मभागौदि २०२५ शशक - रिपुदम-न - मामी

Submitted by मामी on 22 February, 2025 - 21:18

"मी, डॉ. जमदग्नी म्हणजे कोण आहे हे दुनियेला माहित आहे कामिनी. माझ्या कर्तृत्वावरच तर तू भाळलीस ना?"
"हो आणि तुम्ही माझ्या सौंदर्यावर! "
"अलबत! आणि अजूनही तुझ्या सौंदर्याचा लोभ सुटलेला नाही हे ही तुला माहित आहे. "
"इश्श्य! ते मी जाणते की पण तुमच्या आजूबाजूला इतक्या ललना वावरत असतात की कधी कधी माझा मत्सराग्नी जागृत होतो. "
"साहजिकच आहे गं. जिथे प्रेम तिथे मत्सर असणारच. "
"आणि जिथे कर्तृत्व तिथे क्रोधही आहे म्हटलं. "
"हा! हा! हा! मान्य!!!"
"खरं सांगू, मनुष्यस्वभावात षड्रिपु असणारच. फक्त त्यांवर मात करता यायला हवी. अगबाई, बेल वाजली. आपले लव-कुश आले वाटतं. थांबा दरवाजा उघडते."
.
दरवाज्यात उभे होते - मद-न आणि मोह-न !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त मामी.
अगदी सगळ्या रिपुंना मस्त गुंफलय.
आवडली शशक.

आवडली!
बाकी ठीक आहेत पण मद-न आणि मोह-न यांना काबूत ठेवणं का कठीण असतं ते ही बरोबर समजलं. Happy

कल्पकरित्या गुंफलीय
फक्त जमदग्नी आणि कामिनी हा संदर्भ लक्षात येत नाहीये.
मी जमदग्नी हे परशुराम ह्यांचे वडील असे वाटून विचार करतोय.

अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद मंडळी.

@झकासराव
जमदग्नी ऋषी कोपिष्ट होते म्हणून ते नाव वापरलं आहे. कामिनी म्हणजे सौंदर्यवती $**¥ स्त्री म्हणून ते नाव वापरलं आहे.

मामी ok
तो ही अंदाज होताच पण काही पौराणिक संदर्भ निसटू नये म्हणून विचारले