Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
काल हॉटेल च्या लॉबी मधे सौरभ
काल हॉटेल च्या लॉबी मधे सौरभ गांगुली ला भेटलो. >> हे म्हणजे झक्की-हुड भेटीसारखेच झाले
नात्या काय बोललास ? दादाभाई
नात्या
काय बोललास ? दादाभाई गांगूली तुझ्या कुठल्या हॉटेलमध्ये काय करत होते?
सही फोटो नंद्या. महागुरू -
सही फोटो नंद्या. महागुरू - कोणते हॉटेल? तुझ्याबरोबर फोटो काढ म्हणून विनंती केली का नाही त्यांनी?
झक्की-हुड भेटीसारखेच>>>
सेहवाग ने बांगलादेश "ordinary team" आहे असे वक्तव्य केल्याने (ती मुलाखत वाचली का कोणी? धमाल आहे. सेहवाग ने एकदम अनौपचारिक पणे उत्तरे दिलीत) जरा टीका झाली, पण सचिन बहुधा मुद्दामच त्याच्या बाजूने उभा राहिला -मैदानावर आणि पहिल्या दिवस अखेर मीडियाला मुलाखत देतानाही. मला वाटते आजही तो चांगला खेळेल.
नात्या, बगतांय हां.....
नात्या, बगतांय हां.....
साहेब आज लवकर आउट झालेत...
साहेब आज लवकर आउट झालेत... फक्त १६ धावा आणि पायचित...
आज चांगला खेळेल असे वाटले
आज चांगला खेळेल असे वाटले होते. गंभीर जबरी फॉर्म मधे आहे पण.
गंभीर जबरी फॉर्म मधे आहे
गंभीर जबरी फॉर्म मधे आहे पण.>>> सहमत..
सलग पाच मॅच मध्ये पाच शतके.. आणि सलग १० मॅच मध्ये १० वेळा ५० हून अधिक धावा.. फक्त दोन खेळाडूंनी असा पराक्रम केल आहे कसोटी मध्ये... सर व्हिवियन रिचर्डस आणि दुसरा इंग्लंडचा डावखुरा फलंदाज (नाव आठवत नाहीये).. सलग ११ वेळा ५० हून अधिक धावा... अर्थात गंभीरच्या नंतर म्हणजे सलग ९ वेळा असे केलेले बरेच जण आहेत...
साहेब आज लवकर आउट झालेत...
साहेब आज लवकर आउट झालेत... फक्त १६ धावा आणि पायचित...>>साहेबांचे हे नेहमीचे आहे पण एकदा शतक मारले की मग साहेबांना law of averages पाळावाच लागतो आणि अगदीच त्यांनी नाही पाळला तर पंच पाळतात
पायचित शब्दाला हिन्दी दैनिकात
पायचित शब्दाला हिन्दी दैनिकात 'पगबाधा' असा गमतीशीर शब्द वापरतात.
दुसरा इंग्लंडचा डावखुरा
दुसरा इंग्लंडचा डावखुरा फलंदाज (नाव आठवत नाहीये).. >>> डेव्हीड गावर का?
तिकडे पाँटींगने शतक मारले की साहेब लगेच आपला एक्का टाकतात, जबरी रेस लागली आहे त्यांच्यात.
पूर्वी श्रीलंका नवीन असताना
पूर्वी श्रीलंका नवीन असताना हे लोक आपापली रेकॉर्डे सुधरवण्यासाठी त्या दौर्याचा वापर करीत. आता श्रीलंकेपासून जीव वाचवायची पाळी येत आहे. त्यानन्तर बांगला देशापासून लवकरच जीव वाचवायची पाळी येईल असे दिसते....
तसे अजून झिंबाब्वे, आयर्लंड
तसे अजून झिंबाब्वे, आयर्लंड असे काही संघ आहेतच. शतके काढायची ती विक्रमासाठी नसून, जाहीराती करण्यात जास्त पैसे मिळावेत म्हणून.
दुसरा इंग्लंडचा डावखुरा
दुसरा इंग्लंडचा डावखुरा फलंदाज (नाव आठवत नाहीये).. >>> जे एच एडरिक
आपण जिंकलो. (ते ही कुणाला
आपण जिंकलो. (ते ही कुणाला लिहावे वाटले नाही. )
अरे नसतो जिंकलो तर बदाबदा
अरे नसतो जिंकलो तर बदाबदा पोस्ट्स पडल्या असत्या ईथे.
९७/६ वरून बांगलाबाबून्नी २४३ केले यातच काय ते आलं. त्यांची पोरं टोरं पण शर्मा, झहीर, श्रीशांत ची पिसे काढत होते. नेहेमीप्रमाणे फलंदाजीच्या जोरावर जिंकलो.
पुढील सामन्यासाठी:
लक्षमण बाहेर म्हणजे बहुतेक मुरली विजय ला खेळवतील.
युवराज ला बसवायला हवाय.. फिरकी गोलंदाजी अजूनही झेपत नाही त्याला.
श्रीशांतला बसवून इरफान पठाण
श्रीशांतला बसवून इरफान पठाण ला घ्यायला पाहिजे. त्याला धोनीनं पार सडवलाय आणि युसुफ ला उगाचच डोक्यावर घेउन बसलाय.
सेहवाग अजूनही त्यांना
सेहवाग अजूनही त्यांना ऑर्डीनरीच म्हणतोय.
आयपीएलमधे पाकिस्तानी खेळाडूंना न घेतल्याबद्द्ल थयथयाट चाललाय.त्यांचा मंत्री म्हणतो 'आम्ही भारताला याचे चोख प्रत्युत्तर देउ'.म्हणजे काय करणार? कसाबसारखे अजून दहा लोक पाठवणार काय आयपीएलच्या सामन्यात? येडच्याप लोक आहेत.
साहेबांच्या पोराच्या आत्त्तापासूनच बातम्या बिचारा बुरखा घालून क्रिकेट खेळेल!
साहेब शतक नं. ४५!
साहेब शतक नं. ४५!
१४३ - साहेबांचं
१४३ - साहेबांचं अभिनंदन.
कालच्या व्हायकिंग वि. सेंट्स गेममध्ये कमेंटेटर १०२ डेसिबल्सची साऊंडलेव्हल मोजून किती टेन्शन येत असेल वगैरे चर्चा करत होते. त्यांना २००३ भारत पाकिस्तान मॅचमध्ये बसवायला हवे होते.
म्हातारा फावरे म्हणत होता, "it puts you under tremendous pressure". मित्रा आमचे साहेब गेली २० वर्षे कसे खेळतात बघ जरा.
(No subject)
अरे नसतो जिंकलो तर बदाबदा
अरे नसतो जिंकलो तर बदाबदा पोस्ट्स पडल्या असत्या ईथे >>>> योग.. आयडी बदलायचा राहिला का रे हे लिहिताना???
सेहेवाग गट आणि ढोणी गटात भांडण म्हणे परत...
सचिन भारी खेळला बाकी काल..
सेहेवाग गट आणि ढोणी गटात
सेहेवाग गट आणि ढोणी गटात भांडण म्हणे परत... >> कश्यावरुन?
(तिकडे कोण कविता करतं? )
तिकडे कोण कविता करतं? >>>>>
तिकडे कोण कविता करतं? >>>>>
अरे मटाला आलं होतं काहितरी.. त्या अमित मिश्राला टिममधे घेण्यावरून..
ओहो वाचतो आता शोधून.
ओहो वाचतो आता शोधून.
टीओआय- लेट पेपरमध्ये होती
टीओआय- लेट पेपरमध्ये होती बातमी
उद्या लंच नंतर डिक्लेअर करुन
उद्या लंच नंतर डिक्लेअर करुन (४०० चा लिड) त्यांना आउट करावे. २ १/२ दिवस खेळून नाही काढता येणार त्यांना.
मुरली विजय ला कशाला मधेच
मुरली विजय ला कशाला मधेच घेतला काही कळाले नाही.
लक्ष्मणबुवा घरी गेले - म्हणून
लक्ष्मणबुवा घरी गेले - म्हणून घेतला. बरंय नाहितर वायूराज - वायूवेगाने ढपले असते.
केजो: धोनी आहे तो, ५०० चा तरी लीड घ्यायला बघणार. सेहवाग असता तर त्याने केले असते.
बांग्लावासीयांनी नाकी नऊ
बांग्लावासीयांनी नाकी नऊ आणायचा प्रयत्न केलाच काल.. पण शेवटी झहीर बाबा मदतीला आले आणि संपली मॅच... काल त्या तमिमनी खिमाच केला सगळ्या गोलंदाजांचा... तो ज्या पध्दतीन बडवत होता ते बघून कालच ते ३०० धावा कुटतात की काय असे वाटत होते.. पण तसे व्हायचे नव्हते....
आता द.अफ्रिका च्या विरुद्ध द्रविड आणि वायूराज पहिल्या मॅच मध्ये तरी बाहेर.. म्हणजे परत एकदा कार्तिकला संधी मिळणार बहुतेक.. किंवा मग कर्नाटकच्या मनिष पांडेला संधी द्यायला पाहिजे.. रणजी मध्ये जबरदस्त खेळला तो...
मला तरी कार्तिक आणि मुरली
मला तरी कार्तिक आणि मुरली विजय खेळतील असे वाटतय..
कदाचीत मनिष पांडेला टीममधे घेतील पण..
Pages