Submitted by पल्ली on 16 December, 2007 - 09:55
फार जुना शब्द एक
आज मला आठवला
जुन्या पुस्तकावरची सारी
धुळ उडवीत बसला.
एकेक पान उघडलं
सारं सारं आठवलं
आठवता आठवता मनात
आभाळ भरुन आलं.
गच्च भरलेल्या ढगानं
हळुच थेंबांना सोडलं,
उघडलेल्या पुस्तकावर
अश्रु बनून सांडलं...
आणि गड्या,
माझं पुस्तक भिजून गेलं!
गुलमोहर:
शेअर करा
सुरेख
आवडली कविता, सहज, छान लिहीलय.
सुंदर
कविता सहज सुंदर मस्त एकदम..!
अप्रतिम
अप्रतिम लिहिलिस कविता. अशीच लिहित रहा.
तु़झे
तु़झे पुस्तक भिजवण्यासाठि पाऊस आला होता का
की तुषार पडले
भापो
सुन्दर लिहितेस
सहज शब्द
सहज शब्द रचना हि तुझि खसियत आहे
छान कविता
छान कविता आहे!
मस्त
मस्त !!!
...............अज्ञात