Submitted by mona_somkuwar on 27 January, 2010 - 12:39
नसतानां ही स्पर्श तुझा गं, जेव्हा छेळून जातो
परत पुन्हा त्या स्मरणानी, हळूच ओलावा येतो....
लक्षात येत, तुला बघाया, कसाबसा मी व्हायचो
आणि समोर येता तु, मात्र लपून बसायचो....
नजरभेट होता वेळी, मन दडपडून बसायचं
तु गेल्यावरही मात्र, ते तुझ्याशीच बोलायचं....
दूर तुला जाऊ बघतानां, येई डोळ्यात पाणी
आणि काही बोलण्याआधि, येई कंठ दाटुनी....
वाट तुझी गं बघता बघता, वाटांवरही त्या झालाय काळोख
तुला जवळ मी जपता जपता, विसरून गेलो माझी ओळख....
राहूनी गेले तुझ सागांया, शब्द जे माझ्या मनी
ठाऊक नाही होईल का गं, भेट या जीवनी....
--- मोना सोमकुवर
गुलमोहर:
शेअर करा
ओ मो ना ही कसली कथा
ओ मो ना ही कसली कथा
हि कथा नाहि कविता आहे. हि
हि कथा नाहि कविता आहे.
हि कविता विभागात पोस्ट करावी हि विन्नती.
मस्त आहे कविता.
मस्त आहे कविता.
कसली का असेना ...मला तर आवडली
कसली का असेना ...मला तर आवडली ....बाबा !! मोना ....प्रतिसादाच्या संख्येवर काही अवलंबुन नाही बरं का !