मित्र आणि मैत्रिणिंनो,
मी प्रकाशचित्रे ह्या सदरामध्ये "अतुल्य भारत" हि एक मालिका सुरु करत आहे. मी आजपर्यंत जे काही भारतभ्रमण केले आणि त्यामध्ये जी काही प्रकाशचित्रे काढ़लि ती येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. माझा उत्तरेहुन सुरुवात करुन दक्षिणेकडे येण्याचा विचार आहे. आशा आहे आपल्याला हि प्रकाशचित्रे आवडतील.
आपले विचार, अभिप्राय व सूचना जरूर कळवा.
कळावे, लोभ असावा,
चंदन.
--------------------------------------------------------------------------------
थोडक्यात माहिती -
सिझन - मे १५ ते सप्टेंबर १५. (ऑगस्ट महीना अतिशय योग्य)
प्रेक्षणिय स्थळे - लेह, लेह परिसर, खार्दुंग ला, नुब्रा व्हॅली, झांस्कार व्हॅली, पँगाँग सरोवर, त्सो मोरीरी सरोवर, श्रिनगर - लेह प्रवास, लेह - मनालि प्रवास.
आम्ही पाहिलेली स्थळे- लेह, लेह परिसर, खार्दुंग ला, नुब्रा व्हॅली, पँगाँग सरोवर, त्सो मोरीरी सरोवर, लेह - मनालि ("Trans Himalayan Safari")
दिवस - १२ ते १४
झांस्कार व्हॅली ला रस्ता द्रास वरुन गेला आहे. लेह वरुन गेलात तर २ दिवस जायला, २ दिवस यायला आणि २ दिवस बघायला. झांस्कार व्हॅली साठी वरच्या वेळापत्रकात आणखिन ६ दिवस जोडावेत.
लेह आणि लडाख ला ३ प्रकारे जाता येते.
१) दिल्ली - लेह -दिल्ली flight. (वेळ - २ तास)
२) श्रिनगर - कारगिल/द्रास - लेह highway (वेळ - २ दिवस्/१रात्र, कारगिल/द्रास येथे मुक्काम)
3) मनालि - लेह highway (वेळ - २ दिवस्/१रात्र, केलाँग/सर्चु/पांग येथे मुक्काम)
प्रवासवर्णन -
आम्ही आमचा प्रवास १४ ऑगस्टला हैदराबाद येथे सुरु केला. आम्ही संध्याकाळची flight पकडून दिल्ली येथे रात्रि ९ वाजता आलो. आमचीपुढचि लेह ची flight सकाळी ४:३० ला असल्यामुळे व दिल्लीतिल सर्व Hotels विमानतळापासुन लांब असल्यामुळे रात्र विमानतळावरच घालविली.
१५ ऑगस्ट - सकाळी ४:३० ची flight पकडून लेह ला निघालो. रात्रिचि अर्धि झोप डोळ्यावर होतिच त्यामुळे विमानात बसल्या बसल्या डुलकी लागली. जाग आली ते गदा गदा हलविल्यामुळे. मला वाटले विमानच हलते आहे. पण बघितले तर आमचि ही मला उठ्वत होति. तशी हिला सवयच आहे. हि प्रवासात नेहमी मला उठवते आणि मी उठलो कि स्वतः झोपुन जाते. झोपताना माझा खांदा तिला पाहिजे तसा व्यवस्थित adjust करते. डोके ठेवायला म्हणुन. अणि वर हि अपेक्षा असते कि तिची झोप पुर्ण होईपर्यंत मि त्याच स्थितिमध्ये बसले पाहिजे. मि खांदा अवघडला म्हणुन position बदललि तर उठुन माझा खांदा होता त्या स्थिति मध्ये आणुन पुन्हा झोपते.
असो. मी खाली पाहिले तर खाली उत्तुंग हिमालय दिसत होता आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात त्याची हिमशिखरे सुवर्णकळसाप्रमाणे चमकत होती. अतिशय सुंदर देखावा होता तो. लगेचच camera ऑन करुन फोटो कढायला लागलो. तेवढ्यात air hostess किंचाळली कि लेह येते आहे आणि आपण land करत आहोत तेव्हा आपली electronic उपकरणे बंद करा.
लेह मध्ये landing हाहि एक भन्नाट अनुभव आहे. विमान पर्वतरांगांमधुन नागमोडी वळणे घेत उतरते. विमान दोन्हि बाजुला व्यवस्थित हेलकावे खाते. खालि उतरलो आणि डोळे विस्फारुन बघतच राहिलो. लेह चा विमानतळ हा जवळ जवळ चारही बाजुंनि डोंगरांनी वेढलेला आहे. उतरल्या उतरल्या थंडी झोंबली.
सामान वैगेरे घेउन बाहेर आलो तर Sumo वाला आलाच होता. लेह ला आधिच Sumo वैगेरे बुक करणे गरजेचे आहे कारण विमानतळ शहराबाहेर आहे आणी दुसरी काहिहि व्यवस्था नाहि आहे. Sumo ने शहरात गेलो. ईथे hotels तशी स्वस्त आहेत. जवळ जवळ सगळ्याच hotels मध्ये मध्यभागी एक छोटेशी बाग असते. त्या मध्ये हे लोक भाजिपाला लावतात आणि तुमच्या जेवणात ह्याच भाज्या वापरतात. त्यामुळे सर्व काहि अगदि garden fresh. दुपारी सर्व आवरुन लेह बाजारपेठ पहायला आणि खरेदी करायला बाहेर पडलो. लेह मध्ये जरदाळू फार छान आणि स्वस्त मिळतात. लडाख फार उंचावर असल्यामुळे तिथे हवा विरळ असते आणि oxygen कमि असल्यामुळे डोके दुखी किंवा चक्कर येणे असे त्रास होउ शकतात म्हणुन एक oxygen cylinder घेतला. काहि भेटवस्तु घेतल्या. लेह मध्ये एक दिवस time pass करणे किंवा आराम करणे हे गरजेचे आहे कारण आपल्याला तिथल्या विरळ हवेचि सवय व्हावि लागते. जर का उत्साहाच्या भरात लगेचच प्रवास सुरु केलात तर आजारी पडण्याचा संभव असतो. तर असा पहिला दिवस घालविला.
१६ ऑगस्ट - आज लेह परिसर पहायचा असे ठरले. लेह चा राजवाडा, शांती स्तुप पाहुन लेह सोडले आणि शे च्या मार्गाला लागलो. वाटेत एका ठीकाणी खुप गर्दि दिसली. का म्हणुन विचारले तर चालक म्हणाला की ईथे धर्मगुरु दलाई लामा आलेले आहेत अणि त्यांचे प्रवचन सुरु आहे. ताबडतोब गाडी थांबवुन दलाई लामा यांचे दर्शन घेतले, थोडे फोटो काढले आणि पुढे निघालो. रस्त्यामध्ये शे राजवाडा, सिंधु नदी, ठिकसे मोनस्टरी बघुन हेमिस गोंपा पहायला निघालो. ठिकसे मोनस्टरी मधिल भित्तिचित्रे फारच सुंदर आहेत. हेमिस गोंपा हे भारतातिल सर्व मोनास्टरिंचे मुख्यालय आहे आणि सर्वात श्रिमंत देखिल आहे. परत येतान स्तोक चा राजवाडा पाहिला. येथुन समोरचा देखावा फारच छान दिसतो. संध्याकाळि परत लेह ला येउन थोडी खरेदि केलि.
१७ ऑगस्ट - आज नुब्रा व्हॅली ला जायचे होते. हा प्रवास सधारणपणे ६ ते ८ तासांचा आहे. लेह सोडून जर तुम्हाला कुठेही फिरायचे असेल तर लश्कराची विशिष्ट परवानगी लागते. तुमचा चालक ती तुम्हाला मिळवुन देतो. परवानगी साठी PAN card/पारपत्र सारखे ओळखपत्र चालते.
नुब्रा व्हॅली चा रस्ता खार्दुंग ला वरुन जातो. हा जगातिल सर्वात उंचावरचा मोटार रस्ता आहे. ईथे खुप जणांना श्वसनाचा त्रास होतो तेव्हा oxygen cylinder बरोबर असु ध्यावा. सुदैवाने आमच्यापैकि कोणालाही हा त्रास झाला नाहि. पण पुर्ण लडाख प्रवासात हलकिशी डोकेदुखी सर्वांना होती.
खार्दुंग ला वरुन लेह चा देखावा फार छान दिसतो. खार्दुंग ला लश्कराचे दुकान आहे. तिथे स्मरणार्थ भेटवस्तु मिळतात. तिथे एक दोन लहान ढाबे हि आहेत. तिथुन नुब्रा ला निघालो. वाटेत भरपुर फोटो काढले. नुब्रा व्हॅली ही नुब्रा नदीच्या कुशीत वसली आहे. ईथुनच पुढे सियाचिन हिमनदी व जगातिल सर्वात उंचावरच्या रणांगणाला रस्ता गेलेला आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा सियाचिनला जाण्याची सामान्य नागरिकांना परवानगी नव्हती पण आता तिथे सामान्य नागरिकांना पण जाता येते. संध्याकाळी नुब्रा च्या दिस्किट ह्या गावात पोहोचलो. रहाण्याचि सोय एका घरगुती hotel मध्ये केली होती. hotel लहान पण अतिशय स्वच्छ अणि टापटिप होते. hotel एक आजोबा अणि आज्जी सांभाळत होते. पुढे अणि मागे छान अंगण होते. त्या मध्ये जरदाळू ची झाडे होती अणि त्यांना पिकलेली फळे देखील होती. आयुष्यात प्रथमच जरदाळू ची फळे खाल्ली. तेही फुकटात. आम्हा पुणेकरांना काय, "फुकट ते पौष्टिक". पण खरेच सांगतो, फार चविष्ट होती. संध्याकाळी नुब्रा नदी वर फिरुन आलो. रात्रिचे जेवण अंगणात होते. नुब्रा सारखे ठिकाण फार उंचावर असल्यामुळे व प्रदुषण अजिबात नसल्यामुळे आकाश अगदिच जवळ आल्यासारखे वाटत होते. सर्व तारे ईतके प्रखर तेजाने चमकत होते व ईतक्या जास्त संख्येने होते कि विचारता सोय नाहि. जेवण अप्रतिम होते. जेवुन सारे झोपि गेलो.
१८ ऑगस्ट - सकाळी उठुन अंगणात नाश्ता केला. आजोबांनी खास लडाखि रोट्या बनविल्या होत्या. त्या रोट्या, ऑम्लेट, ब्रेड, बटर, जॅम, चहा, कॉफी असा भरपुर नाश्ता करुन बाहेर पडलो. नुब्रा व्हॅली हे एक शित वाळवंट आहे. ईथे वाळुच्या टेकड्या आहेत. ईथे उंट (double humped camels) आहेत. ईथले उंट मात्र पाळीव नसतात. सर्व जंगली उंट. ईथले उंट वाले रोज सकाळी उंट जंगलामधुन पकडून आणतात, दिवसभर पर्यटकांना फिरवतात अणि संध्याकाळी परत सोडून देतात. तसे हे उंट शांत असतात, पण जास्त लडिवाळ पणा केलेला ह्या उंटांना खपत नाहि. त्या उंटांवरुन चक्कर मारुन आलो. ह्या वाळवंटाच्या पुढे जाण्याची सामान्य नागरिकांना परवानगी नाहिये. तिथुन पुढे लश्कराची हद्द सुरु होते. नुब्रा मोनास्टरी पाहुन नुब्रा सोडले आणि परत लेह च्या रस्त्याला लागलो. तसे नुब्रा व्हॅली नीट पहायची असेल तर ईथे एक दिवस मुक्काम केला पाहिजे पण आमच्यावर वेळेचे बंधन असल्यामुळे थांबता नाहि आले. रात्रि लेह ला पोहोचलो.
१९ ऑगस्ट - आज पँगाँग सरोवर ला जाण्याचा बेत होता. हा प्रवास साधारणपणे ६ ते ७ तासांचा आहे. दुपारी २:३० च्या दरम्यान पँगाँग ला पोहोचलो. वाटेत बरेच ठिकाणी थांबलो होतो, बरेच फोटो काढले हे सांगण्याची गरज नाही.
पँगाँग सरोवर हे अतिशय रमणिय ठिकाण आहे. ह्याचे सौंदर्य हे स्वर्गिय आणि कल्पनातित आहे. ह्या सरोवराचि खासियत अशी की सुर्यप्रकाश पडल्यावर ह्या सरोवराचे हिरवा आणि नीळा असे रंग बदलतात.
पाणी अगदी थंड होते. हे सरोवर १/३ भारतामध्ये आणी २/३ चीन मध्ये आहे. ईथे रहायला तंबू आणि एक बांधलेले छोटेसे घर अशा सोयी होत्या. सुदैवाने आम्हाला ते घर मिळाले. ईथे सर्व काहि तात्पूरते आहे. सिझन संपला की गाशा गुंडाळून सर्व काही बंद होते. सोयी काही खास नव्हत्या. शौचालय सुद्धा सर्व तंबू आणि घर मिळून common च होते. बाथरूम तर नव्हतेच त्यामुळे अंघोळीचा प्रश्नच नव्हता.
२० ऑगस्ट - सकाळी ६ वाजता उठून नाश्ता केला. आज त्सो मोरीरी सरोवर गाठायचे होते. पँगाँग ते त्सो मोरीरी हा ११ तासांचा प्रवास आहे. पँगाँग पासुन परत लेह च्या दिशेने यावे लागते आणि लेह च्या ५० km आधि कारू ह्या ठिकाणावरुन त्सो मोरीरी ला रस्ता गेलेला आहे. तुम्ही पँगाँग वरुन परत लेह ला येउन, लेह ला मुक्काम करुन दुसर्या दिवशी त्सो मोरीरी ला जाउ शकता.
लडाख मधील अंतरे अतिशय फसवी असतात. तुम्हाला अंतर दिसेल २०० km, पण तिथे जायला लागतील १० ते १२ तास. कारण लडाख मध्ये सपाट रस्ते जवळपास नाहितच. जे काहि रस्ते आहेत ते पण कच्चे, वळणावळणाचे, वर खाली, चढ उतार असे आहेत. ईथे प्रतिकूल वातावरणामूळे रस्ते टिकतच नाहित. म्हणून माझा सल्ला असा कि जेव्हाही लडाख ला जाल तेव्हा मोठा group बरोबर घेउन जा म्हणजे प्रवासाचा कंटाळा येणार नाही. असो. संध्याकाळी ४ च्या सुमारास त्सो मोरीरी पोहोचलो. त्सो मोरीरी हे एक व्यवस्थित गाव आहे. ईथे शेति वैगेरे होते. छोटी hotels अणि तंबू यांची सोय आहे. आम्ही hotel घेतले.
त्सो मोरीरी हेही एक अतिशय सुंदर सरोवर आहे. infact आम्हाला त्सो मोरीरी, पँगाँग पेक्षा जास्त आवडले कारण ईथे शेति, हिरवळ, पक्षी अशा अनेक गोष्टी सरोवराच्या सौंदर्यात भर घालत होत्या. त्सो मोरीरी ची संध्याकाळ तर अफलातून असते. आम्ही ताजेतवाने होउन सरोवराकाठी गेलो. भरपूर फिरलो. रात्रि त्सो मोरीरी येथे मुक्काम केला.
२१ ऑगस्ट - सकळी उठून ताजेतवाने होउन सरोवराकाठी गेलो. भरपूर फोटो काढले. दूपारी १२ च्या सुमारास पांग येथे जाण्यास निघालो. आम्ही मनालीस रस्त्याने जाणार होतो त्यामुळे आम्हास पांग येथे गाड्या बदलणे भाग होते. पांग येथे आमचा दूसरा चालक येणार होता जो आम्हाला मनाली ला नेणार होता. मनाली हिमाचल प्रदेशात आणि लडाख जम्मू आणि काश्मीर मध्ये असल्यामुळे ईकड्च्या tourist गाड्या तिकडे चालू शकत नाहीत. पण खाजगी गाड्यांना ही अट नाही.
पांग ला पोहोचल्यावर लक्षात आले की आमचा हिमाचल प्रदेशातला चालक आलेलाच नाही. लेह मधून निघताना आम्ही त्याच्याशी बोललो होतो. बरं, पांग हे पण एक तात्पूरते गाव होते. तिथे रस्त्याच्या एका बाजुला काहि तात्पूरते तंबू आणी दूसरया बाजूला army चा transit camp होता. पूर्ण लडाख भर mobile phones चालत नाहित. लेह मध्ये फक्त BSNL चे मोबईल फोन (त्यावेळी तरी) चालायचे आणि आम्ही आता लेह पासून ४०० km लांब होतो आणि संध्याकाळ झालेली. फोन करायची पण काही सोय नाही. ३ दिवसांनी आमचे दिल्ली वरुन हैदराबाद साठी विमान होते. पण तिथे असलेल्या जवान बांधवांनि आम्हाला धिर दिला. ते म्हणाले, की ईथुन सकाळी लेह वरुन निघणार्या व मनालीसाठी जाणार्या बरयाच गाड्या जातात. त्यातल्या काही गाड्यात तूमची सोय करून देतो. त्यांनि त्यांच्या बराकीत आम्हाला बोलाविले. अंघोळीची सोय करुन दिली. रात्रि जेवायली अंडा करी चा बेत बनविला. खूप आनंद वाटला.
२२ ऑगस्ट - सकाळी लवकर उठलो, पट्पट आवरले आणी गाडी शोधण्यासाठी रस्त्यावर आलो. गाड्या येत होत्या पण त्या सर्व फुल्ल भरलेल्या. गटागटाने जायचे म्हटले तरी जागा नव्हती. मग आमच्या जवान बांधवांनि आम्हाला दुसरा मार्ग सुचविला. लदाख हा भाग अतिदूर्गम असल्यामूळे वर लश्कराचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना सतत रसद पूरवावी लागते. ईंधन हे त्यातील एक. अंबाल्याला लश्कराचा मोठा डेपो आहे. त्यामूळे अंबाला - लेह - अंबाला अशी सतत tankers ची वर्दळ सुरू असते. त्यातले काहि रिकामे tankers परत अंबाल्याला चालले होते. आमच्या जवान बांधवांनि त्यातिल काहि tankers थांबविले आणि त्यामध्ये आमची सोय लावून दिली. आणि आम्ही गटागटाने ३ tankers मधून केलाँग, हिमाचल प्रदेश येथे निघालो. पांग ते केलाँग हाही एक अतिशय सुंदर रस्ता आहे. ह्या प्रवासाला "Trans Himalayan Safari" असे म्हणतात. हा प्रवास आम्ही tankers ने केला त्यामूळे वेगळाच अनूभव आला. सर्व tanker चालक पण अतिशय सज्जन आणि मनमिळावू होते. असे करुन संध्याकाळी ४ वाजता आम्ही केलाँग येथे पोहोचलो.
केलाँग मधील प्रकाशचित्रे आणि अनुभव, हे हिमाचल प्रदेश ह्या भागामध्ये.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या e-mail ID वर संपर्क साधावा -
communicate.anyway@gmail.com
--------------------------------------------------------------------------------
लडाख
लेह ला जाताना झालेले हिमालयाचे दर्शन
लेह चे प्रवेशद्वार
लेह च्या प्रवेशद्वारावरील नक्षी
लेह चा राजवाडा
शांति स्तुप : लेह
आम्ही अतिशय भाग्यवान होतो जे आम्हाला धर्मगुरु दलाई लामा यांचे दर्शन झाले.
लेह परिसर
सिंधु नदी
शे राजवाडा
ठिकसे मोनास्टरी
ठिकसे मोनास्टरी मधिल भित्तिचित्रे
ठिकसे मोनास्टरी मधिल भित्तिचित्रे
ठिकसे मोनास्टरी मधिल एक दरवाजा
हेमिस मोनास्टरी
स्तोक च्या राजवाड्यावरुन दिसलेला देखावा
खार्दुंग ला ला जाताना लागलेला रस्ता
लेह. उंचावरुन
खार्दुंग ला
खार्दुंग ला
खार्दुंग ला वरुन दिसलेला देखावा नुब्रा व्हॅली चा देखावा
नुब्रा व्हॅली चा रस्ता
नुब्रा व्हॅली च्या वाटेवर लागलेले एक गाव
एक झरा
याक
नुब्रा व्हॅली व नुब्रा नदी
नुब्रा व्हॅली
नुब्रा व्हॅली
नुब्रा मोनास्टरी
उंट (Double Humped Camels). नुब्रा व्हॅली
शित वाळवंट. नुब्रा व्हॅली
नुब्रा नदी व सियाचिन कडे गेलेला रस्ता
नुब्रा व्हॅली
एक मोनास्टरी
पँगाँग सरोवर
पँगाँग सरोवर
पँगाँग सरोवर
पँगाँग सरोवर
पँगाँग सरोवर
पँगाँग सरोवर
पँगाँग सरोवर
पँगाँग सरोवर
पँगाँग सरोवर
एक झरा
एक अनामिक तलाव
Himalayan Marmot
त्सो मोरीरी सरोवर
त्सो मोरीरी सरोवर
शेती. त्सो मोरीरी सरोवर
त्सो मोरीरी सरोवर
त्सो मोरीरी सरोवर
त्सो मोरीरी सरोवर
त्सो मोरीरी सरोवर
त्सो मोरीरी सरोवर
त्सो मोरीरी सरोवर
Reflection. त्सो मोरीरी सरोवर
फुलपाखरू. त्सो मोरीरी सरोवर
त्सो मोरीरी सरोवर संध्याकाळी
त्सो मोरीरी सरोवर संध्याकाळी
त्सो मोरीरी सरोवर संध्याकाळी
जंगलि खेचरे
एक संध्याकाळ आम्ही आपल्या जवान बांधवांबरोबर घालविली. त्यांनि आमच्यासाठी खास अंडाकरी चा बेत केला होता.
लेह - मनालि हायवे
लेह - मनालि हायवे
लेह - मनालि हायवे - समोर आणि बाजुला खूप खोल घळ आहे.
लेह - मनालि हायवे
अशी हि आमचि लडाख चि ट्रिप आम्ही लेह ला सुरु करुन केलाँग, हिमाचल प्रदेश येथे समाप्त केलि.
अतुल्य भारत - क्रमशः
पुढिल आकर्षण - शुभ्र काश्मीर.
चंदन साहेब.. एकदम सोन्यासारखे
चंदन साहेब.. एकदम सोन्यासारखे आहेत हो फोटो!
तुम्ही भाग्यवान!
आम्हालाही दाखवल्याबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतुल्य भारत आतुल्य फोटो.
अतुल्य भारत आतुल्य फोटो.
लिंबुटिंबु, लाल पाटीपाशी मि व
लिंबुटिंबु,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाल पाटीपाशी मि व माझी कारभारिण आहे.
जब्बरी फोटो! अक्षरशः कलर्स
जब्बरी फोटो!
अक्षरशः कलर्स ची मेजवानी....एवढे सगळे निसर्गाचे रंग लेह-लडाखलाच का बहाल केलेत काय कळत नाही बै! एकीकडे बंजर डोंगर तर तिथेच खाली हिरवागार परिसर! पहिला फोटो तर अगदी वेड लावणारा...बर्फावरील ऊन की उन्हातलं बर्फ?? ! आणि ते पॅगाँग सरोवर ...लिटरली पाचु विखुरलेले वाटतात एका फोटोत! एकदा बघुन मन भरत नाही... माझ्या आवडत्या/ निवडक १० मधे टाकतेय!
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.....
Simply Marvolous
Simply Marvolous
पहिल्याच फोटोंपासुन तुम्हि
पहिल्याच फोटोंपासुन तुम्हि सिक्सर मारायला सुरवात केलित ति शेवटच्या फोटोंपर्यंत. अतुल्य चंदन .
फोटो मस्तच. शांती स्तुपापासून
फोटो मस्तच. शांती स्तुपापासून जवळच राहतो आम्ही. तुम्ही कालीमाता मंदीरही पाहिलेत का? तेही छान आहे. तेथील देवांच्या मुर्ती वर्षभर झाकून ठेवलेल्या असतात, फक्त जानेवारीत ५-६ दिवस त्यांचे दर्शन घेता येते.
दुसरे असे की इकडील मायबोलीकर,
दुसरे असे की इकडील मायबोलीकर, खार्दुग वा अन्य ठिकाणी स्वतःच्या वाहनाने जाऊ शक्तील काय, याबद्दल मार्गदर्शन हवे,>>>>
अवश्य जून ते सप्टेंबर या काळात येऊ शकता. तेव्हा रस्तेही क्लिअर असतात आणि बर्फ नसल्याने सृष्टीसौंदर्यही अनुभवु शकता.
कदाचित इकडील काही आयड्या, एखाए जीटीजी खार्दुर्ग लाही ठेवू शकतील असा विश्वास आहे >>> व्हॉट अॅन आयडिया सरजी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंडळी, मी ईथे प्रवासवर्णन
मंडळी,
मी ईथे प्रवासवर्णन समाविष्ट केले आहे. तसेच आणखिन काही प्रकाशचित्रे टाकली आहेत. आशा आहे तुम्हाला आवडतिल.
चंदन
प्रवासवर्णन उपयुक्त
प्रवासवर्णन उपयुक्त आहे....धन्यवाद चंदन.
आणि हो... नंतर ऎड केलेले फ़ोटोही पहिल्यासारखेच अतुल्य आहेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता काष्मिर पहायची उत्सुकता लागली!
प्राची, कालीमाता मंदीर नाही
प्राची,
कालीमाता मंदीर नाही बघता आले.
होय, तुम्ही पूर्ण लडाख स्वतः च्या वाहनाने फिरू शकता. पण त्यासाठी हिमालयातला driving अनुभव हवा. आपली घाटातली driving आणि हिमालयातली driving यामध्ये जमिन आस्मानाचा फरक आहे.
आहाहा! लाजबाब! ती शिखरे तर
आहाहा! लाजबाब! ती शिखरे तर चक्क सोन्याने मढवल्यासारखी दिसतायत चक्क! डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये! फोटोत इतके सुंदर दिसतेय तर प्रत्यक्ष किती दिसत असेल?
प्रवासवर्णनपण आवडले.
प्रवासवर्णनपण आवडले.
कायच्या काही फंडु फोटो!
कायच्या काही फंडु फोटो! अहाहा! क्या बात है!
सत्य हे कल्पनेपेक्षाही जास्त सुंदर आहे.
फोटो सुंदरच
फोटो सुंदरच आहेत.अप्रतिम..!!!!!!!!!!!!!
सॉरी यार, उशीरच झाला हे
सॉरी यार, उशीरच झाला हे वाचायला. बेफाम आवडलं. फोटो तर खल्लास आहेत. प्लीज जास्त वेळ नलो लावू पुढचे भाग टाकायला...
मस्त फोटो ! मी ६
मस्त फोटो ! मी ६ महिन्यांपूर्वीच ही ट्रिप केली...फोटो बघताना पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. या वर्षी पुन्हा जायचा विचार आहे. बघू या जमते का..त्या वेळी नुब्रा ला जायला जमले नव्ह्ते..अति बर्फामुळे! या वेळी नुब्रा आणि त्सो मोरीरी करायचा विचार आहे.
डोळ्याचे पारणे फिटले!
डोळ्याचे पारणे फिटले! अप्रतिम!!
काय रापचीक फोटोज आहेत यार !
काय रापचीक फोटोज आहेत यार ! पार येडा झालो मी फोटो बघुन !!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाद खुळा... खरचं खुप खुप
नाद खुळा... खरचं खुप खुप मज्जा आली.... बघताना आणि वाच्ताना... आणि प्रचंड अभिमान वाटला..... धन्यवाद...
चंदन.. वर्णन लिहिल्याबद्दल
चंदन.. वर्णन लिहिल्याबद्दल धन्यवाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चंदन , हे सृष्टीसौंदर्य
चंदन , हे सृष्टीसौंदर्य आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद .पुन्हा पुन्हा फोटो पाहिले .सगळे फोटो
फार फार आवडले .
एकदम नादखुळा केलसा बग
एकदम नादखुळा केलसा बग
चंदन.. प्रवासवर्णन
चंदन.. प्रवासवर्णन लिहिल्याबद्दल धन्यवाद उपयुक्त आहे.....
असुदे, काश्मिर च्या भागावर
असुदे,
काश्मिर च्या भागावर काम करतो आहे. मार्च च्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शीत करण्याचा विचार आहे.
अप्रतिम . केवळ
अप्रतिम . केवळ अप्रतिम.
टेरिफीक.
अप्रतिम , निव्वळ अप्रतिम...
अप्रतिम , निव्वळ अप्रतिम...
मस्तच....
मस्तच....
अप्रतिम पहिला फोटो तर भारीच
अप्रतिम
पहिला फोटो तर भारीच आहे.
प्रत्येक फोटो हा खास आहे. लेह-लदाखला जायची इच्छा आहेच पण हे फोटो पाहिले की वाटत की आपल्या जाण्याने तिकडची शांतता भंग तर होणार नाही ना.
अतुल्य भारत अतुल्य प्रकाशचित्रे!!
फोतोतिल सरोवराजवल ३ idiots चे
फोतोतिल सरोवराजवल ३ idiots चे shooting झाल का? फोतो छान!!
Pages