प्रतिमंत्रिमंडळाची नवी राजधानी- फेसबुक!!!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोली प्रशासकांच्या मायबोली संकेतस्थळाच्या धोरणानुसार अन मायबोली हितचिंतकांच्या शंकांचे गांभीर्य लक्षात घेता, प्रतिमंत्रिमडळ गट यापुढे मायबोलीवर कार्यरत असणार नाही. परंतु, इंटरनेट वर इतरत्र, जसे याहु, गुगल, ऑर्कुट इ. इ. वर जर हा गट स्थापन होउ शकला, तर त्याबद्दल ची माहीती मायबोलीवर प्रकाशित कराण्यास मायबोली प्रशासनाने परवानगी दिली आहे. (उदा, सुपंथ हा गट).

प्रतिमंत्रिमंडळ गटामध्ये काम करु इच्छिणार्या सर्वांनी आता याहु, गुगल ग्रुप, ऑर्कुट कम्युनिटी वा इतर मर्ग सुचवावेत. सध्या मी असा एक गट तयार केला आहे.
http://groups.google.com/group/maharashtra-shadow-cabinet
(ज्यांना सामील व्हायचे आहे, त्यांनी इ मेल पत्ता कळवावा.)

तज्ञ मंडळींच्या सल्ल्याची अन मदतीची अपेक्षा आहे.

सदर उपक्रमाला सुरुवातीच्या काळात केलेल्या मदतीबद्दल अन यापुढे ही मदत करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मी व्यक्तीशः मायबोली प्रशासनाचा आभारी आहे.

धन्यवाद! Happy

नवीन जागेत स्थलांतर कि उपराजधानीत बैठक! Happy

प्रकार: 

ईच्छा तिथे मार्ग..... एक मार्ग बंद झाला कि दुसरा सापडतो! Happy (ओपन द डोअर्स ऑफ विंडो!)

उपक्रम सुरु करणे महत्वाचे होते. अन तो सुरु देखील झाला आहे. सर्वप्रथम त्याला स्पेस मिळवुन देण्याचे काम मायबोली प्रशासन अन मायबोलीकरांनी केले आहेच! ब्रावो! Happy

आपल्या देशात चांगले विचारवंत असुन ही भारतापेक्षा पाश्चिमात्य देश त्याच उपयोग करुन आपल्या पुढे आहेत>>>
......... हि खरी शोकांतिका आहेच. या उपक्रमाची सुरुवात देखील जगभरात असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी महाराष्ट्रासमोर असलेल्या महत्वाच्या मुद्द्यांबद्दल/समस्येबद्दल मत व्यक्त करावे ह्या भावनेनेच केली आहे. अन त्यात बरेच यश देखील मिळाले आहे. गुगलग्रुप वर आजवर १३ लोकांनी सहभाग नोंदवला आहे. (सभासद संख्या हे अश्या उपक्रमाच्या यशाचे मोजमाप ठरु शकत नाही, हे माहीती असुनही ही माहीती देतो आहे)

मी ज्या काही दोन चार देशात राहिलो, फिरलो, तेंव्हा असे जाणवले कि, विकसित देशातही हाडामासाची माणसेच असतात अन अविकसित देशातही तशीच हाडामासाची माणसेच असतात. एकाच सृष्टीनिर्मात्याने बनवलेली हि प्रजा! पण एकमेकांपासुन काही शे/हजार मैलावर राहत असताना, त्यांना मिळणार्‍या भौतिक, मानसिक सुखामध्ये मात्र जमीन आसमान चा फरक का? हा फरक कमी करण्याचा आपण एक सामान्य नागरिक म्हणुन प्रयत्न करु शकु का? असा प्रश्न जेंव्हा जेंव्हा मला पडतो, तेंव्हा मी खुप अस्वस्थ होतो... पण प्रश्नाचे उत्तर नेहमीच सकारात्मक असते! हम होंगे कामयाब!:)

ऑडॅसिटी ऑफ होप वाचताना पण हेच लक्षात येते कि विकसित म्हणवल्या जाणार्‍या अमेरिकेत देखील दोन अमेरिका आहेत. अन त्यांना एकत्र करण्यासाठी, विकासाच्या वाटेवरचे सह प्रवाशी बनण्यासाठी, माणसाला माणसासारखी वागणुक मिळावी म्हणुन झटण्यासाठी मार्टीन ल्युथर किंग पासुन रोजा पार्क्स ते बराक ओबामा पर्यंत अनेक सामान्य लोकांनी प्रयन केले अन करत आहेत. कारण उम्मीद पे दुनिया कायम है! आपल्या भारत देशातही अशी असंख्य उदाहरणे आपल्या समोर आहेतच!

***प्रतिमंत्रिमंडळ ग्रुप मायबोलीवरुन हलवल्याच्या निषेधार्थ, राज्य मंत्रिमंडळाने त्यांच्या या सप्ताहातील बैठकीचे निर्णय अजुन जाहेर केलेले नाहीत! दखल घेणारेच कोणी नसेल, तर आम्ही निर्णय का जाहीर करायचे असा त्यांचा सवाल आहे! ... दिवा Happy

जय हो!

गेली अनेक दिवस साप्ताहिक मंत्रिमंडळ निर्णय अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित केले जात नव्हते. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला असता आज पासुन हे नियम पुन्हा नियमित प्रकाशित केले जात आहेत.

गेले दोन महिने मंत्रिमंडळाचे निर्णय पाहिले तर-
वाळुची रॉयल्टी वाढवली, दगड खाणींचा भाव वाढवला.. पाचगणीतील चार कुटुंबांचे पुनर्वस्न केले, एक नवा शासकिय विभाग निर्माण केला, एका शास्किय कार्यलयाला संगणक खरेदीला मंजुरी दिली...........यापेक्षा महत्वाचे काहीच नाही!

हे महाराष्ट्र राज्याचे मंत्रीमंडाळ कि एका ग्रामपंचायतीच्या बैठकीचे इतिवृत्त! ग्रामपंचायत सुद्धा यापेक्षा जास्त निर्णय घेते! अन असे जर निर्णय होत असतील, तर आनंद आहे! जो जे वांछिल तो ते लाहो अशीच परिस्थिती होईल!

चार थातुर मातुर निर्णय घेउण मंत्रिमंडळ जनतेची दिशाभुल करतेय कि लोकांना माहिती देणे बंधनकारक म्हणुन एक चार ओळीची प्रेस नोट छापतेय..!

कॅबिनेट व राज्यमंत्र्यांना दिली वेगवेगळी माहिती
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, March 30, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: politics, disturbance, mumbai, maharashtra

मुंबई - कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्र्यांत अधिकाराच्या वाटपावरून अधून-मधून वादाच्या ठिणग्या पडत असतानाच अधिकारी कॅबिनेट मंत्र्यांना एक माहिती देतात व राज्यमंत्र्यांना दुसरीच माहिती देतात, अशा नव्या वादाला आज तोंड फुटले. उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री वर्षा गायकवाड यांनी चुकीची माहिती देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा लेखी आदेश प्रधान सचिव जे. एस. सहारिया यांना दिला आहे.

विधान परिषदेत आज मुंबई विद्यापीठाशी संबंधित एक लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. त्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे गायकवाड यांनी उत्तर दिले; मात्र कॅबिनेट मंत्री राजेश टोपे यांनी वेगळे उत्तर दिल्याने गायकवाड यांची माहिती बरोबर नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे संतापलेल्या गायकवाड यांनी चौकशी केली. त्यांना उत्तरासाठी अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आले; मात्र याच अधिकाऱ्यांनी कॅबिनेट मंत्र्यांना वेगळीच माहिती दिल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या अधिकच संतप्त झाल्या. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत चार वेळा ब्रिफिंग घेऊनही अधिकाऱ्यांनी आपल्याला बरोबर माहिती दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6088195.cms

शिवसेना-भाजप युतीकडे सत्ता दिली तर हे पक्ष आपसात भांडत राहतील, त्यात आपण भरडले जाऊ, अशी भीती वाटल्याने मतदारांनी नार्कत्या काँग्रेसला स्वीकारले. आता शिवसेना-भाजप असो वा मनसे, यांची जबाबदारी प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची असताना हे बाहूला बाहू भिडवून कुस्तीच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांच्या कुस्तीची गंमत सत्ताधारी सिंहासनावर बसून पाहत आहेत.

एमबी टु एफबी Happy

या उपक्रमासाठी एक गुगल गृप सुरु केला होता. परंतु माझ्या इंटरनेटच्या अगाध ज्ञानामुळे मला तो फारसा नीट चालवता आला नाही. गेले काही दिवस मी फेसबुक वापरतो आहे, अन ते तुलनेने सोपे वाटले. म्हणुन म्हणुन आता मी तो गृप फेसबुक वर हलवतो आहे. एक नवे 'पेज' तिथे सुरु केले आहे.

'प्रतिमंत्रीमंडळ Shadow Cabinet (Maharashtra/India)' नावाने सर्च केल्यास ते पेज सापडेल.

धन्यवाद!