ॠतूराज...

Submitted by गणेश कुलकर्णी on 8 February, 2010 - 01:47

रिमझिम रिमझिम बरसतो
पाऊस माझ्या अंगणात...
मन माझे हळूच जाते
तुझ्या आठवणींच्या देशात!

गोड गुलाबी येऊन जाते
बोचणारी थंडी...
उबदार वाटतात मजला
तुझ्या परिस स्पर्शाच्या झुंडी!

रखरखत्या, तळपत्या उन्हात
मी सावलीच्या शोधात...
तू होऊन येतोस शितल वारा...
अन अलगद येतोस माझ्या मनात!

: गणेश कुलकर्णी (समीप)

गुलमोहर: 

छान .

छान!