हिंदी चित्रपटातील उत्तम रित्या चित्रीत झालेली गाणी

Submitted by दिनेश. on 16 November, 2009 - 17:21

गाणी आणि नृत्य, हा अनेक वर्षे हिंदी चित्रपटाची खासियत राहिलेली आहे. अर्थवाही शब्द, सुयोग्य चाल आणि गायकाची कारागिरी, याना पुरेपूर न्याय देणारे चित्रीकरण अनेकवेळा झालेय. इथे आपण अश्या गाण्यांची चर्चा करु. या चित्रीकरणात, नेमके काय आवडले, तेच लिहायचे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही ते गाणं न पाहता फक्त ऐकलं ते बरं झालं मामी Happy कारण पडद्यावरचं चित्र असं आहे की गाण्याकडे लक्ष जाऊ नये! न ऐकता पाहता बन्द करावे Happy
केजो चा चित्रपट विथ शाहरुख आणि काजोल म्हटल्यावर कल्पनाशक्तीला कोणताही ताण न देता कुणीही जे इमॅजिन करेल तेच ते तेच ते आहे या गाण्यात पडद्यावर !!काजोल हिरवा पंजाबी घालून तिचे ते टिपिकल चकणे डोळे, भुवया, तोंड वेडावणे वगैरे करून ख्यॅ ख्यॅ खिदळत आहे. हाताला मेंदी. बरोबर मैत्रिणी. लांबून बघणारा क्लीन शेव्हन , विचित्र दिसणारा एसार्के. (ऑटिझम आहे वाटते या सिनेमात त्याला)

मि. इन्डियामधल ते गाण ज्यात श्रीदेवीने मुलांचा फुटबॉळ काढुन घेतला आहे आणि परत देत नाही ते गाण फर्मास आहे.
श्रीदेवी आणि सगळ्या बच्चे कंपनीने त्यात मजा आणली आहे. Happy

लग्नानंतर काजोल परत भुमिका करू लागली, त्यावेळी खुप आनंद झाला होता. पण ती टिपिकल भुमिकाच करतेय. खरे तर नर्गिस एवढी कुवत आहे तिची. अगदी एकटीच्या खांद्यावर ती सर्व डोलारा पेलू शकते, पण ....

आज प्रेमपुजारी मधले, शोखियोंमे घोला जाये, ऐकत होतो. काय सुंदर शब्द, किती सुंदर चित्रीकरण, जाळीत पकडलेले फुलपाखरू, नंतर उडून जाते, त्यावेळचा एस्डीचा मस्त पीस. हाय !!

माझं आवडतं गाणं... पल भर के लिए कोई हमे प्यार कर ले...ऐकायला छान वाटतं..बघायला पण खुप गमतीशीर आहे.. खट्याळ देव आनंद अन् स्वप्न सुंदरी हेमा अन् त्या असंख्य खिडक्या Happy

आज प्रेमपुजारी मधले, शोखियोंमे घोला जाये, ऐकत होतो. काय सुंदर शब्द, किती सुंदर चित्रीकरण, जाळीत पकडलेले फुलपाखरू, नंतर उडून जाते, त्यावेळचा एस्डीचा मस्त पीस. हाय !!

आज सकाळी ब्४य वर नेमके हेच गाणे दाखवत होते.... Happy

b4u chanel वर सकाळ संध्याकाळ जुन्या हिंदी चित्रपटातली गाणी without stupid commercial break दाखवत असतात. इच्छुकांनी लाभ घ्यावा Happy

काल जितेन्द्र चे 'दिलमे SSSSSSSsक्या है' हे गाणे दाखवले. अतिशय टाईट शर्ट, त्याच रंगाची टाईट निमुळती पॅंट, त्याच रंगाचे शुज घालुन तो जी कवायत करत होता त्याला नयनरम्य नक्कीच म्हणता येणार नाही, पण डोळे हलतही नव्हते त्याच्यावरुन हेही खरेच.. काल बहुतेक जितेंद्रचीच दाखवली.. त्यात त्याचे आणि नंदाचे 'के हमतुम जोडीसे....जैयो कहा ए हजुर.. ' हे गाणे पण होते.. त्यात पण काय नाचलाय.. नंदाला नुसता धरून गदागदा हलवत होता सोबत....

लक्ष्य चित्रपटातील "मै ऐसा क्यूं हूं" हे गाणं बाकी कसं ही असलं तरी मला पहायला आवडतं कारण त्याची कोरियोग्राफी अफलातून आहे..

लक्ष्य चित्रपटातील "मै ऐसा क्यूं हूं" हे गाणं बाकी कसं ही असलं तरी मला पहायला आवडतं कारण त्याची कोरियोग्राफी अफलातून आहे..

अरे त्याचा मधला तो पिस आहे ना, तो तर मला भन्नाट आवडतो.... आणि ते गाणं बाकी कसंही नाहीये गं.. हृतिक काय दिसलाय आणि नाचलाय जबरा त्यात...

बेबे दिसलाय बोरंच बरं, (म्हणजे त्याच्या इतर सिनेमात दिसतो त्यापेक्षा) टोप का घातलाय कोण जाणे. पण नाचलाय जबरदस्त Happy

बेबे दिसलाय बोरंच बरं, (म्हणजे त्याच्या इतर सिनेमात दिसतो त्यापेक्षा)

काय गं असं करतेस.. मला आवडतो ब्वा तो.... Wink

मै ऐसा क्यु ची कोरिओग्राफी, प्रभु देवा ची आहे. त्यातले ते प्रीति झिंटा बरोबरचे गाणे, अच्छे लगते हो, पण छान चित्रीत झालेत. हृतिकचे शरीर खुपच लवचिक आहे.
धूम २, मधल्या धूम मचाले च्या काहि स्टेप्स बघताना असे वाटते कि याने स्वतःचा तोल कसा सावरला असेल ?

शर्मिला चे कुछ ऐसी भी बाते होती है, आवडतं. पण त्या गाण्याच्या शब्दांमधे जे गूढ आहे, आणि लताने जी जान ओतलीय, त्याला न्याय मिळालाय असे वाटत नाही. अनुपमा मी बघितला नाही, या गाण्याचा संदर्भ मला माहीत नाही, तरीपण लता ची कारागिरी काय सांगावी, कलियोंसे कोई पूछता, या ओळीनंतर, हसती है या वो रोती है, अशी ओळ येते, त्यातल्या रोती शब्द लताने खासच उच्चारलाय, त्या मानाने शर्मिला, फिकी पडते.

मला ते जितेंद्रचे , 'कितना प्यारा वादा है इन मतवाली आंखो का"( सुरुवातीला मी 'हिम्मतवाली आंखो का' असे म्हणायची.. त्या चुकीचे एकलेले गाणेवर जायला पाहिजे) आवडते.दोघे पण एकदम मस्त धुम्दीत आहे, बाहेर वातावरण एकदम मस्त.. मस्ती करायला साजेसे.. Happy

आशा पारिख आवडायची नाही पण हे गाणे बघायला टाईमपास आहे. एकदम मस्ती मध्ये आपल्यालाही नाचावेसे वाटेल.. आंगातला आळस काढायला उत्तम.:)

त्यातले ते प्रीति झिंटा बरोबरचे गाणे, अच्छे लगते हो,
>>
अगर मै कहूं (कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट)

धूम २, मधल्या धूम मचाले च्या काहि स्टेप्स
परत एकदा कोरिओग्राफी- वैभवी मर्चंट

लक बाय चान्स मधलं बावरे पण तिचंच...

..

अनुपमा अप्रतिम आहे... मी एकदाच पाहिलाय. आता कुठे सिडी मिळाली तर पाहायला पाहिजे.

त्यात शर्मिलानेही उत्तम काम केलेय.. तिचे बोलणे खुप कमी आहे ह्या चित्रपटात. इन्फॅक्ट हे गाणे येईपर्यंत मला वाटलेले की ती मुकी आहे चित्रपटात.. हे गाणेच हा तिचा पहिला संवाद आहे.

पण गाण्यात जे काय आहे ते पडद्यावर कोणीही अभिनेत्री असती तरीही तेवढ्या प्रभावीपणे व्यक्त करू शकली नसती असे माझे मत आहे..

दिल की तसल्ली के लिये,
झुठी चमक झुठा निखार...
जीवन तो सुना ही रहा,
सब समझे आई है बहार....

कलीयोंसे कोई पुछता, हँसती है वो या रोती है..
ऐसीभी बाते होती है, कुछ ऐसी भी बाते होती है...

बैजू बावरा पाहिला. (गेले ७-८ दिवस रोजच सुरु आहे.. Happy ) सगळीच गाणी अप्रतिम आहेत.... इन्सान बनो गाणे खूप आवडले.... लोकांची गर्दी स्तब्धपणे उभी आहे.. आणि एकटा हिरो गाणे म्हणत सैनिकाना रक्तपातापासून परावृत्त करत आहे. छान आहे गाणे.... रफीचा आवाज अगदी मुलायम आहे..

शारदा तील "ओ चांद जहां वो जाये" कोणाला माहीत आहे का? अगदी सही गाणे आहे. अंतरात्मा सुखी होतो.
दोन स्त्री गायिकांनी गायलेले आहे, लता व सुमन कल्याणपूर बहुतेक.

नौशेर वाने आदिल सिनेमातील जवळ जवळ सर्व डयूएट्स मस्त आहेत.
जहां आरा तील दोन गाणी लै भारी. शोधून पोस्टेन.

नौशेर वाने आदिल

खरेच... लताचा आवाज काय लागलाय... बहुतेक सी रामचंद्रांचे संगित असावे.

आता लगेच गीतायनावर जाऊन कन्फर्म केले, सी रामचंद्रांचेच आहे. मागे एकदा लताने एका मुलाखतीत म्हटलेले की त्यांना एकदम मऊ मुलायम बारीक आवाज लागायचा... ह्या चित्रपटातल्या सगळ्या गाण्यात लताचा एकदम मधात भिजलेला आवाज लागलाय....

मामी हे पाहा

http://www.youtube.com/watch?v=YC6-kdg5Bms

हा चित्रपट दुरदर्शनवर ८० च्या दशकात कधीतरी लागलेला, तेव्हा एकदाच पाहिलेला, पण अजुन लक्षात आहे ते त्यातल्या गाण्यांमुळे आणि चित्रपटात अतिशय सुंदर दिसणा-या राजकुमार्-मालासिन्हाच्या जोड्यामुळे...

अश्विनीमामी ' ओ चांद जहां वो जाये' हे शारदातलं ड्युएट लता आणि आशाचं आहे. मीनाकुमारी आणि श्यामाने गायलेय ते स्क्रीनवर. लता अ‍ॅट हर बेहतरीन बेस्ट आहे यात वादच नाही पण मला आशाने गायलेल्या श्यामाच्या ओळी जास्त आवडतात. अर्थ आणि आवाज दोन्हीसाठी.

धन्यवाद. लता च्या आवाजात एक दैवीपणा आहे आणि आशाच्या आवाजात एक Earthiness आहे. आशाने जे मनापासून जगले आहे त्याचा प्रभाव तिच्या आवाजात दिसतो. म्हणून लताची भजने मला अति प्रिय पण
तिने जी सिड्क्टीव गाणी थोडी बहुत म्हण्ली आहेत ती ऐकताना अवघड्ल्यसारखे होते मला. आशाच्या आवाजातच एक सिडक्टिवनेस आहे. उदा: जाइय आप कहां जायेगे./ तनहा तनहा( रंगीला)/ अंग लग जा बालमा वगैरे.

काल रात्री लताचे चंदन सा बदन चंचल चितवन ऐकले. मन लिटरली शरीराच्या बाहेर पडून स्वरांबरोबर विहरते. शब्द फार नेमके व सुंदर आहेत. आपल्याला मुकेशचे माहीत आहे पण हे अतिशय छान आहे.

बदलते रिश्ते मधील मेरे सांसों को जो महका रही है ये तेरे प्यार की खुश्बू आवड्ते का? खूप सुरेख बांधणी आहे.

त्यात भूपेंद्र नाही महेंद्र कपूर आहे.दुसरा कोणी असता तर गाणं अजून रंगलं असतं असं नेहमी वाटते.
आशाच्या बर्‍याच गाण्यात हे तिचेच शब्द आहेत, तिचाच विचार आहे,असे प्रतित होते लताच्या बाबतीत हा अनुभव कमी वेळा येतो.
नविनपैकी- 'कुछ तो हुआ है'( कल हो ना हो).रंगांचा सुंदर वापर, न्यूयॉर्क कल्चरची झलक आणि शानचा मोकळा, प्रसन्न आवाज! कुणाची कोरिओग्राफि आहे?

Pages