India's got latent - चला निषेध नोंदवूया.
India's got latent अश्या नावाचा एक कार्यक्रम येतो.
कुठे येतो कल्पना नाही. पण फेसबूक, इन्स्टा, युट्यूब वर शॉर्ट आणि रिल्स स्वरूपात याचे व्हिडिओ मुबलक बघावयास मिळतात.
Latent या शब्दाचा अर्थ काय मला माहीत नाही. मी आधी ते टॅलेंट समजूनच याचे काही एपिसोड बघितले. एक दोन फनी वाटले म्हणून अजून काही एपिसोड बघितले तसे वरचेवर दिसू लागले. आणि हळूहळू त्यांचा ठेवणीतील 18+ स्टॉक समोर येऊ लागला. मग मात्र मी न बघण्याची काळजी घेऊ लागलो कारण मोबाईल मुलांच्या हातात सुद्धा जातो.
तरीही अध्येमध्ये याचे व्हिडिओ नजरेस पडायचेच. आणि रिल बघने हे असे व्यसन आहे की जे समोर येईल ते झोप उडवून बघितले जाते.
गेल्या आठवड्यात मात्र हादरवून टाकणारे व्हिडिओ नजरेस पडले. मुले मुली एकत्र बसले आहेत आणि एकमेकांची खेचणे म्हणजे रोस्ट करणे या नावाखाली काहीही अश्लील शब्दफेक चालू आहे. म्हटले हे तर फार वाया गेलेले प्रकरण आहे. दूर राहिलेलेच चांगले.
आणि आज त्यांनी काहीतरी मोठे कांड केले, अश्लील टिप्पणीचा कळस गाठला ज्या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसले.
बातमी काय हे शोधले तर खरेच किळस वाटावे आणि युवा पिढीची चिंता वाटावी असे एकेक व्हिडिओ समोर आले.
चिंता यासाठी वाटली कारण ज्याने आज हे कांड केले त्या Ranveer Allahbadi याला नरेंद्र मोदींच्या हस्ते National creater award असा पुरस्कार मिळाला आहे.
चिंता यासाठी वाटली कारण हा शो जो चालवतो तो समय रैना नावाचा मुलगा अमिताभच्या कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात आला होता आणि अमिताभ त्याच्या विनोद बुद्धीचे कौतुक करतl होता.
चिंता यासाठी वाटली कारण ही मुले एकीकडे आदर्श म्हणून समोर आणली जात आहेत तर तेच दुसरीकडे चुकीचा आदर्श ठेवत आहेत.
कोण बनेगा करोडपतीमध्ये या समय रैना सोबत एक तन्मय भट म्हणून मुलगा आलेला. जर मी चुकत नसेल तर यालाच मी कित्येक वर्षांपूर्वी एआयबी रोस्ट या कार्यक्रमात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करन जोहर या बॉलीवूड कलाकारांसोबत अश्लीलतेची निचतम पातळी गाठताना पाहिले होते.
आज India's got latent ची बातमी पाहिल्यावर तो कार्यक्रम आठवला कारण मी त्यावेळी देखील मायबोलीवर धागा काढला होता. आणि धक्का तेव्हा बसलेला जेव्हा काही लोकं त्या कार्यक्रमाचे कौतुक करत होते, तर कित्येक जण आपल्याला काय त्याचे म्हणत होते. उलट रुचत नाही तर आपण असले कार्यक्रम बघू नये हा उपाय सुचवत होते.
तो धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/52596
आज पुन्हा मायबोलीवर धागा काढला कारण आज "आपल्याला काय त्याचे?" म्हणावे अशी परिस्थिती उरली नाहीये. आज कॉलेज जाणारया प्रत्येक मुलाकडे मोबाईल असतो तर शाळेत जाणाऱ्या मुलांचे सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट असते. आणि त्यांनाही हे व्हिडिओ कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय बघायला उपलब्ध असतात.
मुळात लहान मुलांनीच काय पुरेशी अक्कल न आलेल्या कुठल्याही तरुणांनी असे व्हिडिओ बघू नयेत असे वाटते.
सोशल मीडियावर सर्रास दिसणाऱ्या या कंटेंटवर काही निर्बंध असावेत असे वाटते.
म्हणून आज संधी मिळाली आहे तर निषेध नोंदवतो!
6000?? जोक ही तो है...
6000?? जोक ही तो है....मुस्कुराईये आप नये इंडिया मे है.
सर म्हणजे बाजी प्रभू किंवा
सर म्हणजे बाजी प्रभू किंवा मुरार बाजी प्रमाणे आहेत. मुंडी तुटली तरी दोन्ही हातानी दांडपट्टा फिरवत अनेक धाग्यांवर प्रतिसादांचा समाचार घेत आहेत. ते अष्टावधानी जैन साधू असतात्त तसेच. सर तुसी ग्रेट!
(No subject)
200
200
हे दिसल्याशिवाय सर थांबणार नाहीयेत.
खरं तर शर्माजींना क्रिकेटमधून
खरं तर शर्माजींना क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर रैनाजींचा शो हा एक उत्तम करियर ऑप्शन होता.
>>>>>>>>
त्याला अजून बरीच वर्षे आहेत. तोपर्यंत जग आणखी पुढे गेले असेल. बरेच नवीन ऑप्शन तयार झाले असतील.
अहो पण त्या पुस्तकात हिंदू
अहो पण त्या पुस्तकात हिंदू देवांची टवाळी करण्यात आली आहे, ते तुम्हाला चालले असते का? मग माझ्या भावनांचे काय?
>>>>>
मी नास्तिक आहे. पण हे पुस्तक वाचले तेव्हा आस्तिक होतो. मला नाही वाटत त्या पुस्तकानी भावना दुखावल्या असत्या..
असो, जी गोष्ट झालीच नाही त्यावर होऊ शकते म्हणून कुठे विषय खेचता.. सोडून देऊया
तसेही त्या पुस्तकाची आणि या कार्यक्रमाची तुलना होऊ शकत नाही.
पण खजुराओ आणि वासूनाका
पण खजुराओ आणि वासूनाका ह्यांचे काय?
वासूनाका वाचले तर रैनाला झीट येईल.
ब्रेकिंग न्यूज. सरांनी एक
ब्रेकिंग न्यूज. सरांनी एक पुस्तक वाचले आहे.
१८९
१८९
१९०
१९०
माझ्या कडून दोन प्रतिसादांचे योगदान
लोकसत्तेचा अग्रलेख - कृती,
लोकसत्तेचा अग्रलेख - कृती, संस्कृती , विकृती
हल्ली निखळ विनोद निखळपणे
हल्ली निखळ विनोद निखळपणे घेतले जात नाही आणि बीभत्स विनोदाला सपोर्ट दाखवला जातो.
सपोर्ट दाखवणे म्हणजे काय ? इथे कुणी सपोर्ट दाखवला आहे ? एखाद्या फडतूस विनोदावर सर्व यंत्रणांनी आपापली कामे सोडून छाती पिटत बसू नये असे म्हणणे म्हणजे सपोर्ट दाखवणे आहे का ? बीभत्स ची व्याख्याही सापेक्षच ना ?
व्यक्तिशः मला वरील विनोदापेक्षा दिल्लीच्या भावी मुमं नी केजरीवाल यांच्यावर केलेला विनोद ( खरा असेल तर) जास्त आक्षेपार्ह वाटतो.
१९३
१९३
एखाद्या फडतूस विनोदावर सर्व
एखाद्या फडतूस विनोदावर सर्व यंत्रणांनी आपापली कामे सोडून छाती पिटत बसू नये असे म्हणणे म्हणजे सपोर्ट दाखवणे आहे का>>>
तुम्ही निषेध व्यक्त केला नाहीत म्हणजे तुमचा सपोर्ट आहे असं गृहीत धरतात सर आणि जे काही लिहिलंच नाही आपण ते लिहिलं आहे हे स्वतःच ठरवून त्यावर प्रतिसाद देतात
आणि आपण ते मान्यही केलंही
आणि आपण ते मान्यही केलंही असंही लिहितात..
सपोर्ट दाखवणे म्हणजे काय ?
सपोर्ट दाखवणे म्हणजे काय ? इथे कुणी सपोर्ट दाखवला आहे ?
>>>
इथे असे कुठे लिहिले आहे का?
एकाच प्रकरणात वेगवेगळे एफ आय
एकाच प्रकरणात वेगवेगळे एफ आय आर्, तेही वेगवेगळ्या राज्यांत नोंदवायचे हे निव्वळ त्रास देण्यासाठी केलं जातं. मग सगळे एफ आय आर एकत्र करा, अटकेपासून संरक्षण द्या म्हणून त्या लोकांना सर्वोच्च न्यायालयात धावावं लागतं. न्यायाधीश काय, अशा लोकांना अटकेपासून संरक्षण द्यायला तयारच असतात. फी म्हणून थोडं प्रवचन देतात, रागावल्यासारखं करतात. बीअर बायसेप्स पाठोपाठ आशिष चंचलानी.
मग न्यायालयांना महत्त्वाच्या खटल्यांकडे आणि प्रसारमाध्यमं व जनतेला खर्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येतं.
वरुण ग्रोवर - व्हिडियो
वरुण ग्रोवर - व्हिडियो रेकॉर्डिंगची परवानगी नाही
वरुण ग्रोवर - व्हिडियो
वरुण ग्रोवर - व्हिडियो रेकॉर्डिंगची परवानगी नाही
२००!
२००!
अभिनंदन.
समय रैनाचे कॅनडा मधले हाउसफूल
समय रैनाचे कॅनडा मधले हाउसफूल आहेत, लोकांचा प्रचण्ड प्रतिसाद मिळतो आहे.
कॅनडा भारताचा शत्रू आहे.
कॅनडा भारताचा शत्रू आहे. जळ्ळा मेला ट्रुडो.
Pages