क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>बहुधा ही कारणे असावीत.
बरोबर फारेंड [ वरची घनघोर चूक सुधारली आहे Proud ]
आता हा अनुभव असलेली लोकं - मुरली, बद्री यांना काढता उपयोगी नाही.

द्रविड नि लक्ष्मण फिट नसतील असे धरले तर मुरली नि बद्री ह्यांना ठेवून, उरलेला एक कोण हा कळीचा मुद्दा ?
१. विराट कोहली त्याच्या बाकीच्या form वरून येउ शकतो.
२. Totally random मटका - पुजारा, पांडे, राहाणे
३. रैना, युवराज : रैना ला bounce allergy आहे पण दावखुरा असल्यमुळे Harris ला सहज हाताळू शकतो. युवराजचे काही खरे नाही.
४. कार्थिक

रैना बेस्ट फिट आहे टेस्ट टीम मध्ये. त्याला टेस्ट मध्ये संधी द्यायला पाहीजे. युवीला टेस्ट मध्ये नको, तो फारसा काही खेळत नाही.

नात्या - भारताच्या तशाही तीन टिम आहेतच. फक्त पहिले तीन चार खेळाडू सगळीकडे आहेत. वनडे मध्ये रैना, आता कोहली आहे, लक्ष्मण, द्रविड नाहीत. टि ट्वेटींमध्ये सच्या,लक्ष्मण, द्रविड नाहीत वगैरे नाहीत, टेस्ट मध्ये रैना, कोहली अन इतर काही खेळाडु नसतात. पण टोटली वेगळ्या टिम नाहीत म्हणा!

असामी - ऑप्शन नाहीतच. कोहली किंवा रैना सोडले तर इतर लोकं स्टेनसमोर उभे राहतील का नाही शंकाच आहे. [वॄद्धीमान काका १०० बॉल टिकले, हेही नसे थोडके].

कोहली किंवा रैना सोडले तर इतर लोकं स्टेनसमोर उभे राहतील का नाही शंकाच आहे.>>रैना पण नाहि रे. त्यालाही short pitched stuff फारसा झेपत नाही, पण तो gutsy आहे. कार्थिक ह्यासाठी कि मागच्या SAF दौर्‍यामधे खेळला होता तो.

कैफ ही अचानक चांगला खेळतो आहे. रोहित शर्मा ला पुढचे ४-५ दिवस फुटबॉल खेळू देउ नका आणि मग ट्राय करा म्हणावं Happy

रोहित शर्मा ला पुढचे ४-५ दिवस फुटबॉल खेळू देउ नका आणि मग ट्राय करा म्हणावं

वा रे वा! असे कसे? समजा त्याला फुटबॉल जास्त आवडत असेल तर? त्याला का कळत नाही की जखमी झाला तर क्रिकेट खेळू शकणार नाही? पैसे मिळणार नाहीत?
तरी तो फुटबॉल खेळतो. कदाचित् त्याला फुटबॉल जास्त आवडत असेल. फार तर त्याला आधी विचारा, क्रिकेट खेळायचे आहे का फुटबॉल?

नि क्रिकेट खेळताना जखमी झाला तर फुटबॉलवाल्यांनी ओरडायचे का, क्रिकेट खेळू नको म्हणून.

आपण कोण त्याने काय खेळावे नि काय नाही हे ठरवणारे??

क्रिकेट खेळायचे आहे का फुटबॉल? >> हा खेळ सरावासाठी बोर्डानेच ठेवला आहे. कारण त्यामुळे आपापसातील कोऑर्डिनेशन वाढतं. धाव काढन्या सारख्या गोष्टी ह्यामुळे सोप्या होतात. (रनआउट होणे कमी होईल व रन्स वाढतील हा उद्देश).

कल्पना चांगली आहे.

तुमचे खालील वाक्य वाचून माझा गैरसमज झाला, की रोहित मुद्दाम फुटबॉल खेळायला गेला! आता मुद्दाम जखमी झाला, असे तर नाही म्हणायचे ना तुम्हाला!

"तुफान फटकेबाजी करणारे पण प्रत्यक्ष अवघड मॅच च्या दिवशी काहीतरी कारण काढून खेळायचे टाळणारे खेळाडू त्याला कसे आवडत नाहीत वगैरे. आजची रोहित शर्माची बातमी वाचून तो त्या लाईनीत चालला आहे का अशी शंका येते."

अहो हे मी नाही म्हणालो.
अमोलने लिहीले आहे ते. अमोलने लिहीलेले मला निदान रोहीतच्या बाबतीत पटत आहे, त्याने आत्तापर्यंत असे दोन तीनदा केल्याचे स्मरते. म्हणजे जेंव्हा हाय प्रोफाईल मॅचेस असतात तेंव्हा.

इशांत शर्मा ला टीम मधे एक राइट आर्म बोलर हवाय म्हणुन ठेवलाय असेच वाटतेय आता..
आर पी सिंग, इरफान पठाण वैगेरे कुठे आहेत ?
पठाण ला दुलीप ट्रोफीत खेळताना पाहिला होता..

सध्या घरच्या सामन्यात युसुफ पठाण, इर्फान पठाण, पुजारा, रहाणे, दिनेश कार्तिक, पाण्डे सगळेच भारी खेळत आहेत.. आणि सामने पण चुरशीचे होत आहेत.. युसुफ पठाणला खरच एक संधी देउन बघितली पाहिजे.. मटका लागला तर सेहवाग आणि त्याच्या वेगाने प्रचंड धावा होतील.. गोलंदाजीमध्ये मात्र बोंबाबोंब आहे.. अभिमन्यु मिथुन, सुदीप त्यागींना वगैरे घेउन बघायला पाहिजे.. फिरकी गोलंदाज सध्या कोणीच दिसत नाहिये.. चावला/मिश्रा पण फार काही चमकदार कामगिरी करत नाहियेत..

श्रीशांत, रैना आणि कार्तिक ह्यांना परत संधी... साहा, त्यागी आणि आभिमन्यू बाहेर...
शर्माला बाहेर बसवणार बहुतेक ह्या मॅच मध्ये.. भज्जीला खरच बसवा बाहेर.. पण त्याच्या ऐवजी कोण हा प्रश्न असल्याने तो संघात आहे...
आपल्याकडे जे खेळाडू स्थानिक पातळीवर चांगले खेळतात त्यांना कुजवणे हा फार जुनाच प्रकार आहे.. आणि तो चालू रहाणारच...

हरभजनची गेल्या ६ महिन्यातली कामगिरी (?) ( CricInfo च्या सौजन्याने)
Mat Inns Overs Mdns Runs Wkts BBI BBM Ave Econ SR 5 10
Overall 82 150 3827.4 713 10862 347 8/84 15/217 31.30 2.83 66.1 23 5
गेले ६ महिने 5 8 249.1 30 822 17 4/112 6/192 48.35 3.29 87.9 0 0

अजुन किती दिवस याला पुर्वपुण्याई वर खेळवणार ?
आणी प्रश्न केवळ आकडेवारिचा नाही , attitude चा आहे .
आक्रमक म्हणाव तर flight म्हणजे काय हे माहित आहे का असा प्रश्न पडावा अशि बोलिन्ग करतो .
बर defensive म्हणाव तर हल्ली Econ 3.5 च्या वरती असतेच साहेबान्ची . ( परवा तर एक maiden टाकता येत नव्हती याला )

कैफ कुठे आहे सध्या? त्याला का घेत नाहीत?>> का घ्यावे ? इतरांपेक्षा काही वेगळे केले नाहिये त्याने सध्या तरी, थोडासा कमीच पडलाय.

हरभजन Sad

कैफ ने नुकतेच दुलीप ट्रॉफीच्या क्वार्टर आणि सेमी फायनल मधे द्विशतक आणि शतक मारले होते. त्यामुळे त्याचे नाव पुढे आले होते. वास्तविक कैफ सारखे खेळाडू फॉर्मात आहेत का नाही हे ठरवणे अवघड आहे. कारण असे खेळाडू कौशल्यापेक्षा खुन्नस आणि प्रेशर खाली खेळण्याची क्षमता यामुळे जास्त महत्त्वाचे असतात. लॉर्ड्स वरच्या त्या फेमस फायनल नंतर लगेच भारतात एक शतक मारल्यानंतर जवळजवळ १०-१५ डावात कैफ ने काही विशेष केले नव्हते (क्रिकइन्फो वरून), पण २००३ च्या वर्ल्ड कप च्या पाक विरूद्ध च्या सामन्यात २७४ चेस करताना लागोपाठ दोन विकेट गेल्यावर गांगुलीने कैफ ला पुढे पाठवले आणि प्रचंड प्रेशर खाली खेळताना (आणि आफ्रिदी व इतर बरेच स्लेजिंग करत असताना) त्याने सचिन बरोबर शतकी भागीदारी केली.

त्याला नंतर थोडीफार संधी मिळूनही त्याने फारसे काही केले नाही (आंतरराष्ट्रीय सामन्यांत) हे खरे आहे, पण अशा खेळाडूंना कसे हँडल करावे हे माहीत असणारे कप्तान, कोच ही असावे लागतात. गांगुलीची सद्दी कप्तान म्हणून संपल्यावर कैफ ही विशेष चालला नाही.

सुमारे एक वर्ष संघाबाहेर असूनही २००७-०८ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अचानकपणे निवडलेला आणि मग 'सुटलेला' सेहवाग हे कदाचित आणखी एक उदाहरण!

माझ्या मते या दारुण पराभवाने अगदीच निराश व्हायचे कारण नाही ... बॅटिंगमधे द्रविड व लक्ष्मण असले असते तर प्रचंड फरक पडला असता.. सामन्याच्या आउट-कममधे.. मुरली विजय-- ३ टेस्ट, बद्रिनाथ..० टेस्ट व वृध्हिमान सहा..० टेस्ट अशी मधली फळी व तीही डेल स्टाइन समोर! मग जे व्हायचे तेच झाले! म्हणजे आपला दुय्यम संघच हरला असे म्हणायला हरकत नाही.

हे मात्र खर की गोलंदाजीमधे मात्र बोंबच आहे! इशांत जाउन श्रिसंथ आला तर काही फरक पडेल असे मला तरी वाटत नाही.. आतापर्यंतच्या श्रिसंथच्या कामगीरीवरुन मल तरि तो भेदक किंवा हुशार गोलंदाज वाटत नाही .. अभिमन्यु मिथुन व त्यागी अजुन एवढे अनुभवी नाहीत की कालीस्,स्मिथ,अमला व डिव्हिलेरस ला त्रास देउ शकतील व भज्जी ला काढा म्हणताय.. पण त्याच्या ऐवजी कोणाला घेणार? पियुष चावला,रमेश पोवार व प्रग्यान ओझा हे त्याला आल्टरनेटिव्हज!

दिनेश कार्तिकला परत घेतल आहे.. पण त्याचे टेक्निक एकदमच सुमार दर्जाचे आहे.. स्टाइनसमोर तो टिकु शकेल याची मला खात्री वाट्त नाही.. पाटा विकेटवर धवल कुलकर्णि व आविष्कार साळवी सारख्या सुमार गोलंदाजांविरुद्ध दोन्ही डावात शतके मारल्याचे मला तरी कौतुक वाटत नाही.

गंभिर वॉज लाँग ओव्हर्ड्यु फॉर अ फेल्युअर!पण कलकत्याला तो परत फेल होइल असे वाटत नाही. पण सेहवाग व तेंडुलकर या आपल्या फर्स्ट टिमवाल्यांनी दाखवुन दिले की ते कोणासमोरही सहजासहजी नांगी टाकणार नाहीत.. त्यांच्या दिमतिला द्रविड व लक्ष्मण असतील तर अजुनही आपल्या संघाला फलंदाजीत तरी घाबरायचे कारण नाही..पण प्रश्न हा आहे की द्रविड्,तेंडुलकर्,लक्ष्मण रिटायर झाल्यावर आपलीही परिस्थिती ३-४ वर्षापुर्वीच्या ऑस्ट्रॅलियन टिमसारखीच होणार की काय..? लुळीपांगळी!

आणी साउथ आफ्रिकाही २ च टेस्ट पुर्वी इंग्लंडसारख्या फडतुस टिमकडुन हरली होती हे विसरु नका.. तेही त्यांचे सगळे चांगले प्लेयर्स असताना! त्यामुळे आपला दुय्यम संघ हरला ही काही अगदी मोठा बाउ करण्याची गोष्ट नाही ...

म्हणजे फॅब फोर गेल्यावर आपल्याकडे चांगली माणसे नाहीत म्हणायचे? Uhoh

रच्याकने , सध्या तळाचा नम्बर कोणाचा आहे क्रिकेट 'विश्वात' ? बांगल्यांचा का? त्याना म्हणावे जागा जरा साफ करून ठेवा, आम्ही येतोय , तिथे फॅब फोर गेले की. Proud

त्यामुळे आपला दुय्यम संघ हरला ही काही अगदी मोठा बाउ करण्याची गोष्ट नाही ......
रेकॉर्डात , आणि क्रमवारीत दुय्यम संघ, पाटा विकेट्स, जखमी खेळाडू, पंचांचा पक्षपात या बाबीत धरत नसावेत माझ्या मते... Happy

अमोल कैफचे जे आहे तेच रोहितचेही सुरू आहे. एखाद्या मॅचमधे खेळतात नि मग बराच वेळ गॅप असते. तो जे मुद्दे मांडलेस त्यात मी हे अअ‍ॅड करेन कि domestic touranments मधेही जर धावांचा रतिब नसेल तर पुढच्या level ला खेळाल ह्याची खात्री कशावर धरायची ? नवख्या प्लेयरला संधी मिळाली तरी, lack of exposure can go with him. पण कैफ आधीही केह्ळला आहे आणि त्याच्या खेळाचे बारकावे हे बर्‍यापैकी जाहीर आहेत. माझ्या मते त्याला जेंव्हा संधी मिळाली तेंव्हा पुरेशी मिळाली नाही हे एक कारण असले तरी दुर्दैवाने आपल्या संघामधे जागा एव्हढी कमी आहे कि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही तर ती तुमची कमकुवत बाजू ठरते. Unfortunately it is fact of life. Sad

त्यामुळे आपला दुय्यम संघ हरला ही काही अगदी मोठा बाउ करण्याची गोष्ट नाही ......>>मुकुंदला एव्हढेच म्हणायचे असावे आपला हवा तो संघ नसताना एका चांगल्या संघासमोर हरलो असल्यामुळे टोकाच्या reactions ची गरज नाही.

मुकुंद यांच्या पोस्ट ला पूर्ण अनूमोदन. हरभजन त्याच्याहून दुसरा स्पिनर चांगला नाही म्हणुनच टिकलाय एवढे दिवस

मुकुंद चे बरेच मुद्दे पटले, आणि असामीचे ही. कैफ बद्दल वाईट वाटते कारण तो किमान दोन वेळा एकदम महत्त्वाच्या मॅचेस मधे प्रेशर खाली चांगला खेळला होता.

अमोल.. कैफच्या बाबतीत एकच म्हणता येइल.. सातत्याचा अभाव!

कैफ व कसोटी सामने:

कैफ एकुण १३ कसोटी सामने खेळला.. तेही बहुतेक फॅब ४ पैकी कोण एक जखमी झाला असेल तेव्हाच.. म्हणजे त्याला अगदी मोजक्याच संधी मिळाल्या. त्यामुळे वर असामी म्हणाला त्याप्रमाणे त्याला मिळालेल्या मोजक्याच संधीचा त्याने ३२ सरासरी दाखवुन पुरेपुर फायदा उठवला नाही. संघातल्या स्थानाची अनिश्चितता .. म्हणजे डोक्यावरती सारखी टांगती तलवार.. हे त्याच्या ३२ सरासरीचे एक मोट्ठे कारण असु शकेल पण त्याच्याकडे तेंडुलकरसारखी नैसर्गीक देणगी किंवा लक्ष्मणसारखी नजाकत नाही हेही तितकेच खरे आहे.त्याला खेळताना बघीतले तर मोर ऑफन दॅन नॉट तो चाचपडत खेळत आहे असेच वाटते.. एक दोनच.. तु वर नमुद केलेली.. उदाहरणे अशी देता येतील की तो अत्यंत फ्ल्युएंटली खेळला आहे.. तीही एक दिवसिय सामन्यातली उदाहरणे आहेत.. कसोटीतले त्याचे तसे अविस्मरणिय डाव माझ्या तरी लक्षात नाहीत.
कदाचित गंभिरला जितक्या संधी दिल्या गेल्या तितक्या त्याच्या वाट्याला आल्या असत्या तर त्यानेही आपले स्थान संघात भक्कम केले असते. पण गंभिरला संघात स्थान मिळवताना फॅब फोरविरुद्ध काँपिटिशन करायची नव्हती .. त्यामुळेच त्याला तेवढ्या संधी मिळण्याचे भाग्य लाभले हेही तितकेच खरे. अर्थात गंभिरने त्या सगळ्या संधींचे शेवटी चिज करुन दाखवले हे बरेच झाले. त्यावरुन खर म्हणजे आपल्या निवडसमितीने बोध घेतला पाहीजे की एकदा टॅलंट शोधले की त्या टॅलंटला यशस्वी व्हायला भरपुर संधी दिल्या पाहीजेत. गंभिर हा भारतामधे बहुतेक एकमेव अपवाद असावा (कदाचीत थोड्याफार प्रमाणात श्रिसंथ!)पण भारतात बहुतेक वेळा १-२ संधी(किंवा कधी कधी त्यापण काहींच्या वाटेला येत नाहीत.. ताजे उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी.. याला १५ मधे घेतले होते पण एकही कसोटी सामना त्याच्या वाटेला न येता आता त्याचे नावही कुठे घेतले जात नाही!) दिल्या जातात व मग अनसेरिमोनिअस डच्चु! आता या बद्रिनाथाचे काय होते ते बघुयात!

कैफ व एक दिवसिय सामने:

कैफ जवळ जवळ १२५ च्या आसपास एक दिवसिय सामने खेळला. या फॉर्मॅट मधे त्याचा इंपॅक्ट जरा जास्त चांगला होता.. अमोल.. तु वर उल्लेख केलेल्या दोन खेळ्या त्याने चांगल्या खेळल्या हे तर सगळ्यांनाच माहीत आहे पण मला कैफबाबतीत.. एक गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते की एक दिवसिय सामन्यात तो त्याच्या नुसत्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर.. भारतिय संघात जागा मिळवु शकतो! २०-२५ धावा पॉइंट्-कव्हर्-मिड ऑफ क्षेत्रात तो सहज वाचवायचा व वाचवु शकतो! तसेच एक दोन गडी धावबाद करण्यासही तो जबाबदार असायचा.. २००३ वर्ल्ड कप मधल्या इंग्लंड बरोबरच्या सामन्यात.. त्यांचा ओपनर निक नाइट याला कैफने कसा धावबाद केला होता ते आठवते का कोणाला?पण याही फॉर्मॅटमधे युवराजला जेवढा ढिल दिला गेला तेवढा ढिल कैफला दिला गेला नाही हे माझे मत..पण याही फॉर्मॅटमधे त्याला ठराविक एका नंबरवर फलंदाजी करायला लावुन त्याचा रोल डिफाइन केला गेला नाही असे मला वाटते.. कधी ओपनर तर कधी वन डाउन तर कधि ४ डाउन वा ५ डाउन.. त्यामुळे युवराजला जसे गोलंदाजी झोडपून काढायला रान मोकळे करुन दिले होते तसे कैफला कधीच दिले गेले नाही असे मला वाटते. त्यामुळे फटकेबाजी करता येत असुनही मोर ऑफन दॅन नॉट कैफ एक दिवसिय सामन्यात हातचे राखुनच खेळताना दिसला.. एकंदरीत आयडेंटेटी क्रायसिस झालेल्यासारखाच कैफ भारतिय संघातुन खेळला. खर म्हणजे २००० सालातल्या अंडर १९ वर्ल्ड कप विजेत्या भारतिय संघाचा तो कप्तान होता व त्या संघात तो एक तडाखेबंद फटकेबाज फलंदाज म्हणुन प्रसिद्ध होता व तो वर्ल्ड कप जिंकण्यात युवराजइतकाच त्याचाही सिंहाचा वाटा होता. पण आता २-३ वर्षाच्या गॅपनंतर प्रश्न असा आहे की एक दिवसिय सामन्यात कैफला संघात घ्यायचे असेल तर कोणाला काढायचे? गंभिर,सेहवाग्,,तेंडुलकर्,धोनी,रैना व युवराज पिक फॉर देमसेल्व्ह्स! मग सातवा फलंदाज घ्यायचा असेल तर विराट कोहली,कैफ्,युसुफ पठाण व रविंद्र जडेजा यात चुरस असेल पण युसुफ पठाण व जडेजा ऑल रांउंडर असल्यामुळे त्यापैकी एकाला किंवा नुसताच फलंदाज पाहीजे असेल तर विराट कोहलीचे वय व पोटेंशियल बघता त्यालाच स्थान दिले जाइल असे मला वाटते.. म्हणजे कैफच्या वाटेला अजुन संधी येतील की नाही याची मला शंकाच आहे!

एवढे लिहुन मी माझे कैफ पुराण संपवतो!:)

आपली ही 'कैफियत' ऐकून निवड समिति बोध घेईल अशी आशा.
एक प्रश्नः ही कैफियत वाचली खरी. पण कैफ कोण? कधी ऐकले नाही नाव त्याचे.

धन्यवाद मुकुंद! कैफ चे कसोटीतील सर्वात मोठे अपयश २००४ च्या ऑस्ट्रेलिया विरूद्ध घरच्या दौर्‍यातील पराभवात असेल. जेव्हा बाकी सगळे लोक फॉर्म साठी चाचपडत होते, तेव्हा हा ही अपयशी ठरला.

क्षेत्ररक्षणाबद्दल सहमत. २००४ च्या पाक दौर्‍यात पहिल्या वन डे मधे मॅच 'बॅलन्स' मधे असताना आणि पळत येउन आणि बदानी ला धडकून सुद्धा त्याने पकडलेला अत्यंत अवघड कॅच कायम आठवतो. लिन्क मिळाली तर देतो येथे.

झक्की - २००२ नेटवेस्ट फायनल वर सर्च करा Happy

जॉन राईट ने इडन गार्डन्स ला लक्ष्मण ला नं. ३ ला खेळवायला सांगितलेले अचूक आहे असे वाटते. त्या क्रिकइन्फो च्या महान लेखकाने ४ वर्षांपूर्वी च्या एका शतकाबद्दल लिहीले आहे (३ नं ला येउन केलेले) पण २ वर्षांपूर्वी सिडने मधे मारलेल्या एका बहारदार शतकाबद्दल विसरलेला दिसतोय Happy पहिली टेस्ट हरल्यावर या दुसर्‍या टेस्ट मधे ऑसीज नी ४६३ केल्यावर आपले ८/१ असताना कुंबळेने लक्ष्मण ला नं ३ ला पाठवला आणि त्याने १४२ बॉल्स मधे मारलेले १०९ जबरदस्त होते.

त्या डावाबद्दल पीटर इंग्लिश ने तेव्हा लिहीलेले वर्णन बघा:
“Waving boundaries off both feet through cover, he transfixed the SCG crowd during the second session that revived India and the series. Mitchell Johnson was taken for 18 from five balls as Laxman split a crowded offside field and when he grew bored of hitting to cover, he worked towards square leg and mid-on with shots few Australians would have considered - or known how to play“.

लक्ष्मण वर मी येथे एक लेख लिहीला होता पूर्वी Happy

Pages

Back to top