गुणसूत्रांची भेसळ थांबवा!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 2 February, 2010 - 00:06

नमस्कार!

ह्या घडीला पर्यावरण मंत्री जयराम रमेश अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सना भारतातील फळभाज्यांचा राजा असलेल्या "वांग्या"च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल विचारविनिमय करत आहेत.

येथे एका अभिनव पद्धतीने मंत्री महोदयांना भारतातील वांग्याचे रक्षण करण्याची विनंती करण्यात येत आहे : जगातील सर्वात मोठ्या पातळीवर वांग्याचे भरीत बनविण्यात येत आहे. आणि ते भरीत दिल्लीतील हजारो गरीब व भुकेल्या जनतेला वाटण्यात येणार आहे.
ध्येय आहे २०,००० (वीस हजार) वांग्यांचे! तुम्ही खालील पिटिशनवर साईन (स्वाक्षरी) करून त्यांत एका वांग्याची भर टाकाल काय?

http://greenpeace.in/safefood/the-biggest-baingan-bharta-ever/

पिटिशन मध्ये लिहिले आहे : "भारताने आपल्या वांग्यांना अमेरिकन हितसंबंध असलेल्या कॉर्पोरेशन्सद्वारा प्रदूषित होऊ देऊ नये."

धन्यवाद!

--- अरुंधती

Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही स्थगीती तात्पुरती आहे.
लवकरच भारतीय बंधु भगिनींना बी टी वांग्याची भाजी खायला मिळो हीच इश्वरचरणी प्रार्थना !

विजय, आपण प्रयोगाचे उंदीर व्हायची काहीच गरज नाही असं मला वाटतं.
इथे जास्त पैसे देऊन ऑरगॅनिक अन्न खरेदी करते.
भारतात तो पर्यायच नसेल ह्याची खात्री आहे.

टाईम मॅगेझिनचं "Getting Real About the High Price of Cheap Food" म्हणून आर्टिकल खालच्या दुव्यावर मिळेल: http://www.time.com/time/health/article/0,8599,1917458,00.html

अमेरिकेत उगाच नाही येवढी ओबेसिटी दिसत!

आणि जगभरात जिथल्या तिथल्या नैसर्गिक प्रजाती (अन्न, पक्षी, प्राणी) टिकवण्यासाठी प्रयत्न होत असताना आपण 'आ बैल मुझे मार' करतोय असं मला वाटतं!
वर कुणीतरी म्हटल्यासारखं, आपला वारसा आपण टिकवला पाहिजे.
आधीच 'बासमती' च्या अट्टाहासापायी भाताच्या कितीतरी प्रजाती एक्स्टिंक्शनच्या मार्गावर आहेत. कदाचित आपल्या पिढीचं निम्म आयुष्य ऑलरेडी सरलेलं असल्यानं आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाहीत, पण आपल्या येत्या पिढ्यांना त्याची किम्मत चुकवावी लागेल!
माझाही जेनेटिकली बदललेल्या अन्नाला विरोध!

बी. टी. वान्ग्या वरील स्थगिती ही तात्पुरती आहे, आणि ती आज नाही तर कधी तरी उठणारच आहे......

नुस्त्या अफवा पसरवुन काय फायदा होणार, आणि तुम्हाला कस माहीत झाल कि बी. टी आल्या मुळे नैसर्गिक प्रजाती टीकणार नाही अस........

काही लोकाना तर ऑरग्यानिक आणि बी टी मधला फरक सुद्धा माहीत नाही...... तरी म्हणायला तयार की, ऑरग्यानिक चान्गले आणि बी टी वाईट.

अरुंधती, चांगला विषय आहे. मृण्मयीने दिलेल्या लिन्क्स नक्की वाचणार.

माझा पूर्ण विरोध नसला तरी जरा मनांत भीती, शंका आहे. मूळ नैसर्गिक जाती हळूहळू मागेच पडतील ही अरुंधतीनी व्यक्त केलेली चिंता अनाठायी नाही. काही तांदळाच्या जातीची पिके आता घेतलीच जात नाहीत कारण त्यांची पिकाला वेळ जास्त लागतो आणि तेवढा वेळ द्यायला नको असतो. मागणी वाढली आहे.

जेनेटिक मॉडिफिकेशनमुळे तयार केलेल्या अन्नाबद्दल अशी एक भीती व्यक्त करण्यात आली होती की यामुळे अ‍ॅलर्जी असलेली प्रथिने अश्या अन्नात तयार होऊन ज्यांची सहसा अ‍ॅलर्जी नसते त्यांचीही लोकांना अ‍ॅलर्जी होऊ लागेल. माझ्या एका मैत्रीणीच्या मुलीला भारतातल्या शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी नाही, इथे मिळणार्‍या शेंगदाण्याची आहे!

अजून वाचून, माहिती मिळवून मी लिहीन इथे.

@ लालु,

GM मुळे allergy होईल हे म्हणने चुकीचे ठरेल,...... allergy चा गुणधर्म हा त्या त्या शेन्गदाण्याचा जाती (variety) वर अवल्म्बुन असतो. काही जाती मध्ये तो असतो काही मध्ये नाही.

काही तांदळाच्या जातीची पिके आता घेतलीच जात नाहीत कारण त्यांची पिकाला वेळ जास्त लागतो आणि तेवढा वेळ द्यायला नको असतो.

शेतकरी पण त्याचा फायदा बघेल ना. त्याला जर नविन चान्गल उत्पन्न, कमी कालावधी असणार्या ताद्ळाच्या जातीचा प्रयाय मिळाला तर तो त्याचा मागे जाईल.....

गणेश, अ‍ॅलर्जीबद्दल हे वाचा-
http://www.healthy.net/scr/News.aspx?Id=9187

मृ ने दिलेली दुसरी लिन्क पहा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अ‍ॅलर्जीचे गुणधर्म असलेल्या शेंगदाण्याच्या जातीचे जीन्स दुसर्‍या पिकात वापरले तर? शक्यता आहे की नाही?
शेतकरी फायदा बघेल म्हणूनच परिणाम काय तर काही जाती कधी घेतल्या जाणार नाहीत.

भारतातील शेतकर्‍याची काळजी ही आहे की त्याला कमी खर्च व कष्टात जास्तीत जास्त पीक, व तेही पुरेसा मोबदला देणारे हवे आहे.
सरकारला आपल्या तिजोरीवर जास्त बोजा न पडता भूकबळी, कुपोषितांची समस्या घटवायची आहे.
ग्राहकाला आरोग्याला कोणताही धोका नसलेले, पर्यावरणपूरक अन्नधान्य रास्त किमतीत हवे आहे.
कृषितज्ञ, शास्त्रज्ञांना शेती व तंत्रज्ञान यांच्या विकासाबरोबरच ते मानवाशी व प्राणिजगताशी मैत्र साधणारे असतील ही खबरदारी घ्यायची आहे.
बीटी वांगे नक्कीच ह्या सर्व निकषांवर अजून खरे उतरलेले दिसत नाही. शिवाय आत्तापर्यंत झालेले संशोधन पारदर्शी पध्दतीने झालेले नाही ह्या म्हणण्यातही तथ्य आहे.
जी कंपनी सध्या बीटी वांग्यांच्या बीजाचे उत्पादन करु शकते त्यात २६% भागीदारी एका अमेरिकन कंपनीची असल्याचे समजते.
भारतात सद्यस्थितीत असलेल्या वांग्यांच्या प्रजातींमधील औषधीगुण, किंवा अंगभूत गुण नव्या बीटी प्रजातींमध्ये असतीलच ह्याची शाश्वती नाही.

वरील प्रतिसादांमध्ये :
काही तांदळाच्या जातीची पिके आता घेतलीच जात नाहीत कारण त्यांची पिकाला वेळ जास्त लागतो आणि तेवढा वेळ द्यायला नको असतो. मागणी वाढली आहे.

पण बंगालमध्ये आलेल्या पुरामुळे आता तिथे अतिवृष्टीतही टिकून राहणार्‍या व चांगले पीक देणार्‍या तांदळाची गरज निर्माण झाली आहे, जी तांदळाची प्रजाती अनेक वर्षे तिची लागवड न झाल्याने जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे बंगाल सरकारला आता अशा प्रजातीचा शोध आहे जी अतिवृष्टीतही तग धरून भरघोस पीक देऊ शकेल.
ह्याचाच अर्थ, आधीच्या प्रजातींचे रक्षण न केल्यास पुढील काळात जर त्यांची गरज भासली तर समस्या उद्भवू शकते. पर्यावरणात होणारे बदल, नवनव्या कीडी - रोगराई यांना तोंड देण्यात बीटी धान्य/ भाज्या अधिक ताकदीच्या असतील की देशी प्रजाती?
बीटी वांग्याबद्दलही हीच शंका मनात येते. पुढील काळात हे वांगे मनुष्याला किंवा पर्यावरणाला अनारोग्यकारक ठरले तर अशा वेळी वांग्यांच्या आधीच्या प्रजाती जर शिल्लकच नसतील किंवा धोक्यात आल्या असतील तर मग पर्याय काय?

तसेच इतर प्रगत देशांमध्ये बीटी तंत्रज्ञान एवढे 'विकसित' असताना त्यांनी बीटी भाज्या बाजारात का बरे नाही आणल्या? त्यांनी फक्त मका, गहू अशा व्यापक प्रमाणात लागणार्‍या धान्यातच बीटी तंत्रज्ञान अंमलात आणले आहे. असे का? वस्तुतः त्यांना बटाटा, सोयाबीन, बार्ली, टोमॅटो ह्या मोठ्या प्रमाणावर ज्या भाज्या/ पीके लागतात त्यांच्याबाबत बीटी तंत्रज्ञान वापरलेले का दिसत नाही? आणि जे धान्य बीटी तंत्रज्ञान वापरून उत्पादन केले जात आहे त्याबद्दलही त्याच देशातील लोकांकडून, नागरिक व आरोग्यतज्ञांकडून मग ओरड का ऐकू येत आहे? चीनमध्ये आज बीटी तांदूळ वापरला जातोय म्हणतात....पण चीनच्या नागरिकांना आपले मत व्यक्त करण्याची मुभा आहे का हो? अन्य पर्याय आहे का?
असे व इतर अनेक प्रश्न बीटी धान्य/ भाज्यांच्या माध्यमातून पुढे येत आहेत व येत राहातील.
बीटीचा पर्याय नाकारून सरस व मुबलक पीक घेता येणे हे समोरचे आव्हान आहे. तसेच त्या पिकाला रास्त भाव मिळावा व ते अन्नधान्य लोकांच्या खिशाला परवडावे हेही पाहावयास लागेल.

@ लालु,
तुम्ही दिलेली लिन्क् चा लेखक Jeffrey M Smith, ते मुळातच anti GM आहेत, the references he has cited in his article are from the journals which are not peer reviewed (i.e. any one can publish anything and people like Mr Smith can use them for their purpose).

शेतकरी फायदा बघेल म्हणूनच परिणाम काय तर काही जाती कधी घेतल्या जाणार नाहीत........

बिचारा शेतकरी त्याचा फायदा नाही बघणार तर काय करणार...... शेवटी त्याला जे फायध्याचे तेच तो पेरणार.

सध्या भारतात बी टी वान्ग्या बद्द्ल जे काही चालले आहे ते तर फक्त ट्रेलर आहे, खरी मजा तर परवानगी मिळाल्याबर ते बाजारात आल्यावर येणार आहे,......

उ. दा. १ बी टी वान्ग्याला अजिबात चव नाही.....
२. बी. टी. वान्ग खाऊन डोख/पोट्/अन्ग्/हात पाय अजुन काही... दुखते
३. बी. टी. वान्ग खाऊन शेळ्या/ गायी/ म्हशी मेल्या....
४. बी. टी. वान्ग्याच भरीत चाल्गल लागत पण भाजी काय बरोबर चव देत नाही....
ही लिस्ट वाढतच जाणार आहे......

जी कंपनी सध्या बीटी वांग्यांच्या बीजाचे उत्पादन करु शकते त्यात २६% भागीदारी एका अमेरिकन कंपनीची असल्याचे समजते
भारतात सद्यस्थितीत असलेल्या वांग्यांच्या प्रजातींमधील औषधीगुण, किंवा अंगभूत गुण नव्या बीटी प्रजातींमध्ये असतीलच ह्याची शाश्वती नाही................

भारतात बीटी वान्ग्याला परवानगी मिळाली तर, २-३ वर्षा च्या कालावधित तो बीटी जिन्स भारतीय वान्ग्या च्या प्रजाती मध्ये टाकला जाईल, कॉटन च उदाहरण घ्या आज २०० पेक्शा जास्त भारतिय कॉटन च्या प्रजाती मध्ये बीटी जिन्स आहे, प्रजाती त्याच आहेत, फक्त त्यात conventional breeding (back crossing) ने बीटी जिन्स टाकण्यात आला आहे.
त्यामुळे भारतीय प्रजाती राहणार नाही हा दावा चुकिचा आहे.

तसेच इतर प्रगत देशांमध्ये बीटी तंत्रज्ञान एवढे 'विकसित' असताना त्यांनी बीटी भाज्या बाजारात का बरे नाही आणल्या? त्यांनी फक्त मका, गहू अशा व्यापक प्रमाणात लागणार्‍या धान्यातच बीटी तंत्रज्ञान अंमलात आणले आहे. असे का?..............

कारण त्याच्या कडे, मका आणि गहू हे प्रमुख पिके आहेत आणि त्यान्च्या वर तेथिल वातावरणा मुळे कीड चा प्रार्दुर्भाव जास्त आहे.

त्याबद्दलही त्याच देशातील लोकांकडून, नागरिक व आरोग्यतज्ञांकडून मग ओरड का ऐकू येत आहे?

किती टक्के लो.ंकाचा त्याला विरोध आहे ते सान्गणार का?

छान आहे चर्चा.... फक्त व्यक्तीगत पातळीवर न उतरता वाचकांना दोन्ही बाजुंची माहिती मिळेल असे बघा म्हणजे दुधात साखर....

अरुन्धती जी,
बंदी घालु नये ,याला असलेली बाजु ..
१.जर बीटी कापुस (आता तर भात्,भेंडी येणार ) चालते तर "वांगी" का नाही ?
२.किटकनाषकाचा वापर वाचेल,त्यामुळे पर्यावरण कमी प्रर्दुर्शीत होईल ...
३.ऊत्पादन ज्यास्त मिळेल .

गणेश, असूदेत ना ते anti GM. त्यांना वाटणार्‍या शंकांमुळे ते बनले असतील तसे. पण त्यांनी आणि मी व्यक्त केलेली भीती रास्त आहे ना? अ‍ॅलर्जी होणार नाही असे ठामपणे कशावरुन म्हणू शकता तुम्ही?

असूदेत ना ते anti GM. त्यांना वाटणार्‍या शंकांमुळे ते बनले असतील तसे...............
शका वाटणे सहाजिक आहे, पण त्यात तथ्य असले पाहीजे. जेव्हा एखादी वस्तु बाजारात (medicine, insecticide, GM etc) येते, तेव्हा सगळ्या mandatory test ( the test which are reasonable and practically possible) घ्याव्याच लागतात. आणि त्या विषयावर भरपुर (Scientific conferences and work shops) debate झालेला असतो, तेव्हा सगळे जे काही scientifically valid arguments असतात त्याचे निरसन केले जाते.

आणि, मी आधिच म्हटले आहे की, Jeffrey M Smith याच्या लेखात दिलेले references ची Scientific community ने नोन्द घेतली नाही कारण ते Scientifically strong नाहीत.

राहीला allergy चा विषय, तुम्ही म्हटल्या प्रमाणे, USA मधिल तुमचा मैत्रिनी च्या मुलाला तेथिल शेन्गदाण्या मुळे allergy होते, त्या शेन्गादाण्या मुळे सगळ्या ना allergy का होत नाही, यातच त्याचे उत्तर आहे......

अ‍ॅलर्जी होणार नाही असे ठामपणे कशावरुन म्हणू शकता तुम्ही?...........
मीच काय पण, १०० वर्ष जरी सशोधन केले तरी १००% ठाम पणे कोणिच सान्गु शकत नाही,
Human medicine चे उदाहरण घ्या, antibiotics देण्याचा आधि डॉक्टर तुम्हाला allergy आणि reaction बद्दल विचारतो.

(लिहीताना अनुस्वार कसा देयायचा कोणी सागेल का?)

>>त्या शेन्गादाण्या मुळे सगळ्या ना allergy का होत नाही, यातच त्याचे उत्तर आहे
कशाचे उत्तर? सगळ्यांना अ‍ॅलर्जी होईल असं मला म्हणायचं नाही.

मला असं म्हणायचं आहे की ज्या काही लोकांना त्या शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी आहे त्या शेंगदाण्याचे जीन्स समजा तुम्ही वाटाण्यात घातले, तर त्यात अ‍ॅलर्जीला कारण असणारे प्रोटीन वाटाण्यात तयार होऊन त्याच लोकांना त्या वाटाण्याचीही अ‍ॅलर्जी होईल. आले का लक्षात?

शंका व्यक्त करायला ना नसावी. त्यात तथ्य नाही हे दाखवून दिले जाणार असेल तर प्रश्नच नाही. तेच तर हवे आहे

(अनुस्वारासाठी .n वापरा किंवा caps M)

Genetic modifications, वेगवेगळ्या कारंणासाठी केले जाते, पिंका मध्ये ते protection against pest and diseases, quality improvement, growth enhancement etc साठी केले जाते. आणि वरील कारणासांठी जे जिन्स फायद्याचे ( सगळे नाही फक्त फायदा देणारे) असतील तेच टाकले जातात....... समजा भुईमुंगात एखादा चांगला जिन्स तुम्हाला आढळला आणि तो जर वाटाण्यात टाकायच ठरवंल तर, फक्त तो एकच जिन्स टाकला जाईल, सगळे नाही, त्यामुळे भुईमुंगाचा allergy वाला जिन्स तिकडे जायाचा प्रश्नच येत नाही.

माझ्या मते तुम्हाला हा मुद्दा समजला असेल, शंका असल्यास जरुर लिहा.......

आपण जिन्स बद्दल जेंव्हा बोलतो ते फार सोपे वाटते, पण एखादा जिन्स शोधने म्हणंजे फार दिव्य काम आहे..... त्या साठी कित्तेक वर्ष लागुन जातात........

ही चर्चा चांगली रंगत आहे. साधक बाधक, दोन्ही मुद्यांचा विचार, सविस्तर चर्चा व्हायलाच पाहिजे. जर बीटी अन्न हानीकारक आहे तर ते का आहे, किंवा त्यात काय त्रुटी आहेत व त्यापासून काय धोके आहेत, फायदे झाले तर ते काय आहेत यावर अशी सप्रमाण वैचारिक देवाणघेवाण होऊन लोकांमध्ये त्याविषयी जागृती निर्माण होणे ह्याअगोदर सरकारपातळीवर केले जाणे आवश्यक होते. पण हरकत नाही. ह्या अगोदर अमेरिकन कंपनीचे शेअर असलेल्या कंपनीने खाजगी प्रयोगशाळांद्वारे केलेल्या प्रयोगांचे बीटी वांग्याबद्दलचे निष्कर्ष जनतेने ग्राह्य धरले नाहीत हे आतापर्यंत वाचलेल्या बातम्यांवरून समजते. प्रत्यक्ष प्रयोगांअखेर निघालेले निष्कर्ष आतातरी पारदर्शी पध्दतीने लोकांसमोर आणण्यात येतील अशी आशा आहे. ग्राहक म्हणून त्यांचा व आपणां सर्वांचा तो अधिकार आहे.

जर बीटी अन्न हानीकारक आहे तर ते का आहे, किंवा त्यात काय त्रुटी आहेत व त्यापासून काय धोके आहेत,

ते तुम्हीच सांगा. आपण त्या वर सविस्तर चर्चा करु....

फायदे झाले तर ते काय आहेत

१. कीटकनाशकांचा वापर कमी होईल, त्यामुळे, मित्र कीटकांची हाणी होणार नाही.
२. Pollution कमी होईल, कारण बहुतेक कीटक नाशक हे आरोग्यास हाणिकारक असतात, आणि त्यांचे residues बरेच
दिवस जमिनीत/पाण्यात राहतात.
३. कीड चा वेळेवर बदोबस्त झाल्यामुळे उत्पन्न वाढेल.

मला ह्यातली वैज्ञानिक माहिती फारशी नाहीय, पण कुठेतरी वाचलेय, की किटकांपासुन स्वतःचा बचाव करण्यासाठी धान्याच्या बीजामध्ये जे बदल करतात ते माणसाच्या पोटात जाऊन त्यापासुन हळूहळू त्याच्यावर परिणाम व्हायची शक्यता आहे. अर्थात हे बदल काय करतात, बीजाची प्रतिकारशक्ती कशी वाढवतात त्यावर अवलंबुन असेल असे मला वाटते.

वर एका लिंकमध्ये डीडीटी खरेतर चांगले आहे असे वाचले, पण त्याचवेळी मी असेही वाचलेले डीडीटी च्या अतिवापराने काही ठिकाणी मातांच्या दुधातही डीडीटीचे अंश सापडले आणि त्या दुधामुळे बाळाच्या एकुण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

हे सगळे वाचुन मला वाटते की डीडीटी काय, इतर किटकनाशके काय किंवा बीटी धान्य काय, सगळे जेवढी वापरण्याची गरज आहे तेवढेच वापरले तर फायदाच होईल, पण तेच गरजेपेक्षा जास्त वापरले तर त्याचे दुष्परिणामच होणार, मग अशा वेळी दोष त्या किटकनाशकांचा/धान्याचा की माणसाचा?

किटकांपासुन स्वताचा बचाव करण्यासाठी पिंकाच्या single cell मध्ये Bacillus thuringiensis (B.T.) नावाच्या मातीत आढळनारया Bacteria चा gene टाकला जातो. आणि त्यानन्तर त्या single cell पासुन tissue culture technology ने पुर्ण plant तयार केले जाते. Genes, plant मध्ये टाकतांना plant चे इतर कार्य disturb होणार नाही याची पुर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळे plant चे इतर कार्य अगदी व्यवस्थित चालतात.

पुर्ण Plant मध्ये हा gene एक protein निर्माण करतो, हा protein फक्त ठराविक जातिच्या किटकाला हाणीकारक असतो, कारण ह्या ठराविक जातिच्या किटकांमध्ये हा protein, bind होण्यासाठी receptors असतात, आणि या किटकांची gut pH ही alkaline असते, हा protein इतर किटक्/ प्राणी/ मानव जातीला अजिबात हाणिकारक नसतो. कारण, त्यांचा मध्ये या protein साठी receptors नसतात, pH alkaline नसते.

१९३० पासुन, Bacillus thuringiensis हा bacteria, biological pesticide म्हणुन वापरला जात आहे, Organic Farming मध्ये पण या Bacteria चा उपयोग biological pesticide म्हणुन फार मोठ्या प्रमाणात केला जातो.......

डीडीटी खरेतर चांगले आहे असे वाचले, पण त्याचवेळी मी असेही वाचलेले डीडीटी च्या अतिवापराने काही ठिकाणी मातांच्या दुधातही डीडीटीचे अंश सापडले आणि त्या दुधामुळे बाळाच्या एकुण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.....>>>>>>>>>>>>>>

याच कारणा मुळे genetic modifications for pest/disease control ची संकल्पना असतित्वात आली.
पण तेच गरजेपेक्षा जास्त वापरले तर त्याचे दुष्परिणामच होणार,

पण तेच गरजेपेक्षा जास्त वापरले तर त्याचे दुष्परिणामच होणार, मग अशा वेळी दोष त्या किटकनाशकांचा/धान्याचा की माणसाचा?>>>>>>>>>>>>>>>

हो ते बरोबर आहे, दोष माणसाचा च असणार आहे, Technology (GM) available आहे म्हणुन त्याचा वापर सगळी कडे करणे चुकीचे ठरेल, ज्या पिकांवर किटकांचा प्रादुर्भाव जास्त आहे आणि त्यांच्या वर किटकनाशक जास्त वापरले जातात अशाच पिंकाचे genetic modification करण्याला परवानगी दिली पाहीजे...... आणि सोबतच technology जास्त वेळ कश्याप्रकारे टीकविता येइल हे पण बघितले पाहिजे........

नद्यांवर धरणे बांधून त्यातून वीज निर्मिती सुरु झाली तेव्हा काही लोकांनी त्यालाही विरोध केला होता.
कारण काय तर ज्या पाण्यातून वीज कढून घेतली आहे त्या पाण्यावर पिके वाढणार नाहीत.

एकच प्रश्नः
ही बीटी वांगी अमेरिकेतही उगवतात का? नसतील तर कारण काय?
इथलं (अमेरिकन) सरकार परवानगी देत नसेल तर कारण काय?

इथलं सरकार सिगरेटस वर इनडायरेक्टली बंदी आणण्याकरता प्रचंड प्रयत्न करतंय
(सिगारेट => कॅन्सर => उपचारांचा खर्च => स्टेटला भरावा लागतो)
मग त्याच कंपन्या आपलं मार्केट टारगेट करतात. का "Third worlds" मधल्या लोकाना कॅन्सर होत नाही का?
आणि तसंच बीटीचं नाही ना?

गणेश, चांगली माहिती दिलीत.

>>>>Genes, plant मध्ये टाकतांना plant चे इतर कार्य disturb होणार नाही याची पुर्ण काळजी घेतली जाते. त्यामुळे plant चे इतर कार्य अगदी व्यवस्थित चालतात.
ह्या विधानाबाबत थोडं सांगायचंय. एखादा जीन वनस्पतीत घालणं हे आजकाल अगदी दैनंदीन कामाइतकं सोपं झालं असलं तरी त्यावर सगळं संशोधन होऊन चुकलंय असं नाही. जीन वनस्पतीत घालताना वनस्पतीकडून देखिल एक प्रतिसाद मिळतो. बायोकेमिकल आणि जेनेटिक पातळीवर बदल घडतात. एरवी बॅक्टेरियाकडून आलेला परकीय जीन वनस्पतीच्या पेशीकडून ओळखला जाऊ शकतो. त्याचा संहार करायचा म्हणून पेशी सज्ज होऊ शकते. परंतु ज्या मार्गे जीन वनस्पतीत घातला जातो किंवा निसर्गतःच जातो त्याची कथा बरीच मनोरंजक आहे.
Agrobacterium tumefaciens नामक बॅक्टेरिया निसर्गत: मातीत आढळतो. हा एकपेशीय जीव स्वतःच्या DNAचा काही भाग वनस्पतीत घालून, वनस्पतीत अशा प्रकारचे बदल घडवून आणू शकतो, की वनस्पतीवर बांडगूळ तयार होऊन त्यातून 'ओपाइन' नामक पदार्थ बाहेर पडतात. ह्या ओपाइन्सचा उपयोग कार्बन आणि नायट्रोजन मिळवण्यासाठी बॅक्टेरिया करतो. तेव्हा निसर्गातच घडणार्‍या ह्या घटनेचा उपयोग शास्त्रज्ञांनी हवा तो जीन आधी ह्या बॅक्टेरियात घालून, वनस्पतीच्या केंद्रकात (nucleus) पोचता करण्यात यश मिळवलं. नवा जीन वनस्पतीच्या जेनेटिक मेकअपचा भाग होऊन, हवं ते प्रोटीन वनस्पतीत तयार करवून घेण्याचा सफल प्रयत्न सुरू केला.
मग वनस्पती हा पेशीत शिरणारा 'परकीय DNA(जीन)' विघटीत न होता केंद्रकापर्यंत कसा पोचू देते? तर Agrobacterium आपल्या DNA ला स्वतःच्याच एका प्रोटीनमधे गुंडाळून आणतो. ह्या बॅक्टेरियाच्या प्रोटीनथरावर वनस्पतीतल्या ठरावीक प्रोटीनचा थर जमतो, हा थर विघटीकरण करणारा नसतो. त्यामुळे आता वनस्पतीची पेशी ह्या DNA-protein complexला परकीय म्हणून न ओळखता केंद्रकापर्यंत पोचू देते.
केंद्रकाजवळ पोचताच योग्य वेळी प्रोटीन्स काढून टाकून फक्त DNAला वनस्पतीच्या जेनेटिक मेक अपचा भाग होता येतं. बांडगूळ तयार करणारा भाग बॅक्टेरियाच्या DNAमधून वगळला गेल्यामुळे आता वापरात असणार्‍या वनस्पतीवर बांडगूळ तयार होत नाही.
परंतू अशा तर्हेनं Agrobacteriumच्या सांनिध्यात आलेल्या वनस्पतीत 'सगळं सुरळीत चालंलय' असं म्हणता येणार नाही. वनस्पतीत बायोकेमिकल पातळीवर किंवा न्युक्लिअसमधे देखिल नक्की काय होतंय त्याकरता संशोधन सुरू आहे.

वर नानबा जे म्हणाली त्यावरुन एक प्रश्न मनात आला - कागदोपत्री बीटी वांग्यातले जीन्स आणि प्रत्यक्ष भारतीय मार्केटमध्ये उतरल्या जाणा-या बीटी मधले जीन्स यात फरक तर नसणार ना? आणि जर असेल आणि भारतीय सरकारला ते माहीत असेल तरीही पैशासाठी कसलीही पर्वा न करणारे राजकारणी लोकांची काळजी करतील की जे जो भोगेल तो ते त्याच्या कर्माने भोगेल असा भारतीय संस्कृतीला शोभेलसा विचार करुन स्वतःच्या स्विस अकाऊंटचा बॅलॅन्स वाढवतील?

कधी कधी डोके अगदी भंडावुन जाते असले उलट्सुलट विचार करुन.....

अमेरिकेतले लोक वांगी फारशी खात नाहीत.
>> Dont kid me! I know so many americans around who eat egg plant
माझ्या मागच्या कंपनीत, ऑफिसकडून लंच यायचं. हे जेवण पूर्ण अमेरिकन असायचं. त्यात एगप्लँटची डिश असायचीच असायची आठवड्यातून दोनदा वगैरे.
हॅरिस टीटर, वॉलमार्ट, फार्मर्स मार्केट सगळीकडे वांगी मिळतात- आणि गोरे लोक ती विकतही घेतात!

लोकहो, हा प्रश्न आपल्याला वाटतोय त्यापेक्षा खुपच गम्भिर आहे.
सुदैवाने आपल्या Government ने तूर्तास ह्यास स्थगिती दिली आहे.

Youtube वर जाउन dr vandana shiva शोधा . त्यात अनेक विचार मुद्देसुदपणे मांडले आहेत.
खरेखोटे तपासावे लागेल पण हे अशक्य नाही.

वरील कोणत्यातरी पोष्ट मधे असे म्हटले आहे की अनेक देशात हे वापरले जाते. हे देश कोणते? त्याच्या काही लिन्क्स देता येतील का? माझ्या माहितीप्रमाणे भारतालाच ह्याचे गिनीपिग बनवण्याचे घाटते आहे.

http://www.marathimanoos.com/ ही साइट पहा.

अरुन्धती, नानबा...अनुमोदन.
>>बी टी कापसाला आधीच परवानगी दिली असती तर शेतकर्‍यांच्या काही आत्महत्या तरी टाळता आल्या असत्या>>..
विजय, हा विशय खुप गुन्तागुन्तीचा आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की, बी टी चे बियाणे साठवून पुनःपुन्हा वापरता येत नाही. त्यामुळे त्याची दरवर्शी खरेदी करावी लागते. याचा शेतकरी आणी त्याच्या आर्थिक विपन्नतेशी नक्किच सम्बन्ध आहे. सेन्द्रीय शेती जिन्दाबाद Happy

>>बी टी कापसाला आधीच परवानगी दिली असती तर शेतकर्‍यांच्या काही आत्महत्या तरी टाळता आल्या असत्या>>..
हे विधान तितकेसे तर्कसंगत वाटत नाही.

मुण्मयी,
चांगली माहीती आहे..... Agrobacterium mediated transformation सोप आहे आणि त्याचा success rate पण चांगला आहे, पण transformation च्या अजुन दुसर्या पधद्ती पण आहेत (e.g pollen tube transformation, particle bombardment, electroporation, viral transformation etc )....... जेव्हा जिन वनस्पतीत टाकतात तेव्हा तो वनस्पतीच्या genome मध्ये कुठेतरी land होतो, तो जर house keeping genes च्या मध्ये/जवळ land झाला तर, वनस्पतीचे कार्य अगदी व्यवस्थित चालते, पण तो जर functional genes मध्ये/जवळ land झाला तर मग वनस्पतीचे कार्य disturb होते.... पण हे सगळे molecular characterization करुन लक्षात येऊन जाते आणि हे सगळे प्रयोग laboratory conditions मध्ये पाहीले जातात...... त्यानंतर त्या यशस्वी झालेल्या (successful transformation) वनस्पतीला आशा अजुन बर्याच चाचण्यातुन ( human/animal safety, allergy, ecological impact, effect on beneficial insects, pollen transfer....... etc) जाव लागंत. त्यानतर सरकार कडे परवानगी मागितली जाते, नंतर सरकार पहीले net house trials साठी परवानगी देते, आणि सगळ व्यवस्थित आढळुन आल्यास, त्याची परत २-३ वर्ष open multi-location field trials घेतल्या जातात.... सगळ व्यवस्थित झाल्यास मग परवान्गी मिळते...........

कागदोपत्री बीटी वांग्यातले जीन्स आणि प्रत्यक्ष भारतीय मार्केटमध्ये उतरल्या जाणा-या बीटी मधले जीन्स यात फरक तर नसणार ना?>>>>>>>>>>>>>>>>>>>
एवढा मोठा fraud नाही करणार, कारण ते जिन्स नतर कोणीही पढताळुन पाहु शकतो,,,,,, कारण तेच जिन्स इतर भारतीय कंपण्या त्यांच्या भरपुर उत्पन्न देणार्या भारतीय प्रजातीत conventional breeding ने टाकतात.

हॅरिस टीटर, वॉलमार्ट, फार्मर्स मार्केट सगळीकडे वांगी मिळतात- आणि गोरे लोक ती विकतही घेतात!>>>>>>>>>>>>>
गोरे लोक वांगी खात ही असतील तरी ते त्यांचे मुख्य पिक नसणार आणि वांग्या वर तेथिल हवामना मुळे insect pest चा problem कमी असतो, म्हणुन त्याना अजुनतरी वांग्यात बी टी टाकायची गरज भासली नाही.

Youtube वर जाउन dr vandana shiva शोधा . त्यात अनेक विचार मुद्देसुदपणे मांडले आहेत.
खरेखोटे तपासावे लागेल पण हे अशक्य नाही.>>>>>>>>>>>>>>>>>

२००१ मध्ये बी टी कॉटन बाजारत आले तेव्हा सुधा त्यानी हेच काम केले होते...... आणि आज भारतात भरपुर मोठ्या प्रमाणावर बी टी कॉटन चे उत्पादन घेतले जात आहे.

Pages