आमचा(बी) व्यसनी बाप
ही ह्या कविते(?)ची प्रेरणा!
हे हटकेश्वरा, कंपूशेठ फलकाण्या, हिरवट फोकनाडेश्वरी माते आणि
बाराहून खास भगतगणाला, उदा: डोंमकावळ्याला भेटायला आलेल्या सरकोजीदेवा...
तुम्हाला चांगलच माहिती आहे
मायबोलीवर काय चाल्लंय ते
तरीपण.....
आमचा बाप काडेल आणि मायबोलीचा व्यसनी
ID अजून शाबूत आहे.
नाहीतर कधीच 'अंतू' आणि 'हवालदार'सारखा
पार्श्वभागावर हाणल्या जाऊन गचकला असता.
बापाचा मायबोलीवर लई जीव!
इतका, की हापिसात कामचुकार्या करून
आणि घरी मायपासून चोरून लपून मायबोलीवर टवाळक्या कराव्या.
आमच्याबी टाळक्यात चमकतं कधीकधी, अजून बाप आहे, मग आम्ही पुसतो,
"बापुजी, डोळे फुटाया आले, आता पुरे मायबोली!"
आमचा बाप मग कवटी सरकून खेकसतो,
"लमडीच्या, मी इथं मायबोलीवर पडीक म्हणून
म्हणून तुम्हाला रान मोकळं मिळतं ना? मग बोंबलता कशाला?"
आम्ही म्हणतो, "ते बी खरंच!"
एका टायमाला म्हणे आमच्या बापाचा मायबोलीवर लई रुतबा होता.
(असं काही डुप्लिकेट आयड्या सांगतात.)
आम्हाला कसं माहित असणार?
आम्हाला आठवतं ते मायनं बाजारात पाठवलं तर
किती पोष्टी वाचायच्या राहतील ह्याच्या चिंतेतला बाप!
परवा मायबोलीवरचा एक आयडी भेटला.
व्यसनानं झिंगलेला, साथीला २-४ डुप्लीकेट आयड्या आणि पासवर्ड घेऊन बसलेला.
आम्ही पुसलं, कारं मर्दा?
आयडी म्हणला, गेला महिना वंगाळ गेला, सगळ्यांनी अनुल्लेख केला.
आम्ही बोललो, अनुल्लेख केला तर तोंड घालता कशाला?
तर आयडी म्हणाला, "पूर्वापार सवय आहे, आत्ताच कसं सोडणार?"
आम्ही म्हणालो, "मरा मग!"
तसा आयडी म्हणाला, "मेलो तरी बेहेत्तर, नव्या आयडीनं येईन".
आम्ही म्हणालो, "ते बी खरंच!"
एवढं काय हे व्यसन समजत नाही.
म्हणून पुन्हा बापाकडे वळलो,
"बापूजी, शिव्या खाता, टोमणे खाता, तरी जाता कशाला ?"
आमच्या बापानं सुजक्या डोळ्यांनी पाहिलं, म्हणाला :
"माझी औलाद असशील तर तू पण मायबोलीवर घूस!"
आम्ही म्हणालो, "ते बी खरंच!"
बाप अजूनही मायबोलीवर येतो.
हे हटकेश्वरा, कंपूशेठ फलकाण्या, हिरवट फोकनाडेश्वरी माते आणि
बाराहून खास भगतगणाला, उदा: डोंमकावळ्याला भेटायला आलेल्या सरकोजीदेवा...
आता तुम्हाला तर माहितीच आहे,
एकतर बापाला मायबोलीवरून जायची बुध्दी द्या,
नाहीतर मी घ्यावा असा दुसरा आयडी सुचवा,
हात जोडतो देवा!
(No subject)
(No subject)
पण ते फोकनाडी म्हणजे काय?
पण ते फोकनाडी म्हणजे काय?
दंडवत माये
दंडवत माये
केश्विनी, फोक्या मारणे असा एक
केश्विनी, फोक्या मारणे असा एक वर्हाडी शब्द आहे. अर्थात बनवाबनवी करणे. त्यावरुनचं फोकनाड्या हा शब्द आला असावा.
(No subject)
(No subject)
मेलो तरी बेहेत्तर, नव्या
मेलो तरी बेहेत्तर, नव्या आयडीनं येईन >>
माझी औलाद असशील तर तू पण मायबोलीवर घूस >>
बाप रे बाप, अशक्य.
माझे नाव कंसात का घातले कळले नाही!!!!! >>
अरे बी, नुसतं शीर्षकातच नाही; तर तेराव्या, अठराव्या, बत्तीसाव्या आणि अडतिसाव्या ओळींत पण मला तुझं नाव दिसलं!!!!!!
(No subject)
छे छे , या कवितेचा नायक
छे छे , या कवितेचा नायक वेगळाच आहे. आमी वळिखलं !
मृण्मयी... धन्य आहेस.. मस्तच
मृण्मयी... धन्य आहेस.. मस्तच जमली आहे कविता..
(No subject)
धन्यवाद मंडळी! बी, तुझ्या
धन्यवाद मंडळी!
बी, तुझ्या आयडीला कंसात घालायचं तर साधा कंस नको, महिरपी कंस हवा की नाही?
मॄ
मॄ
धन्य आहेस मृ!!! हे असलं
धन्य आहेस मृ!!!

हे असलं विडंबन तूच आणि तूच करू जाणे!!!!
अशक्य मृ...
मृ, कहर आहेस
मृ, कहर आहेस
लै लै भारी...
लै लै भारी...
:हहगलो: :हहगलो: पाचपैकी पाच
पाचपैकी पाच तारे
धन्यवाद ट्यु, पन्ना, भाग्य,
धन्यवाद ट्यु, पन्ना, भाग्य, फचिन, मुटेजी आणि झकास!!!
यसन लागलं की सोडवना...
यसन लागलं की सोडवना...
मृ, व्यसनी बाप परतलाय माबो वर
मृ, व्यसनी बाप परतलाय माबो वर
धन्य आहे तुझी!..
धन्य आहे तुझी!..
हास्यकल्लोळ.
हास्यकल्लोळ.
अशक्य..... खुप खुप
अशक्य.....

खुप खुप हसलो..... तुझं खुप कौतुक.....
(No subject)
हसून हसून वाट लागली... मस्तच
हसून हसून वाट लागली... मस्तच
(No subject)
लय भारी. कोपरापासुन _/\_
लय भारी. कोपरापासुन _/\_
कालातीत !!
कालातीत !!
Pages