आमचा(बी) व्यसनी बाप
ही ह्या कविते(?)ची प्रेरणा!
हे हटकेश्वरा, कंपूशेठ फलकाण्या, हिरवट फोकनाडेश्वरी माते आणि
बाराहून खास भगतगणाला, उदा: डोंमकावळ्याला भेटायला आलेल्या सरकोजीदेवा...
तुम्हाला चांगलच माहिती आहे
मायबोलीवर काय चाल्लंय ते
तरीपण.....
आमचा बाप काडेल आणि मायबोलीचा व्यसनी
ID अजून शाबूत आहे.
नाहीतर कधीच 'अंतू' आणि 'हवालदार'सारखा
पार्श्वभागावर हाणल्या जाऊन गचकला असता.
बापाचा मायबोलीवर लई जीव!
इतका, की हापिसात कामचुकार्या करून
आणि घरी मायपासून चोरून लपून मायबोलीवर टवाळक्या कराव्या.
आमच्याबी टाळक्यात चमकतं कधीकधी, अजून बाप आहे, मग आम्ही पुसतो,
"बापुजी, डोळे फुटाया आले, आता पुरे मायबोली!"
आमचा बाप मग कवटी सरकून खेकसतो,
"लमडीच्या, मी इथं मायबोलीवर पडीक म्हणून
म्हणून तुम्हाला रान मोकळं मिळतं ना? मग बोंबलता कशाला?"
आम्ही म्हणतो, "ते बी खरंच!"
एका टायमाला म्हणे आमच्या बापाचा मायबोलीवर लई रुतबा होता.
(असं काही डुप्लिकेट आयड्या सांगतात.)
आम्हाला कसं माहित असणार?
आम्हाला आठवतं ते मायनं बाजारात पाठवलं तर
किती पोष्टी वाचायच्या राहतील ह्याच्या चिंतेतला बाप!
परवा मायबोलीवरचा एक आयडी भेटला.
व्यसनानं झिंगलेला, साथीला २-४ डुप्लीकेट आयड्या आणि पासवर्ड घेऊन बसलेला.
आम्ही पुसलं, कारं मर्दा?
आयडी म्हणला, गेला महिना वंगाळ गेला, सगळ्यांनी अनुल्लेख केला.
आम्ही बोललो, अनुल्लेख केला तर तोंड घालता कशाला?
तर आयडी म्हणाला, "पूर्वापार सवय आहे, आत्ताच कसं सोडणार?"
आम्ही म्हणालो, "मरा मग!"
तसा आयडी म्हणाला, "मेलो तरी बेहेत्तर, नव्या आयडीनं येईन".
आम्ही म्हणालो, "ते बी खरंच!"
एवढं काय हे व्यसन समजत नाही.
म्हणून पुन्हा बापाकडे वळलो,
"बापूजी, शिव्या खाता, टोमणे खाता, तरी जाता कशाला ?"
आमच्या बापानं सुजक्या डोळ्यांनी पाहिलं, म्हणाला :
"माझी औलाद असशील तर तू पण मायबोलीवर घूस!"
आम्ही म्हणालो, "ते बी खरंच!"
बाप अजूनही मायबोलीवर येतो.
हे हटकेश्वरा, कंपूशेठ फलकाण्या, हिरवट फोकनाडेश्वरी माते आणि
बाराहून खास भगतगणाला, उदा: डोंमकावळ्याला भेटायला आलेल्या सरकोजीदेवा...
आता तुम्हाला तर माहितीच आहे,
एकतर बापाला मायबोलीवरून जायची बुध्दी द्या,
नाहीतर मी घ्यावा असा दुसरा आयडी सुचवा,
हात जोडतो देवा!
फोकनाडेश्वरी माते
फोकनाडेश्वरी माते
तूफान!!!! बर्याच दिवसांनी
तूफान!!!! बर्याच दिवसांनी "फोकनाड्या" शब्द ऐकला!
>>आम्ही म्हणालो, "मरा
>>आम्ही म्हणालो, "मरा मग!"
तसा आयडी म्हणाला, "मेलो तरी बेहेत्तर, नव्या आयडीनं येईन".
आम्ही म्हणालो, "ते बी खरंच!"
>> फोकनाडेश्वरी माते
!!!
(No subject)
कोपरापासुन _/\_
कोपरापासुन _/\_ :d
(No subject)
(No subject)
हे बी खरंच
हे बी खरंच
(No subject)
लय भारी
लय भारी
ह्या सगळ्या शिव्या आहेत ना
ह्या सगळ्या शिव्या आहेत ना कुठल्यातरी भाषेत... कुठल्यातरी मूवीत एकल्या होत्या.
>>फलकाण्या वगैरे<<
ह्ये बी खरंच....फक्कड जमलंय
ह्ये बी खरंच....फक्कड जमलंय बगा....:हहगलो:
लै भारी .
लै भारी .
ते "बी" खरंच
ते "बी" खरंच
मजा आली वाचताना.
मजा आली वाचताना.
(No subject)
(No subject)
लै भारी. शरद
लै भारी.
शरद
(No subject)
एक नंबर...
एक नंबर...
एक नंबर..
एक नंबर..
मी इथं मायबोलीवर पडीक
मी इथं मायबोलीवर पडीक म्हणून
म्हणून तुम्हाला रान मोकळं मिळतं ना>>>> अगदी अगदी.
(No subject)
(No subject)
आम्हाला कसं माहित
आम्हाला कसं माहित असणार?
आम्हाला आठवतं ते मायनं बाजारात पाठवलं तर
किती पोष्टी वाचायच्या राहतील ह्याच्या चिंतेतला बाप!
>>> जबरी!
चांगले आहे विडंबन. माझे नाव
चांगले आहे विडंबन. माझे नाव कंसात का घातले कळले नाही!!!!! (:
(No subject)
साष्टांग _/\_ माझे नाव कंसात
साष्टांग _/\_
माझे नाव कंसात का घातले कळले नाही!>>>> मलाही आधी तसेच वाटले!
(No subject)
:हहगलो:
Pages