इथुन सुरुवात झाली http://www.maayboli.com/node/12190
आणि हे आमचे प्रेरणास्थान http://www.maayboli.com/node/12752
*******
त्या दुपारी विशालचा फ़ोन आला तेंव्हा मी एका मित्राबरोबर ‘मेट्रीमनी’वर धडपडत होतो. हं.. हं .. माझ्यासाठी नाही, माझ्या मित्रासाठी. तिशी पार केली तरी बिचार्याचं लग्न जुळत नाहीये. अर्थात तो बिचारा आहे हे त्याचं मत, कारण माझ्या मते जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत बिचारा या शब्दाचा अर्थच कळत नाही..... तर असो.
विशालचं नाव बघुन मी ताबडतोब फ़ोन उचलला.
" काय राजे ? आज कशी आठवण काढलीत?" नेहमीचा चेष्टेचा सुर.
" चाफ़्या काहीतरी गडबड आहे रे ! मला ..... मला ठिक वाटत नाहीये" विशालच्या आवाजात अस्वस्थता होती.
" अरे, मग डॉक्टर गाठ ना ! " हा विशल्याचा काहीतरी चावटपणा असावा असं वाटून मी सल्ला दिला.
" नाही रे, डॉक्टर काही करु शकतील असं वाटत नाही, तुच जमलं तर ताबडतोब निघुन ये"
‘मरता क्या न करता’ ताबडतोब रजेचा अर्ज खरडला आणि शक्य तितक्या लवकर मुंबई गाठली.
निघे निघे पर्यंत चारवेळा कौतुकला फ़ोन करुन झाले पण त्यालाही नेमका प्रकार माहीत दिसत नव्हता. शेवटी विशाललाच कौतुककडे येण्याची सुचना देउन मी निघालो.
कौतुकच्या घरी पोहचेपर्यंत जरा उशीरच झाला. मी आलेला पहताच कौतुकवहीनींच्या डोळ्यात चिंतेची झाक येउन गेलेली दिसली, ते स्वाभावीकच होतं म्हणा आमच्या तिघांची गेल्यावेळची भेट चांगलीच वादळी झालेली.
आत शिरल्या शिरल्या समोर लॅपटॉपवर बोटं आपटत बसलेल्या कौतुकला विचारलं
" कौत्या लेका, विशल्या कुठंय ?"
" येतो म्हणाला होता पण अजुन पत्ता नाहीये, दोनदा तु आलायस का हे विचारायला फ़ोन येउन गेला त्याचा"
" च्यायला, मग मलाच फ़ोन करायचा ना डायरेक्ट" मी वैतागत म्हणालो.
" टांग तुझी, तुझा फ़ोन सारखा शवासनात असतो त्याला आम्ही काय करणार ?" कौत्याचा नेहमीचा टोला.
" शवासनात नसतो रे ! आमचा यारानाच असा आहे ना, की मी जवळ नसलो की तो बेशुध्द पडतो" माझंही नेहमीचंच उत्तर. " त्यात विशल्यासारखा विपणक असला की नेटवर्क प्रॉब्लेम यायचेच" ‘विपणक’वर भर देत मी म्हणालो. आमची टवाळकी कदाचीत आणखीही चालली असती पण तेवढ्यात बेल वाजली.
एकदा.. दोनदा.. सारखी वाजतच राहीली. कौतुक धडपडतच दरवाजाकडे धावला. मी आपली सहजच त्याच्य लॅपटॉपच्या स्क्रीनकडे नजर टाकली
‘ त्याची परीस्थीती दिवसेंदिवस खालावत चाललेय यातुन त्याला वेड लागायला फ़ारसा वेळ लागणार नाही’ स्वच्छ मराठीत लिहीलेल्या दोन ओळी स्क्रीनच्या कपाळाजवळ दिसत होत्या. बहुदा कौतुकची पुढच्या कथेची तयारी चालु असावी.
" असा वाघ मागे लागल्यसारखा काय करतोयस ?" कौतुकच्या आवाजानं माझं लक्ष दरवाजाकडे गेलं. दारात विशाल उभा होता आणि त्याचा हात अजुनही बेलच्या बटणावरच होता, एकदम यंत्रवत. त्याच्या हाताला धरुन जवळपास ओढतच कौतुकने त्याला आत आणलं. एरव्ही सदा हसरा असणारा विशालचा चेहरा आत्ता बघवत नव्हता.
चेहर्यावर वाढलेले दाढीचे खुंट गेल्या दोन-चार दिवसांचे तरी असावेत. डोळे पार निस्तेज झालेले, नजर शुन्यवत, हातांचा चष्म्याशी चाललेला अस्वस्थ चाळा आणि हालचाली तर एकदम यंत्रवत अं..हं.. हा नेहमीचा उत्साही विशाल नव्हताच.
विशालला खुर्चीत बळंबळंच बसवल्यावर आम्ही काही विचारणार इतक्यात कौतुकवहीनी चहा घेउन आल्या. विशालची अवस्था त्यांच्या नजरेतुन सुटली असती तरच नवल, त्यात आमच्या गंभिर मुद्रा आता पुन्हा काहीतरी विपरीत घडणार अशी जणु चाहूल लागल्यासारख्या त्या आमच्या जवळच खुर्ची ओढून बसल्या नेहमीप्रमाणे आत गेल्या नाहीत.
" विशल्या, अरे काय ही तुझी अवस्था? " कौतुकच्या आवाजात काळजी स्पष्ट जाणवत होती.
" अरे..... मी.. मला....." यापुढे विशाल बोलुच शकला नाही.
" काही प्रॉब्लेम आहे का? " विचारायचं म्हणुन मी विचारलं त्याची अवस्था बघुनच कुणीही ते सांगितलं असतं.
" अं..... "
" विशल्या चाचरणं बंद कर आणि काय झालं ते निट सांग बघु " कौतुकचा काळजीयुक्त राग.
" माझ्या मागे इंस्पेक्टर शिरवडेकर लागलेयत " एकाच वेळी तीथे दचकल्याच तीन वेगवेगळे आवाज आले पाठोपाठ एक ‘ ठप्प ’ कौतुकवहिनींनी कपाळावर हात मारुन घेतला होता. आम्ही तिघांनी काहीतरी नवा घोटाळा केल्याची त्यांची खात्री झालेली दिसली.
" शिरवडेकर ? पण का ?" कौतुकचा प्रश्न.
" माहीत नाही आणि तो माधव कुंटेपण असतो त्यांच्याबरोबर"
" अशक्य.. माधव कुंटे उर्फ़ समिर वर्धन सध्या तुरुंगात आहे माहीताय ना ?"
" तरीही ते माझ्या मागे असतात "
" म्हणजे ते पार घरापासुन तुझा पाठलाग करत असतात का?" कौतुकचा संशयी प्रश्न.
" नाही.. "
" नाही..?"
" नाही ! ते प्रत्येक ठिकाणी माझ्या जवळपास असतात"
" तेच तर म्हणतोय ना मी ! "
" तसं नाही, ते घराच्या आत आणि ऑफ़ीसच्या केबिनमधेही माझ्या आजुबाजुलाच असतात. आत्ताही ते तिकडे सोफ़्यावर बसलेत बघ " येउन दहा मिनीटं व्हायच्या आत विशालनं आमच्यावर बाँबशेल टाकलं.
चमकुन आम्ही बाजुच्या सोफ़्याकडे बघितलं, सोफ़ा रीकामा.. पार पाठीला टेकवुन ठेवलेल्या उशीच्या सुरकुत्या दिसतील इतका रीकामा.
" तिथे कुणी नाही रे, तुला भास झाला." मी स्पष्टीकरण दिलं.
" सगळे असंच म्हणतात, पण ते खरोखर माझा पाठलाग करतात रे .." विशालचा आवाज कापत होता. पुन्हा पुन्हा दचकुन तो त्या सोफ़्याकडे पहात राहीला तेंव्हा आणि त्यानंतरही जवळपास दर दहा-पंधरा मिनीटांनी तो तिकडे तसाच पहात असायचा.
" बरं समजा..... म्हणजे आपण गृहीत धरु ते करतायत तुझा पाठलाग पण का ?" प्रश्न सगळ्यांनाच होता.
" कदाचीत.. कदाचीत त्यांना सगळं कळलं असेल"
" कळलं असेल ? काय कळलं असेल ?" कौतुक आणि मी एकदमच.
" ते.. कौतुकला अडकवायच्या प्लॅन बद्दल सगळं " ही माहीती नवी होती.
" मला अडकवायचा प्लॅन ? विशल्या निट काय ते सांग "
" म्हणजे त्या माधव कुंटेने केलेला खुन आणि त्याच्याकडे सापडलेला तुझ्या हस्ता़क्षरातला खुनाचा प्लॉट......" इथुन पुढे कौतुकने विशालकडे ठेवायला दिलेल्या कथेचा वापर करुन त्याने आखलेल्या प्लॅनपर्यंत विशाल सगळं काही सांगत सुटला. त्याचं बोलणं संपल्यावर हॉलमधे एक विल़क्षण शांतता पसरली. विशाल पुन्हा दचकुन सोफ़्याकडे पहायला लागला.
" पण.... हे सगळं तु का केलंस विशाल ?" सुन्न आवाजात कौतुक म्हणाला.
" तुझं रहस्यकथालेखन बंद करण्यासाठी ! तुला लोकांनी इतका डोक्यावर घेतला मग मला का नाही? "
" विशल्या, विशल्या तु फ़क्त बोलायचंस रे ! मीच रहस्यकथा लिहीणं बंद केलं असतं " खिन्नपणे मान हलवत कौतुक म्हणाला.
" सॉरी यार .... भावनेच्या भरात वहावलो " विशालच्या आवाजात प्रामाणिकपणा होता.
"एनी वे, आपण शिरवडेकरांना समजावुन सांगु " कौतुकने सामंजस्याची भुमिका घेतली.
" कुठल्या शिरवडेकरांना ? त्या न दिसणार्या ? " मी प्रथमच तोंड उघडलं.
" ते ही खरंच, विशल्या तुला गिल्टी काँप्लेक्स आला असेल त्यामुळे तुला असले भास होतायत" कौतुकचा अंदाज.
" नाही , त्या पलिकडेही काही घडतंय "
" म्हणजे ?"
" मागच्या केसमधुन सुटल्यावर तु आपल्या तिघांना एकसारखे टी शर्ट घेतले होतेस "
" हो.. त्या प्रसंगातल्या एकमेकांच्या सहकार्याची आठवण रहावी म्हणुन घेतलेले ते त्याचं काय ?"
" माझा टी शर्ट जळाला, व्यवस्थित हँगरला लावलेला असताना आपोआप जळाला "
" आँ "
" असं कसं होईल ?"
" तसंच झालंय हँडबॅगेतुन टीशर्ट बाहेर काढत विशाल म्हणाला.
निरखुन, निरखुन बघितला आम्ही. तळाच्या भागाकडून चांगला हाताच्या पंज्याइतका जळून गेला होता तो.
" भानामती..... " अस्फ़ुटपणे कौतुकवहीनींचा आवाज आला. त्या तिकडल्या गोव्याकडल्या असल्याने त्यांना असल्या प्रकारांबद्दल ऐकुनतरी माहीत असावे.
पुन्हा एकदा हॉल शांततेने काठोकाठ भरला, विशाल पुन्हा दचकुन सोफ़्याकडे पहायला लागला.
" भानामती ? म्हणजे ते जादूटोणा जारणमारण वगैरे ? " कौतुक विचारत होता.
" आगदी तसंच नाही, पण कपडे जळणे , काही काही भास होणे असले प्रकार भानामतीतच होतात असं ऐकलय खरं "
" चाफ़्या, हा तुझ्या माहीतीचा प्रांत आहे, हा खरंच त्यातला काही प्रकार असेल?"
" म्हणजे बघ, भास होणं इथपत ठिक आहे पणा विशल्याचा जळका टी शर्ट बघुन मलाही तसंच काहीसं वाटायला लागलय"
एव्हाना विशाल थिजलेल्या नजरेनं सोफ़्याकडे पहायला लागलेला.
" च्यायला.. हे प्रकार खरंच अस्तित्वात असतात ? "
" निदान लोकांचे अनुभव तरी हेच सांगतात " माझे स्पष्टीकरण.
" मग यातुन विशल्याला बाहेर कसा काढायचा ?"
" हे काम फ़क्त एखादा मांत्रीकच करु शकेल "
" कुठे सापडेल असा मांत्रीक ? आत्ता निघु " कौतुकच्या आवाजात उत्कंठा
" इथे मुंबईत असा एखादा सापडणे कठीणच " मी अजुनही शांतच.
" मग गावाकडे जायचं ? बोल तु ठिकाण सांग मी गाडी काढतो "
" लगेच? "
" हो .. काहीही करुन विशल्या यातुन बाहेर पडलाच पाहीजे " कौतुकचे निर्णायक उत्तर .
" सॉरी यार .. मी तुझ्याशी वाईट वागुनही तु माझ्यासाठी धडपडतोयस " विशालचा स्वर कातरलेला.
" डझन्ट मॅटर, दोस्तीत असं व्हायचंच, तु बोल ना यार चाफ़्या कुठे जायचं ?"
" कुठेही नाही "
" काय ?"
" हो..... कुठेही नाही कारण हा माझाच उद्योग आहे "
" पण.. तु असं का केलंस ? " कौतुकचा भडकलेला आवाज धक्का बसला नसता तर बहुतेक मला हाणलाच असता त्यानं.
" कौत्या, तुझ्यावर आलेल्या प्रसंगाच्या मागे विशल्याचा हात असावा असा पुसटसा संशय मला आलेला" विशालकडे वळून पहात मी पुढे म्हणालो.
" मी विशालला विचारलं होतं की एखाद्याच्या हस्ता़क्षराची नक्कल करता येईल पण त्याच्या विचारसरणीची, त्याच्या शैलीची नक्कल कशी जमेल? तर त्यावर काहीतरी गुळमुळीत उत्तर देउन त्याने तो विषय बदलला. पण त्यामुळे माझा संशय आणखी दाट झाला. मी पुन्हा शिरवडेकरांकडून ते हस्तलिखीत घेउन वाचलं तेंव्हा मला त्यातल्या त्रुटी जाणवल्या. एकतर कौत्या तुझी विचार करण्याची पध्दत अशी चौफ़ेर आहे की तु जर खरच तसा प्लॅन केला असतास तर तो एकदम एअरटाईट असता, मग त्या माधव कुंटेनं सापडायलाच नको होतं, आणि जर हा उद्योग त्या माधवचा असला तरी कुणी खुनाचा प्लॅन आखुन तो कुणाच्याही का अ़क्षरात असे ना, लिहून ठेउन त्याच पध्दतीने खुन करण्याइतका तो माधवही मुर्ख वाटला नाही, मग तुझी स्टाईल उचलु शकणारा आणखी कोण राहीला ? शेवटी फ़क्त विशाल उरला पण त्याच्यावर सरळ आरोप करुन काही उपयोग नव्हता म्हणुन मी हा गेम केला" शेवटचं वाक्य उच्चारताना मी दात विचकले.
" व्हॉट डू यु मीन बाय गेम ? लेका त्यासाठी हे करणी भानामती ? " कौत्या अजुनही वैतागलेलाच.
" करणी बिरणी काही नाहीये रे, साधं शास्त्र आहे ते "
" अरे पण लेका तु हे घडवलंस तरी कसं ?" आता कौतुकच्या आवाजात कुतुहल होतं.
" सोपय रे ते, माझ्या लिखाणासाठी म्हणुन मी अफ़्रीकन व्हू डू बद्दल माहीती मिळवत होतो त्यात कळलेल्या काही गोष्टी आणि आपल्या भारतीय भानामतीतली सोपी शास्त्रिय ट्रीक वापरुन मी फ़क्त विशल्यावर दडपण आणलं "
" पण तरीही गध्द्या तु नक्की काय केलंस ? विशल्याला ते शिरवडेकर कसे दिसतात ?"
" ते इथे सांगुन फ़ायदा नाही जरा बाहेर येतोस ? " कारण नुसत्या शिरवडेकरांच्या उल्लेखाने विशाल कावरा बावरा होऊन आजुबाजुला बघायला लागला होता. त्याला तिथेच सोडून आम्ही बाहेर आलो.
" आता सांग दिडशहाण्या, विशल्याला केलयस तरी काय ?"
" काही नाही त्याला हिप्नोटाईज केलाय "
" भंकसबाजी करु नको तुला हिप्नॉटीझम येत नाही हे माहीताय मला." मागे या विषयावर आमची फ़ोनवर धुमश्चक्री उडालेली.
" मला व्यक्तीशः येत नाही, पण काही पध्दतीने मी तो इफ़ेक्ट आणु शकतो."
" तरीही, तु मुंबईत आलास कधी त्याला हिप्नोटाईज करायला ?"
" अं.. हं.. मी नाही आलो, फ़ोनवरुन केला मी त्याला हिप्नोटाईज "
" च्यायला, चाफ़्या तुला काय ही मायबोली वाटली वाटेल ते सांगायला ? "
" कौत्या, लेका संमोहन म्हणजे काय रे ? तर बाह्यमनाला काहीकाळ निद्रीस्त करुन अंतर्मनाला जागृत करुन त्यावर आपले आदेश ठसवणे हेच ना ? मग हाच इफ़ेक्ट एखाद्या केमीकलने येत असेल तर ? "
" अरे पण ते तरी त्याला कुणीतरी टोचायला किंवा पाजायला हवंय ना ! "
" कुणी सांगीतलं केमीकल फ़क्त रक्तातुन कींवा तोंडावाटेच शरीरात जाउ शकतात ? "
" मग ..?"
" मी ज्या केमीकलबद्दल बोलतोय ते प्रचंड व्होलाटाईल आहे. थोडावेळ जरी हवेवर उघडं राहीलं तरी उडून जातं, पण त्याचा काही सेकंदाचा वास माणसाचं अंतर्मन जागृत त्याची दारं उघडून ठेवतं काही मिनीटांसाठीच, पण माणुस संमोहनाच्या स्थितीत जातो. "
" पण ते विशालपर्यंत कसं पोहोचलं ?"
" माझ्याकडे एक टेलीकॉमचं अॅडव्हर्टाइझींग लेटर आलं होतं त्याच्यावर ते केमीकल लावलं, लेटर व्यवस्थीत सिल केलं आणि त्यावर विशल्याचं नावं टाकलं "
" हो, पण ते त्यानं उघडलंच नसतं तर ?"
" तसं घडणार नव्हतंच कारण पुजारी नावाच्या माझ्या एका मित्राला एजंट म्हणुन विशल्याकडे पाठवला होता. त्याचं काम ते लेटर विशल्याच्या ऑफ़ीसमधे जाउन पर्सनली त्याला देउन वाचायला लावणं इतकंच होतं "
" ओ.के., पण मग तु विशल्याला हिप्नोटाईज केलंस कसं ?"
" विशल्याने ते लेटर वाचायला घेतलं आणि त्या केमीकलच्या इफ़ेक्टमुळे त्याचं अंतर्मन जागृत झालं. नेमका त्याचवेळी पुजारीने मला मिसकॉल केला बस्स, मी फ़ोन लावला आणि विशल्याला लेटरमधे मुद्दाम टाकलेल्या सिंबॉलकडे पहायला लावलं आणि त्याच्या मनात पाठलाग करणारे शिरवडेकर आणि माधव कुंटे भरवून दिले वर दर दहा-पंधरा मिनीटांनी ते त्याला दिसतील अशीही त्याची खात्री पटवून दिली बस्स रिझल्ट तुझ्या समोर आहेत "
" पण हे सगळं विशल्याला का आठवत नाहीये ?"
" कारण ते न आठवण्याची पोस्ट हिप्नॉटीक कमांड मी त्याला दिलीये. आता त्याला तो पुजारीही आठवणार नाही की त्याची भेटही आठवणार नाही "
" वा राजे, पण मग तो टी शर्ट जळण्यामागचं कारण काय ?"
" ती आपली भानामती, तु टी शर्ट दिलास तेंव्हाच करुन ठेवलेला उद्योग होता तो. एका ग्लास फ़्युजमधे मी यलो फॉस्फ़रस ठेवला त्यात पाणी भरलं आणि त्याच्या दोन्ही बाजु मेणानं सिल करुन टाकल्या त्यात फ़क्त एक सुक्ष्म छिद्र होतं त्यातुन पाणि व्हेपोराईज होऊन उडून गेलं आणि फॉस्फ़रस पेटला मेणावर दिलेल्या फ़्लेमेबल कोटींगने आग भडकायला मदत केली. गावाकडल्या भानामतीत याचाच सर्रास वापर होतो."
" बरं, बास झाले तुझे खेळ, आता आधी विशल्याला त्यातुन बाहेर काढ "
" ये तो मेरे बाए हाथ का खेल है " असं म्हणत मी खिशातुन इस्पिकचा एक्का काढला हेच चिन्ह त्या लेटरच्या शेवटी होतं.
विशालसमोर उभं राहून मी तो इस्पिक एक्का त्याला टोक खाली आणि शेपटी वर असा उलटा दिसेल असा धरला आणि त्याला म्हणालो.
" विशाल, नीट निरखुन बघ, आता तुझ्या अंगात पुन्हा उत्साह येतोय, शिरवडेकर आणि माधव कुंटे हा तुझा भ्रम होता, कुणिही तुझ्या पाठलागावर नाही तु नेहमीसारखाच धडधाकट आणि उत्साही आहेस माझ्या टीचकीच्या आवाजानंतर तु झोपेतुन उठल्यासारखा जागा होशील " असं म्हणुन मी टिचकी वाजवली, आणि विशल्याच्या " अरे चाफ़्या तु ?" असल्याच काहीश्या प्रश्नाच्या अपे़क्षेत उभा राहीलो, पण.......
काहीतरी चुकलं विशाल अजुनही शुन्यातल्या नजरेनं आजुबाजुला पहात होता. चटकन त्याने दचकुन त्या सोफ़्याकडे बघितलं आणि माझ्या काळजात धस्स झालं. विशाल अजुनही संमोहीत अवस्थेतच होता.....
पुन्हा पुन्हा मी तोच प्रयोग करुन पाहीला पण छे..... विशाल संमोहीतच राहीला.. आता ? "
माझा उडालेला गोंधळ इतकावेळ माझे उपद्व्याप शांतपणे बघणार्या कौतुकच्याही ल़क्षात आला.
" चाफ़्या काय भानगड आहे ही ? विशल्या नॉर्मल का होत नाहीये ? "
" तेच तर कळत नाहीये, लेटरच्याखाली मी इस्पिकचेच चिन्ह काढलेलं होतं आणि ते उलटं करुन पाहील्यावर त्याच्यावरचा अंमल जाईल अशी कमांडही दिलेली, पण काहीतरी चुकलंय विशल्या रिस्पॉन्स देत नाहीये " एव्हाना माझी पार तंतरलेली.
" चाफ़्या काय करुन बसलास हे, हा नस्ता उपद्व्याप कुणी करायला सांगीतलेला ?" कौतुकच्या आवाजात रागापे़क्षा उद्वेग जास्त होता.
" अरे, साधी सोपी प्रोसेस होती ही, पण काय चुकलं माहीत नाही "
" आता यावर उपाय काय ? पुन्हा हिप्नोटाईज करायचा त्याला ?"
" ते शक्य नाही आत्ताही तो हिप्नॉसिसखाली आहे "
" तुला जमणार नसेल तर एखाद्या हिप्नॉटीस्टकडे नेउया त्याला ?"
" अं.. तेही उपयोगाचं नाही, त्याला डिप हिप्नॉटीक कमांड आहेत आणि त्या फ़क्त त्यांच्याच पध्दतीनं काढता येतील. थोडक्यात एखाद्या पासवर्ड प्रोटेक्शन सारखा प्रकार आहे हा "
" आणि त्याचा पासवर्ड तु हरवलायस, आता ?"
" आता ?" पुन्हा एकदा हॉलमधे शांतता पसरली, पण यावेळी तीची भिषणता मला जाणवत होती.
किती वेळ गेला माहीत नाही, शेवटी शांतता भंग करत मी म्हणालो.
" कौत्या, असं हातावर हात धरुन बसणं योग्य होणार नाही काहीतरी केलं पाहीजे "
" तोच तर विचार करतोय मी, ओ.के. आपण पुन्हा एकदा सगळा प्रसंग निट मांडून बघु. "
" ओ.के. "
" तु विशल्याला लेटर पाठवलंस, विशल्या ते वाचताना ट्रांसमधे गेला, तुझा फ़ोन आला, तु त्याला कमांड दिल्यास आणि विशल्या संमोहनात गेला. जे चुकलं ते याच टप्प्यात कुठेतरी चुकलं अर्थात तु जर अजुन काही इरसालपणा करत नसशील तर "
" नाही रे , आईशप्पथ मी आता खरंच गोंधळलोय"
" पण मग तेंव्हा नेमकं काय घडलं हे आपल्याला कसं कळणार ?"
" पुजारी..... येस पुजारीच आपल्याला सांगु शकेल तेंव्हा नेमकं काय घडलं ते. एक सेकंद..... " मी पुजारीचा नंबर पंच केला. पुजारीला त्या वेळची सगळी हकीगत विचारुन घेतली आणि मान हलवत फ़ोन कट केला.
" कौत्या, तो ही यापे़क्षा वेगळं काही सांगत नाहीये रे "
" पुन्हा एकदा विचार एखादी लहानशी गोष्टही राहीली असली तरी त्याला सांगायला सांग "
मी पुन्हा पुजारीचा नंबर पंच केला, फ़ोन कानाला लाउन उभा राहीलो , आवाज नाही , फ़ोनकडे पाहीलं तर ‘कॉल फ़ेल्ड’ दारातुन बाहेर पडत पुन्हा कॊल केला पुन्हा ‘कॉल फ़ेल्ड’ वैतागुन मी आत आलो आणि कौतुकला म्हणालो.
" कौत्या तुझा फ़ोन दे यार, माझ्या फ़ोनवरुन फ़ोनच लागत नाहीये "
" नाहीतरी कधी लागतो कायम शवासनातच तर असतो " असं म्हणत त्याने त्याचा मोबाईल टेबलावरुन उचलुन पुढे केला आणि अचानक थबकला.....
" चाफ़्या, त्या पुजारीने तुला मिसकॉल केल्यावरच तु विशल्याला फ़ोन केलास ना ?"
" हो, पण तेंव्हा लगेचच लागलेला फ़ोन " काहीच न समजुन मी म्हणालो.
" पहील्या ट्रायलाच लागला ?"
" आगदी "
पुन्हा सेकंदभर थांबुन कौतुक म्हणाला
" तु पुजारीला विचार त्याने तुला मिसकॉल दिला तेंव्हा तुझा फ़ोन पहील्या ट्रायलाच लागला का ते "
" गॉट इट यार, यु आर ब्रिलियंट, तुझा मुद्दा कळला मला " मी पुजारीचा नंबर पंच करत म्हणालो.
साधी गोष्ट आहे जर माझाच फ़ोन चारपाच ट्राय नंतर लागला असेल तर तोपर्यंत विशाल लेटर वाचुन मोकळा झालेला असणार.
" यु आर राईट कौत्या, माझा फ़ोन चार-पाच वेळा नॉट रिचेबल आल्यानंतर लागला. कदाचीत केबिनमधे नेटवर्क मिळत नसावं असा विचार करुन पुजारी बाहेर आला आणि आत गेला तेंव्हा विशल्याला माझा फ़ोन आला होता " उत्साहानं मी सांगत होतो.
" आता मला सांग तु विशल्याला स्पेसीफ़ीक त्या इस्पिकच्या खुणेकडे पहा असं म्हणालास की ..... "
" नाही माझ्या अंदाजाने विशल्या लेटर वाचत होता त्यामुळे मी त्याला फ़क्त समोरच्या चिन्हाकडे पहा असंच म्हणालो "
" याचाच अर्थ मित्रा तुझा फ़ोन आला तेंव्हा विशल्याचं लेटर वाचुन झालं होतं आणि तो हीप्नॉटिक कंडीशनला आला होता. तु जेंव्हा त्याला समोरच्या चिन्हाकडे पहा म्हणालास तेंव्हा तो नक्कीच दुसरीकडे कुठेतरी पहात असणार. आता त्याच्या केबीनमधल्या असंख्य वस्तुंपैकी त्याने नेमकं काय बघितलं हे आपल्याला कसं कळणार ? " अस्वस्थ होत कौतुक म्हणाला.
" वस्तु नाही रे चिन्ह, माणुस वस्तुला वस्तु म्हणुन ओळखतो चिन्ह म्हणुन नाही. डॉक्टरच्या गाडीला आपण गाडी म्हणुन ओळखतो पण त्यावरच्या अधिकच्या चिन्हाला बघितल्यावर आपण ती गाडी डॉक्टरची आहे असं समजतो तसं असतं हे " कौतुकचा मोबाईल त्याच्या हातात देत मी म्हणालो
" हो रे , पण त्याच्या केबिनमधे चिन्ह म्हणता येईल असं बरंच काही आहे त्याचं काय ? " मोबाईल घेउन लॅपटॉपच्या उजव्याबाजुला ठेवत कौतुक म्हणाला. त्याच्या हाताच्या धक्क्याने लॅपटॉप हलला आणि त्याचा मंद झालेला स्क्रीन पुन्हा झळाळला. त्याच बरोबर माझ्याही डोक्यात हजारो वॅटचा दिवा लखलखला.
" कौत्या आपल्याला एक संभाव्य मार्ग सापडला "
" काय ...?" कौतुकच्या स्वरात उत्कंठा
" म्हणजे बघ, मी विशल्याला फ़ोन केला तो त्याच्या मोबाईलवर, आता आगदी सहज सुलभपणे आपण मोबाईल ठेवतो कुठे ?"
" कुठे ?"
" बहुतेकवेळा तो लॅपटॉपच्या किंवा मॉनीटरच्या बाजुला, आता अश्यावेळी जर आपल्याला फ़ोन आला तर आपली नजर नेमकी कुठे असेल ?"
" समोर स्क्रीन कडे..... च्यायला चाफ़्या तु.. " कौतुकला पुन्हा उत्साहाचं भरतं आलं
" बरोबर, पण मोठा प्रश्न हा की मी फ़ोन केला तेंव्हा विशल्या स्क्रीनवर काय बघत होता ? " मी विचारात पडत म्हंटलं. कौतुकही विचारात पडला पण जेमतेम सेकंदभरच.
" चाफ़्या तुझा मोबाईल घे आणि ताबडतोब गाडी काढ आपल्याला विशल्याच्या घरी जायचंय "
" अरे पण....." जवळजवळ हिसका मारतच कौतुकने मला बाहेर काढलं.
" तुझ्या कॉल समरीत विशल्याला केलेल्या कॉलचा टायमिंग दिसेल बरोबर ?"
" हो अर्थात "
" मग फ़क्त विशल्याच्या लॅपटॉपवर त्याची नेट हिस्टरी चेक करायची नेमका त्यावेळी तो कोणत्या साईटवर होता ते बघु "
" पण समजा तो त्यावेळी नेटवर नसेल तर ?"
" तरी त्याच्या लॅपटॉपवर कळेलच काहीतरी "
घाईगडबडीत आम्ही विशालच्या घरुन लॅपटॉप उचलला आणि तडक कौतुकचं घर गाठलं. अजुनही विशाल तसाच यंत्रवत बसुन होता. अधुनमधुन दचकुन सोफ़्याकडे पहाणं चालुच होतं.
काहीच मिनीटात विशालचा लॅपटॉप सुरु करुन कौतुक त्याची नेट हिस्टरी पहात होता.
" हां.. तुझा कॉल आहे १२.४७ ला दुपारी आणि इथे दिसतय विशल्या त्यावेळी मायबोलीवर होता." माझा जीव भांड्यात पडला.
" तु तुझ्या लॅपटॉपवर मायबोली उघड" मी घाईवर येउन म्हणालो. तोपर्यंत कौतुकने मायबोली ओपन केली सुध्दा.
" घे, पण लेका इथे इतके फ़ोटो आहेत लिंक आहेत त्यापैकी नक्की कशाकडे पाहीलं असेल त्यानं ?"
" फ़ोटो नाही रे चिन्ह.. "
" चिन्ह..... चिन्ह म्हणजे लोगो नाही का ? म्हणजे विशल्याचं ल़क्ष मायबोलीच्या लोगोकडेच गेलं असणार. हा बघ मायबोलीचा लोगो पण शहाण्या.., हा उलटा सुलटा सारखाच दिसणार नाही का ? "
" नाही, लोगो म्हणुन पहाताना आपण त्याच्याखाली लिहीलेली ‘मायबोली’ ही अ़क्षरंही गृहीत धरतो, चल ट्राय करुन बघु."
कौतुकने सरळ लॅपटॉपच उलटा करुन विशालच्या समोर धरला, मी पुन्हा मघाच्याच कमांड दिल्या आणि टिचकी वाजवली पण पुन्हा शांतता.....
" चाफ़्या, कौत्या काय चाललय दोघांच आणि तो लॅपटॉप का असा वटवाघळासारखा उलटा धरलाय ?" विशल्याच्या दणदणीत उत्साही आवाजाने शांतताभंग झाला, आणि आमच्या सगळ्यांच्याच मनावरचं दडपण एकदम उतरलं. विशल्याकडे पहात मी हसायला सुरुवात केली, पाठोपाठ कौतुकलाही हसु फ़ुटलं आणि आम्हा दोघांना हसताना बघुन विशल्याही आमच्यात सामिल झाला.
" चाफ़्या पुन्हा असला उद्योग करणार असशील तर आधी तो मोबाईल बदल " कौतुकचा पाहुणचार झोडून दुसर्या दिवशी सकाळी निघताना विशल्या म्हणत होता.
" नक्की नक्की " मी गाडी स्टार्ट करत म्हणालो.
कौतुक विशालचा निरोप घेउन मी निघालो खरा पण मन मात्र कालच्याच विचारात गुरफ़टलेलं
‘च्यायला आधी हा मोबाईल बदलला पाहीजे त्याच्यामुळेच आता विशल्याच्या जिवाशी खेळ झाला, विशल्या म्हणाला ते बरोबर आहे.’ मी विचार करत होतो ‘ विशल्या म्हणाला ?’ पाय आपोआप ब्रेक पॅडलवर दाबल्या गेला. ‘विशल्या काय म्हणाला ? पुन्हा असले उपद्व्याप करणार असशील तर आधी तो फ़ोन बदल, पण विशल्याला झाल्याप्रकाराचा मनस्ताप नको म्हणुन आम्ही त्याच्याशी काल हा विषय बोललोच नव्हतो मग विशल्या.....? ’ पाठीमागुन गाडीने दिलेल्या कर्कश्य हॉर्नमुळे माझी तंद्री भंगली.
जाउ दे, कदाचीत झोपेतुन अर्धवट जाग यावी तसा मधेच विशल्या आमचं बोलणं समजुन घेउन बोलला असेल, नवशिक्या पध्दतीने केलेल्या हिप्नॉटीझममधे असेल एखादा कच्चा दुवा शक्य आहे.
पण ......... खरंच हे शक्य आहे ?
अप्रतिम, झकास जमलीय मस्त
अप्रतिम, झकास जमलीय
मस्त कथांची सेरिज चालु आहे,
आता कोण लिहिनार आहे याच्या पुढचा भाग??
(No subject)
हाण तिच्या मारी... नहले पे
हाण तिच्या मारी...
नहले पे दहला
सॉल्लीड आहे ही सेरीज!!! मी तर
सॉल्लीड आहे ही सेरीज!!!
मी तर अत्ता ३ही भाग वाचलेत.. तुम्ही ग्रेटच आहात सगळेजण मस्त लीहीलय
लगे रहो चाफ्फ्याभाय ...
लगे रहो चाफ्फ्याभाय ...
क्या बात है!!! चांगलं सत्रच
क्या बात है!!! चांगलं सत्रच चालु केलंय तुम्ही तिघांनी...चालुद्या
हाहा..तुम्हा तिघांच्या
हाहा..तुम्हा तिघांच्या सत्रामुळे आम्चं चांगलच मनोरंजन होतय.. थॅन्क्स..
मस्तच... सीरीज.. लगे रहो
मस्तच... सीरीज.. लगे रहो त्रिदेव..
ये चाफ्या लय भारी.
ये चाफ्या लय भारी.
अजुन कौतूकराव आले नाहीत इथे.
अजुन कौतूकराव आले नाहीत इथे. का खरोखरच हे शक्य आहे का याची पडताळणी करताहेत.
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद
प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद !
विशल्या,
कौतुकरावच काय कुणीच आलं नाहीये इथे, बहुतेक कथा मेली वाटतं
क. ड. क.!
क. ड. क.!
इंटरेस्टींग!!
इंटरेस्टींग!!
मस्तच..चालू द्या...
मस्तच..चालू द्या...:)
चाफ्या, मस्तच जमलय ! येतील रे
चाफ्या, मस्तच जमलय !
येतील रे हळू हळू... अजून सगळे नव्या वर्षाच्या संकल्पात बिजलेत बहुधा.
hey 3 idiots... लगे रहो....
hey 3 idiots...
लगे रहो.... छान चालू आहे.............
*******************************************
Give me the sunshine, give me the rain, give me another chance I wanna grow up once again.
तिनही कथा खूपच
तिनही कथा खूपच छान्...........अफलतुनच!! एक सूतकताईच वाचते आहे असे वाटले.
खूपच छान!!
क्या बात है.... !!
क्या बात है.... !!
धन्य!! ही पण सही जमली आहे!
धन्य!!
ही पण सही जमली आहे!
ड्रिमगर्ल.... कस्चं...
ड्रिमगर्ल.... कस्चं... कस्चं.... !
नही$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
नही$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
चाफ्या तू विशालला इतक्या सस्त्यात सोडलसं? खरच हे शक्य आहे?
कौतुकला जेल ते पण दोन दिवस, तुझं नाव बदलावं लागलं त्या कवटी हलवणार्या किकमुळे आणि विशालला काय तर फक्त यंत्रवत हालचाली आणि शुन्यवत नजर! ये तो नाइन्साफी है हुजुर!
मला वाटलं तू त्याला मस्त असा कोंडीत पकडणार की इकडे आड तिकडे विहीर आणि डबल जिओपार्डी, काळं मांजर वगैरे.
ही एक तक्रार सोड्ल्यास मस्त लिहीलय.
हाण तिच्या मायला...! मागचे
हाण तिच्या मायला...!
मागचे संदर्भ डोक्यात खटाखट क्लिक होत गेले.. आणि धम्माल आली
श्रुती, कदाचीत त्याला
श्रुती, कदाचीत त्याला मांत्रिकाची भिती वाटली असेल
धन्यवाद लोकहो, मी नेमकी नव्या
धन्यवाद लोकहो, मी नेमकी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कथा टाकली, आणि मग आशासुध्दा टाकली होती डायरेक्ट आत्ता उगवुन पहातोय मी तुमचे प्रतीसाद !
ड्रीमगर्ल
>>>>>श्रुती, कदाचीत त्याला मांत्रिकाची भिती वाटली असेल
नाय रे ! विशल्या तु राडा केलेलास कौत्याशी, म्हणुन सस्त्यात सोडला
अरेच्चा.. आधिचा माधव जोशी..
अरेच्चा.. आधिचा माधव जोशी.. इथे माधव कुन्टे कसा काय झालाय??
bapre kasli bhayanak aahe pan
bapre kasli bhayanak aahe pan tari dekhil awadli
bapre kasli bhayanak aahe pan
bapre kasli bhayanak aahe pan tari dekhil awadli
नविन लोकांनी वाचायलाच हवी अशी
नविन लोकांनी वाचायलाच हवी अशी एक ढासु सिरिज...............
सिरिज मधील तिसरी आणि शेवटची कथा
आज परत एकदा वाचली.. आता इतकंच
आज परत एकदा वाचली..
आता इतकंच सांगा की माधव जोशी की माधव कुंटे?????????? प्रेरणास्थानांच्या कथेमधे माधव जोशी असा उल्लेख आहे, या कथेत माधव कुंटे???
चाफ्याची मती कुंठली होती
चाफ्याची मती कुंठली होती चिमुरे पहिल्या दोन कथा वाचून, त्यामुळे माधव जोशीचा माधव 'कुंटे' झाला असावा
Pages