काश्मीरमधील कालचा दहशतवादी हल्ला – एक सुन्न करणारा अनुभव
कालचा दिवस (२२ एप्रिल २०२५) देशाच्या हृदयाला हादरवून गेला. मी स्वतः जेव्हा ही बातमी वाचली, तेव्हा काही क्षणोंसाठी सुन्नच झालो. जम्मू-काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये, जिथे लोक शांतता शोधायला जातात, तिथे अचानक झालेला गोळीबार, आणि त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे.
एकेकाळी "धरती का स्वर्ग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांततेचे सावट पसरले आहे. कालचा हल्ला काही क्षणांचा नसून, त्या ठिकाणचं शांत वातावरण एकदम रक्तरंजित केलं. बायसरन व्हॅलीमधून घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर अचानक अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अनेकजण त्या क्षणी काही समजायच्या आतच जखमी झाले, तर काहींनी जागीच प्राण गमावले.
या घटनेत भारतातील काही पर्यटकांसोबतच दोन विदेशी नागरिकांचाही दुर्दैवी अंत झाला. हा हल्ला केवळ पर्यटकांवर नव्हता, तो भारताच्या शांततावादी वृत्तीवर होता. "काश्मीर रेसिस्टन्स" नावाच्या एका दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. त्यांच्या मते, हा हल्ला ‘बाहेरून होणाऱ्या वसाहतीं’ विरोधात होता. पण खरं सांगायचं तर, हे केवळ बिनदिक्कत मारणं होतं – निर्दोष, निःशस्त्र, निष्पाप लोकांना मारणं.
पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी यावर कठोर भूमिका घेतली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली आहे आणि शोधमोहीम सुरू झाली आहे. पण इतक्यावरच थांबून चालणार नाही. देशभरातून, सोशल मीडियावरून, कँडल मार्चसह, सर्वत्र एकच मागणी आहे – "दोषींना कठोर शिक्षा व्हावी."
या घटनेनं मला वैयक्तिक पातळीवर खूप विचार करायला लावलं आहे. आपण कुठे चाललो आहोत? आपण ज्याठिकाणी मनःशांती शोधतो, तिथेच अशा घटना घडत असतील, तर आपण खरंच सुरक्षित आहोत का?
आता वेळ आली आहे की, आपल्याला केवळ निषेध नोंदवून थांबायचं नाही, तर सुरक्षेबाबत अधिक जागरूक व्हावं लागेल. शांती ही कमकुवतपणाचं लक्षण नाही, ती मजबूत इच्छाशक्तीची आणि दृढतेची निशाणी असली पाहिजे.
माझ्या या ब्लॉगच्या शेवटी, मी प्रार्थना करतो –
ज्यांनी आपलं आयुष्य गमावलं त्यांना श्रद्धांजली, आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची ताकद मिळो.
तुमच्या भावना, प्रतिक्रिया, किंवा यासंदर्भातील अनुभव कमेंटमध्ये जरूर शेअर करा.
– एक संवेदनशील भारतीय
वाईट घटना आहे. मानवतेला
वाईट घटना आहे. मानवतेला लाजविणार्या या हल्ल्याचा तिव्र निषेध. हत्याकांडाची कसून चौकशी आणि खर्या अपराध्यांना कडक शिक्षा व्हायला हवी.
<< त्यात २६ निरपराध पर्यटकांचा मृत्यू – हा प्रकार केवळ क्रूर नाही, तर मानवतेच्या मुळांवर घाव घालणारा आहे. >>
----- सहमत
आपली यंत्रणा वल्गना करण्यात
.
भुशी डॅम, टायगर पॉईंट सारख्या
भुशी डॅम, टायगर पॉईंट सारख्या थातूरमातूर जागी पण पोलिस उभे असतात, इथे एवढ्या मोठ्या टुरिस्ट स्पॉट ला एकही पोलिस नसणे म्हणजे भयानक अपयश आहे
काश्मीर मधील सामान्य लोकांनी
काश्मीर मधील सामान्य लोकांनी हयाचा मोठया प्रमाणात विरोध करून आम्ही ह्या सोबत नाही हे दाखवून द्यायला पाहिजे.
भुशी डॅम, टायगर पॉईंट सारख्या
भुशी डॅम, टायगर पॉईंट सारख्या थातूरमातूर जागी पण पोलिस उभे असतात, इथे एवढ्या मोठ्या टुरिस्ट स्पॉट ला एकही पोलिस नसणे म्हणजे भयानक अपयश आहे>>>
बैसरन व्हॅलीची तुलना भुशी डॅम आणि टायगर पॉईंट सारख्या थातूरमातूर ठिकाणांशी करुन तुम्ही आपले भौगोलिक अज्ञान दाखवुन दीले आहे. त्या ठिकाणाबद्दल थोडी माहिती मिळवा, शक्य झाल्यास ते बघुन या एवढेच म्हणेन.
दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
तुलना केलेलीच नाहीय्ये, नीट
तुलना केलेलीच नाहीय्ये, नीट वाचा काय लिहिले आहेत
-- टुकारानंद
तुलना केलेलीच नाहीय्ये, नीट
तुलना केलेलीच नाहीय्ये, नीट वाचा काय लिहिले आहेत>>>
वर लिहिलंय ना, त्या ठिकाणाबद्दल थोडी माहिती मिळवा, शक्य झाल्यास ते बघुन या. ते करा आणि मग अपघाताच्या ठिकाणी पोलिस का नसावा? टाईप्स ज्वलंत प्रश्न विचारा.
- मधु मलुष्टे
आकाशानंद, तुम्हला माहिती असेल
आकाशानंद, तुम्हला माहिती असेल तर सांगा. आम्हलाही समजेल. प्रत्यक्ष बघणे सध्यातरी शक्य वाटत नाही.
मी गेल्या आठवड्यात पहलगामला
मी गेल्या आठवड्यात पहलगामला गेले होते. पहलगामला टुरिस्ट पॉइण्ट्सला खासगी लहान वाहने एका मर्यादेपर्यंत नेता येतात. टुरिस्ट गाड्या नेता येत नाहीत. तिथल्या लोकल गाड्या कराव्या लागतात. आम्हालाही करावे लागले. त्याला युनियन
टॅक्सी म्हणतात.
जिथे पर्यटक उतरतात तिथे मेन चोउकीवर पोलिस म्हणजे crpf असतात. पण पुढे ते प्रत्येक ५०मिटरवर नसतात. बातम्यात लिहिलेय तसे लोक वादीत फिरत असताना वगैरे निवडुन निवडुन मारलेय. त्यामुळे तिथे तात्काळ पोलिस नव्हते. बैसारण वादी खुप मोठी आअहे, भरपुर लांबवर फिरता येते. प्रत्येक माणसाच्या मागे पोलिस नसतो. चहुबाजुने डोंगर व जंगल. तिथुन नजर चुकवुन टेररिस्ट येऊ शकतात. पहल्गाममधल्या गुजरांचा यांना पाठिंबा आहे व गुजरांच्या कित्येक पिढ्या तिथल्या जंगलात वावरताहेय, त्यांना जास्त माहिती आहे. त्यातले कोणी मदत करत असतील तर कठिण आहे. मुठभर गद्दारांमुळे पुर्ण समुहाला वेठिला धरता येत नाही. पहलगाम पहिल्यापासुनच दहशतवादासाठी कुप्रसिद्ध आहे ते यामुळेच.
काश्मोरात एकुणच बंदोबस्त फार आहे. गुलमर्ग तर त्यांच्याच आधिfunction at() {
[native code]
}याखाली आहे.
बंदोबस्त असुनही हे घडते कारण चारही बाजुनी जंगल व त्यातल्या छुप्या वाटा. त्यामुळे सरकारने कितीही प्रयत्न केले तरी गद्दार आहेत तोवर दहशतवाद राहणार हे नक्की.
मी २०१३ मध्ये श्रीनगरला गेले होते तेव्हाचा पोलिस बंदोबस्त व आताचा यात थोडा फरक जाणवला. तेव्हा प्रत्येक १०० मिटरवर सैनिक उभा असलेला दिसलेला. आता महत्वाच्या जागी कुमक दिसली. १०० मिटरच्या जागी ५०० मिटरवर असेल पोलिस असे वाटले. चेकिन्ग, बंदोबस्त होताच पण थोडा कमी वाटला. हे होणेही तितकेच गरजेचे आहे. सामान्य लोक किती काळ असे पहार्यात राहणार?
कारण चारही बाजुनी जंगल व
कारण चारही बाजुनी जंगल व त्यातल्या छुप्या वाटा. त्यामुळे सरकारने कितीही प्रयत्न केले तरी गद्दार आहेत तोवर दहशतवाद राहणार हे नक्की. >> १००+
भौगोलिक रचना,डेमोग्राफी आणि काही दशकांचा इतिहास लक्षात घेता दहशतवाद पूर्ण संपवणे हे फार मोठे चॅलेंज आहे.
सिक्युरिटीचे प्रमाण कमी झाल्याचे मलाही जाणवले. पण मला तो पॉझिटिव्ह चेंज वाटतो कारण एक तर सामान्य लोकांना शांतता आवडते आहे. काही घटकांना हे होणे म्हणजे काश्मीर हातातून जाणे याची खात्री आहे. आणि एक आंबा सगळी आढी नासवतो त्याप्रमाणे एक हल्ला प्रगतीला दशकभर मागे नेऊ शकतो.
गुज्जरांपेक्षा मला अनंतनागमधल्या लोकांचा भरवसा वाटत नाही. कारण अनंतनाग जिल्हा दहशतवादाचे एपिसेंटर आहे. तिथे isis चे झेंडे पाहिले होते एके काळी. गुज्जर जनरली भारताच्या बाजूने असतात. अर्थात अपवाद सर्वत्र असतात.
<< काश्मीर मधील सामान्य
<< काश्मीर मधील सामान्य लोकांनी हयाचा मोठया प्रमाणात विरोध करून आम्ही ह्या सोबत नाही हे दाखवून द्यायला पाहिजे. >>
----- हा विचार मनापासून आवडला.
असे खरोखरच व्हायला हवे असे म्हणतांना भारतात जेव्हा धार्मिक कारणावरुन हिंसाचार होतो आणि मुस्लिमांना किंवा ख्रिश्चनांना टार्गेट केले जाते त्यावेळी समस्त भारतीयांनी मोठ्या प्रमाणांत विरोध करुन आम्ही ह्या हिंसाचारा सोबत नाही हे दाखवून द्यायला हवे.
(अ) गुजरात मधे इस्टरला एका चर्च मधे काही गुंडांनी प्रवेश केला. दुसर्याच्या धार्मिक स्थळावर हातात शस्त्रे घेऊन हे शांतता सैनिक कशासाठी गेले होते? किती लोकांनी निषेध केला ?
https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/ahmedabad-bajrang-dal...
(ब) राम नवमी, हनुमान नवमी, होळी, रंग पंचमी , गणपती मिरवणूक अशा विविध कारणांनी वर्षातल्या ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस मिरवणूका काढतांना त्याचा इतर धर्मियांना त्रास होणार नाही याची पण काळजी घ्यायला हवी. मशिदीवर किंवा मुस्लिम व्यक्तीच्या घरावर भगवे फडकविणे, किंवा गुलाल उधळणे, अगदी तिथेच मोठ्मोठ्याने गाणी वाजविणे - थोडक्यांत विविध प्रकाराने त्यांना सतत डिवचत रहायचे. अशा प्रकारांना विरोध होतो ? किती?
(क) मुस्लिम लोकांच्या व्यावसायावर सरसकट बंदी घाला अशा आवाहनाचे व्हिडिओ फिरत आहेत. किती लोक विरोध करतात?
या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मुस्लिमांचे पण मोठे योगदान आहे हे विसरुन चालणार नाही. प्रत्येक धर्मात काही विध्वंसक लोक आहेत. याला अपवाद कुठलाही धर्म नाही. हिंसाचार करणार्यांना धर्म नसतो.
जेव्हा जेव्हा हिंसाचार होईल त्या प्रत्येक घटनेचा शांतताप्रेमी नागरिकांनी निषेध करावा. कायम.
पहलगाम हत्याकांडाची कसून
पहलगाम हत्याकांडाची कसून चौकशी व्हायला हवी आणि कारणीभूत असणार्या दोषी व्यक्तींवर, त्यांच्या master mind वर कारवाई होणे अपेक्षित आहे.
मार्च २००० सालची अध्यक्ष क्लिंटन यांची भारत भेट आणि त्या वेळी छत्तीसिंहपूरा येथे ३८ अधिक शिखांची हत्या झाली होती. आज अमेरिकेचे उपाध्यक्ष भेट देत आहेत, काही साम्यता आहे?
हा लेखही ललितलेखनात आहे.
हा लेखही ललितलेखनात आहे.
एक थिअरी वाचली की पर्यटनातून
एक थिअरी वाचली की पर्यटनातून भरपूर रोजगार निर्मिती होते आहे त्यामुळे खोऱ्यात सामान्य माणसाकडे बर्यापैकी पैसा आला आहे. यामुळे आधीसारखे दगडफेक करायला कोणी तयार नसते.
ह्या हल्ल्यानंतर पर्यटन पुन्हा बंद होईल आणी पैशाची चणचण झाली तर पुन्हा काश्मीर चे लोक हिंसेकडे वळतील.
खूप धक्कादायक आहे हे. भारताने आता लवकरात लवकर काहीतरी अॅक्शन घ्यावी.
या दहशवाद्यांना अत्याधुनिक
या दहशवाद्यांना अत्याधुनिक शस्त्रात्रे घ्यायला पैसा येतो कुठून???
काही काळापूर्वी तर पाकिस्तानात अन्नान्न दशा होती.
साधना, गुज्जर बकरवाल mostly
हल्ल्यातील सर्व मृतांना श्रद्धांजली...
साधना, गुज्जर बकरवाल mostly भारताच्या बाजूचे आहेत. त्यांनीच कारगिलबद्दल आर्मीला कळवले होते.
आणि एक आंबा सगळी आढी नासवतो त्याप्रमाणे एक हल्ला प्रगतीला दशकभर मागे नेऊ शकतो. >>>> खरे आहे.
काश्मीर मधील सामान्य लोकांनी हयाचा मोठया प्रमाणात विरोध करून आम्ही ह्या सोबत नाही हे दाखवून द्यायला पाहिजे >>>>
आज काश्मीरमध्ये उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला गेलाय. गिलानी व इतर Separatists नेते उठसुठ हरताळ करुन सामान्यांना वेठीस धरायचे त्यापेक्षा अगदी उलट प्रतिक्रिया.
पर्यटनाला झळ पोहोचेल व त्यामुळे त्यावर अवलंबून अनेक कुटुंबाना झळ पोहोचेल. पण...
Tourism share is just 8% of GDP of Kashmir.
Over 63% comes from horticulture, 13% from handicrafts. BUT tourism provides vibrancy and visibility.
But it does provide livelihood to many families directly or indirectly associated with tourism.
गेला आठवडा काश्मीरमध्ये आनंदात घालवला. निर्भयपणे बिनधास्त सगळीकडे फिरलो, लोकल्सशी गप्पा मारल्या, Downtown सारख्या एकेकाळी separatism hotbed असलेल्या भागातून तिन्हीसांजेला रिक्षातून गेले. तिथून व जामीया समोरून जाताना traffic मध्ये देखिल अडकले होते. सोबत मामेभाऊ होता. रिक्षावाला त्याचे हरताळ काळातले अनुभव सांगत होता. कसलीच भीती वाटली नव्हती.
आणि एक आठवड्याच्या आत हे असं. काश्मिर भारताच्या बाजूने झुकलेला बघवत नाहीये पलीकडील लोकांना.
ह्यात अजून एक angle हा narco terrorism चा नक्कीच असणार. पर्यटनाचा बाजार उठवला की परत तरुण रिकामटेकडा. मग त्याला ड्रग्जचे व्यसन लावायचे. ड्रगच्या बदल्यात त्याच्याकडून dahashtvadala पोषक कृत्ये करुन घ्यायची. त्यात नीट शिकूनही नोकऱ्या नाहीत कारण industries नाहीत. ज्याची बागायतदारी आहे त्यांच्याकडे बक्कळ पैसा. नाही त्यांनी बागायतदारांकडे अल्प मोबदल्यावर कम करायचे. पोतं भरून पैसा घरी नेणार आणि मजुरांना सांगणार घाटा झालाय... द्यायला पैसे नाहीत. हे तिथल्या लोकल्सनी सांगितले. मग गेल्या काही वर्षांत भरभराटीला आलेल्या पर्यटनात हे लोक पोट भरू लागले. पर्यटन उध्वस्त झाल्यावर मग असे लोक पोटासाठी चुकीच्या गोष्टी करवून घेण्यासाठी available होणार. आणि ह्यासाठी शांत होवू पाहणाऱ्या काश्मीरला पुन्हा रक्तरंजित करायचे. स्वतःची भूमी न वापरता भारताची भूमी वापरून वार करायचे. त्यासाठी टार्गेट्टेड mass killings हा जुना मार्ग निवडला की दोन्ही काश्मिर व उर्वरित भारतामध्ये अजून alienation अगदी सोपे.
आता locals नी त्यांच्यातल्याच OGWs ना expose करायचे आहे. त्यांनी security forces च्या पाठिंब्याने दहशतवाद झुगारायचा आहे.... जर त्यांना शांत normal जीवन जगायचे असेल तर. भारताला इजा पोहोचवण्यासाठी काश्मीरचा वापर झाला, होतो आहे आणि होणार आहे.
अतिरेक्याना धर्म नसतो, हिंदु
अतिरेक्याना धर्म नसतो, हिंदु सण, रामनवमी, हनुमान जयंती वैगेरे गोष्टी प्रतिसादात घुसडुन प्रसंगाच गांभिर्य घालवत आहेत.>>>>>
हिंदुच वाईट म्हणुन नाईलाजाने मुस्लिमांना वाईटपणा करावा लागतो ही रेकॉर्ड खुप जुनी आहे. ती वापरुन वापरुन इतकी घासली की त्याची परिणीती २०१४ निर्माण होण्यात झाली. अजुनही ती रेकॉर्ड संधी मिळेल तशी वापरली जाते.
अश्विनीने लिहिलेय त्याच्याशी सहमत. काश्मिरमधल्या भारतिय लोकांनीच आता function at() {
[native code]
}इरेक्यांना धडा शिकवला पाहिजे. त्यांचे जीवन हलाखीचे आहे, त्यांनाही स्वतंत्र भारतात इतर भारतियांसारखे सामान्य जीवन जगायचा हक्क आहे. कालचा हल्ला त्यांना १० वर्षे मागे घेऊन गेलाय. आजवर पर्यटक निर्धास्त मनाने जात होते. काही झाले तरी पर्यटकांना कोणी त्रास्देणार नाही हा विश्वास होता. त्यालाच काल तडा गेला. तो विश्वास परत मिळवायला काश्मिरला खुप मेहनत करावी लागणार.
दरवर्षी काश्मीरवर ३५-४० हजार
दरवर्षी काश्मीरवर ३५-४० हजार करोड खर्च होतात, आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की पंचस्तरीय सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेकी २००km आत आले! नी परत गेलेही! कसे? , पुलवामाचे सत्य अजून बाहेर आले नाही! आपण सरकारला प्रश्न कधी विचारणार? की फक्त हिंदू मुस्लिमच करणार?
सरकारला प्रश्न विचारायचे तर
सरकारला प्रश्न विचारायचे तर लोकांमध्ये एकी हवी. इथे लोकच प्रो व अँटी ग्रुप मध्ये राहुन एकमेकाना प्रश्न विचारत बसतात. धारेवर धरायचे ते लोक प्रतिनिधिंना. पण लोक एकमेकांवर जहरी टीका करण्यात आपली ताकद खर्च करतात. लोक प्रतिनिधी सुशेगाद राहतात.
असो, धागा ललितलेखनातुन हलवा.
>>पुलवामाचे सत्य अजून बाहेर
>>पुलवामाचे सत्य अजून बाहेर आले नाही! आपण सरकारला प्रश्न कधी विचारणार? की फक्त हिंदू मुस्लिमच करणार?<<
नॉर्मली, अशा दुर्घटने नंतर संपुर्ण देश एकत्र येतो.. यायला हवा राजकिय द्वेष्/दुश्मनी विसरुन. आपल्यात ती मचुरिटी कधी येइल?
maturitity आहे म्हणून तर
maturitity आहे म्हणून तर विचारतोय! नाहीतर मिपण मुस्लिमद्वेष करत नसतो के बसलो?
Ministry of external affairs
Ministry of external affairs brief
1. Atari border closed with immidiate effect
2. Indus water treaty held in abeyance
3. No SAARC visas for pak nationals
4. All pak officers in Pakistan consulate to leave India within 48 hrs with their staff
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh/pahalgam-terror-attack-survivor-kal...
या देशात सुरक्षित राहायचे तर कलमा पाठ करून घ्या. कोणी वाचवू शकत नाही.
दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म
दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून मारले.
धर्म ओळखता यावा म्हणून सर्वांना कलमा बोलायला लावले.
एक हिंदू प्रोफेसर ज्याला कलमा पाठ होते तो वाचला.
गूगल केले तर खालील लिंक वर कलमा सापडतील.
https://www.islaminhindi.com/2021/06/six-kalima-in-hindi.html?m=1
फेसबूकवर पोस्ट पाहिल्या ज्यात हिंदूना आवाहन केले होते की आता धर्म विचारून तुम्ही सुद्धा त्यांच्या व्यवसायावर बहिष्कार टाका.
अश्या आवाहनाना फसू नये. अन्यथा हा दहशतवाद्यांचा विजय ठरेल. त्यांना तेच हवे असते. सर्व भारतीय नागरिकांमध्ये दहशत का माहोल.
सिंधु पाणी करार काही
सिंधु पाणी वाटप करार काही काळापुरता थांबवला हा निर्णय पाकिस्तानला चांगलाच महागात पडेल, विशेषतः पंजाब प्रांतात. पाकिस्तानी आर्मी व समाजाचा एलिट क्लास बराचसा पंजाब प्रांतातून येतो आणि जमीन धारणा कायदा वगैरे नसल्याने या वर्गाकडे हजारो एकर सुपीक जमीन आहे.
भारताने बरीचशी धरणं बांधून याची तयारी केलीच आहे. पाणी पूर्णपणे थांबवता येणार नाही पण १०-२० % पाणी अडवले तरी पंजाबातील शेतीवर फरक पडू शकतो.
सिंधु पाणी करार काही
डुप्लिकेट पोस्ट
Terror Attack in Kashmir -
Terror Attack in Kashmir - Terror Has a religion : https://www.youtube.com/watch?v=i95CFWWkvas - Adam Seeker Hindi लाईव सुरू आहे.
सुधारणा केली आहे. टीव्ही बघत
सुधारणा केली आहे. टीव्ही बघत टाईप करत होते तर लक्षात आले नाही
दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म
दहशतवाद्यांनी नाव आणि धर्म विचारून मारले. >>> अगदी अगदी. हिंदू धर्म विचारुनच मारलं आहे.
आपल्या गुप्तचर संघटनेला काहीच
आपल्या गुप्तचर संघटनेला काहीच सुगावा लागला नाही का, हेही मनात येतंय.
Pages