राजमाची

Submitted by गिरीविहार on 11 January, 2010 - 12:56

बरयाच दिवसान् पासुन राजमाचीवर पावसाळा सोडुन दुसरया त्रुतुत जायचा विचार होता, पण योग काहि जुळुन येत नव्हता. अचानक आसमन्त ग्रुपचा मेल आला, ९-१० डिसेम्बरला राजमाचीचा बेत आहे. लवकर नावे नोन्दवा. इन्द्राला फोन केला तर त्याचा आधीच रायगडावर जाउन महाराजाना मुजरा करायचा बेत पक्का झाला होता. होना करता अखेर नाव नोन्दविन्याकरता फोन केला तर जागा आधिच भरलेल्या होत्या. वाटले की परत सन्धी हुकली. जरासा नाराज Sad झालो पण मनात म्हट्ल, Better Luck Next time.

९ तारखेला सन्ध्याकाळी भ्रमणध्वनी वाजला, पलीकडुन आवाज आला, मी आसमन्त कडून बोलतोय, एक जागा खाली झालेली आहे जर आपणास या़यचे असेल तर रात्रि ११.३० वाजता मुलुन्ड स्थानकाबाहेर विश्वमहल हॉटेल जवळ या. लगेच तयारीला लागलो, ऑफिस मधील काम गुन्डाळुन घरी पोचलो अन SACK भरुन रात्री ११-३० वाजता मुलुन्ड स्टेशनवर पोचलो. बस अगोदरच विश्वमहल हॉटेल समोर उभी होती. बसमध्ये या आधीच्या कळसुबाई ट्रेक मधील मीत्र हजर होते. सर्वाना Hi, Hello करुन बसमध्ये स्थानापन्न झालो. एकुन २८ जणांचा ग्रुप ट्रेकला जमलेला होता.

बस बरोबर रात्री बारा वाजता निघाली, वाटेत आजुन एका ट्रेकरला घेउन बस ठाणे-बेलापुर रोड मार्गे मुम्बइ - पुणे द्रुतगती महामार्गावर वाटेला लागली. पनवेल, शेडुन्ग, खोपोली, खंडाळा, मागे टाकत बस खंडाळा exit मार्गे कुने नावाच्या गावात रात्री २-३० वाजता पोचलो. इथुन ट्रेकची सुरवात होणार होती.
आसमन्त तर्फे एका घरात सर्वांची चहाची व्यव्स्था केलेली होती.
chota.jpgछोटा मित्र

चहा घेउन रात्रीच ३ वाजता कुने गावापासुन ट्रेकची सुरवात केली, नवमी असल्यामुळे अंधुक चन्द्रप्रकाश होता, पण विजेरीच्या प्रकाशात मार्गस्थ झालो. आम्हाला वाट दाखवायला राजमाची गावातुन एक काका कुने गावात आधीच आलेले होते. त्यांच्या साथीने थोड्याच वेळात एक डोंगर पार करुन एका तीठ्यावर येउन पोचलो, येथे एक वाट लोणावळा स्टेशनवरुन वळवण, तुंगार्ली लेक मार्गे राजमाचीच्या वाटेला येउन मिळते. या मार्गे आल्यास तीठ्यावर पोचण्यास अजुन एखाद तास-दीड तास खर्ची घालावा लागतो. या जागेवरुन मागे पाहिले तर वरती डोंगरावर Upper Deck Resort चे दिवे चमकताना दिसत होते. दोन वर्षापुर्वी या रीसॉर्ट वर केलेल्या आउट ऑफ ऑफिस कॉन्फ्ररन्सची आठवण येउन गेली.

या जागेवर थोडावेळ थांबुन पुर्ण ग्रुप एकत्र झाल्यावर परत वाटचालीला सुरवात केली, वाट सरळ व जास्त चढउताराची नसल्याने थकवा जाणवत नव्हता, पण वाटेतील लहान मोठया दगडामुळे अंधारत चालताना थोडा त्रास होत होता. लवकरच चालुन चालुन अंगात उष्णता निर्माण झाल्यामुळे सर्वाची जॅकेट्स, स्वेटर्स आनि कानटोप्या सॅकमध्ये रवाना झाल्या. आता थंडी जरासुध्धा जाणवत नव्हती.

मजल दरमजल करत, आकाशातील सप्तर्शी, ध्रुवतारा, उपग्रह, ओळखत आम्ही एका मोठ्या सुक्या ओढ्यावर येउन पोचलो. आता सुक्या असलेल्या या ओढ्याला पावसाळ्यात भरपुर पाणी आसते, कधी कधी हा ओढा ओलांडता देखील येत नाही.ट्रेक लीडर ने इशारा केला, येथे आपण पाच ते दहा मिनीटे थांबणार आहोत. लगेच सर्वांनी आप आपल्या सॅक उघडून खायचे पदार्थ बाहेर काढायला सुरवात केली. आयोजकांकडुन सर्वांना ठेपला आणि स्पेशल छूंदा याचा आहार देण्यात आला. पहाटे चार वाजाता देखील बघता बघता चाळिस ते पन्नास ठॅपल्यांचा सहज फड्शा पडला.

या ब्रेक नन्तर लगेच पुढे चालायला सुरवत केली आणि तासाभरत पुर्ण कडयाला वळसा घालुन, बरेच चढ उतार पार करत राजमाची गावाच्या वेशीवर येउन पोचलो. या येथे एक पडलेला जुना दगडी दरवाजा आहे. असे सांगतात की जुन्या काळी पुर्ण राजमाची गावाला तटबंदी होती आणि सर्वांना या दरवाज्यातुनच प्रवेश करावा लागत असे. येथुनच पुढे थोड्या अंतरावर एका नविन वास्तुची उभारणी चालु होती. विजेरीच्या प्रकाशात बघितले असता समजले कि ते एक गणपतीचे मंदिर होते. जवळच जुन्या पडलेल्या देवळाचे अवशेष दिसत होते. येथुन पुढे अजुन एक पडलेला दरवाजा पार करत लवकरच राजमाची गावात येउन पोचलो.

आयोजकांतर्फे एका दुमजली घरात सर्वांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. चालुन चालुन दमल्यामुळे लवकरच सर्व जण ते सकाळी साडे आठ वाजता उठण्याच्या बोलीवर झोपी गेले. झोप लागते ना लागते तोच एका मोठ्या आवाजाने जाग आली. तो आवाज दुसरा कुठ्ला नसुन बरोबरच्या दोन साथीदारांच्या घोरण्याचा होता. चालुन चालुन दमल्यामुळे दोघंचेही लयीत, रीले रेस लावल्यासारखे लयीत घोरणे चालु होते. त्या घोरण्याला न जुमानता लवकरच झोपी गेलो. जवळपास ९ वाजता जाग आली ती कांदा पोह्यांच्या खमंग सुवासाने. उठुन बाहेर आलो तर समोर श्रीवर्धन व मनरंजन दिमाखात उभे होते. जोरदर वारा सुटला होता. सर्वांनी मग आप आपली आन्हीके उकरली अनि गरम गरम चहा आनि पोह्यांवर ताव मारला.

या पुढचा कार्यक्रम होता, ओळख परेड व श्रीवर्धन या कील्ल्याला भेट देण्याचा.
olakha.jpgओळख परेड

लगेच सर्वांची ओळख करुन पुढे निघालो. हवेत थोडा गारवा होता अन वाट देखिल गर्द झाड्यांच्या सावलीतुन जात होती. जाताना वाटेत डाव्या बाजुला दोन गुहा लागल्या ज्या पाण्याने पुर्ण भरलेल्या होत्या. गावातील बायाबापड्या येथुनच पाणी भरुन घेउन जात होत्या. थोड्याच वेळात आम्ही एका पत्राचे छ्प्पर असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ येउन पोचलो. हे मंदिर दोन्हि किल्ल्यांच्या बरोबर मध्ये आहे. येथुनच डावीकडची वाट मनरंजन किल्ल्याला जाते तर उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्याला जाते. मंदिरासमोरच दोन तीन तम्बु उभारलेले होते. चोउकशी करता कळले कि मुम्बइच्या एका शाळेतील मुले राजमाचीवर रॅपलींग करण्यासाठी आलेली आहेत. त्यांना मागे टाकुन उजवीकडच्या वाटेने श्रीवर्धनवर चढाई करण्यास सुरवात केली. चढ जास्त मोठा नसल्याने लवकरच श्रीवर्धनच्या लपविलेल्या दरवाज्याजवळ येउन पोचलो. दरवाजा पडलेल्या अवस्थेतच होता, दरवाज्याच्या आत पहरेकरयांच्या पडलेल्या देवड्या होत्या. येथुन पुढे अजुन एका कोरीव गुहेजवळ येउन पोचलो. जवळच हिरवे पाणी असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या. येथे दोन तीन ग्रुप फोटो काढुन पुढे श्रीवर्धनच्या व राजमाचीच्या सर्वात उंच जागी येउन पोहचलो.
Guha.jpgगुहा व गँग

किल्ल्याच्या सर्वात उंच जागी असल्यामुळे चहुकडचे बघता येत होते. समोरच बुटका मनरंजन, त्याचा पलीकडे ढाकचा किल्ला व कळकरायाचा सुळका दिसत होता. थोडे नीट बघीतल्यावर ढाकच्या बहिरीची गुहा पण दिसत होती. मनातच परत एकदा ढाकच्या बहिरीला भेट द्यायचे ठरविले. डाव्या बाजुच्या डोंगरवर एक मेल गाडी पुण्याच्या दिशेने जाताना दिसत होती. खाली उल्हास नदिचे लांबवर पसरलेले खोरे दिसत होते. पावसाळ्यात तुडुंब भरुन वाहणारया नदिला फारच थोडे पाणी दिसत होते. मागे वळुन पाहिल्यास समोर थोड्या डाव्या बाजुस वळवण, तुंगार्ली लेक व बराच दुर अंधुक विसापुर किल्ला दिसत होता. समोरच आम्हि रात्री वळसा घालुन चालुन आलेली वाट, थोडया दुर अंतरावर आकाशात थेट घुसलेला डुयकस नोजचा सुळका दिसत होता. या जागी काहि फोटो काढल्यावर उतरुन सर्व जण कील्ल्याच्या बरयापैकी शाबुत तटबंदीवर प्रदक्षिणा घालण्यास निघाले.
dhaak.jpgढाकचा बहिरी

प्रदक्षिणा घालता घालता एका चिलखती बुरुजाजवळ येउन पोचलो. या बुरुजावर बाहेरील बाजुस जाण्यास एक चिंचोळी वाट होती. या वाटेतुन खाली उतरताना एखाद्या छोट्या गुहेत गेल्याचा अनुभव येत होता. ही वाट चिलखती बुरुजाच्या दोन्हि भिंतीमध्ये घेउन जाते. तेथे पोचल्यावर राजगडाच्या संजिवनी माचीच्या बुरजांची आठ्वण झाली. एव्हाना एक वाजला होता व पोटत कावळे ओरडण्यास सुरवात झाली होती. तेथुन बाहेर पडुन कील्ल्याच्या तटबंदीवर चालत चालत बाहेर निघालो. बाहेर पडता पडता मध्येच तटबंदिवर एक मार्ग बाहेर जाताना दिसला. कुतुहल म्हणुन पुढे गेलो तर ती वाट एका अंधारया गुहेजवळ जाउन संपली. गुहा बरयापैकी प्रश्स्त व बरयाच आत जात होती. थोडे पुढे गेलो तर वटवाघुळ्यांच्या लीदेचा वास आला. लगेच मागे फिरुन तट्बंदीमार्गे महादरवाज्या बाहेर पडलो. वाटेत भैरवनाथाचे दर्शन घेउन आल्या वाटेला परत फिरलो. मुक्कामाच्या ठिकाणावर पोहचण्याच्या आधी वाटेत एका टपरीवर दोन ग्लास लिंबु सरबत रीचवले. मुक्कामाच्या ठिकाणावर जेवण्याची तयारी झालेली होती. गरम गरम फ्लॉवर-बटाटा भाजी, चपाती, भात, वरण, पापड, लोणचे चापुन थोडा आराम करण्यास मॅटवर पहुड्लो.
chilkhati.jpgचिलखती बुरुज
buruj.jpgचिलखती बुरुज- प्रवेश

सन्ध्याकाळी ४ वाजता चहा घेउन मनरंजन किल्ल्याला भेट देण्यास निघालो. बरोबरचे काही साथिदार दमल्यामुळे गळाले होते आणि रात्री २८ जणांच्या ग्रुप मधील फक्त १८ जण मनरंजनला जायला निघालो. आमच्या लीडरने घोषणा केली कि आपण नेहमीच्या रुळलेल्या वाटेने न जाता एका वेगळ्या वाटेने मनोरंजन चढणार आहोत. ही वाट मनरंजनच्या डाव्या अंगावरुन चढुन, एक छोटा टॅव्हर्स घेउन मनोरंजनच्या नेहमीच्या वाटेला भेटते. थोड्याच वेळात या वाटेने एका भल्या मोठ्या बुरुजाजवळ येउन पोचलो. किल्ल्यावर जाण्याचा दरवाजा या बुरुजाच्या उजव्या बाजुने आहे. या दरवाज्याने आत जाउन आम्ही सरळ बुरुजाच्या माथ्यावर जाउन पोचलो. जेथुन समोर ज्या वाटेने आलो ती वाट व खाली चिमुकले राजमाची गाव दिसत होते. गावापासुन दुरवर कौडिण्येश्वरचे जुने देउळ व समोरील तलाव दिसत होता. थोडा वेळ बुरुजावर घालवुन उरलेला किल्ला पाहण्यास निघालो. बुरुजावरुन मागे फिरुन पुढे सरळ जाता डाव्या हाताला एक छप्पर नसलेले मोठे बांधकाम दिसते. राजमाचीवरील हेच एक शाबुत असलेले बांधकाम असुन ह्याचा दरवाजा मागच्या बाजुने आहे. दरवाज्यावर गणेश, कमळ, सुर्य, चन्द्र ही शुभचिन्हे कोरलेली दिसत होती. बांधकामाच्या आकारावरुन तो किल्लेदारा वाडा असावा असे वाटत होते.
buruj-manorajnan.jpgबुरुज - मनरंजन
vaada.jpgवाडा - मनरंजन

इथुनच पुढे एक हिरवे पाणी असलेला बांधिव तलाव लागला. तलावाकाठी दोन-तीन शाळुंका नसलेल्या शंकर पिंडिका, भग्न नंदी, काही कोरीव दगड व एक चुण्याच्या घाण्याचा मोठा गोल दगड पडलेला दिसला. तिथुनच पुढे असलेल्या एका सुक्या टाक्याच्या शेजारी सर्वजण सुर्यास्त पाहण्यास बसले. आयोजकांकडुन परत एकदा सर्वांना ठेपला आणि स्पेशल छूंदा याचा आहार देण्यात आला. ढग असल्यामुळे सुर्यास्त काही चांगला दिसला नाही. सर्वजण परत आल्या वाटेने परत निघाले. मुक्कामाला पोचेपर्यन्त गडद अंधार झाला होता.

रात्री गरमागरम पिठलं-भाकरी जेऊन सर्वजण "Dumb Sharrads" खेळायला बसले. एक-दोन डाव होतात तोच लाईट गेले. चोउकशी करता कळले की गावात फक्त दिवसातुन दोनच तास वीज असते, तीही मराविमंची नव्हे तर गावकर्‍यांनी स्वतः बसविलेल्या सोलार लाईट यंत्रणेची. पावसाळ्यात तर ढगांमुळे हि देखिल वीज नसते. सम्पुर्ण गाव चार ते पाच महिने अंधारात असतो. आयोजकांपैकी एकाने लगेच पेट्रोमॅक्स कंदिल आणुन मध्ये ठेवला. त्याच्या उजेडात खेळ परत सुरु झाला. पुढे आलाम आरा, काबुलीवाला, सल्तनत, नटरंग इ. चित्रपटांची नावे घेत खेळ चालला तो सर्वांना झोप येई पर्यन्त.
morning.jpgसुप्रभात

सकाळी लवकर उठुन निवडक जण "ऊदय सागर" तलावावर स्नान करण्यास निघालो. हा तलाव गावापासुन जवळच पाच्-दहा मिनीटे अंतरावर आहे. तलावाच्या काठीच कौडिण्येश्वरचे जुने देउळ आहे. तलावाच्या पाण्यात थोडा वेळ मस्ती व स्नान करुन कौडिण्येश्वराच्या दर्शनास निघालो. हे आटोपशीर देउळ पुर्णपणे दगडी बांधणीचे आहे. असे सांगतात की काही वर्षापर्यन्त हे देउळ अर्धे मातीत गाडलेले होते. गावकर्‍यांच्या प्रयत्नाने आता ते सुस्थितीत आहे. देउळाच्या समोरच एक टाके आहे ज्यात गोमुखातुन थेंब थेंब पाणी पडत होते. समोरच एक कोरीव दगडी स्तंभ उभा केलेला आहे. इथुनच पुढे चालत थोड्या अंतरवर दरीच्या टोकाशी जाता जेते. दरीच्या टोकावरुन उल्हास नदीचे खोरे, मुम्बई-पुणे रेल्वे लाईन, डयुकस नोजचा सुळका, मागे पाहिले असता मनरंजन व श्रीवर्धन दोन्ही बालेकिल्ले यांचे स्पष्ट दर्शन होते. थोडा वेळ तेथे घालविल्यानन्तर सर्व जण मागे फिरुन नाश्ता करुन परत कोंढाणे-कर्जत मार्गे मुम्बईस येण्यास तयार झाले.
udaysagar.jpgऊदयसागर

mandir.jpgकौडिण्येश्वर

raa.jpgराजमाची - बालेकिल्ले

परत येताना आमचा मार्ग कोंढाणे लेण्यांमार्गे सरळ कोकणात उतरणारा होता. ह्या वाटेने जाण्यासाठी सर्वजण राजमाची गावाच्या मागील बाजुस कड्यापाशी येउन जमले. येथुण तीव्र उताराची एक वाट सरळ कोकणात उतरते. प्रमुखातः मातीची असलेली हि वाट पावसाळा सोडुण इत्तर त्रुतुत उतरण्यासाठी सोपी आहे. परन्तु योग्य काळजी न घेतल्यास एक दोन ठिकाणी फसविणारी देखिल आहे. या वाटेने आम्ही जवळपास दहा वाजता उतरण्यास सुरवात केली. सुर्याच्या विरुध्ध बाजुस असल्याने ऊन्हाचा त्रास नव्हता पण वारा जोरदार सुटला होता. हळु-हळु सर्वांनी उतरण्यास सुरवात केली. जागोजागी निळी, सफेद, पिवळी रानफुले दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही एका छोट्या पठारावर येउन पोचलो. येथे एक वाट उजवीकडे जाते, त्या वाटेवरुन पुढे गेल्यास दोन लहान पाण्याची टाकी व जवळच उतारावर एक छोटे देउळ दिसते. आमच्या लीडरच्या मते ही ए़क राबता न राहिलेली कोकणातुन येणारी वाट होती.
raan.jpgरानफुले

हि जागा मागे टाकुन, दोन डोंगर उतरुन परत एका छोट्या पठारावर येउन पोचलो. इथुन आम्हाला डावीकडे कोंढाणे लेण्यांकडे जायला वळायचे होते, पुर्णं ग्रुप जमा झाल्यावर आम्ही डावीकडे वळलो. दहाच मिनीटात एक सुका ओढा ओलांडुन लेण्यांजवळ पोचलो. लेण्यांजवळ ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजचा राष्ट्रिय सेवा योजनेचा एक ग्रुप लेण्यांची सफाई करत होता. त्यांनी जमवलेल्या कचर्‍यात प्लाष्टिक बॉटल्स, पिशव्या, गुटख्याची व सिगारेटची पाकिटे ई. मालमसाला दिसत होता. मनात आले अजुनही आपल्या जन्तेत ऐतिहासिक वारश्याची जपणुक करण्याची मानसिकता निर्माण झालेली नाही. थोडे वाईट वाट्ले.
cave.jpgलेणी

कोंढाण्याची ही बोउध लेणी ख्रिस्तपुर्व सुमारे २०० वर्षांपुर्वी खोदलेली आहेत. यात पुर्ण दगडात खोदलेले एक चैत्यगृह आणि आठ विहार आहेत. डोंगराच्या खालच्या भागात खोदल्याने पाणी झिरपुन लेण्यांची भरपुर नासधुस झालेली दिसत होती. या लेण्यांपासुन बोध घेऊन या नन्तरची कार्ला, भाजे, बेडसे लेणी डोंगराच्या वरच्या भागात खोदली गेली. पावसाळ्यात या लेण्यांवरुन एक सुदर धबधबा खाली कोसळतो.
त्यातल्या त्यात चांगल्या अवस्थेत असलेली लेणी पाहुन, दोन चार फोटो काढुन सर्वजण आल्या रस्त्याने मागे वळुन १५ ते २० मिनीटत खाली कोंढाणे गावात उतरलो.

एव्हाना दोन वाजले होते, गावातील एका घरात सर्वांची भोजन व्यवस्था केलेली होती. तेथे गरम जेवणावर ताव मारुन, सहा आसनी रिक्शाने कर्जत रेल्वे श्टेशनला पोहचलो. प्लॅट्फोर्मवर ३-३३ ची सीएसटी लोकल लागलेलीच होती. ती पकडुन पाच वाजता भांडुप स्थानक आणी सव्वा पाच वाजता घरी पोहचलो. मनात एक सुंदर ट्रेक केल्याचे समाधान होते.......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users