत पाऊण तास गेलाच. बैलगाडीतून धक्के बसल्याने बेगमचा जीव वरच्या वर अडकू लागला. बादशहा सारखा सहा फुटाचा गडी पण तोही हवालदिल झालेला. बेगमने आपला अंत ओळखला होता. बाळाचे तोंड बघायची इच्छा आता पूर्ण होत नाही हे तिच्या लक्षात येऊ लागले होते. बादशाहा तिला धीर धरायला सांगत होता. त्याही परिस्थितीत तिला त्याच्याबद्दल कणव वाटली. त्याचे प्रेम पाहून तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली.
" क्या हुआ बेगम ?"
उत्तरादाखल मोत्यांची एक माळ ओघळली.
" बताओ तो बात क्या है ? "
" ए क.. बा त... क ह नी..... थी तु म्हे... वर्ना खुदा...... मुखे कभी मुआफ नही करेगा ..." एकेक अक्षर महत्प्रयासाने उच्चारत ती म्हणाली..
"तुम धीरज रख्खो..कुछ नही होगा.. मै हूं ना "
ती मान हलवीत राहिली. बेगमची मां कासावीस होऊन तिला चूप करीत राहिली. बादशहा काहीच न समजल्यासारखा दोघींकडे पाहत राहिला... त्याच्या कानाशी बेगम काहीतरी खुसरफुसर करीत राहीली..
अचानक बेगमचे डोळे मोठे होत सताड उघडे राहिले आणि तिच्या मां ने हंबरडा फोडला. बेगम गेली होती.....!!
तिच्या दफनविधीची तयारी चालू होती. बादशहा यांत्रिकपणे सगळे विधी पाहत होता. जणू काही तो या फ्रेममध्येच नव्हता. नुकतेच त्याला जे काही कळाले होते त्याने त्याच्या पायाखालची जमीन खचली होती. त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते. तिला पाठीला टेकलेल्या अवस्थेतच पुरण्यात आले आणि सगळ्यांनी तिच्यावर माती टाकायला सुरूवात केली.
कयामत के दिन अल्लाह से मुलाकात करना .... मनातच तो बेगमला म्हणाला.
इकडे म्हाद्या या सगळ्यावर लक्ष ठेवून होता. मुसलमानाची बाई मेली. तिला पुरणार. सगळी पांगापांग झाली कि आपण आपले काम करायचे...
रामाला पण ही आयडिया आवडली होती. अर्थातच ते सगळी काळजी घेत होते. इकडे पोटुशी बाई गेल्याने मुसलमानाच्या घरचे कुणी ना कुणी अधूनमधून काहीबाही निमित्ताने चक्कर टाकून जात असल्याने या दोघांचे काम जरा कठीण होत चालले होते. गावाकडे असल्या बाबतीत लोक खबरदार असतात. अर्थातच खूप थांबायची दोघांचीही तयारी नव्हती.
काही दिवस गेल्यावर मात्र त्यांचा संयम सुटला. आज रात्री काहीही करून बेत तडीस न्यायचाच....!! दोघांचाही निर्धार ठरला होता.
रात्री लपतछपत ते स्मशानात गेले....
"
नुकतीच फुले वाहिलेली कबर शोधून काढायला त्यांना कष्ट पडले नाहीत.
झाडीमध्ये काळोखाने भेसूर रूप धारण केले होते. मिणमिणत्या चांदण्यांनी दोघांच्या कृष्णकॄत्याला झाकोळून टाकलेले होते. दोघांच्या चाहूलीने स्मशानातली कुत्री दचकून जागी झाली होती. त्यांनी दंगा करायला सुरूवात केल्यावर एकाच्या पाठीतच म्हाद्याने फावड्याचा वार केला त्याबरोबर कुत्रे कळवळून ओरडले. त्याची झालेली गत पाहून सर्व कुत्री मागे हटली. दूरवर जाऊन त्यांनी मोठ्याने गळा काढायला सुरूवात केली.
स्मशानाकडून येणा-या त्या अभद्र आवाजाने तिकडे येणा-या मुसलमानांचा बेत बदलला. कुत्र्यांना शिव्या घालत त्यांनी पुन्हा घरचा रस्ता धरला. दोघांनी कबर उकरायला सुरूवात केली. रात्रीच्या त्या वेळी फावड्याचे आवाजही चांगलेच घुमल्यासारखे वाटत होते...
चंद्र आता माथ्यावर आला होता. थंड वारं सुटले होते. कबरीची मऊ माती भराभर वेगळी होत चालली होती.
"हळू...!!!!"
,
,
,
,
,
,
,
अचानक आलेल्या त्या आवाजाने म्हाद्या केव्हढ्यांदातरी दचकला..
रामा त्याला आता हळू काम करायला सांगत होता.....!
खाली हाताला काहीतरी जाणवत होते. चंद्राचे मळभ दूर होत चालले होते. खालचे स्पष्ट दिसायला लागले होते. कदाचित ती चादर असावी. वरची वरची माती दूर केल्यावर चादर दिसत होती.
" हळू.. तिला पाठीला टेकल्याली हाय.. तशीच पुरल्याली हाय.."
म्हाद्या ने चादर हातात पकडली. इकडून रामाने दुसरे टोक पकडले आणि अज्जातच चादर उचलली गेली.
चंद्राचा प्रकाश बरोबर कबरीवर पडला.
आणि त्या प्रकाशात त्यांना जे काही दिसले ....ते पाहून दोघांचीही दातखीळ बसली....! रामाच्या अंगाला थरथर सुटली होती. पायात गोळे आल्याने हालचाल ही करता येईना. डोळे इतके विस्फारले गेले कि आता खोबणीतून बाहेर येतात कि काय असे वाटू लागले होते.. म्हाद्याची अवस्था त्याच्याहून वाईट्ट होती. तोंडातून आवाज देखील फुटत नव्हता.
त्यांना जे काही तिथे दिसले त्याची त्यांनी अपेक्षाच केली नव्हती... !! बेगमचे प्रेत सावकाश मान वळवून त्यांच्याकडे पहात होते................
ह्र्दयक्रिया बंद पडतेय असे वाटत होते. अंगाला दरदरून घाम फुटलेला होता. समोर एक फुटावर अमानवी प्रकार होता आणि जीवनमृत्यूमधले अंतरही..
त्या अवस्थेत कसेबसे धडपडत कबरीतून ते वर आले आणि ........
अवसान गोळा करून दोघांनीही पळायला सुरूवात केली...
कदाचित पाठीमागे अघटित असे काहीतरी घडत होते... आणि तिथून लवकरात लवकर दूर जायला हवे होते.
*********************************************
सगळ्या गावात चर्चा सुरू होती. कबर उकरल्याने कुणी हा प्रकार केला असावा याचीच चर्चा चालू होती आणि प्रत्येकाचा संशय या दोघांवर येत होता. गाव चांगलेच चिडलेले होते. पण जेव्हां दोघेही अचानक तापाने फणफणल्याची बातमी कानावर आली तेव्हां सगळेच बुचकळ्यात पडले.
इकडे रामाचा भाता वर खाली होत होता. त्याचे काही खरे दिसत नव्हते. पोलीस जबाब घ्यायला आले तेव्हां त्याला बरेच काही सांगायचे होते..पण त्याला सांगता येते नव्हते. फौजदार त्याच्या कानाला लागलेला होता. फौजदार उठून बाहेर आला तेव्हां त्याचे काम संपलेले होते. बाहेर गावातली जाणती मंडळी उभी होती.
"काय वं, काय झाल साहेब "
" काही नाही. दोघांनीच हे काम केलंय. पण नंतर तो काहीही बरळत होता. कशाला तरी घाबरलाय तो "
" म्हंजी ? काय झालं म्हणायचं ?"
" नाही... बाईने अंगठे धरलेत म्हणतोय "
ते ऐकल्याबरोबर मुल्लाने आभाळाकडे पाहून हात वर केले. कयामतच्या दिवशी अल्लाह येऊन पापाचा पाढा वाचेपर्यंत अंगठे धरायचे असतात असा एक समज मुस्लिमांमध्ये आहे. बादशहा मुल्लाकडे पाहत राहिला.
" अल्लाह से अपना जुर्म कुबूल किया उसने.... छूट गयी... बेचारी " त्याच्या मनात आले.
बेगमला पाठीला टेकवलेल्या अवस्थेत पुरले होते. त्याला चांगलेच आठवले. कयामतच्या दिवशी अल्लाहला तिने जुर्म कबूल करतांना या दोघांनी कबर खोदली.. !!
रामा आणि म्हाद्या दोघेही तापातच गेल्याची खबर पाठोपाठच आली.
,
,
,
,
तिच्या हाताचे हाड भलतेच महाग पडले होते.
Kiran
मित्रांनो
मुक्तपीठसाठी लिहीलेली ही भयकथा इथे देतांना खूप आनंद होतोय. कथा कशी वाटली हे खरं खरं सांगा...
डिलीटेड
डिलीटेड
नाही जमली!!!
नाही जमली!!!
शिर्षकातच तुम्ही भयकथा लिहिले
शिर्षकातच तुम्ही भयकथा लिहिले कदाचित त्यामुळे वाचताना भयच वाटले नाही.
सहमत आहे दोघांशीही...
सहमत आहे दोघांशीही... शिर्षकात बदल करतोय !!
कायनात च्या दिवशी >>>>
कायनात च्या दिवशी >>>> 'कयामतच्या दिवशी' म्हणायचेय का तुम्हांला?
प्राची बरोबर आहे तुमचे,
प्राची बरोबर आहे तुमचे, कायनात म्हणजे चराचर सृष्टी, कयामत म्हणजे पापाच्या कबुलीचा / अखेरचा दिवस.
किरण कथा फुलवायला पाहिजे, त्यात भीतीदायक प्रंग वाचताना नुस्त वर्णन वाटण्यापेक्षा वाचकाला ती भिती जाणवेल अशा पद्धतीमे मांडा, तसेच शेवटी असा पंच असावा कि जो वाचकाला सुन्न करुन सोडेल.
हे शिर्षकही पटले नाही, हाताच्या हाडाच्या शोधाने सुरु झालेली कथा, पुढे हाताशी हातभर अंतर ठेवूनच वावरतेय. नंतर कुठेही रेफरन्सच नाहिये हाताचा वा हाडाचा.
वाईट वाटून नका घेउ, लिखाण फुलवण्याची गरज आहेच मात्र.
कथानक छान आहे. लिखाण अजुन
कथानक छान आहे. लिखाण अजुन फुलवण्याची गरज आहेच.
हो! कथा फुलवण्या साठी अजुन
हो! कथा फुलवण्या साठी अजुन खुप वाव आहे...पुलेशु
सॉरी, पण मला कथा समजलीच नाही
सॉरी, पण मला कथा समजलीच नाही
अंगठे धरलेत म्हणजे काय? पाठीला टेकवून पुरली म्हणजे काय? आणि त्यामुळे त्यांना हाताचे हाड का काढता आले नाही?- ह्यांचा परस्परसंबंध नाही कळला.
काही खास जमली नाहीये कथा.
काही खास जमली नाहीये कथा. भयकथेचा धक्का वाचकांना कुठेच जाणवत नाहीये.
पाठ जमिनीकडे करून बेगमला पुरलं. त्या दोघांनी कबर उकरली तेव्हा ती अंगठे धरलेल्या स्थितीत होती म्हणजे तिने मृतावस्थेत स्थिती बदलली. त्या दोघांना आपण भूत पाहिल्याची जाणिव होऊन ते हादरले अशी कथा असावी असं मला वाटतंय.
पोटुशी बाइ पूर्ण अंगठे धरू
पोटुशी बाइ पूर्ण अंगठे धरू शकणार नाही बाबू. अनैसर्गिक तर हेच आहे. देव पण तिला अशी शिक्षा नाही देणार. पण आपल्याला एडिट करून लिहीता येतेच की. पुलेशु.
प्रामाणिक अभिप्रायांबद्दल
प्रामाणिक अभिप्रायांबद्दल आहारी आहे. वाह, छान मुळे मला हे कधीच कळाले नसते... पुढच्या वेळी सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन
कायनात हे चुकून झालेय..
चेटूक करतांना गर्भार स्त्रीच्या हाताचे हाड आणले जाते ही गोष्ट खरी आहे. मुस्लिमांमध्ये असा समज आजे कि कयामत च्या दिवशी अल्लाह येऊन पापांचा पाढा वाचतो आणि त्यानंतरच जन्नत किंवा जहन्नुम प्राप्त होते. अल्लाह समोर असतांना पायाचा अंगठा धरून पापाचा पाढा वाचतात अशी त्यांची समजूत आहे. त्यावर आधारीत कथा आहे. त्या दोघांनी कबर उकरली तेव्हां कयामतचा लेखा जोखा चालू असल्याने तिने अंगठे धरलेले या दोघांनी पाहीले.. कथा लिहीताना ही गोष्ट शेवटी स्पष्ट करावी असे वाटले...
असो. इथल्या मार्गदर्शनाबद्दल मनापासून आभारी आहे.. सूचनेप्रमाणे थोडेफार बदल केले आहेत. आता पूर्ण कथा नाही बदलता येणार. पुढच्या वेळी या गोष्टी ध्यानात ठेवीन...
एखादे कथानक वाचल्यानंतर काही
एखादे कथानक वाचल्यानंतर काही काळापर्यंत जर मनात घोळत असेल किंवा डोक्यात ठीय्या मांडून बसले असेल तर ती कथानकाच्या यशस्वितेची पावतीच म्हणायला हवी त्या कसोटीवर ही कथा एकदम चांगली म्हणुनच गणावी लागेल.
शिवाय " अंगठे धरलेले " ही नव्याने माहित झालेली गोष्ट तर आयुष्यभर विसरण्याची शक्यता नाहीच.
पुलेशू.
त्या दोघांनी कबर उकरली
त्या दोघांनी कबर उकरली तेव्हां कयामतचा लेखा जोखा चालू असल्याने तिने अंगठे धरलेले या दोघांनी पाहीले..>>> कयामत म्हणजे जगबुडीचा दिवस. सर्वाच्या पापाचा पाढा तेव्हाच वाचला जातो. म्हणजे त्या दिवशी सर्वच कबरीमधले मुडदे उठून अल्लाह त्याना पाप आणि पुण्याचा हिशोब वाचायला लावतो.
ती बाई बादशहाला काय सांगते हे पण एक रहस्यच राहिलय शेवटपर्यंत
नंदिनीला अनुमोदन. मुक्तपीठ
नंदिनीला अनुमोदन. मुक्तपीठ काय आहे ? इ-सकाळ मधले सदर ?
नंदिनीशी सहमत आहे. ती बाई
नंदिनीशी सहमत आहे.
ती बाई बादशहा ला काय सांगते ज्यामुळे तो म्हणतो कयामत च्या दिवशी अमुक अमुक कर..
भयकथा नाही म्हणता येणार हिला.
तिने पाप काय केले आहे? आणि तिच्या कयामत के दिन लेखा जोखा चाललेला असताना यांनी कबर खोदल्यामुळे ते घाबरले का? आणि तिचे प्रेत त्यांच्याकडे मान वळवून बघत होते .. याची त्यांना भिती वाटली का?
कथा अस्पष्ट वाटते आहे.
प्रेत पुरल्यानंतर सातव्या
प्रेत पुरल्यानंतर सातव्या दिवशी अल्लाह कबरीत येतो असे म्हणतात. त्या वेळी अंगठे धरायचे असतात. या दिवसाला काय म्हणतात असे विचारले असता त्याला कयामत असे म्हणतात असे सांगितले गेल्याने मी तो शब्द वापरला. कयामत म्हणजे जगबुडी असे असेल तर हे चुकलेच ...
बेगमच्या पोटात बाळ होते आणि मरतांनाही तिला कांहीतरी बादशहाच्या कानांत सांगावेसे वाटले.. त्यानंतर बादशहाच्या हालचाली यंत्रवत होत्या यातून मला सूचकपणे सांगायचे होते तिने काय सांगितलेले असावे ते.. ते समजले नसेल तर हा दोषही माझ्याकडे घेतो.
मुक्तपीठ सकाळची कम्युनिटी
मुक्तपीठ सकाळची कम्युनिटी आहे....
प्रयत्न चांगला आहे..पण म्हणाल
प्रयत्न चांगला आहे..पण म्हणाल तशी भिती वाटली नाही वाचताना..आणि बर्याच गोष्टी मला कथा वाचल्यानंतर नाही, तर इथल्या प्रतिसादांवरुनच स्पष्ट झाल्या.
सुमेधाला अनुमोदन!
सुमेधाला अनुमोदन!
मजा आली...!!!
मजा आली...!!!
पुढची कथा पोस्ट करतोय...
पुढची कथा पोस्ट करतोय...
अम्याशी सहमत.. पुलेशु
अम्याशी सहमत.. पुलेशु
काही प्रश्न आहेत, कृपया
काही प्रश्न आहेत, कृपया समजाऊन सांगा.......
१. पाठीला टेकवून म्हणजे??
२. ती बाई बादशहा ला काय सांगते ज्यामुळे तो म्हणतो कयामत च्या दिवशी अमुक अमुक कर..??