१. ३ कप traditional 100% oats,
२. पाव कप organic flax seed(म्हणजेच जवस, म्हणजेच आळशी वगैरे),
३. पाव कप organic wheat germ,
४. आपल्या आवडीचे नट्स्(मी बदामाचे काप अवन रोस्ट करून घेते वेगळे; अक्रोड व पिकॅन तसेच टाकते कारण ते भाजले की कडवट होतात.),
५. अर्धा कप मध (मी आणखी चवीला organic maple unsweetned सिरप्स घेते),
६. १ मोठा चमचा दालचिनी (हि नेहमी खावी चिमूटभर ,insulin maintain करते नॅचरली),
७. अर्धा कप ताजा केलेला संत्रा ज्युस,
८. काळे मनुके
९. साखरविरहित सुक्या बेरीज कुठल्याही आवडिच्या,
नोटः (wheat germ मध्ये लोह असते फोलीक अॅसीड च्या फॉर्म मध्ये, बायकांना ते खूप चांगले. नेहमी हे सॅलड मध्ये पण घालून खावे.)
ह्याच्यात कुठलेच तेल व कृत्रीम साखर नसल्याने हेल्दी आहे.
कृती:
सर्वात आधी १ तास तरी एका बोल मध्ये ज्युस व मध(नाहीतर मेपल सिरप) टाकून फेसायचे. मग मध वितळले की बाजूला ठेवायचे. ह्यात काळे बेदाणे, नट्स भिजत ठेवायचे.
१. अवन ३२५ वर सेट करून मग कामाला लागायचे.
२. नंबर १,२,३ आणि ६ हाताने मस्त एकत्र करायचे. त्यावर हे संत्रा मध मिश्रण ओतायचे. हातानेच चांगले मिक्स करायचे. मग ओपन ट्रे मध्ये मिश्रण टाकून ओवन मध्ये ठेवायचे. मधून मधून ढवळायचे. जरा वास आला की बेरीज मिक्स करून मग पुन्हा आत ठेवायचे. मस्त ग्रॅनोला तयार. टोटल वेळ २५-३० मिनीटे लागतात. पुर्ण थंड करूनच डब्यत भरायचा. फ्रीजमध्ये ३ महिने टिकलाय माझा. बाहेर १ महिना. अॅकच्युली टिकतो तसा पण मी फ्रीजमध्ये ठेवते. मी तर घेवूनच फिरते कामासाठी इथे तिथे फिरताना. दही व ताजी स्ट्रॉबेरी,ब्लुबेरी टाकून मस्त वाटते खायला.
नाहीतर आमंड मिल्क टाकून सुद्धा मस्त लागते.
दही ग्रॅनोला रेसीपी:
घट्ट दही घ्यायचे,जरा फेटायचे. त्यात हा ग्रॅनोला मग ताजी बेरीज कापून टाकायच्या. झाले तयार.
१. तुम्हाला आणखी तुमच्या चवीचे बनवायचे असेल तर कोको पॉवडर वगैरे टाकू शकता.
२. हवे त्या बेरीज टाका.
३. लेयर पातळ करून ठेवा मग मस्त कुरकुरीत होतो.
मस्तच ! मला ग्रनोला खूप
मस्तच ! मला ग्रनोला खूप आवडते.
छान कृती मनु. दही केव्हा
छान कृती मनु. दही केव्हा टाकायचे?
मनु फोटो टाकशिल का? मला हा
मनु फोटो टाकशिल का?
मला हा पदार्थ कसा दिसतो तेही माहित नाही. म्हणुन विकीवर पाहिले तर मोकळे कॉर्न वगैरेसारखे काहितरी दिसले.
wheat germ म्ह्नंजे राजगीरा
wheat germ म्ह्नंजे राजगीरा का
ग्रनोला बार आपल्या
ग्रनोला बार आपल्या चिक्कीसारखा असतो दिसायला साधनाताई.
मी फोटो टाकते रात्री.
मी फोटो टाकते रात्री.
wheat germ सोडुन सगळे आहे
wheat germ सोडुन सगळे आहे घरात. wheat germ आणुन या विकएंडला करुन बघते आता.
रेसेपी बद्द्ल धन्यवाद
मनःस्विनी मी कोको टाकुन करुन
मनःस्विनी मी कोको टाकुन करुन बघेन. मुलांना आवडले तर विकतचे बंद
रेसिपीसाठी धन्यवाद.
मनु, काल तुझ्या रेसिपीने
मनु, काल तुझ्या रेसिपीने ग्रनोला केला. माझ्याकडे मृच्या फ्लॉरिडाहून आणलेला ऑरेंज ब्लॉसम मध होता त्यामुळे ऑरेंजज्युस वापरला नाही. जरा ओव्हरबोर्ड जाऊन बदाम आणि काजू घातले. एकदम मस्त. आता रोज सिरिअल म्हणून हाच ग्रनोला. माझ्या नवर्याला एरव्ही ओटस गळ्याखाली उतरायचे नाहीत. पण हा ग्रनोला एकदम भारी. धन्यवाद.
मनःस्विनी, आर्च हे अवनमध्ये
मनःस्विनी, आर्च हे अवनमध्ये किती वेळ ठेवायचे? आज करुन पहायचा विचार आहे?
अग थोडं ब्राऊन होईपर्यंत
अग थोडं ब्राऊन होईपर्यंत ठेवल होतं २० -२५ मिनीटं लागली. मधून मधून हलवलं.
एकदम मस्त होतं.
धन्यवाद. अरे हो वरती मी
धन्यवाद. अरे हो वरती मी लिहिले नाही का टोटल वेळ २५-३० मिनीटे लागतात. बदाम आहेत कि वर लिहिलेले.
खरे तर मी सुद्धा काजू घालते मला आवडतात म्हणून पण कॅलरीज इथे लो कॅलरी ग्रॅनोला लिहिलेय हणून नाही लिहिले.
यातच थोडा काहि बदल करुन बार
यातच थोडा काहि बदल करुन बार बनवता येइल का लो कॅलरीजवाला??
मनु, अग तू बदाम लिहिलेलच आहे.
मनु, अग तू बदाम लिहिलेलच आहे. पण मी जरा जास्तच घातले बदाम असं म्हणायचं आहे.
प्रिया, बारची रेसीपी जरा
प्रिया, बारची रेसीपी जरा वेगळी आहे ,लिहिते थोड्या वेळाने..
मी बकवीट,बारली व ओटस असा बार बनवत. बारली मस्त मक्यासारखी फुलवते. अतीशय मस्त बार लागतात
हो का? मी जस्ट साधनाताईंना
हो का? मी जस्ट साधनाताईंना कल्पना यावी म्हणून लिहीलं.
आणि ए ते दहीचं नव्हतं गं माहीती. छान आयडीया. पुढच्या वेळेस बघेन करून. धन्यवाद.
काले केले हे एकदम मस्त झालेत.
काले केले हे एकदम मस्त झालेत. मी दोन वरायटी केले एक मुलांसाठी कोको घालुन(नो नट्स), दुसरे आमच्यासाठी (नो कोको)
धन्यवाद!
मी करुन पाहते ह्या विकांताला.
मी करुन पाहते ह्या विकांताला. वाचुन एकदम खावीशी वाटतेय.
मनु, मी पण केला हा ग्रनोला
मनु, मी पण केला हा ग्रनोला मस्तच झाला. सही रेसीपी आहे तुझी. मी थोडी ब्राऊन शुगर घातली. छान लागतो आहे.
मनःस्विनी ग्रनोला बार चि
मनःस्विनी ग्रनोला बार चि रेसीपी टाकशील का?
अगदी मस्त रेसिपी! मनु, मी
अगदी मस्त रेसिपी! मनु, मी सुकलेल्या क्रॅनबेरीज वापरल्या. पोर नुसती येता जाता चरताहेत हा ग्रनोला. तुझे मनापासून आभार!
धन्यवाद कळवल्याबद्दल. हो
धन्यवाद कळवल्याबद्दल. हो ना...? माझी बहिण ढूंकून बघत नाहीत ओटमील दिले तर... आता मी करून ठेवते व पाठवते तर खाते आवडीने.
wheat germ म्ह्नंजे राजगीरा
wheat germ म्ह्नंजे राजगीरा का ?
मी काल केला हा ग्रॅनोला.
मी काल केला हा ग्रॅनोला. पहिल्यांदाच असा पदार्थ केला जो आधी बघितलाही नाही आणि खाल्लाही नाही कधी..
इथला संत्र्याचा मौसम गेला म्हणुन मोसंबी वापरली, तीही खास नाहीयेत असा इशारा फळवाल्याने दिलेला घेतानाच. पण ठिक होती.
wheat germ इथे मिळत नाही, म्हणुन ते रद्द.
रचु, wheat germ म्ह्नंजे राजगीरा नाही. गव्हात असते हे wheat germ
जवस आणले बाजारातुन त्यात खुप माती होती. साफ करतानाच बोटे इतकी काळी झाली की तसेच वापरायला जीवावर आले, म्हणुन चाळणीत घालुन धुतले. त्यामुळे एक बुळबुळीतपणा आला त्यांना. तसेही मध्+रस यात घातल्यावर बुळबुळीत झालेच असते.
घरात होते ते नट्स म्हणजे काजु, बदाम, अक्रोड घातले. काळ्या मनुका घातल्या. ड्राय बेरीज इथे मिळत नाही त्यामुळे तेही रद्द
डाबर हनी वापरले घरी होते म्हणुन.. त्याचा स्वाद मला आवडत नाही. मला फक्त ग्रामोद्योग भवनमधले मध आवडते.
तर हा असा माझा ग्रेनोला तयार केला. चव ठिक वाटली. अगदीच काही टाकावु झाला नाही. अजुन थोडा कुरकुरीत झाला असता तर अजुन छान वाटला असता. पुढच्या वेळेस इम्प्रोवमेंट करायचा प्रयत्न करेन
कोणी केला की नाही हा
कोणी केला की नाही हा ग्रॅनोला. अगदी मस्त रेसिपी. मी खुप वेळा केलाय. कितीही केला तरी भर्र कन संपतो
(मनु कुठे गेलीय? गेले तिन वर्षे ती आली नाहीय माबोवर )
इथे पण जवस म्हणजे आळशी.
इथे पण जवस म्हणजे आळशी.
कोणी फोटो टाकता का फोटो? ??
कोणी फोटो टाकता का फोटो? ??
मी गेल्या काही वर्षात
मी गेल्या काही वर्षात कित्येकदा केलाय. लेकीला डबे भरुन करुन देते. आता केला की नक्की फोटो टाकते.
साधना ताई, तुमची ही कृती आणि
साधना ताई, तुमची ही कृती आणि फोटो टाका ना..
विना अवन करता येईल का ?