सानुची तक्रार आणि मागणी

Submitted by कविन on 19 January, 2010 - 23:20

सकाळची थंडी;
नी अंगात बंडी

उबदार दुलईत गुडुप्प व्हाव
जादुने घड्याळच गायब कराव

वाटत फार;
वारंवार

पण घड्याळाची टिकटिक
आईची किटकिट; थांबतच नाही
मनासारख झोपता येतच नाही

उठ ना रे बाळा;
आहे तुझी शाळा

आईचा धोशा चालुच राही
मनासारख झोपता येतच नाही

नको नको उठते;
शाळेत मी जाते

बाईंना तिळगुळ द्यायचाय ना आई?
चल आटप; बस माझी जाईल ना ग आई

उद्या आहे सुट्टी;
घड्याळाला बुट्टी

उद्या मला लवकर उठवायच नाही
घड्याळाला गजर लावायचा नाही

उशिरा मी उठणार;
लोळत मी पडणार

मग मला हट्टी म्हणायच नाही
लवकर अजिबात उठवायच नाही

गुलमोहर: 

धन्स Happy

मंजु(डी) वरच्या मंजुचा रिप्लाय वाच माझ्या विपुतला, त्या मंजुबाळाला पण असच वाटत नी तिचा इशान (लेक) तिला उठवत असतो Wink

छान आहे.. तक्रार

उशिरा मी उठणार;
लोळत मी पडणार
>>
कवे, सानूच्या नावाखाली तुझ्या मनातल लिहिलिस ना Proud

छान Happy